Type Here to Get Search Results !

शिक्षक दिन कविता मराठी | shikshak din kavita

 शिक्षक दिन कविता मराठी | shikshak din kavita


5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो म्हणूनच आज आपण शिक्षक दिन कविता मराठी हा लेखाचा विषय घेतला आहे.

शिक्षक दिन कविता मराठी
शिक्षक दिन कविता मराठी


शिक्षक दिन कविता (toc)


5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांना सर्वजण शुभेच्छा देत असतात त्यांनी केलेल्या अध्यापनाच्या कामकाजाचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या जातात कोणी प्रत्यक्ष भेटून शिक्षकांना वंदन करते कोणी फोनच्या माध्यमातून तर कोणी पत्राच्या माध्यमातून अगदी त्याच पद्धतीने कवितेच्या माध्यमातून शिक्षकांविषयी ऋण व्यक्त करणे म्हणूनच आजचा विषय शिक्षक दिन कविता मराठी हा घेतलेला आहे.आमची ही shikshk din kavita marathi स्वरचित असल्याने आपल्याला नक्की आवडेल .


शिक्षक दिन कविता मराठी | shikshak din kavita

आपण जर इंटरनेट वरती सर्च केले तर शिक्षकांवरती अनेक कविता सापडतील जर आपण शाळेमध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेणार असाल शिक्षकांविषयी आपल्याला आदरभाव व्यक्त करायचा असेल तर नक्कीच आमची शिक्षक दिन कविता मराठी हे आपणाला मदत करेल.चला तर मग teachers day marathi poem आपण पाहूया.......


शिक्षक दिन कविता |shukshak din kavita 


      कविता  शिक्षक | kavita shikshak


देतो समाजाला आकार 

घडवूनि नररत्ने थोर

स्थान तुझे मोठे माझ्या आयुष्यात

माता- पित्यानंतर

नमन माझे हे तुज गुरुवर्या सदासर्वकाळ ||१||



 देतो अजाण बालकाला आकार त्यातून घडवितो नागरिक नक्षत्रासमान

उपकार तुझे मोठे या भूमीवर

नमन माझे हे तुज गुरुवर्या सदासर्वकाळ ||२||



नाही केला कसलाच भेद

फोल तुझ्यापुढे जात -धर्म, गरीब- श्रीमंत

सर्व तुजला दिसती एकसमान

नमन माझे हे तुज गुरुवर्या सदासर्वकाळ||३||



दिसतोस मला तू मोठा वटवृक्षासमान

देतोस आधार, सावली थंडगार

शिकविले तुझ्या मुळांनी खोलवर रुजायला

संकटातही तोल सावरायला

नमन माझे तुज  हे  गुरुवर्या सदासर्वकाळ ||४||



रूपे तुझी अनेक गौतम - कबीर - तुक्या समान

माझी निष्ठा तुझ्या चरणी  एकलव्यासम

अवघे विश्व सामावले तुझ्या उदरात

नमन माझे तुज हे गुरुवर्या सदासर्वकाळ ||५||



नाही शिकविली हिंसा ,क्रौर्य 

दिलीत हातात लेखणी, आणि मनात शांती

बुद्धीत भरला विवेक,सदाचार

जागविली ज्ञानाची लालसा

नमन माझे तुज हे  गुरुवर्या सदासर्वकाळ||६||


आमचा शिक्षक दिन कविता मराठी हा लेख आपणास कसा वाटला हे नक्की कळवा आपल्या शिक्षकांना ही कविता पाठवून त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा द्या त्यांना नक्कीच आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!


आमचे हे लेख नक्की वाचा

शिक्षक दिन भाषण 

योगा व योगाचे प्रकार

- शिक्षक दिन बातमी लेखन 

-  सॅलरी खाते असण्याचे फायदे 

- गणेश स्थापना विधी ,उत्तरपूजा व विसर्जन

- सरकारी कर्मचाऱ्यास धमकावले तर .....ही शिक्षा होणार

- शिक्षक दिन व सर्वपल्ली राधाकृष्णन यांची माहिती






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area