Type Here to Get Search Results !

शब्द समुहाबद्दल एक शब्द | shabd samuhabaddal ek shabd

शब्द समूहाबददल एक शब्द | shabdsamuhabaddal ek shabd 

आपण बोलणे अगदी मोकळया शब्दात मांडल्यास ते अधिक प्रभावशाली, परिणामकारक ठरते. अशावेळी अनेक शब्दांऐवजी एक शब्द वापरता येतो.शब्दांच्या काटकसरीने आपली भाषा डौलदार, अर्थवाही, सौंदर्य असणारी बनविता येते. शब्दांचा पाल्हाळ न लावता एका शब्दात सारा अर्थ सामावनू वाक्याची रचना करता येते व भाषेची खुमारी, गोडी वाढते.

शब्दसमूहाबद्दल एक शब्द
शब्दसमूहाबद्दल एक शब्द


उदा.१ शाहू महाराजांनी निरश्रित मुलांना आश्रय देणारी एक संस्था काढली.

शाहू महाराजांनी अनाथालय काढले.


२.  अशोक कोणत्याही पक्षाचा उमेदवार नाही.

अशोक अपक्ष उमेदवार आहे. या शब्दांना ‘शब्दसमूहाबददल’ एक शब्द म्हणतात.

शब्दसमूहाबददल एक शब्द उदाहरणे | shabd samuha baddal ek shabd udaharne

   १. आस्तिक - देवाचे अस्तित्व मानतो असा

   २. कवी  –  कविता रचनारा

३.  उपकृत – उपकाराखाली ओशाळ बनलेला

४.  उदयोन्मुख  –  उदयाला येत असलेला

५. ऐतखाऊ –  कामधंदा न करता दुसऱ्याच्य जीवावर जगणारा 

६. अविनाशी - कधीही नाश न पावणारा 

७. दुसऱ्याच्या मनातील जाणणारा - मनकवडा

८. दुसऱ्यावर अवलंबून असलेला -परावलंबी

९. शत्रू कडील बातमी गुप्तपणे आणणारा - गुप्तहेर 

१०. नवीन गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असलेला - जिज्ञासू

११. कोणतीही अपेक्षा न ठेवता- निरपेक्ष

२.कानउघडणी –  कठोर शब्दांनी केलेला उपदेश

 १३. कतज्ञ -  केलेले उपकार जाणणारा

 १४. काव्यगायक –  कविता तालासुरात गाऊन दाखविणे

 १५. खग -  आकाशात गमन करणारा पक्षी

 १६. खेळाडू –  खेळाची आवड असणारा, खेळ खेळणारा

 १७. गोठा – गाई, गुरे जेथे बांधून ठेवतात ती जागा

  १८. गाभारा – मूर्ती जिथे असते तो देवालयातील भाग

  १९. गायरान – गाईला चारण्यासाठी राखलेले रान

  २०. घरकोंबडा – नेहमी घरात बसून राहणारा

  २१. चक्रव्यूह – सैन्याची चक्राकार केलेली रचना

  २२. चौक - चार रस्ते मिळतात ती जागा

  २३. चक्रधर, चक्रपाणी – ज्याच्या हाती चक्र आहे असा     

  २४. जितेंद्रिय – ज्याने सर्व इंद्रिये जिंकली आहेत असा

  २५. जिज्ञासू – जाणून घेण्याची इच्छा असलेला

  २६. जेता   - विजय मिळविलेला

  २७. झंझावात – सोसायट्यांचा वारा

  २८. टाकसाळ – नाणी पाडण्याची जागा

  २९. डोळस  - डोळयांनी पहावयास समर्थ असलेला      

  30. मेघाच्छादित – ढगांनी भरलेले, अच्छादून गेलेले

  ३१. तितिक्षा  - हालअपेष्टा सहन करण्याचा गुण

  ३२. तट – किल्ल्याच्या भोवतीची भिंत

  ३३. तिठा – तीन रस्ते एकत्र येतात ती जागा

  ३४. दोषिक दृष्टी – गुणाकडे डोळेझाक करुन केवळ दोष काढल्याचा स्वभाव

  ३५. दैववादी – देवावर भरवसा ठेवून राहणारा

  ३६. दरवेशी – अस्वलाचा खेळ करणारा

३७. धबधबा – उंचावरुन पडणारा पाणलोट

३८. धनको – पैसे कर्जाऊ देणारा

३९. धर्मशाळा – पांथस्थांना विश्राम

४०. नाटककार – नाटक लिहिणारा

४१. निर्माल्य – देवाला वाहून शिळी झालेली फुले

४२. नांदी – नाटकाच्या सुरुवातीचे  स्तवन गीत

४३. परस्परावलंबी – एमेकांवर अवलंबून असणारे

४४. पाणपोई – मोफत पाणी मिळण्याची सोय

४५. प्रलयकाल – जगाचा नाश होण्याची वेळ

४६. फितूर – शत्रूला सामील झालेला

४७. बिनतक्रार – कोणतीही तक्रार न करता

४८. बोगदा – डोंगर पोखरुन आरपार केलेला रस्ता

४९. बहुरूपी – निरनिराळया प्रकारच्या माणसांची सोंगे करणारा

५०. भाट – स्तुती करणारा

५१. भाकडकथा – निरर्थक सांगितलेल्या गोष्टी

५२. महत्वाकांक्षी – मोठया इच्छा असणारा

५३. कामधेनू – सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय

५४. मूर्तिकार – मूर्ती घडविणारा

५५. रुग्णालय – रोगी ठेवण्याची जागा 

५६.दैनिक - दररोज प्रकाशित होणारे 

५७.मासिक - महिन्याला प्रकाशित होणारे 

५८. वार्षिक - वर्षाला प्रकाशित होणारे  

५९. रामबाण – अचूक गुणकारी असणारे 

६०. राजमान्य – राजाने मान्यता दिलेली

५८. लोकमान्य –लोकांनी मान्यता दिलेला

५९. लेखनशैली – लिहिण्याची हातोटी

६०. लघुकथाकार – लघुकथा लिहिणारा 


अशा  पद्धतीने शब्द समुहाबद्दल एक शब्द याचा पूर्ण अभ्यास होण्यासाठी व ही संकल्पना समजण्यासाठी तुम्हाला आमच्या या लेखाचा नक्कीच उपयोग होईल इयत्ता नववी आणि दहावी परीक्षेमध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकावर ती एक गुणांसाठी प्रश्न हा विचारला जातो त्याच बरोबर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये देखील या घटकावरती प्रश्न विचारले जातात शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा आमचा लेख आपणास कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!


आमचे हे लेख जरूर वाचा


 इयत्ता नववी दहावी प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका मराठी माध्यम 


परीक्षेला हमखास पडणारा प्रश्न शिक्षक दिनाची बातमी तयार करा


अकस्मात पडलेला पाऊस निबंध 


आपल्याला 90% पेक्षा जास्त गुण पाडायचे असतील तर या पद्धतीने करा तयारी 


वाचलेला भाग लक्षात राहत नाही तर या पद्धतीने जाणून घ्या अभ्यासाच्या पद्धती












  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area