पोलीस भरती 2022 शारीरिक चाचणी मैदानी चाचणी माहिती व गुण विभागणी | police bharti sharirik chachni gun vibhagni v tayari
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! कोरोना महामारी नंतर महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठी पोलीस शिपाई भरती 2022 होणार आहे.आजच्या लेखात आपण पोलीस भरती 2022 शारीरिक चाचणी म्हणजेच मैदानी चाचणी याबाबत संपूर्ण माहिती व गुण विभागणी पाहणार आहोत.
मैदानी चाचणी गुणदान माहिती (toc)
मैदानी चाचणी गुण विभागणी|maidani chachni gun vibhagni
पोलीस भरती मध्ये होणारी मैदानी चाचणीत गुण विभागणी पुरुषांसाठी आणि महिलांसाठी सारखीच गुण विभागणी आहे ,परंतु स्त्रियांची शारीरिक क्षमता विचारात घेता त्यामध्ये दिला जाणारा वेळ किंवा अंतर यामध्ये तफावत आहे.ते आपण नीट समजून घेऊया. महिला आणि पुरुषांना मैदानी चाचणीमध्ये खालील प्रमाणे गुण विभागणी करण्यात आलेली आहे.
पोलीस भरती 2022 सर्वसाधारण गुण विभागणी महिला व पुरुष - एकूण ५० गुण
१. लाँग रन - 20 गुण
२.१०० मीटर धावणे - १५ गुण
३. गोलाफेक - १५ गुण
आता यामध्ये दिला जाणारा वेळ आणि अंतर तसेच गोळ्याचे वजन महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या आहे याबाबत सविस्तर माहिती पाहूया.
पोलीस भरती शारीरिक चाचणी गुण विभागणी पुरुष |police bharti sharirik chahchni physical test gun vibhagni marking system
१. पोलीस भरती पुरुष 1600 मीटर धावणे - 20 गुण
पोलीस शिपाई भरतीसाठी पुरुषांना पाच मिनिटे व दहा सेकंदामध्ये १६०० मीटर धावावे लागते,यासाठी 20 गुण आहेत.यामधे पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते तरच पैकीच्या पैकी गुण मिळतात.याची गुणदान पद्धती साधारण अशी आहे.(मागील भरतीनुसार थोडेफार यावर्षी बदल होऊ शकतात)
- 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ - 20 म्हणजे पैकीच्या पैकी गुण
- 5 मिनिट 10 सेकंदपेक्षा जास्त व 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी- 15 गुण
- 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त व 5मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी - 12गुण
- 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त व 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी - 10 गुण
- 6मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त व 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी - 8 गुण
- 6 मिनिट 30सेकंदापेक्षा जास्त व 6मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी - 4 गुण
- 6मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त व 7 मिनिट 10सेकंदापेक्षा कमी - 0 गुण
अशाप्रकारे पोलीस भरतीसाठी साधारणपणे १६००मीटर धावण्यासाठी पुरुषांसाठी गुणविभागनी असू शकते.यावर्षीच्या नवीन परिपत्रकानुसार यामध्ये थोडेफार अपडेट होऊ शकतात. परंतु विद्यार्थ्यांनी तयारी करत असताना साधारणपणे शारीरिक चाचणीची तयारी ही अतिशय व्यवस्थित आणि वेळेकडे लक्ष देऊन करावी.
2.100 मीटर धावणे पुरुष - 15 गुण
यामधे उमेदवारांना 11.50 maicro सेकंद एवढ्या वेळात जर टार्गेट पूर्ण केले तर पैकीच्या पैकी गुण मिळतात.विद्यार्थ्यांना हा धावण्याचा प्रकार अतिशय सोपा वाटत असला तरी गुण मिळवण्यासाठी अवघड भाग म्हणजे 100 मीटर धावणे.कारण यामधे अतिशय कमी वेळ असतो. आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी 11.50 मायक्रो सेकंद मध्ये 100 मीटर धावावे लागते. त्याची गुणविभागणी खालील प्रमाणे
- 11.50 सेकांदापेक्षा कमी - 15 म्हणजेच पैकीच्या पैकी
- 11.50 सेकंद ते 12.50 सेकंद - 12 गुण
-12.50 सेकंद ते 13.50 सेकंद - 9 गुण
-13.50 सेकंद ते 14.50 सेकंद - 6 गुण
-14.50 सेकंद ते 15.50 सेकंद - 3 गुण
- 15.50 सेकंद पेक्षा जास्त - 0 गुण
अशी गुणविभागणी शंभर मीटर धावण्याच्या बाबतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी आहे पुढचा घटक आहे गोळा फेक त्याची गुणविभागणी बघूया.
३.गोळा फेक | gola fek
गोळा फेक या शारीरिक चाचणीसाठी विद्यार्थ्यांना पंधरा गुण आहेत हा गोळा ७.५० kg साडेसात किलोचा असतो त्याची गुणविभागणी पुढील प्रमाणे
- ८.५० मीटर पेक्षा जास्त गोळा फेकल्यास १५ म्हणजे पैकीच्या पैकी गुण
- ७.९० ते ८.५० मीटर गोळा गेल्यास - १२ गुण
- ७.४० ते ७.९० मीटर - ९ गुण
- ६.९० ते ७.४० मीटर गोळा फेक्ल्यास - ६गुण
- ६.४० ते ६.९० मीटर गोळा गेल्यास - ३ गुण
- ६.४० पेक्षा कमी गेल्यास ० गुण
गतीने गोळा फेक साठी गुण विभागणी करण्यात आलेले आहे. पोलीस भरती 2022 शारीरिक क्षमता चाचणीची तयारी करत असताना आम्ही दिलेली माहिती नक्कीच आपल्याला उपयोगी पडेल. चला तर मग महिला उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीसाठी असणारी गुणविभागणी पाहूया.
महिलांच्या शारीरिक चाचणीसाठी गुणविभागणी
१.८०० मीटर धावणे २० गुण
- ८०० मीटर धावण्यासाठी जर आपल्याला
- २ मिनिट ५० सेकंदापेक्षा कमी कालावधी लागला तर आपल्याला पैकीच्या पैकी म्हणजे वीस गुण मिळतात.
- २ मिनिट ५० सेकंद ते ३ मिनिटे .०० - १५ गुण
- ३ मिनिटांपेक्षा जास्त ३ मिनिट .१० सेकंद पेक्षा कमी - १० गुण
- ३ मिनिटे १० सेकंदापेक्षा जास्त परंतु ३.२० सेकांदा पेक्षा कमी - ६ गुण
-- ३ मिनिटे २० सेकंदापेक्षा जास्त परंतु ३.३० सेकांदा पेक्षा कमी - २ गुण
- ३ मिनिटे व ३० सेकंदापेक्षा जास्त - ० गुण
२. १०० मीटर धावणे - १५ गुण
- १४ कमी कालावधी लागल्यास - १५ गुण
- १४ सेकंदापेक्षा जास्त व १५ सेकंदापेक्षा कमी - १२ गुण
- १५ सेकंदापेक्षा जास्त व १६ सेकंदापेक्षा कमी - ०९गुण
- १६ सेकंदापेक्षा जास्त व १७ सेकंदापेक्षा कमी - ०६ गुण
- १७ सेकंदापेक्षा जास्त व १८ सेकंदापेक्षा कमी - ०३ गुण
- १८ सेकंदापेक्षा जास्त - ० गुण
३ गोळा फेक १५ गुण
शारीरिक चाचणीसाठी जो गोळा फेकावा लागतो त्याचे वजन
- ६ मीटरपेक्षा जास्त पैकीच्या पैकी म्हणजे - १५ गुण
- ५.५० मीटर पेक्षा जास्त ते ६ मीटर पेक्षा कमी - ११ गुण
- ५.०० मीटर पेक्षा जास्त ते ५.५० मीटर पेक्षा कमी - ८ गुण
- ४.५० मीटर पेक्षा जास्त ते ५.०० मीटर पेक्षा कमी - ५ गुण
- ४.०० मीटर पेक्षा जास्त ते ४.५० मीटर पेक्षा कमी - २ गुण
- ४ मीटर पेक्षा कमी - ० गुण
वरील प्रमाणे पोलीस भरती 2022 साठी शारीरिक क्षमता चाचणी म्हणजेच मैदानी चाचणी आपल्याला द्यायचे आहे या मैदानी चाचणीची गुणविभागणी म्हणजेच आपल्याला शारीरिक समता चाचणीमध्ये आजच किती गुण मिळतात मिळू शकतील याबाबत आपण काही अंदाज लावून अधिकची तयारी करून जास्तीत जास्त गुण वाढण्यासाठी प्रयत्न करू शकता.
वर दिलेली गुणविभागणे ही या अगोदर झालेल्या भरतीच्या गुणांच्या आधारे देण्यात आलेली आहे यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात पण साधारणपणे विद्यार्थ्यांना काही एक कल्पना यावी म्हणून नक्कीच ही गुणविभागणी उपयोगी पडेल यात काही बदल झाल्यास आपणास तात्काळ कळवले जाईल.
तुमचा आजचा हा लेख शारीरिक क्षमता चाचणी व गुणविभागनी हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.
पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शन wtp ग्रुप लिंक
आमचे हे लेख वाचा