बालिका दिन मराठी भाषण | balika din marathi bhashan
नमस्कार! 3 जानेवारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. कारण का तर 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस. महिलांसाठी शिक्षणाचे द्वार खुले करणाऱ्या आद्य शिक्षिका, समाजसेविका आणि सत्यशोधक समाजाच्या एक निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या क्रांतिवीर महात्मा फुले यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होय. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गुणगौरव म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रभर 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये बालिका दिन वक्तृत्व स्पर्धा, बालिका दिन वाद विवाद स्पर्धा त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या बालिका दिवसाचे महत्व कळावे म्हणून बालिका दिन मराठी भाषणाचा एक नमुना पाहणार आहोत. या बालिका दिनाच्या भाषणातून आपल्याला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बहुमूल्य कार्याचा आढावा घेता येणार आहे.
बालिका दिन मराठी भाषण |
बालिका दिन मराठी भाषण नमुना | balika din marathi speech
भाषण ही एक कला आहे. आपण ज्या विषयावर भाषण देतो.त्या विषयासंदर्भात आपल्याला अगोदर सर्व संदर्भ एकत्रित करावे लागतात. एकत्रित केलेले संदर्भ आपण इतरांशी बोलत आहोत अशा शैलीत मांडावे लागतात. आपल्याला गुरुपौर्णिमा या विषयावर भाषण करायचे असेल तर आपल्याला गुरु शिष्यांच्या जोड्या, गुरुपरंपरा या विषयी माहिती एकत्रित करावी लागते. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला बालिका दिन भाषण तयार करत असताना बालिका दिन हा दिवस पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो याविषयी विवेचन करावे लागेल. साहजिकच आपल्याला बालिका दिन भाषणाची तयारी करत असताना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील लहान लहान संदर्भ शोधावे लागतील तसे केले तर आपले बालिका दिन भाषण अतिशय मुद्देसूद आणि छान होईल. चला तर मग बालिका दिन मराठी भाषण अगदी साध्या व सोप्या भाषेमध्ये पाहूया. या भाषणात आपण कुठेही ऐकली नसेल अशी छान व सुंदर माहिती आम्ही आपणास दिलेली आहे.
@@बालिका दिन दहा ओळींचे सोपे इंग्रजी भाषण
(बालिका दिन मराठी भाषण आकर्षक सुरुवात | balika din bhashan intresting start )
अध्यक्ष! ,महाशय! ,गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो आज 3जानेवारी बालिका दिन. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. या शुभप्रसंगी मला माझे विचार व्यक्त करण्याची संधी एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती मिळत आहे. म्हणून मी सर्वप्रथम या व्यासपीठाचे आभार मानून माझे विचार मांडायला सुरुवात करतो ते आपण शांत चित्ताने ऐकावेत ही विनंती.
सावित्रीबाई यांनी मुलींच्या शिक्षणासाठी जे अनमोल योगदान दिले आहे. त्या योगदानाबद्दल कवितेत सांगायचे झाले ,तर एक कवी सूर्यकांत डोळसे आपल्या कवितेत म्हणतात,
@सावित्रीबाई फुले जयंती /बालिका दिन शुभेच्छा संदेश पाहण्यासाठी क्लिक करा.
सगळ्या कुलूप बंद व्यवस्थेची,
शिक्षण हीच चावी होती,
ज्योतिबांना सावित्री मिळाली
त्यांना जशी हवी होती.
या ओळी आपल्याला खूप काही सांगून जातात. आपल्याला जर माणसांमध्ये परिवर्तन करायचे असेल तर त्यासाठी शिक्षणासारखे प्रभावी साधन नाही. असे मानणारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे गमक जाणले आणि म्हणूनच त्यांना मुलींना शिक्षण देण्यासाठी एका सामाजिक बांधिलकी असणाऱ्या जोडीदाराची आवश्यकता होती. सावित्रीबाई अगदी तश्याच होत्या.महात्मा फुले एका कवितेत म्हणतात,
जिच्या हाती पाळण्याची दोरी,
ती जगाला उद्घारी.
हे महात्मा फुले यांनी जाणले .आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम आपल्या घरामध्ये शिक्षणाचे धडे दिले. आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लाऊन सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षण देण्यासाठी सज्ज झाल्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले एक महिला शिक्षण प्रसारक, समाज सुधारक ,भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाची जननी याचबरोबर दिन दलित महिलांसाठी देखील शिक्षणाची ज्ञानगंगा ज्यांनी खुली करण्याचे काम केले.लोक साक्षर नसतील शिकलेले नसतील तेवढा एका विशिष्ट वर्गाचा फायदा होता. अशा काळात मोलाचे योगदान दिले ते सावित्रीबाई फुले यांनी. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. नि आज तो साजरा करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. खरोखरच महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार.
(बालिका दिन भाषण मध्यावर आल्यावर सावित्रीबाई यांचा जीवन परिचय balika din marathi speech middle)
महिलांच्या शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा खेडेगावांमध्ये 3 जानेवारी 1831 रोजी झाला. लग्न म्हणजे काय असते? हे देखील ज्या वयात कळत नाही. या वयामध्ये त्यांचा विवाह झाला.सावित्रीबाई त्यावेळी अवघ्या नउ वर्षाच्या होत्या. आता विचार करा ! नऊ वर्षाच्या मुलीची जाण किती असते.अशा वयामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या खांद्यावरती संसाराच्या जबाबदारी आल्या. ज्यावेळी सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या घरी आल्या त्यावेळी महात्मा फुले यांचे देखील शिक्षण सुरू होते. महात्मा फुले हे आधुनिक विचारांनी परिपक्व होते. महात्मा फुले यांच्यावर थोर थॉमस स्पेन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रभाव होता. म्हणूनच आपली पत्नी सावित्रीबाईस शिक्षण देण्याचा निर्णय महात्मा फुले यांनी घेतला.घरातील, शेतातील दैनंदिन कामे करत असताना वेळ मिळेल तसे ते पत्नी सावित्रीला शिकवत गेले. पत्नीसाठी ते स्वतः शिक्षक बनले.सावित्रीबाई यांना देखील त्यांच्याकडून शिक्षण घेणे आवडू लागले.
शिक्षणाची ही ज्ञानगंगा सर्वांना मिळावी या भूमिकेतून महात्मा फुले यांनी दिन दलितांच्या मुलांसाठी शाळा सुरू केल्या. परंतु महिला वर्ग हा कायम या शिक्षणापासून वंचितच राहणार. जर आपल्याला संपूर्ण घराचा विकास करायचा असेल तर त्या घरातील महिला शिक्षित झाली पाहिजे. हे गुपित महात्मा फुले यांनी जाणले व म्हणूनच महिलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावरती सोपवली.
अगदी सुरुवातीच्या काळामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या वरती काही पुरोगामी विचारांच्या लोकांनी महिलांना शिक्षण देणार म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये खूप टीका केली. केवळ टिका करूनच ते थांबले नाहीत तर सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी शाळेला जात होत्या. त्यावेळी त्यांच्या अंगावरती शेण देखील फेकण्यात आले.परंतु मागे फिरून पाहतील त्या सावित्रीबाई कसल्या? मी या लोकांच्या विरोधाला न जुमानता आपले पती ज्योतिबा फुले यांनी आपल्याला शिकवत आहेत. ते सर्व ज्ञानगंगा त्यांनी महिलांपर्यंत पोहोचवली.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1948 रोजी पुण्याच्या भिडे वाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली. भारतातल्या व्यक्तीने स्वतः पुढाकार घेऊन मुलींसाठी काढलेली पहिली शाळा म्हणून या शाळेला ओळखले जाते.या शाळेच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई होत.
सावित्री तू होतीस म्हणून
आज आम्ही ज्ञान कण पीत आहोत
तू नसतीस तर आज आम्हीही नसतो
या व्यवस्थेच्या बागलबुव्यात
असून नसल्यासारखे असतो
खरोखरच सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी जर स्त्री शिक्षणाची द्वारे खुली केली नसती तर आज महिलांना कोणत्याही प्रकारचे अस्तित्व मिळाले नसते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे दूरदृष्टी असलेले विचार खरोखरच समाजाला पुढे घेऊन जाणारे ठरले कारण आज कोणते क्षेत्र घ्या त्या क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर असताना दिसत आहेत. सुधारक हा ज्या काळात जगतो त्यापेक्षा पुढच्या शंभर वर्षांचा विचार करत असतो. खरोखरच हे वाक्य सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यासाठी अगदी लागू होते.
सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा सुरू केली त्यावेळी फक्त 6 मुली होत्या. हळूहळू त्या शाळेचा पट वाढू लागला.अगदी सुरुवातीला सावित्रीबाई यांना विरोध होऊ लागला परंतु कालांतराने काही केल्या सावित्रीबाई थांबणार नाहीत म्हटल्यावर विरोधकांचा विरोध थोडा मावळला. यानंतर मात्र एकापाठोपाठ एक अशा अनेक शाळा सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी काढल्या.
अनिष्ट प्रथा बंद
सावित्रीबाई फुले यांनी केवळ स्त्री शिक्षणच नव्हे तर केशवपण सारख्या वाईट प्रथा बंद व्हाव्यात यासाठी आवाज उठवला. विधवांना देखील पुनर्विवाहाचा अधिकार हवा त्यांनी सती का जावे असा त्याकाळच्या व्यवस्थेला प्रश्न केला. कुमारी माता,विधवा माता यांच्यासाठी अनाथ बालिकाआश्रम सुरू करून अनेक कुमारी मातांची,विधवा माता यांची बाळंतपणे स्वतः सावित्रीबाई यांनी केली.संकट समयी धावून जाणे, समोरच्याला धीर देणे हे व्रत सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर जपले.
25 डिसेंबर 873 रोजी आपली मैत्रीण बजुबाई हिचा विवाह सीताराम आल्हाट नावाच्या ग्रहस्ताशी लावून दिला.तो विवाह लावत असताना कुठल्याही प्रकारचा हुंडा दिला नाही.एवढेच नव्हे तर सत्यशोधकीय पद्धतीने विवाह लावला.पुरीहितास देखील लग्न लावण्यासाठी बोलावले नाही. हे उदाहरण देण्याचे एकच कारण या लग्नामध्ये नवरदेवाने मी मुलीला शिक्षण देण्याची आणि बाकी इतर बाबतीमध्ये समान हक्क देण्याची सर्वांसमोर प्रतिज्ञा केली म्हणून खास ठरला. खरोखरच त्या काळचा विचार करता सावित्रीबाई फुले यांनी दिलेली योगदान अतिशय उल्लेखनीय आहे.
सावित्रीबाई फुले प्रतिभावंत कवयित्री
सावित्रीबाई फुले केवळ समाज सुधारक होत्या असे नव्हे तर त्या एक प्रतिभावंत कवयित्री होत्या.सावित्रीबाई फुले यांनी काव्यफुले हा काव्यसंग्रह लिहिला. तो 1854 ला प्रकाशित करण्यात आला. सावित्रीबाई यांनी दुसरा काव्यसंग्रह बावनकशी रचला. त्यांनी लिहिलेल्या सुबोध रत्नाकर ग्रंथामध्ये तत्कालीन समाज व्यवस्थेचे चित्रण केले आहे. तत्कालीन समाज व्यवस्थेवरती,अनिष्ट रूढी परंपरा यावरती आपल्या लेखणीच्या माध्यमातून ताशेरे वाढण्याचे काम त्यांनी केले.
विद्यार्थ्यांसाठी पहिले वाचनालय
सावित्रीबाई फुले यांचे अजून एक महत्त्वाचे योगदान म्हणजे मुलांनी केवळ पुस्तकी शिक्षण न घेता बाहेरच्या जगाचे देखील त्याला ज्ञान मिळाले पाहिजे. म्हणूनच त्यांनी वेताळ पेठेत मुलांसाठी पहिले वाचनालय सुरू केले.
दुष्काळात गोरगरिबांसाठी अन्नछत्र
1876 - 77 मध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता. दुष्काळामध्ये गोरगरिबांना दोन वेळचे खाण्याचे वांदे झाले. अशा परिस्थितीमध्ये अन्नछत्र सुरू करून सावित्रीबाई फुले यांनी अनेक गोर गरीब लोकांना आधार दिला व अनेकांची उपासमार थांबवली. महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांचे जे समाजकार्य होते ते समाजकार्य सावित्रीबाई फुले यांनी अतिशय हिरीरीने पुढे चालू ठेवले.
1897 च्या प्लेग साथीमध्ये रुग्णसेवा
1897 मध्ये महाभयंकर अशी प्लेग ची साथ पुणे व आसपासच्या परिसरात पसरली होती. प्लेगच्या साथीमुळे लोक एकमेकांच्या जवळ जात नव्हते. परंतु अशावेळी देखील आपल्या जीवाची पर्वा न करता सावित्रीबाई फुले यांनी रुग्णसेवा केली.अनेकांची शुश्रुषा केली. सावित्रीबाई फुले यांचे हे समाजकार्य नियतीला देखील मान्य नव्हते की काय असे रागाने म्हणावे वाटते कारण या प्लेगच्या साथीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची ज्योत अखेरची मावळली.
आजच्या या बालिका दिन भाषण प्रसंगाच्या निमित्ताने प्रत्येक महिलेने सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे. ती शिक्षणाच्या प्रवाहामध्ये टिकली पाहिजे.यासाठी सज्ज रहायला हवे. हे जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रामध्ये बालिका दिन साजरा झाला असे मी म्हणेन.अन्यथा बालिका दिनाला मोठमोठे कार्यक्रम करून, हारतुरे शुभेच्छा देऊन व कितीतरी मुली शिक्षणापासून वंचित ठेवून आपण बालिका दिन साजरा करणे म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्यासारखे आहे. चला तर मग आज सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी बालिका दिनाचे औचित्य साधून आपण संकल्प करूया. मुलगा असो की मुलगी शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही.शिक्षणाचा हक्क सर्वांना मिळवून देण्यासाठी मनापासून प्रयत्न करूया.हाच खरा बालिका दिन असेल.
(बालिका दिन भाषण शेवट आजच्या काळावर भाष्य balika din marathi speech end point)
आज balika din bhashan करीत असताना एक आगळीवेगळी ऊर्जा या व्यासपीठाच्या माध्यमातून मला मिळालेले आहे.आयोजक,नियोजक यांनी आज मला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा / त्यांची आभारी आहे. एवढे बोलून मी माझे balika din marathi speech म्हणजेच बालिका दीन मराठी भाषण रुपी दोन शब्द थांबवतो./थांबवते.
अशा पद्धतीने आपण बालिका दिनाचे भाषण अतिशय छानपणे करू शकता.हा केवळ एक भाषणाचा नमुना आहे.आपल्याकडे जर यापेक्षा वेगळे काही संदर्भ असतील, काही छान छान कोटेशन असतील तर आपण या बालिका दिनाच्या भाषणामध्ये ऍड करू शकता.
देणाऱ्याने देत जावे ,
घेणाऱ्याने घेत जावे.
बालिका दिन मराठी भाषण pdf | balika din marathi bhashan pdf
अशा पद्धतीने हे विचारांच्या देवाणघेवाणीचे कार्य ज्ञानयोगी डॉट कॉम/ व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. आमचा आजचा हा बालिका दिन भाषण हा लेख आपणास कसा वाटला. हे आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!
या भाषणाला असेही म्हणता येईल.
- सावित्रीबाई फुले जयंती भाषण
- सावित्रीबाई बाई फुले कार्याचा परिचय देणारे भाषण
- क्रांतिज्योती सावित्रीबाई मराठी भाषण
अशा कोणत्याही शीर्षखाखाली आपण वरील भाषण संदर्भ म्हणून वापरू शकता.
FAQ
१. बालिका दिन साजरा करणारे पहिले राज्य कोणते?
महाराष्ट्र
२.बालिका दिन किती तारखेला साजरा केला जातो?
३ जानेवारी
३. कोणाचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.
सावित्रीबाई फुले
४. सावित्रीबाई फुले यांचे महत्वाचे कार्य कोणते ?
स्त्री शिक्षण
आमचे हे लेख वाचा