चंपाषष्ठी माहिती|champachashti mahiti
आजच्या लेखामध्ये आपण चंपाषष्ठी याविषयी माहिती पाहणार आहोत. जे लोक खंडोबाचे भक्त आहेत, त्यांच्यासाठी पर्वणीचा दिवस म्हणजे चंपाषष्ठी होय. चला तर मग चंपाषष्ठी विषयी माहिती पाहूया.चंपाषष्ठी माहिती |
चंपाषष्ठी (toc)
चंपाषष्ठी दिवसाचे महत्व|champachashti divasache mhatv
चंपाषष्ठी या दिवसाचे महत्व सांगायचे म्हटले तर खंडेरायाला शंकराची अवतार मानले जाते. या खंडेराया ज्या अवतारामध्ये खंडोबाने भक्तांच्या रक्षणासाठी जे वेगवेगळे दिव्य केले कष्ट घेतले त्या दिवसांमधील एक दिवस म्हणजे चंपाषष्ठी होय.चंपाषष्टी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील सहावा दिवस. म्हणजेच चंपाषष्ठी म्हणून ओळखला जातो.
चंपाषष्ठी दिवशी घडलेली घटना|champachashti divashi ghadleli ghatana
मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात म्हणजेच पहिला दिवस देव दीपावली ने सुरू होतो. या दिवसापासूनच खंडोबाची नवरात्री सुरू होते. या नवरात्रीचा सहावा दिवस म्हणून चंपाषष्ठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्याच दिवशी खंडेरायाने मनी मल्ल राक्षस हा सर्वसामान्य जनतेला अतिशय त्रास देत होता, त्याला धडा शिकवण्याचे काम आणि त्याचा वध ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी होय म्हणूनच खंडेभक्त या दिवसाला जेजुरी पाली यासारख्या ठिकाणी एकत्र जमतात आणि खूप मोठ्या उत्साहामध्ये चंपाषष्ठी साजरी केली जाते.चंपाषष्ठी उपवास|champachashti upvas
खंडेरायाची नवरात्री देव दिवाळीपासून सुरू झाल्यानंतर मार्गशीर्ष महिन्याच्या सहाव्या दिवशी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी हा जो सहा दिवसांचा कडकडीत उपवास असतो. ते मल्हार भक्त म्हणजेच खंडेरायाचे भक्त या दिवशी हा उपवास सोडतात.हा उपवास सोडण्या अगोदर खंडेरायाची पूजाअर्चा केली जाते तर ती पूजाअर्चा कशी केली जाते याविषयी माहिती पाहूया.चंपाषष्ठीचा विधी पूजा|champachashti vidhi Puja
चंपाचेष्टीच्या दिवशी खंडेरायाची पूजा करताना बेल, भंडारा, दवणा ,झेंडू यांच्या साह्याने श्री खंडेरायांची पूजाअर्चा केली जाते. पूजाच्या झाल्यानंतर खंडेरायाला नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्यानंतर ज्यांनी खंडेरायासाठी उपवास केलेला असतो ते तो उपवास म्हणजेच खंडेराया नवरात्री उद्यापन या चंपाषष्ठीच्या दिवशी केले जाते.चंपाषष्ठीचा नैवेद्य |champachashti naivadya
खंडेरायासाठी चंपाषष्ठीच्या दिवशी जो नैवेद्य केला जातो. किंवा जी तळी उचलली जाते ती पाहण्यासारखे असते. शेतकरी बांधवांसाठी त्या चंपाषष्ठीचे महत्व म्हणजे जोपर्यंत चंपाषष्ठीची खंडेरायाची तळी उचलत नाहीत,तोपर्यंत अनेक लोक या नैवेद्यातील म्हणजे तळीतील पदार्थ शेतात पिकले तरी खात नाहीत.म्हणून या नैवेद्याला विशेष असे महत्त्व आहे. चंपाषष्ठीचा नैवेद्य यात रोडगा ,भरीत, कांद्याची पात, लसूण यांचा समावेश असतो.हा रोडगा बाजरीच्या भाकरी पासून बनवला जातो आणि त्याची चव काही न्यारीच असते. हा नैवेद्य खंडेरायाला दाखवला जातो आणि त्यानंतरच ज्यांनी खंडेरायाच्या नवरात्रीचा उपवास केला आहे त्या व्यक्ती आपला उपवास सोडतात.चंपाषष्ठीची तळी |champachashti
खंडेरायाची पूजा करत असताना किंवा पूजा झाल्यानंतर तळी उचलण्याची प्रथा आहे.ही तळी उचलण्यासाठी एका ताटामध्ये पान सुपारी द्या घेतले जातात. व त्या ताटाला पाच व्यक्ती आता मध्ये पकडतात व तीन वेळा वरती उचलून सदानंदाचा येळकोट घे व येळकोट येळकोट जय मल्हार असा जप करतात किंवा त्याचा उच्चार करतात. यानंतर खंडेरायाला भंडारा आणि खोबरे उजळण्याची प्रथा आहे.पंपाचेष्टीच्या दिवशी जेजुरी किंवा अन्य खंडेरायाच्या तीर्थस्थानी खूप मोठ्या जल्लोषात चंपाषष्ठी साजरी केली जाते. उपाशी तिच्या दिवशी खंडेरायाने मनी मल्लाचा वध केला.
अशाप्रकारे चंपाषष्ठी ची माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.
आमचे हे लेख जरूर वाचा