Type Here to Get Search Results !

मराठीतील विरामचिन्हे | marathitil viramchinhe

 

मराठीतील विरामचिन्हे |viramchinhe


मराठी भाषा ही विविधतेने नटलेली आहे. आपण त्याच विरामचिन्हांचा अभ्यास करणार आहोत. 

मराठीतील विरामचिन्हे
मराठीतील विरामचिन्हे


विरामचिन्हे(toc)


मराठीतील विरामचिन्हे |marathitil viramchinhe

आपण बोलत असताना आपल्याला मधून मधून थांबावे लागते. या थांबण्याला विराम असे म्हणतात. आपल्या बोलण्यातील सर्व वाक्य सारखीच नसतात ती वेगवेगळी असतात. आपले विधन कधी उद्गारवाचक, कधी आपल्याला प्रश्न विचारायचा असतो, तर कधी आपले विधान अपूर्ण असते. अशावेळेस आपले विशिष्ट आशय व्यक्त करण्यासाठी आपण बोलताना कमी-अधिक वेळ थांबतो. यातून आपल्या मनातील नेमका आशय, विचार व्यक्त होत असतो.
   जेव्हा हेच विचार आपण लिहून दाखावितो तेव्हा बोलण्यातील विराम वेगवेगळ्या चिन्हांनी दाखवले जातात. अशा चिन्हांना विरामचिन्हे म्हणतात.चला तर मग मराठीतील विरामचिन्हे पाहूया.

 1. पूर्णविराम |puranviram . 

१. विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी उदा. अजय गावाला गेला.
२. शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आदयाक्षरांपुढे
उदा. (ता.क.) केशवसुतांनी याचा वापर केला आहे ताजा कलम
 

2. अर्धविराम |aradhviram ;

     दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली  
     असतात. उदा मुलांनी खूप अभ्यास केला; पण                                        
   परीक्षा झालीच नाही.
 

3. स्वल्पविराम |swalpvairam ,

१.  हा एकच जातीचे अनेक शब्द लागोपाठ असल्यास
उदा. भाषण, कला, क्रीडा या क्षेत्रात यश संपादन करणारी मुले सर्वांना आवडतात.
२. संबोधन दर्शविताना  उदा. मिनल, घर स्वच्छ कर.
 

4. अपूर्णविराम |apurnviram :

 वाकयाच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास
उदा. खेळाच्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषीक मिळवीणारे विद्यार्थी पुढीलप्रमाणे: अजय, आशीष, मोनिका, जानवी, वैशाली आणि कुणाल

 
5.प्रश्नचिन्ह |prashnchinah ?

प्रश्नार्थक वाक्याच्या शवेटी या चिन्हाचा वापर केला जातो.
उदा. तू गावाला कधी जाणार आहेस?
 

6. उद्गारचिन्ह udgar chinh!

उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी किंवा व्यकत्‍ करताना शब्दाच्या शेवटी
उदा. अबब। केवढा मोठा पर्वत आहे।
उदा. शाबास। छान गुण मिळविेलेस।

 

7. अवतरण चिन्हे – (दुहेरी)   आणि (एकेरी) ‘


दुहेरी अवतरण चिन्हे 

बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द आहेत हे दाखवण्यासाठी
उदा. संदीप म्हणाला की, मला परिक्षेत खूपच छान मार्क मिळाले.

एकेरी अवतरण चिन्हे

 एखाद्या धब्दावर जोर द्यावयाचा असल्यास दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगाताना.
उदा. भाषेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ‘व्याकरण’ म्हणतात.
 

8. संयोग चिन्ह|sanyog chinh –

१. दोन शब्द जोडताना याचा उपयोग केला जातो.
 
उदा. भाजी-पाला,
२. ओळीचा शब्द अपूर्ण राहिल्यास उदा. आपण आ-
लेल्या पाहूण्यांचे स्वागत करुयात.
 

9. आपसारण चिन्ह  |apsaran chinah –

   १. बोलता बोलत विचारमालिका तुटल्यास या चिन्हाचा वापर केला जातो. 
     
    उदा. कार्यक्रम वेळेत सुरू झाला पण-

२. स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास 
उदा. मी प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकले पण-

आमचे हे लेख वाचा









 
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area