दत्त जयंती जन्मकथा मराठी माहिती दत्ताची आरती पाळणा पीडीएफ | datta jayanti janmkatha marathi mahiti dattchi aarti palana pdf
मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर श्री दत्तांचा जन्म झाला. तो दिवस श्री दत्त जयंती किंवा श्री दत्तात्रय जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला दत्त पौर्णिमा म्हणून देखील संबोधले जाते. म्हणूनच आजच्या लेखांमध्ये आपण श्री दत्त जयंती माहिती श्री दत्ताची जन्म कथा त्याचबरोबर दत्ताची आरती आणि दत्ताचा पाळणा ही सर्व माहिती पाहणार आहोत. तर मग सर्वप्रथम श्री दत्त जयंतीची माहिती पाहूया.
दत्त जयंती जन्मकथा मराठी माहिती दत्ताची आरती पाळणा पीडीएफ |
दत्त जयंती माहिती | datta jayanti mahiti
मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला जयंती साजरी केली जाते. दत्ताचा जन्म हा सायंकाळी झाल्यामुळे दत्तभक्त घराघरांमध्ये, मंदिरांमध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतात. या भूतलावर असूरी शक्ती मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवत होत्या,त्यांचा नायनाट करावा त्या असुरांना धडा शिकवण्यासाठीच दत्तांनी विविध रूपे किंवा अवतार धारण करून या असूरांचा नायनाट केला असे सांगितले जाते. ब्रह्मदेवांनी आदेश केला व त्या आदेशानुसारच दत्ताचा जन्म झाला. दत्त जन्माचे प्रयोजन काय तर वाईट शक्तींचा अंत होय. थोडक्यात वाईट शक्तीच्या अंतसाठी ज्या देवतेचा जन्म झाला ती देवता म्हणजे दत्त देवता होय. अशा पद्धतीने आपल्याला दत्त जयंतीची माहिती सांगता येते.
दत्त जयंतीचे महत्व | datta jayanti mahtav
दत्त जयंतीचे महत्त्व सांगायचे झाले तर असे सांगता येईल, दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्त्व हे हजारो पटींनी या भूतालवरती शक्ती प्रदान करत असते,म्हणूनच दत्त जयंतीच्या दिवशी दत्त उपासक दत्त नामाचा दिवसभर जप करत असतात, मनोभावे पूजाअर्चा करत असतात.
दत्त जन्मोत्सव | datta janmotsav
दत्त जन्मोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो तर, दत्त जयंतीच्या अगोदर सात दिवस अनेक लोक गुरुचरित्राचे पारायण लावतात. दत्त जयंतीच्या दिवशी या पारायणाचे उद्यापन करतात. त्या दिवशी मंदिरांमध्ये, घरामध्ये भजन कीर्तनाचे कार्यक्रम होत असतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला सायंकाळच्या वेळी दत्तगुरूंची पूजाअर्चा केली जाते. कृष्ण जन्म झाल्यावर सुंठवडा वाटला जातो. त्याच पद्धतीने दत्त जन्माला देखील सुंठवडा वाटून श्री दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्त जयंतीची माहिती पाहिल्यानंतर या दत्ताच्या जन्मा विषयीची दत्त जन्म कथा सांगितली जाते तिची माहिती पाहूया.
दत्त जन्म कथा | datta janm katha
दत्त जन्म कथेविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. यापैकी गुरुचरित्रातील चौथ्या अध्यायामध्ये दत्तजन्माची एक कथा सांगितलेली आहे. ती आपण थोडक्यात पाहूया.
गुरुचरित्रामधील चौथ्या अध्यायामध्ये एक कथा सांगितलेले आहे.त्या कथेनुसार सृष्टी निर्मिती पूर्वी या सृष्टीमध्ये सगळीकडे पाणीच पाणी होते. यानंतर ब्रह्मदेवाने या सृष्टीचे दोन तुकडे केले. त्यातील एक तुकडा म्हणजे आकाश आणि एक तुकडा म्हणजे पाताळ अशी रचना झाली .त्यावेळी ब्रह्म देवाने 14 भवणे तयार केली असे सांगितले जाते.त्याचबरोबर सृष्टीची रचना करण्यासाठी त्याने सात मानसपुत्र तयार केले.जेणेकरून सृष्टी रचताना त्यांची मदत होईल. त्या सात मानसपुत्रांपैकी दत्त जन्माची संबंधित असलेले एक म्हणजे अत्री ऋषी होय.
अत्री ऋषींची पत्नी अनुसया ही दिसायला सुंदर तसेच पातीव्रत्याचे पालन करणारी होती. तिला एक पतिव्रता म्हणून सर्वत्र मान्यता मिळू लागली होती. हे असेच सुरू राहिले तर ,आपले देव पद धोक्यात आहे असे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना वाटू लागले. म्हणूनच माता अनुसयाचे तपोबल कमी करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश हे साधूंच्या वेशात माता अनुसयाच्या घरी आले. त्यावेळी अत्री ऋषी स्नानासाठी बाहेर गेले होते. ब्रह्मा ,विष्णू महेशाने माता अनुसयाच्या दारासमोर येऊन माता भिक्षा देई.अशी आरोळी दिली.
अनुसया दारामध्ये आली त्यावेळी तीन साधू आलेले आहेत .हे पाहून अतिशय आनंदी झाली. आणि त्या साधूंना भिक्षा देऊ लागली. त्यावेळी ते साधू म्हणाले माता आम्हाला भूक लागलेली आहे. आम्हाला जेवण करावयाचे आहे.त्यावेळी माता अनुसया त्या साधूंसाठी जेवण बनवू लागली. पतीचे तपोबल असणाऱ्या अनुसयाने त्या तीनही साधूना पंचपकवांन बनवले;पण हे साधू असून देवच आहेत. त्या अनुसयाच्या लक्षात आले नव्हते.या तिघांनीही मागणी केली की आम्हाला इच्छा भोजन हवे आहे.
या तीनही साधूंची अशी आगळीवेगळी मागणी पाहून माता अनुसया विचारात पडली, परंतु आपल्या घरी आलेले अतिथी यांचा हट्ट पूर्ण करणे. आपले कर्तव्य आहे. कारण तशी त्यांना पती अत्री ऋषी यांची शिकवण आहे.पतीला स्मरून त्यावेळी त्या इच्छा भोजन वाढण्यासाठी आल्या. त्या साधूंच्या मनातील कपट भावना निघून गेली. माता अनुसयाच्या तपोबलाने ते तीनही देव म्हणजे साधू लहान बालके बनले.
पतिव्रता मध्ये किती ताकद आहे. हे अनुसयाने अवघ्या सृष्टीला दाखवून दिल.तिची आगळीवेगळी ख्याती निर्माण झाली. इकडे आडकून पडलो तर, हा सृष्टीचा पसारा कोण चालवणार? म्हणून ब्रह्मा विष्णू महेश्वर वैतागले व आपण बालकांच्या रूपात किती दिवस येथे अडकून पडणार? म्हणून त्यांनी आपले खरे रूप माता अनुसयाला दाखवले. त्यावेळी माता अनुसया यांनी या तिन्ही देवांकडे प्रार्थना केली, की आपण त्रिमूर्ती स्वरूपात इकडेच राहावे.आणि हा त्रिमूर्ती स्वरूप म्हणजेच दत्त होय .अशाप्रकारे दत्त जन्माची कथा सांगितली जाते.
याबरोबरच असुरांची शक्ती मोठ्या प्रमाणात भूमीवरती वाढली होती. हे असुर लोकांना त्रास देत होते. अशा वेळी ब्रह्मदेवाचे आदेशाने वेगवेगळ्या ठिकाणी अवतार घेतले अशी देखील एक दत्त जन्माची कथा सांगितली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी दत्तांचा जन्म झाला.यावर्षी ७ डिसेंबर 2022 रोजी जयंती आहे. या दत्त जयंतीच्या निमित्त म्हणूनच आपणाला दत्त जयंती चे महत्व आणि दत्त जयंती जन्म कथा सांगितली.या दिवशी घराघरांमध्ये दत्त भक्त दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी दत्त जन्माचे पाळणे म्हटले जातात.चला तर मग दत्त जन्माचा पाळणा पाहूया.
श्री दत्त जन्माचा पाळणा PDF | datta janm palna pdf
ज्या पद्धतीने श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी श्रीकृष्ण जन्माष्टमीला श्रीकृष्ण जन्माचा पाळणा बोलला जातो. त्याच पद्धतीने दत्त जन्माच्या वेळी श्री दत्ताचा पाळणा बोलला जातो. तो पाळणा मी आपणास पीडीएफ स्वरूपात देत आहोत. तो दत्त जयंतीच्या वेळी आपण दत्त जयंती साजरी करत असताना म्हणून आनंदात दत्त जयंती साजरी करा. नक्कीच या दत्त जन्माच्या पाळण्याचा आपल्याला उपयोग होईल.
दत्त जन्माचा पाळणा पीडीएफ | datta janm palna pdf
श्री दत्ताची आरती pdf | dattachi arti pdf
दत्त जयंतीच्या वेळी दत्त जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर दत्ताचा पाळणा बोलला जातो.त्याचबरोबर श्री दत्ताचे अवतार कार्य सांगणारी भजने, कीर्तने, तसेच दत्ताचे अभंग देखील गायले जातात. शेवटी दत्ताची आरती देखील बोलली जाते. श्री दत्ताच्या आरतीची माहिती तसेच त्याच्या आरतीची पीडीएफ देखील आपणाला उपलब्ध करून देत आहोत.
दत्ताची आरती pdf
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४