राज्य सरकार गृहपाठ बंद करण्याच्या तयारीत दीपक केसरकर यांची माहिती| rajya sarkar gruhpath bund karnyachya tayarit dipak kesarkar yanchi mahiti
इयत्ता पहिली ते चौथी विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण कमी करून त्यांना आनंददायी शिक्षण घेण्यासाठी राज्य सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तो निर्णय म्हणजे राज्य सरकार विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याच्या तयारीत आहे.
राज्य सरकार गृहपाठ बंद करण्याच्या तयारीत! |
गृहपाठ बंद निर्णय माहिती (toc)
गृहपाठ बंद करण्याविषयी शिक्षणमंत्री केसरकर यांचे मत |gruhpath bund karnyavishyi shikashanmantri kesarkar yanche mat
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, राज्य सरकार लहान विद्यार्थ्यांचा म्हणजे जे प्राथमिक शिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याच्या तयारीत आहे. याविषयी सूतोवाच केले. शिक्षण मंत्री दीपक केसरकर असे म्हणाले की पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना घरी गेल्यानंतर अभ्यासाचा ताण नसावा, कारण शाळेमध्ये शिक्षक जे शिकवतात ते शिक्षण जर व्यवस्थित मिळाले तर त्यांना घरी जाऊन अभ्यास करण्याची आवश्यकता भासणार नाही आणि लहान वयामध्येच त्यांच्यावरती जो एक ताण येतो. त्या तानापासून विद्यार्थ्यांची सुटका होईल.
गृहपाठ बंद करण्याविषयी मते नोंदवण्याची संधी| gruhpath bund krnyavishyi mate nondvnyachi sandhi
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जरी गृहपाठ बंद करण्याविषयी मत मांडले असले तरी याबाबत अंतिम असा निर्णय झालेला नाही, ते पुढे म्हणाले की याबाबत आम्ही संस्थाचालक शिक्षक पालक यांच्याशी चर्चा करू त्यांची मते नोंदवू आणि मगच निर्णय घेऊ.
या अगोदर देखील दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचा बोजा कमी करण्यासाठी पुस्तकांमध्येच काही पाने वहीची दिली जातील म्हणजे विद्यार्थ्यांना वेगळ्या वही घ्यावी लागणार नाही.साहजिकच दप्तराचा बोजा कमी होईल याबाबत देखील अभ्यास सुरू आहे.अशी माहिती दिली होती.
थोडक्यात आपले सध्याचे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी अनेक पर्याय चाचपून पाहत आहेत हे नक्की. परंतु हे सर्व करत असताना शिक्षण तज्ञांशी देखील चर्चा करून योग्य असे निर्णय घेण्यात यावेत. कारण बऱ्याचदा एखादा निर्णय घेतल्यानंतर देखील त्या निर्णयांमध्ये पुन्हा बदल करावे लागले आहेत. याचा अनुभव राज्य सरकारला याआधी देखील आलेला आहे.
उदाहरण द्यायचे म्हटले तर इयत्ता दहावीचे तोंडी परीक्षेचे गुण कमी करण्यात आले होते.परंतु त्यावर विचारून विद्यार्थ्यांचा जर भाषिक विकास, अभिव्यक्ती विकास आपल्याला करायचा असेल तर तोंडी परीक्षा किंवा अंतर्गत गुण दिलेच पाहिजेत.असा निर्णय पुन्हा घ्यावा लागला होता.सांगण्याचे तात्पर्य असे की कोणताही शिक्षण क्षेत्रातील निर्णय घेत असताना त्या अगोदर सर्व पातळीवर त्याबाबत विचार मंथन झाले पाहिजे.
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद होणार! या निर्णयाच्या बाबतीत देखील अगोदर सर्व मतमतांतरे पाहूनच निर्णय घ्यायला हवा. चला पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह.तोपर्यंत धन्यवाद!
आमचे हे लेख वाचा
- माणूस पैश्यात सुख बघतो पण नेमके सुख काय एकदा क्लिक करा नि समजून घ्या
@ मुले अभ्यास करत नाहीत हा लेख वाचून दाखवा