Type Here to Get Search Results !

शिक्षक दिन भाषण मराठी | shikshak din bhashan marathi

 शिक्षक दिन भाषण मराठी | shikshak din bhashan marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! संपूर्ण वर्षभर शिक्षक आणि विद्यार्थी ज्या दिवसाची वाट बघत असतात तो दिवस म्हणजे शिक्षक दिन. म्हणूनच आज आपण शिक्षक दिन भाषण मराठी हा विषय घेतलेला आहे.

शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व अध्यापनाचे कामकाज विद्यार्थी पाहत असतात आणि अध्ययन करण्याचे काम देखील विद्यार्थी करत असतात थोडक्यात या दिवशी शिक्षक शाळेमध्ये असतात परंतु प्रत्यक्षात अध्यापनाचे ते कामकाज करत नाहीत कारण या दिवशी विद्यार्थी शिक्षक अध्यापन करत असतात. एक दिवसाचा शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांना आपले अनुभव शिक्षक दिन भाषण या माध्यमातून व्यक्त करावे लागतात. बरेच विद्यार्थी teachers day speech in marathi साठी अनेक पुस्तके सुद्धा वाचतात जेणेकरून शिक्षक दिन भाषण आपले अतिशय उत्कृष्ट व्हावे.

शिक्षक दिन भाषण मराठी
शिक्षक दिन भाषण मराठी

शिक्षक दिन भाषण (toc)


शिक्षक दिन भाषण मराठी तयारी | shikshak din bhashan marathi tayari

भाषण ही एक कला आहे,म्हणूनच शिक्षण दिन भाषण मराठी तयारी करत असताना आपल्याला त्यासाठी काही संदर्भ पुस्तके वाचायला हवीत. की हा जो शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो त्यांच्याविषयी माहिती मिळवायला हवी. त्याचबरोबर शिक्षक दिन भाषण रटाळ होणार नाही यासाठी आजच्या काळातील शिक्षकांची भूमिका आणि विद्यार्थ्यांची भूमिका यावर देखील आपल्याला लक्ष केंद्रित करावे लागेल. त्याचबरोबर एक दिवसाचा शिक्षक बनल्यानंतर आपल्याला जे अनुभव आले ते देखील आपल्याला काही प्रमाणात इथे सांगावे लागतील. शिक्षक दिन भाषण मराठी अशा पद्धतीने तयार करा की जे अतिशय लहान पण आशय गर्भाशय .आपण देत असलेले shikshak din bhashan marathi द्यायला सुरुवात केल्यानंतर ऐकणारा श्रोता हा मंत्रमुग्ध व्हायला हवा! तरच आपले भाषण अतिशय सुंदर झाले असे म्हणता येईल.

अशा पद्धतीने तुम्ही जर पहिल्यांदाच भाषण देत असाल तर शिक्षक दिन भाषण मराठी थोडी तयारी करूनच द्या. मी आपणासाठी शिक्षक दिनाचे एक भाषण मराठीमध्ये देत आहे याच पद्धतीने तुम्ही आपले अनुभव यामध्ये भर घालून अतिशय छान आणि सुंदर शिक्षक दिनाचे भाषण देऊ शकता चला तर मग सुरुवात करूया शिक्षक दिनाच्या भाषणाला.


शिक्षक दिन भाषण मराठी | shikshak din bhashan marathi

आपण मी जे खाली शिक्षक दिन मराठी भाषण देत आहेत. त्याच पद्धतीने भाषण करावे असा कुठलाही हट्ट नाही आपले भाषण एका साखळीसारखे असावे ऐकणाऱ्याची एकतानता टिकवणारे असावे, तरच होते भाषण ऐकतात चला तर मग आपल्या शिक्षक दिन मराठी भाषणाला सुरुवात करूया.


शिक्षक दिन मराठी भाषण डेमो | shikshak din marathi bhashan demo 

अध्यक्ष! महाशय , गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो आज मी 5 सप्टेंबर संपूर्ण भारतभर जो दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो याविषयी माझे दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकावे. ही नम्र विनंती.

देतो समाजाला आकार ,

घडवूनि नररत्ने थोर,

स्थान तुझे मोठे माझ्या आयुष्यात,

माता- पित्यानंतर,

नमन माझे हे तुज गुरुवर्या सदासर्वकाळ .


या कवितेच्या ओळी शिक्षकाचे आपल्या जीवनातील स्थान सांगायला पुरेशा आहेत. शिक्षक दिनाविषयी काय बोलायचे? म्हणून जरा विचार करत होतो, तर या चार कवितेच्या ओळी मला सुचल्या आणि मग समजले की शिक्षक म्हणजे नेमके कोण? तर काही केल्या समजत नव्हते. कारण, शिक्षकाला शब्दांमध्ये बांधणे कठीण आहे. मग सहज चारोळी सुचल्या, की शिक्षक की जो समाजाला आकार देतो हा समाज पुढे योग्य मार्गावर चालावा त्यासाठी थोर व्यक्तींची निर्मिती करतो.एवढेच काय माता-पित्यानंतर जर नमन करण्याची जागा असेल किंवा महत्त्वाचे स्थान कोणाचे तर ते आहेत आपले शिक्षक. शिक्षकांना नमन करण्याचा वंदन करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन आणि खरोखरच या कवितेच्या माझ्याच ओळी मला इतक्या आवडल्या की पुन्हा पुन्हा त्या वाचत होतो.

असो हा शिक्षक दिन 5 सप्टेंबरला का साजरा केला जातो तर त्यामागे देखील काही भूमिका आहे भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा देखील 5 सप्टेंबर 1888 ला झाला आणि म्हणूनच त्याचे स्मरण म्हणून त्यांची अशी  इच्छा होती की माझा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा. म्हणूनच 5 सप्टेंबर 1962 पासून हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

शिक्षक दिनाच्या दिवशी शाळा महाविद्यालय कॉलेजेस सर्वच ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम साजरे होत असतात हा शिक्षक दिन म्हणजे त्या शिक्षकांनी आपल्याला ज्ञानदानाचे काम केले त्यांच्याविषयी कृतज्ञ होण्याचा दिवस किंवा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा त्यांनी केलेल्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस म्हणून या दिवशी सर्वच विद्यार्थी अतिशय भावना दिवस असतात.शिक्षकांना मनोमन शुभेच्छा देत असतात. काही विद्यार्थी भेटवस्तू देखील आपल्या शिक्षकांना देत असतात आणि शिक्षक देखील या दिवसाचा आनंद अतिशय मनमुरदपणे घेत असतात.

माध्यमिक विद्यालयांमध्ये इयत्ता दहावीचे विद्यार्थी 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी अध्यापनाची सर्व जबाबदारी वाटून घेतात त्या दिवशी कोणीतरी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, अशा भूमिकेत विद्यार्थी एक दिवसासाठी शिक्षक बनत असतात. आणि संपूर्ण दिवसभर अध्यापनाचे कामकाज करत असतात. या दिवशी विद्यार्थ्यांना अध्यापन करायला लावले जाते यामागे देखील एक शास्त्रीय कारण आहे ते ,म्हणजे भूमिका अभिनय पद्धती विद्यार्थ्यांच्या लक्षात यावी.

भूमिका अभिनय म्हणजे त्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला ठेवणे आणि मग त्या व्यक्तीच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न करणे या पद्धतीला अध्यापन पद्धतीमध्ये भूमिका अभिनय म्हणतात आणि तोच अनुभव जे विद्यार्थी एक दिवसासाठी शिक्षक बनतात त्यांना देण्याचा प्रयत्न पाच सप्टेंबर या दिवशी जाणीवपूर्वक केला जातो. त्यावेळी विद्यार्थ्यांना समजते की शिक्षकांना 35 मिनिटे बोलण्यासाठी किती तयारी करावी लागते? शिक्षक वर्गात शिकवत असताना मध्येच कोणी गोंधळ केला मस्ती केली तर शिक्षकांची नेमकी मानसिकता काय होते? समोर उभे राहून बोलणे किंवा व्याख्यान देणे किती अवघड आहे? अशा सर्व अनुभवांचा परिपाक जणू विद्यार्थ्यांना त्या दिवशी मिळत असतो.

शिक्षक दिन कार्यक्रमाच्या सरते शेवटी ज्यावेळी विद्यार्थी एक दिवसासाठी शिक्षक बनलेला असतो तो आपले मनोगत व्यक्त करताना  त्यांच्या डोळ्यात पाणी येते आणि ते विद्यार्थी शिक्षक  सांगतात, की सर यापुढे आम्ही तुम्ही जे शिकवाल ते अगदी मन लावून ऐकू. कारण तुम्ही आम्हाला शिकवण्यासाठी किती मेहनत घेता किती नियोजन करता? आम्हाला एका दिवसातच नाकी नऊ आले. या सर्व मनोगतातून शिक्षकांना देखील खरोखरच आपले कार्य किती अवघड आहे पण; आपण मेहनतीने विद्यार्थ्यांसाठी ते सोपे करत असतो याची जाणीव होते आणि त्यांना आपण शिक्षक असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. असा हा शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही वेगळा अनुभव देणारा दिवस म्हणजे शिक्षक दिन म्हणूनच या दिवसाची मी सांगितल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी शिक्षक दोघेही अतिशय तन्मयतेने वाट पाहत असतात.

काही विद्यार्थी जे एक दिवसासाठी शिक्षक झालेले आहेत ते शिक्षकांच्या अध्यापनात नकला करतात, आवाज तसाच काढण्याचा प्रयत्न करतात शिक्षकांच्या तोंडात एखादा विशिष्ट शब्द असेल तर तो पुन्हा रिपीट करतात सांगण्याचे तात्पर्य हे की हा दिवस शिक्षकांना आपल्या अध्यापनाविषयी आत्मपरीक्षण करायला लावणारा देखील असतो म्हणूनच शिक्षक दिन हा दिवस खूप आगळावेगळा असतो.

इयत्ता दहावीचे विद्यार्थी एक दिवसासाठी शिक्षक बनलेले असतात सप्टेंबर महिन्याची सुरुवात असते आणि आता त्यांच्या अभ्यासाला गती येणे अतिशय गरजेचे असते आणि हा शिक्षक दिन हा दिवस विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये इतकी कलाटणी देऊन जातो की 6 सप्टेंबर पासून विद्यार्थी अभ्यासाविषयी अतिशय दक्ष बनतात अभ्यास मन लावून करतात आणि हे सर्व शक्य होते ते पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या कार्यक्रमामुळे.


मी शिक्षक आहे,

मला जग बदलण्याचा,

 हक्क आहे.

मी शिक्षक आहे,

समाजाला सुयोग्य मार्गावर,

 नेणे माझा हक्क आहे.

मी शिक्षक आहे,

या विश्वाचा भाग्यविधाता आहे.

या जबाबदारीचे मला सदैव भान आहे.


वरील ओळी खूप काही सांगून जातात.खरोखरच या विश्वाला कुठे घेऊन जायचे हे शिक्षकांच्या हाती आहे. कारण संपूर्ण शिक्षण प्रणालीच ठरवत असते की आपले राष्ट्र कुठे जाणार आणि त्या शिक्षण प्रणालीची अंमलबजावणी करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक म्हणूनच शिक्षक हा राष्ट्राचा कणा आहे असे म्हटले तरी वावगे वाटू नये.

आज विश्वानेची सर्व प्रगती केलेली आहे ती प्रगती करणारे रतीमारती कोणत्या ना कोणत्या तरी शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच घडलेले आहेत. सांगण्याचे तात्पर्य असे की अतपासून इतपर्यंत जे काही निर्माण झाले आहे ते शिक्षकांमुळेच. म्हणजेच गुरूंमुळे म्हणूनच आजच्या भाषणातून गुरुजन वर्गांना शिक्षकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!

शिक्षक दिनानिमित्त माझे दोन शब्द आपण सर्वांनी शांतचित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद!जय हिंद! जय महाराष्ट्र!

अशा पद्धतीने आपण देखील शिक्षक दिन भाषण मराठी अगदी छान पद्धतीने देऊ शकता मी फक्त आपणास आजच्या लेखाच्या माध्यमातून शिक्षक दिन मराठी भाषणाचा एक नमुना दिला याच पद्धतीने आपण आपले अनुभव यामध्ये घालून छान असे भाषण देऊ शकता. शिक्षक दिन भाषण असो की यांनी कोणते वाचन असो या भाषणासाठी आपणाजवळ केवळ असंख्य पुस्तके असून उपयोगाचे नाही तर आपली निरीक्षण शक्ती आपला भाषणाला एका उंचीवर नेत असते म्हणून विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही भाषणाची तयारी करत असताना निरीक्षण शक्ती वाढवा आपले अनुभव उगवत्या भाषेमध्ये मांडायला शिका तर आपण देखील शिक्षक दिन भाषण अतिशय चांगल्या पद्धतीने देऊ शकता. 


शिक्षक दिन भाषण मराठी pdf |shikashk din bhashan marathi pdf

बऱ्याच विद्यार्थ्यांना भाषण देत असताना तयारी करण्यासाठी लिखित डाटा पाठ करून तयारी करावी लागते म्हणूनच सदर भाषणाचे म्हणजे शिक्षक दिन मराठी भाषण पीडीएफ देत आहोत ते ते प्राप्त करण्यासाठी डाउनलोड बटणावर क्लिक करा.

         DOWNLOAD


आमचा हा शिक्षक दिन भाषण मराठी हा लेख आपणास कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद !


आमचे हे लेख वाचा


शिक्षक दिनाची बातमी तयार करा


 salary अकाउंट काढण्याचे फायदे


सरकारी कर्मचारी यांना धमकावणे पडेल महागात


राष्ट्रीय क्रीडा दिन माहिती










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area