पोलीस भरती लेखी परीक्षा अभ्यासक्रम व तयारी 2022|police bharati lekhi pariksha abhyaskram v tayari 2022
महाराष्ट्रामध्ये या वर्षी म्हणजे 2022मध्य जवळजवळ 18133 पदांसाठी पोलीस भरती निघालेली आहे. कोरोना काळानंतर होणारी पहिलीच मोठी भरती असल्यामुळे अनेक विद्यार्थी म्हणजे पात्र उमेदवार या भरतीकडे लक्ष ठेवून होते. म्हणूनच आजच्या लेखांमध्ये पोलीस भरती लेखी परीक्षा अभ्यासक्रम व तयारी 2022 म्हणजेच police bharti syllyabus v prepration कसे करावे हे आपण पाहणार आहोत.
पोलीस भरती लेखी परीक्षा अभ्यासक्रम व तयारी 2022 |
पोलिस भरती प्रक्रिया 2022|police bharti prakriya 2022
पोलीस भरती 2022 चा विचार करत असताना या वर्षी होणाऱ्या पोलीस भरती मध्ये सुरुवातीला उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. बऱ्याचदा अनेक विद्यार्थी केवळ शारीरिक चाचणी कडे लक्ष देतात आणि लेखी परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात ,तर हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेला देखील शारीरिक परीक्षेची तयारी करताना महत्व दिले पाहिजे.
शारीरिक चाचणी परीक्षेतून निवड|sharirik chachni parikshetun nivad
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सर्वप्रथम शारीरिक चाचणी द्यावी लागणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेवडवरातून रिक्त पदांच्या/जागांच्या एकास 10 प्रमाणात लेखी परीक्षेसाठी बोलावले जाणार आहे.
पोलीस भरती लेखी परीक्षा गुण|police bharti lekhi pariksha gun
पोलीस भरती 2022 मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना 100 गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. लेखी परीक्षा साधारणपणे चार घटकांवरती घेतली जाणार आहे.
पोलीस भरती लेखी परीक्षा घटक अभ्यासक्रम
१.अंकगणित
२. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
३. बुद्धिमत्ता चाचणी
४. मराठी व्याकरण
साधारणपणे वरील चारी घटकांना दिला जाणारा भारांश म्हणजेच वेटेज हे सारखे आहे प्रत्येक घटकावर ती साधारण 25 गुणांसाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात अशी एकूण आपल्याला 100 गुणांची परीक्षा द्यावयाची आहे.
वरील चारही घटकांची तयारी करत असताना विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती पाहूया.
१. अंकगणित |ankganit
अंकगणिताचा अभ्यास करत असताना कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट न वापरता बेरीज, वजाबाकी, गुणाकार ,भागाकार या गणितातील मुख्य क्रियांची तयारी जास्तीत जास्त करावी. परीक्षेमध्ये लेखी परीक्षेसाठी असणारा वेळ विचारात घेता, विचारले जाणारे अंकगणितीय प्रश्न सोपे असतात परंतु विद्यार्थी वाचत असताना घाई गडबड करतात आणि उत्तरे चुकवतात.म्हणून अंकगणितीय भाग सोडवत असताना गणितीय क्रिया अतिशय शांत डोक्याने कराव्यात आणि जास्तीत जास्त सराव किंवा याबद्दल झालेल्या प्रश्नपत्रिका हाताळाव्यात.आमच्या ज्ञान योगी डॉट कॉम च्या माध्यमातून देखील आपणाला या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट नक्कीच दिले जातील.
२. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी|samanya dnyan v chalu ghadamdi
सामान्य ज्ञान या घटकाचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी पाचवी ते दहावी या इयत्तांची पुस्तके वाचायला सुरुवात करावी कारण; आपण जर मागील प्रश्नपत्रिका पाहिल्या तर बरेचसे प्रश्न हे आपल्याला याच इयत्ता मधील पुस्तकातील दिसतात.तर त्याची तयारी करत असताना शालेय अभ्यासक्रमाची इतिहास ,भूगोल ,विज्ञान ,राज्यशास्त्र यासारख्या विषयांची पुस्तके बारकाव्याने वाचावीत आणि त्याच्या नोट्स काढाव्यात. एक ना धड बराबर चिंध्या असं न करता अतिशय सूक्ष्म अभ्यास करावा. चालू घडामोडी साठी वर्तमानपत्रे टीव्हीवरील बातम्या यांची मदत घ्यावी.
३. बुद्धिमत्ता चाचणी |budhimta chachni
या घटकाची तयारी करत असताना देखील आपण वेगवेगळ्या होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षा,सैनिक भरती इतर स्पर्धा परीक्षेला वापरली जाणारी पुस्तके वापरावीत. या घटकाची तयारी करताना अवघड गोष्टी पाहत बसण्यापेक्षा सोप्या सोप्या गोष्टी नीट समजून घ्या. शॉर्ट बट स्वीट अशी तयारी करा.
४. मराठी व्याकरण| marathi vyakran
मराठी व्याकरण या घटकाची तयारी करत असताना अनेक लेखकांची पुस्तके वाचून गोंधळ न करता एखाद्याच लेखकाचे पोलीस भरती संदर्भात मराठी व्याकरणावरील पुस्तक नीटपणे अभ्यासल्यास या घटकाची देखील तयारी छानपणे होऊ शकते.
अशा पद्धतीने आजच्या लेखांमध्ये आपण पोलीस भरती लेखी परीक्षा 2022 लेखी परीक्षा अभ्यासक्रम व तयारी कशी करावी ही माहिती पाहिली. कोणकोणत्या घटकांवर आणि किती गुणांसाठी लेखी परीक्षा होणार आहे.याबाबत माहिती पाहिली.
लेखी परीक्षेत पात्र ठरण्यासाठी गुणांची अट
विद्यार्थ्यांना पोलीस भरती 2022 मध्ये लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य म्हणजेच कंपल्सरी आहे.ज्या विद्यार्थ्यांना 40 टक्के पेक्षा कमी गुण असतील त्या विद्यार्थ्यांना अपात्र ठरवले जाईल. 40 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले म्हणजे झाले असे नाही तर उर्वरित विद्यार्थ्यांचे मेरिट लावले जाईल आणि त्यानुसार पोलीस भरती होईल.
अशा पद्धतीने आजच्या लेखात आपण पोलीस भरती लेखी परीक्षा अभ्यासक्रम व तयारी 2022 ही माहिती पाहिली ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. यानंतरच्या लेखामध्ये आपण लेखी परीक्षेची तयारी करताना कोणकोणत्या पुस्तकांचा वापर करावा याविषयी माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर या अगोदर झालेल्या प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे आपण यावर्षी कशा पद्धतीने अभ्यास करावा याविषयी देखील स्वतंत्र लेख आपणासाठी प्रकाशित केले जातील.
पोलीस भरती मार्गदर्शन wtp ग्रुप
आपण पोलीस भरतीसाठी अथक मेहनत घेत आहात.आपल्या मेहनतीच्या जोडीला योग्य दिशादर्शने असणे चौकस असणे अतिशय गरजेचे असते. या दिशा दर्शनासाठी आम्ही आपणास योग्य असे मार्गदर्शन करू. यासाठी पोलीस भरती मार्गदर्शन ह्या आमच्या व्हाट्सअप ग्रुपला दररोज जॉईन व्हा यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
आमचे हे लेख जरूर वाचा