आश्वासक चित्र मुद्द्यांच्या आधारे कृती | aashavask chitra muddyanchya aadhare kruti
आजच्या लेखात आपण आश्वासक चित्र मुद्द्यांच्या आधारे कृती पाहणार आहोत.परीक्षेत काही मुद्दे दिलेले असतात व त्या मुद्यांच्या आधारे आपल्याला कृती सोडवायच्या असतात.आज आपण आश्वासक चित्र या कवयित्री नीरजा यांच्या कवितेवर आधारित मुद्दे व त्यावर आधारित कृती अभ्यासनार आहोत.
आश्वासक चित्र मुद्द्यांच्या आधारे कृती (toc)आश्वासक चित्र मुद्द्यांच्या आधारे कृती
आश्वासक चित्र कविता मुद्दे | ashvashk chitr kavita mudde
१आश्वासक चित्र या प्रस्तुत कवितेच्या कवयित्री –
नीरजा
२)आश्वासक चित्र कवितेचा रचनाप्रकार –
मुक्तछंद रचना प्रकार आहे.
३)आश्वासक चित्र कवितेचा काव्यसंग्रह –
निरर्थकाचे
पक्षी
४) आश्वासक चित्र कवितेचा विषय –
स्त्री पुरुष समानता यायला हवी.
५)आश्वासक चित्र या कवितेतून व्यक्त होणारा भाव (स्थायीभाव) –
आनंद, तिरस्कार, प्रेम
६) आश्वासक चित्र भाषिक वैशिष्टये –
नाटयात्मकता, भाषा संवादी, प्रसंगवर्णन, साधी व सरळ सोपी भाषा.
७) आश्वासक चित्र या मध्यवर्ती कल्पना –
कवयित्री नीरजा एके दिवशी घराच्या झरोक्यातून पाहिलेल्या दृश्यातील मुलगा- मुलगी आज जरी परंपरा मानणारे असले तर उद्या प्रत्यक्षात समानता आणून वागतील व ती समानता खरी खुरी असेल .भातुकलीच्या खेळातून वास्तवाच्या जगात एकत्र खेळतील. तिथे खरी समानता असेल.
८)आश्वासक चित्र या कवितेतून व्यक्त होणारा विचार
– कवयित्रीने स्त्री-पुरूष समानतेचे एक आश्वासक चित्र आपल्या समोर रेखाटले आहे. कवितेतील मुलगा
चेंडू उंच आकाशात उडवून नेमका पकडतो व हे पाहून ती मुलगी बाहुलीला मांडीवर थोपटत भातुकलीच्या गॅसवर
भाताचं आधण चढवते. मुलाला वाटते मुलीनं फक्त स्त्रियांचीच कार्म करावीत. तिनं पुरुषांचे
खेळ खेळू नयेत. हा पारंपरिक दृष्टिकोन व्यक्त होतो. पण मुलगी दोन्ही
कामे करु शकते.हे आत्मविश्वासाने सांगते यातून आजची स्त्री सर्वच क्षेत्रात आघाडीवर
आहे.हा आजचा विचार व्यक्त झालेला आहे. कवयित्रीला मात्र मुलगा मुलगीच्या एकत्र खेळण्यातून
एक भविष्यातले आश्वासक चित्र नजरेसमोर येते. भातुकलीच्या खेळातून वास्तवाच्या जगात
ते एकत्र नांदतील, स्त्रीपुरूष समानता येईल हा विचार व्यक्त झाला आहे.कायदा असून उपयोग नाही खरी समानता यायला हवीय.थोडक्यात एक भावी पिढी कशी असेल हेच यात मांडले आहे.
९)आश्वासक चित्र या कवितेमधील आवडलेली ओळ
“माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे
एक आश्वासक
चित्र उद्याच्या जगाचं
जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र”
या ओळी मला फार आवडल्या कारण ,यामध्ये
कवयित्रीने स्त्रीपुरूष समानतेचे छान चित्र रेखाटले आहे आणि ते उद्या वास्तवात देखील यायला हवे.
१०) आश्वासक चित्र कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –
आश्वासक चित्र प्रस्तुत कविता फार आवडली कारण, या कवितेत कवयित्रीने स्त्री-पुरूष समानतेचं एक आश्वासक चित्र रेखाटलं आहे. ते जर प्रत्यक्षात साकार झाले तर काय होईल?खरी समानता येईल. असा विश्वासही व्यक्त केला आहे. ही कविता चिंतनशील व सामाजिक जाणिवेची कविता आहे.एक खरी समानता मांडणारी आहे. फार छान कविता आहे. मुक्तछंदात लेखन असले तरी अंतर्गत लय साधलेली आहे.अगदी सहज भाषा आहे.
११)आश्वासक चित्र कवितेतून मिळणारा संदेश –
या कवितेतून स्त्री-पुरूष समानतेचे मूल्य रुजावे. भातुकलीच्या खेळातील मुलगा-मुलगी वास्तवाच्या जगात एकत्र नांदतील तिथे भेदभाव असणार नाही असा मोलाचा संदेश या कवितेतून मिळतो.
आमचे हे लेख जरूर वाचा
इयत्ता नववी दहावी प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका मराठी माध्यम
परीक्षेला हमखास पडणारा प्रश्न शिक्षक दिनाची बातमी तयार करा
आपल्याला 90% पेक्षा जास्त गुण पाडायचे असतील तर या पद्धतीने करा तयारी
वाचलेला भाग लक्षात राहत नाही तर या पद्धतीने जाणून घ्या अभ्यासाच्या पद्धती