मराठी फिशपाँड 2022| marathi fishpond | मराठी शेलापागोटे | marathi shela pagote
वार्षिक स्नेहसंमेलन म्हटले की विद्यार्थ्यांना आपले कलागुण दाखवण्याची एक नामी संधी असते. वार्षिक स्नेहसंमेलनात किंवा गॅदरिंग मध्ये सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम कोणता असतो तर तो असतो फिशपाँड. म्हणूनच आजच्या प्लॅनमध्ये आपण काही मजेशीर मराठी फिशपाँड पाहणार आहोत. हे फिशपाँड पाहिल्यानंतर आपल्याला आपले गॅदरिंग गाजवताना नक्कीच याचा उपयोग होईल.याला काहीजण मराठी शेला पागोटे देखील म्हणतात.
फिशपाँड म्हणजे काय ? Fishpond mhanje kay | what is meaning of fishpond shela pagote मराठी शेला पागोटे म्हणजे काय?
फिशपाँडलाच मराठीमध्ये शेलापागोटे असे देखील म्हटले जाते. फिशपाँड म्हणजे काय तर स्नेहसंमेलन गॅदरिंग यासारख्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला एखाद्याची खटकत असलेली गोष्ट एका वेगळ्या पद्धतीने सांगणे किंवा टोमण्याच्या स्वरूपात सांगणे म्हणजे फिशपाँड होय.आपण कोणी प्रमुख पाहुणे आले तर त्यांना शेला म्हणजे शाल देऊन त्यांचा पाहुणचार करतो.तर पागोटे म्हणजे त्यांना भेटवस्तू देणे होय.यातूनच उपहासात्मक फिशपाँड ही संकल्पना आली.हे फिशपाँड केवळ विद्यार्थ्यांवरच असतात असे नाही तर शिक्षकांवर देखील हे फिश पॉइंट असतात. एकाद्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धत, किंवा त्यांच्या तोंडामध्ये येणार एकाला शब्द, त्यांची शरीरयष्टी यावर देखील ते असू शकतात. marathi fishpond म्हणजे एक प्रकारे टोमण्याच्या स्वरूपात आपले मित्र मैत्रिणी शिक्षक यांना मोकळेपणाने बोलण्याची संधी म्हणजे फिशपाँड होय. चला तर मग आज असे काही छान छान शिक्षक,शिक्षिका,मुले ,मुली यांच्यावरील फिशपाँड पाहूया.
शिक्षकांसाठी असलेले फिशपाँड 2022शेलापागोटे | teachers fishpond in marathi
१. फळ्यावर लिहून लिहून संपवले सगळे खडू,
आता तरी गुरुजी द्या कि लग्नाचे लाडू ....
२. कधीकाळी आला होता रोग नारू,
आमच्या....... सरांना लागते कधीमधी दारू.
३. सर रोज नको नको त्या प्रश्नपत्रिका
आम्हाला हवी तुमची लग्नाची पत्रिका
४. घड्याळात वाजले बारा,
सर बस झाला अभ्यासाचा पसारा.
५. इकडून आला वारा,
तिकडून आला वारा,
..... सरांचा चढतो सारखा पारा.
६. सर कशाला हवा तुम्हाला बॉब कट,
एकदाच मारून टाका की आपला गांधी कट.
७. भूगोलात सुटतात सोसायट्यांचे वारे,
.... सर नुसतेच छडीने मारे.
८. आम्हाला सांगतात हे खंड ते खंड,
..... सर मधल्या सुट्टीत खातात नुसते श्रीखंड.
शिक्षिकासाठी फिशपाँड 2022 |lady teachers fishpond in marathi शेलापागोटे
१.इतिहासाच्या तासाला .... मॅडमची कायम चालते चळवळ,
आम्हाला मात्र करून देत नाहीत वळवळ.
२..... भूगोलाच्या मॅडम म्हणातात लवकर आणा पृथ्वी गोल,
पण त्याच बनल्यात शिकवून शिकवून ढब्बू ढोल.
३........ बाई वर्गात आल्या की सांगतात काहीबाही,
त्यांना बेल होताच असते घरी जायची घाई.
मुलांसाठी व मुलींसाठी फिशपाँड 2022 | marathi fishpond best friend boys and girls शेलापागोटे
मुलांसाठी फिशपाँड 2022| marathi fishpond best friend boys शेलापागोटे मराठी
१. शरीरावर नाही मूठभर मास,
येड्या दररोज दात घास.
२. शरीरात नाही रक्त,
म्हणे मी बलवान फक्त.
३. आमची .....करायला गेली रक्तदान,
डॉक्टर बोलल्या वेडे बाटली नको
चमचा आण.
मुलींसाठी फिशपाँड 2022| marathi fishpond girls
४. पुढून सपाट,
अहो मागून पण सपाट,
..... आहे गोदरेजचे कपाट.
सुंदर मुलींसाठी मराठी फिशपाँड 2022 | smart girl fushpond in marathi
५.मागून पाहतो तर त्याची इस्त्री कडक,
थोबडा त्याचा जशी गावची डांबरी सडक.
६.अहो ...... स्वतःला समजतो विनोद खन्ना ,
याला जरा बाजूला घेऊन हाना ना.
७.स्वतःला समजतो हॅरी पॉटर ,
.......ला द्या आधी ग्रायप वॉटर.
सावळ्या आणि काळया मुलींसाठी फिश पॉइंट| black girl fushpond marathi
८ . स्वतःला समजते ममता कुलकर्णी,
तिच्यापेक्षा बरी आमची मोलकरणी
९. कॉलेजला येतात किंवा सुटा बुटात,
घरी झोपत असेल गोणपटत.
१०. स्वतःला समजते ऐश्वर्या राय,
दिसते मात्र भंगार गोळा करायला आलेली बाई.
११...… म्हणते,
हा माझा भाऊ,
तो पण माझा भाऊ,
आता पिक्चर ला कोणासोबत जाऊ.
१२....... यांचा चेहरा आहे भोळा,
पण लफडे असतील सोहळा.
१३. कोणी आले गेले फिदी फिदी असते,
तिला वाटते मीच विको वज्रजंतीने दात घासते.
१४. आता काय मी सांगू,
दाजिबा कोणाला सांगू,
मलाच वाटते माझी लाज,
वजन काट्यावर उभी राहता,
वजनाचा काटा तुटला आज.
१५....... याला आहे कवितेचा छंद,
त्याला काय माहिती हाच आहे
जगातला सर्वात मंद.
१६. बाजारात लागलाय की सेल,
...... एकदा तरी डोक्याला लाव की तेल.
१७. एक गाणे गाजले फार,
कुणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे,
...... चा चेष्मा म्हणे किती दिवस माझ्या नाकाला ओझे.
१८. वादळ म्हटलं की सुटतो जोरदार वारा,
..... चा लूक म्हणजे नुसता दरारा.
१९. अहो जीवनात भेटावे एखादी कायम वाट पाहणारी,
..... ला भेटली गावच्या भंडाऱ्यात रेटून जेवणारी.
मराठी विनोदी फिशपाँड| marathi comedy fishpond
१. बाजारात घुसला म्हशींचा घोळका,
....... मला बी ओळखा.
२.अटक मटक चवळी चटक,
वाढत नसेल उंची तर,
झाडाला लटक.
३. घड्याळात पडला बाराचा ठोका,
....... ला दिला ... ने धोका.
श्रीमंत मुलींसाठी फिशपाँड| shrimant mulinasathi marathi fushpond
४. तुमच्या घरात आणले छान छान फर्निचर,
......... च्या बाजूला बसते तीच आहे माझं फ्युचर.
५. खरखर वास्तव मिक्सर,
....... झाला फिशर.
६. रूप तुझे मस्ताने ,
नीट बस नाहीतर ,
बेंच तुटेल तुझ्या वजनाने .
७. चालता चालता माझ्या चप्पलचा तुटला बंद,
आता असे वाटते कुणाशी जुळणार नाहीत माझे स्नेहबंध.
८. स्वतःला समजतो भारी मिथुन,
कपडे आणतो दादरच्या बाजारातून.
९.आमच्या नदीचे गेले पाणी आटून,
...... लग्न लावा एकादा रेडा गाठून.
१०. लांबून पाहिलं तर वाटली आसमानची परी,
जवळ आल्यावर पाहतो तर पावडर से भरी.
११ चार चपला हाना,
पण मला माधुरी म्हणा.
१२.हे दोघे चंगू आणि मंगु
यांना काय माहीत यांची एकच आहे गंगू.
तंबाखू ,गुटखा खातात त्या मुलांसाठी फिशपाँड | tambakhu khanarya mulansathi fishpond
तुझे गाव पूना ,
माझे गाव पुना,
आधी लाव,
तंबाखूला चुना.
आजच्या लेखामध्ये आपण शिक्षकांसाठी असलेले फिशपाँड, शिक्षकांसाठी असलेले फिशपाँड,मुलांसाठी असलेले फिशपाँड,मुलींसाठी फिशपाँड, काळया मुलींसाठी फिशपाँड,विनोदी फिशपाँड,तंबाखू ,गुटखा खातात त्या मुलांसाठी फिशपाँड पाहिले.
हे पण वाचा ↴
मराठी फिशपाँड व्हिडीओ | marathi fishpond
आपल्याला मराठी फिशपाँड सादरीकरण करताना त्याची मांडणी कशी असावी यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.
आपल्याकडे जर शेला पागोटा कार्यक्रम , गॅदरिंग साठी लागणारे मराठी तंबाखू ,गुटखा खातात त्या मुलांसाठी फिशपाँड असतील तर कमेंट करा.आपल्या नावासह ही माहिती ad केली जाईल.आमचा आजचा मराठी फिशपाँड हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.
आमचे हे लेख जरूर वाचा
- 15 ऑगस्ट अमृत महोत्सव सूत्रसंचालन
*स्वातंत्र्यदिनाची संपूर्ण माहिती
■ स्वातंत्र्यदिन हर घर तिरंगा घरोघरी तिरंगा