Type Here to Get Search Results !

शिक्षक दिन बातमी लेखन मराठी | shikshak din batmi lekhan marathi

शिक्षक दिन बातमी लेखन मराठी| shikshak din batmi lekhan marathi |batmi lekhan in marathi

आजच्या लेखात आपण शिक्षक दिन बातमी लेखन मराठी पाहणार आहोत.
आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर काही ठराविक घटक ,विषय हे बातमी लेखनासाठी ठरलेले आहेत जसे की, स्वातंत्र्य दिनाची बातमी तयार करा, पर्यावरण दिनाची बातमी तयार करा, गांधी जयंतीची बातमी तयार करा याचबरोबर वारंवार एका विषयावर बातमी तयार करायला सांगितले जाते. कारण तो शैक्षणिक वर्षातील एका अतिशय महत्वाचा दिवस आहे. तो म्हणजे शिक्षक दिन बातमी लेखन मराठी होय. म्हणूनच आज teachers day news ,report writing in marathi हा विषय घेतलेला आहे. शिक्षक दिनाची बातमी तयार करण्या अगोदर बातमी लेखन म्हणजे काय?आणि बातमी कशी लिहावी? तिचे स्वरूप आपण अभ्यासूया. मग शिक्षक दिनावरची बातमी लिहूया.
शिक्षक दिन बातमी लेखन मराठी
शिक्षक दिन बातमी लेखन मराठी

शिक्षक दिन बातमी (toc)

शिक्षक बातमी लेखन मराठी | batmi lekhan in marathi

अगोदर बातमी म्हणजे काय पाहू.

"बातमी लेखन म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर ती जशीच्या तशी वाचकांसमोर मांडणे होय."

वरील व्याख्येतून स्वरूप स्पष्ट होत नाही, म्हणून आपल्याला त्यामध्ये काही भर घालावी लागते आणि मग तिला पण बातम्या असं म्हणू शकतो.

" दैनंदिन घटनांमधील विशेष अशी घटना म्हणजे बातमी होय"

उदा.
इतिहासात पहिल्यांदाच घरोघरी फडकणार तिरंगा.


बघा वरील बातमीचा मथळा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आले असेल की ही एक विशेष घटना आहे,कारण या अगोदर सरकारी कार्यालय शाळा यांच्यावरतीच तिरंगा झेंडा फडकत होता, परंतु अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे यावर्षी मात्र घरोघरी तिरंगा अशी मोहीम राबविण्यात आली. होती साहजिकच ही घटना म्हणजे विशेष घटना म्हणून तिला बातमीचे स्वरूप मिळाले.


तर आपल्या ध्यानात आले असेल की जी, घटना वास्तव आहे व विशेष आहे अशा घटनेच्या बातमीमध्ये समावेश होतो. आज आपण शिक्षक दिन बातमी मराठी पाहणार आहोत.  मराठीमध्ये शिक्षक दिनाची बातमी कशी लिहायची? हे पाहण्या अगोदर बातमी लेखन करत असताना काही बाबींवर आपल्याला लक्ष केंद्रित करावे लागते. त्या बाबी थोडक्यात समजून घेऊया. म्हणजे आपली शिक्षक दिनाची बातमी अतिशय सुंदर होईल.


बातमी लेखन महत्वाचे मुद्दे | batami lekhan mhtvachemudde


1.बातमीचा मथळा | batmicha mathla

आपल्याला बातमी लेखन करीत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बातमीचा मथळा याचाच अर्थ बातमीचे शीर्षक. हे शीर्षक तयार करत असताना आपल्याला विशिष्ट अशा शब्दांची रचना करावी लागते.की जो मथळा वाचकांचे लक्ष आकर्षित  करेल. ती बातमी सर्वांनाच वाचावीशी वाटेल. असा मथळा असावा. तसेच त्या मथळ्यामध्ये क्रियापद वापरू नये वाचकांचे लक्ष केंद्रित करणारा असा मथळा असावा.
उदा.

  शेतकऱ्याचा मुलगा झाला कलेक्टर.


वरील बातमीचे शीर्षक वाचल्यानंतर ही बातमी शेतकरी आवर्जून वाचतील कारण प्रत्येकाला वाटते माझ्या मुलाने देखील असे काहीतरी वेगळे करावे, शेतकऱ्यांची मुले देखील या बातमीवर फोकस करतील जर आमच्यातीलच एक कलेक्टर झाला तर आम्ही का नाही हा प्रश्न त्यांना पडेल, शिक्षक वकील जे आपल्या पाल्याच्या शिक्षणाविषयी दक्ष असतात त्यांना देखील ही बातमी हवी हवीशी वाटेल.जर शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला तर आमचा नक्कीच होऊ शकतो.ही भावना त्यांच्या मनात येईल. आणि ते देखील बातमी वाचतील म्हणूनच बातमीचे शीर्षक हे अतिशय साधे सरळ आणि वाचकांना आपल्याकडे खेचून घेणारे असावे.(batmi lekhan in marathi)


2. दिनांक व स्थळ | dinanak v sthal,thikan

या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे , दिनांक टाकत असताना विद्यार्थ्यांनी परीक्षेला आपण कोणत्या तारखेला आहोत याचा विचार न करता आपल्याला कोणत्या विषयावर बातमी द्यायची आहे.याचा विचार करणे जास्त गरजेचे आहे बऱ्याचदा अनेक विद्यार्थी आपल्या परीक्षेचा दिनांक बातमीला देतात आणि आपले गुण गमावतात.
बातमीचा दिनांक देत असताना ती बातमी कोणत्या विषयासंदर्भात आहे तो दिवस कोणता आहे हे विचारात घेऊन बातमीचा दिनांक द्यावा.त्याचबरोबर आज घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी बातमी वर्तमानपत्रांमध्ये येत असते हे कायम लक्षात ठेवावे.

उदा.

समजा आपल्याला परीक्षेमध्ये स्वातंत्र्य दिनाची बातमी तयार करायला सांगितली तर आपण स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो, म्हणून आपली बातमी वर्तमानपत्रांमध्ये 16 ऑगस्ट रोजी छापली जाणार हे पक्के. लक्षात ठेवावे त्याचबरोबर पर्यावरण दिनाची बातमी आपल्याला आली तर 5 जून हा पर्यावरण दिन आहे तर आपली बातमी वर्तमानपत्रांमध्ये 6 जूनला छापली जाणार हे पक्के लक्षात ठेवा. बरेच विद्यार्थी या ठिकाणी चुका करतात.


3. बातमीचे ठिकाण आणि स्त्रोत | batmiche thikan ani stort


आपण मथळा लिहिल्यानंतर खालच्या ओळीला दिनांक लिहितो आणि त्या दिनांक पुढे आपल्याला बातमी कोणत्या ठिकाणी घडली ते ठिकाण लिहायचे असते.

उदा. कांदिवली

त्याचबरोबर बातमी कोण देत आहे? ही माहिती कोणी मिळवली? हे समजण्यासाठी आमच्या वार्ताहराकडून हा शब्द लिहायला विसरू नका.

आतापर्यंत आपण मथळा हा जाड ठळक अक्षरात त्याखाली दिनांक ही त्या दिवसाच्या औचित्य साधणारी आणि त्यापुढे ठिकाण आणि माहितीचा स्त्रोत इथपर्यंतचा भाग पाहिला हे लक्षात ठेवा.


4. बातमीचा शिरोभाग | batmicha shirobhag

बातमीचा शिरोभाग याचा अर्थ बातमीची सुरुवात आपल्याला बातमी लेखन करीत असताना साधारणपणे तीन परिच्छेदांमध्ये बातमी लिहायचे असते.


बातमीचा पहिला परिच्छेद

हा भाग बातमीचा शिरोभाग नावाने ओळखला जातो. शिरोभाग तीन ते चार ओळींचा असावा यामध्ये संपूर्ण घटना/बातमी काय आहे असे महत्त्वाचे शब्द असावेत.


बातमीचा दुसरा परिच्छेद

यामध्ये बातमी जशी घडली त्या पद्धतीने सविस्तर वर्णन करावे परंतु ते वर्णन करत असतानादेखील महत्त्वाच्या बाबीच नोंदवाव्यात साध्या साध्या गोष्टी सांगून बातमी पाल्हाळ करू नये.


बातमीचा तिसरा परिच्छेद

शक्यतो दोनच परिच्छेदात बातमीला परंतु जर तिसरा परिचित केला तर कार्यक्रम कशा पद्धतीने संपला किंवा संपन्न झाला याविषयी वाक्य असावे.

थोडक्यात बातमी लेखन करत असताना बातमीचा मथळा दिनांक ठिकाण स्त्रोत आणि सर्वात शेवटी तीन परिच्छेद अशा पद्धतीने आपण बातमी लेखन केल्यास आपल्याला बातमी लेखनामध्ये चांगले गुण मिळतील.


शिक्षक दिन बातमी लेखन मराठी |shikshak din batmi lekhan in marathi

आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. शिक्षक दिन बातमी लेखन मराठी करत असताना आपल्याला देखील शिक्षक दिन कधी असतो? तर 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो, म्हणून शिक्षक दिन बातमी वर्तमानपत्रांमध्ये देत असताना आपल्याला सहा सप्टेंबर हा दिनांक टाकावा लागेल.त्यापुढे ठिकाण आणि आमच्या वार्ताराकडून अशी नोंद करावी लागेल. चला तर मग आपण शिक्षक दिन बातमी लेखन मराठी हा एक नमुना पाहूया. ज्यावरून तुम्ही तुमच्या शाळेतील शिक्षक दिनाची बातमी तयार करू शकता.


शिक्षक दिन बातमी लेखन मराठी नमुना |shikshak din batmi lekhan marathi namuna

या ठिकाणी मी आपणास शिक्षक दिन बातमी लेखनाचा मराठी नमुना देत आहोत.याच पद्धतीने आपण आपल्या शाळेची नावे टाकून आपल्या शाळेत ज्या पद्धतीने घडामोडी घडल्या त्या डोळ्यापुढे ठेवून आपल्या शाळेच्या शिक्षक दिनाची बातमी तयार करावी ही विनंती. आपल्याला परीक्षेमध्ये खालील प्रमाणे प्रश्न विचारला जातो तो अगोदर समजून घ्या.

प्रश्न , तुमच्या शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा झाला त्याची सुंदर बातमी तयार करा.


शिक्षक दिन बातमी लेखन याविषयी वरील प्रमाणे प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर ती बातमी आपण प्रत्यक्ष पाहूया.


शिक्षक दिन बातमी लेखन मराठी| shikshak din batmi lekhan marathi


अशोक नगर मनपा माध्यमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात संपन्न

6 सप्टेंबर:कांदिवली, मुंबई ( आमच्या वार्ताहराकडून)


5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. अशोक नगर मनपा माध्यमिक शाळा कांदिवली पूर्व या ठिकाणी देखील 5 सप्टेंबर रोजी स्थानिक नगरसेवक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.


शिक्षक दिनाच्या दिवशी एक वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना दिला जातो.अगदी तसाच अनुभव अशोक नगर शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील देण्यात आला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी  शिक्षकांची सर्व कामे वाटून घेतली. एवढेच नव्हे तर शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातील भूमिका काही विद्यार्थ्यांनी पार पाडल्या.थोडक्यात 5 सप्टेंबर या दिवशी सर्व शाळा विद्यार्थी शिक्षकांनी चालवली. शिकवणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांसाठी व  शिकणाऱ्या इतर  विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळा अनुभव होता. सकाळी साडेसात ते बारा या वेळामध्ये विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापन केले ,त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनोगताचा कार्यक्रम पार पडला.  या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक राजेश पाटील उपस्थित होते. यांनी देखील शिक्षक दिनाच्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर एक दिवसाचे विद्यार्थी शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सारिका भोर यांनी अध्यक्षीय भाषण करून विद्यार्थ्यांना आता समजले असेल की शिक्षकांना त्रास देणे कसे चुकीचे आहे ! हे वाक्य ऐकून सर्व विद्यार्थी गप्प झाले. सर्व विद्यार्थ्यांनी शब्द दिला की, यापुढे आम्ही शिक्षकांच्या तासाला मस्ती करणार नाही.


कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील शिक्षक श्री गणेश पवार यांनी सन्माननीय नगरसेवक प्रमुख पाहुणे ,कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सारिका भोर, त्याचबरोबर इतर सहकारी शिक्षक आणि एक दिवसाचे विद्यार्थी शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांचे आणि इतर सर्वच  विद्यार्थ्यांचे आभार मानले .शिक्षक दिन  हा दिवस आमच्यासाठी कसा मजेशीर  असतो. याविषयी आपले अनुभव देखील मांडले.  अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात शिक्षक दिनाचा हा कार्यक्रम संपन्न झाला.


अशा पद्धतीने मी आमच्या अशोकनगर मनपा शाळेचा शिक्षक दिन मराठी बातमी लेखन नमुना आपणा समोर सादर केला आहे .याच पद्धतीने आपण शिक्षक दिनाची बातमी तयार करू शकता.


शिक्षक दिन बातमी लेखन मराठी पीडीएफ | shikshak din batmi lekhan marathi pdf


शिक्षक दिन बातमी लेखन आपल्या सोबत संग्रह राहावे. यासाठी शिक्षक दिन बातमी लेखन मराठीची पीडीएफ आपणाकडे देत आहोत. ही पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील डाऊनलोड बटणावर क्लिक करा आणि पीडीएफ आपल्या संग्रही ठेवा.


शिक्षक दिन बातमी लेखन मराठी pdf    

                        DOWNLOAD


अशा पद्धतीने आजच्या लेखात आपण शिक्षक दिन बातमी लेखन मराठी पाहिले हा आमचा लेख आपणास कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करा.या लेखाची आपल्याला batmi lekhan in marathi ची तयारी करताना नक्कीच मदत होईल.सर्वात महत्त्वाचे परीक्षेसाठी हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न असल्यामुळे शिक्षक दिन मराठी बातमी लेखन नीट समजून घ्या. चला पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!


FAQ : काही प्रश्न


1.शिक्षक दिन कधी साजरा केला जातो?

5 सप्टेंबर

2.शिक्षक दिनाच्या दिवशी कोणाचा वाढदिवस असतो?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन

3.शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिला जाणारा भारतातील सर्वात मोठा पुरस्कार

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार - राष्ट्रपतींच्या हस्ते


आमचे हे लेख जरूर वाचा 

- सॅलरी अकाउंट काढण्याचे फायदे 

गणपती आरती संग्रह pdf

- गणपती स्तोत्र पठण फायदे 

-उकडीचे मोदक रेसिपी

विद्यांजली पोर्टल वर शाळा नोंदणी करून अनेक लाभ मिळावा





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area