Type Here to Get Search Results !

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन मराठी माहिती निबंध भाषण चारोळी | international anti corruption day marathi information essay bhashan charoli

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन मराठी माहिती  निबंध भाषण कविता चारोळी| international anti corruption day marathi information essay bhashan kavita charoli quotes    

आज-काल एखाद्या देशासमोर नव्हे तर जगासमोरच अनेक नवनवीन समस्या आ करून थोडे येताना दिसतात.त्यातीलच एक समस्या म्हणजे भ्रष्टाचार या भ्रष्टाचारामुळे देशाच्या अतोनात नुकसान होते, राष्ट्राचा व्यक्तीचा विकास यावर विपरीत परिणाम होतो.यास्तवआजच्या लेखामध्ये आपण आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन मराठी माहिती व निबंध पाहणार आहोत.

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन मराठी माहिती व निबंध मराठी माहिती निबंध भाषण कविता चारोळी


आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन मराठी माहिती व निबंध मराठी माहिती निबंध भाषण कविता चारोळी


आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दीन(toc)


पहिला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दीन | pahila aanatarrashtriy bhrashtachar virodhi din 

आपण या लेखाला सुरुवात करताना पाहिले की, कोणत्याही देशासमोर अनेक समस्या आहेत किंवा असतात यातील सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे भ्रष्टाचार. हा भ्रष्टाचार नैतिक तसेच आर्थिक पातळीवरचा देखील असू शकतो. या भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी किंवा लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन 9 डिसेंबर २००६ रोजी साजरा करण्यात आला. लोकांमध्ये जर आपल्या कामाप्रती प्रामाणिकपणा असेल तर, भ्रष्टाचाराला अटका घालता येतो परंतु लोकांचीच नकारात्मक असेल तर मात्र हा भ्रष्टाचार कोणताही कायदा रोखू शकत नाही हे नाकारून चालत नाही. थोडक्यात काय तर मी भ्रष्टाचार करणार नाही हे तत्त्व व्यक्तीमध्ये उपजायला हवे.


भ्रष्टाचारा संबंधी आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चा | bhrashtachar sambahndhi aanatarrashtriy patlivatltil charcha 

भ्रष्टाचारामुळे कोणत्याही कामांमध्ये नियमितता न राहता त्या गावांमध्ये अनागोंदी वाढत असते .व्यक्तीला शासकीय नियमानुसार किंवा तरतुदीनुसार जबाबी मिळत असतात त्यापेक्षा अधिक चा हाव व्यक्तीमध्ये येतो यावेळी भ्रष्टाचार वाढायला सुरुवात होते. अशा या जागतिक समस्या संदर्भात 31 ऑगस्ट 2003 रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चा झाली. राष्ट्रसंघाच्या सभेमध्ये भ्रष्टाचार हा निपटून काढणे काळाची गरज बनली आहे असे भाष्य करण्यात आले. थोडक्यात 2003 पासून या समस्येची भयानकता सर्वांच्या लक्षात यायला सुरुवात झाली त्यानंतर त्यावरती विविध चर्चासत्रे पार पडली.


आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करण्यामागील हेतू karane | international anti corruption day aantarashtriy bhrashtachar virodhi sakta karnyamagil hetu 

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन नऊ डिसेंबरला साजरा केला जातो ,परंतु तो साजरा करण्यामागील नेमका ही तो काय आहे याविषयी बरेचसे चर्चा वरील मुद्द्यांमध्ये आलेलीच आहे.तर देखील सर्वात महत्त्वाचा हेतू हा आहे की, अलीकडच्या काळात वाढत चाललेला भ्रष्टाचार हा कमी व्हावा. जर वाढायला लागला की देशातील लोकांना आरोग्याच्या सुविधा त्याचबरोबर इतर सुविधा देखील व्यवस्थित भेटत नाहीत. रस्ते वाहतूक औषधे शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचार वाढला की त्याचा परिणाम हा देशाच्या भावी प्रगतीवर होत असतो. जागतिक आकडेवारीनुसार देशाचे एकूण उत्पन्न किंवा व्यवहारातील पाच टक्के रक्कम या भ्रष्टाचाराच्या मार्गाने लंपास होताना दिसतात. थोडक्यात सांगायचे झाले तर हे प्रमाण अतिशय मोठे आहे. एकादी शासकीय योजना आल्यानंतर त्या योजनेमध्ये कार्यरत असणारे अधिकारी प्रत्येक जण आपल्याला मिळणाऱ्या पगारा व्यतिरिक्त किंवा मानधना व्यतिरिक्त अतिरिक्त किती वाटा मिळेल अशी मनीषा जावेधारतात या ठिकाणीच भ्रष्टाचाराचा जन्म होतो. म्हणूनच भ्रष्टाचार कमी व्हावा लोकांमध्ये त्याविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने किंवा या कारणांमुळे भ्रष्टाचार विरोधी दिन हा साजरा केला जातो.

भ्रष्टाचार विरोधी दिना संदर्भात2021 मधील थीम|2021madhil thim

आपण जर 2021 ची जागतिक पातळीवरील टीमचा जर अभ्यास केला तर त्या थीमचे स्लोगन होते.YOUR RIGHT YOUR  ROLE SAY NO TO CORRUPTION याचाच अर्थ असा आहे की आपल्याला दिलेले काम आपण प्रामाणिकपणे काम केले पाहिजे आणि भ्रष्टाचाराला अजिबात त्रास देऊ नये.


जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन निबंध| JAGTIK BHARASHTACHAR VIRODHI DIN 

अलीकडच्या काळामध्ये जगाला जर एका सुयोग्य दिशेने पुढे घेऊन जायचं असेल तर, भ्रष्टाचार कमी होणे अतिशय गरजेचे आहे .म्हणूनच यावर विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी व अगदी लहान वयापासूनच त्यांनी भ्रष्टाचारा थारा देऊ नये. यासाठी त्यांचे विचार मंथन होण्यासाठी जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन निबंध विद्यार्थ्यांकडून लिहून घेतला पाहिजे त्याचबरोबर वर आलेले मुद्दे जर विद्यार्थ्यांना आपण नीट समजावून दिले तर जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन याविषयी ते छान निबंध लिहू शकतात. वरील झालेल्या चर्चेच्या आधारे विद्यार्थ्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना ती माहिती सांगून जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन हा निबंध छान पद्धतीने लिहून घेतला पाहिजे.


जागतिक भ्रष्टाचार विरोधी दीन भाषण | JAGTIK BHRASHTACHAR VIRODHI DIN BHASHAN 

जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन हा निबंध त्याचबरोबर यावर विविध चर्चासत्रे त्याचबरोबर जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन भाषण माध्यमातून देखील आपण विद्यार्थ्यांमध्ये भ्रष्टाचाराला कशा पद्धतीने अटकाव करता येईल याविषयी त्यांची मते जाणून घेऊ शकतो.चला तर मग जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन भाषण त्याचा एक नमुना आपण पाहूया.

नमस्कार ! अध्यक्ष महाशय ,गुरुजन वर्ग आणि जमलेल्या बाल मित्रांनो !आज 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन होय. या दिनाच्या निमित्ताने मी आज आपणास जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन याबाबत भाषण देत आहे माझे काही विचार मांडत आहे तरी आपण माझे विचार शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती.

दोन वर्षांपूर्वी अवघ्या जगाला ज्या समस्यांनी घातले होते.ती समस्या म्हणजे कोरोना महामारी होय.या कोरोना महामारीतून आपण आता सावरत आहोत. परंतु या कोरोना महामारीतून सावरत असताना कधी कधी वर्तमानपत्र ,टीव्ही यावरील बातम्या पाहिल्यानंतर मन सुन्न होते. कारण का तर टीव्ही,वर्तमानपत्रांमध्ये अशा बातम्या कानावर पडल्या,की या कोरोना काळामध्ये जे कार्यकर्ते किंवा आरोग्य सेवक तसेच आम्हाला आटोक्यात आणण्यासाठी कार्यरत असणारे अधिकारी वर्ग त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली होती परंतु पूर्ण मात करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या वस्तू, औषधे इतर बाबी  यांच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार म्हणजेच भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले.तसेच चर्चाही अजून कानावरती येत आहेत.

माझा सांगण्याचा मुद्दा हाच आहे की, कोरोना महामारी सारखी महामारी अवघ्या जगात थैमान घालत असताना जिथे लोकांना आपण जगू की मरू? याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत देखील लोक भ्रष्टाचार करतात यावरून भ्रष्टाचार ही किती मोठी समस्या आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात आले असेल. म्हणून म्हणावेसे वाटते 

.

जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन कविता चारोळी | JAGTIK BHRASHTACHAR VIRODHI DIN KAVITA CHAROLI 


असेल आचार आणि विचार भ्रष्ट,


तर करणार नाही कोणी मनापासून कष्ट,


सर्वजण होतील आचार आणि विचारांनी भ्रष्ट,


अडक जाईल जगासमोरील आर्थिक गैरव्यवहारांचं अरिष्ट,


एके दिवशी सृष्टीच होईल नष्ट,


माणूस बनत चाललाय भ्रष्ट माणूस बनत चाललाय भ्रष्ट


या वरील भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त कवितेच्या ओळी खूप काही सुचवून जातात.

चला तर मग संकल्प करूया. आणि या भ्रष्टाचाराला हद्दपार करूया. माणसाशी माणसासारखं राहूया. पैसा नको आपल्या गरजा नियंत्रित करूया भ्रष्टाचाराला हद्दपार करूया.

जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त मी आपणासमोर माझे विचार प्रस्तुत केले, हे विचार आपण अतिशय शांतचित्ताने ऐकले म्हणून मी आपला आभारी आहे. धन्यवाद! जय हिंद! जय भारत.

अशा पद्धतीने आपण शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन निबंध,भाषण किंवा त्याविषयी माहिती याबाबत विविध उपक्रम राबवून विद्यार्थी जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जाणीव जागृती निर्माण करू शकतो.

आजच्या लेखात  आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन माहिती, निबंध, भाषण,कविता, चारोळी असा बहुवैविध्य असलेला लेख त्याला कसा वाटला या मला नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!


FAQ 

१. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा केला जातो?

9 डिसेंबर

२. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिन सर्वप्रथम कोणत्या तारखेला साजरा केला गेला?

नऊ डिसेंबर 2006

३. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाविषयी सविस्तर माहितीसाठी कशाची मदत होईल?

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाविषयी आपल्याला जर सविस्तर माहिती हवी असेल तर आपण www.dnyanyogi.com या संकेतस्थळाला  भेट द्या.

४. राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करण्यामागे येतो काय आहे?

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी  व लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे.


आमचे हे लेख जरूर वाचा 










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area