Type Here to Get Search Results !

महापरिनिर्वाण दिन सूत्रसंचालन 2024| mahaprinirvan din Sutra sanchalan 2024

महापरिनिर्वाण दिन सूत्रसंचालन 2024 | mahaprinirvan din Sutra sanchalan2024

6 डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर  महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. शाळा महाविद्यालये, कॉलेजेस वेगवेगळी शासकीय कार्यालये, बुद्ध विहार ,सहकारी सोसायटीज अशा सर्व ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली व अभिवादन केले जाते. म्हणूनच आजच्या लेखांमध्ये महापरिनिर्वाण दिन सूत्रसंचालन 2024 आपण पाहणार आहोत.आपण जर या महापरिनिर्वाण दिनाची तयारी करत असाल व आपल्यावर mahaprinirvan din Sutra sanchalan 2024 जबाबदारी असेल तर आमची ही पोस्ट आपल्याला नक्की मदत करेल..

महापरिनिर्वाण दिन सूत्रसंचालन
महापरिनिर्वाण दिन सूत्रसंचालन


महापरिनिर्वाण दिन (toc)

महापरिनिर्वाण दिन सूत्रसंचालन करीत असताना आपल्याला आपला कार्यक्रम नेमका कोणत्या स्वरूपाचा आहे? छोटेखानी आहे की मोठा कार्यक्रम आहे.कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपल्याकडे वेळ किती आहे ? अशा सर्वच बाबी आपण अगोदर विचारात घेतल्या पाहिजेत, परंतु ते करीत असताना आपल्याला आवश्यक असणारी मूलभूत माहिती किंवा कार्यक्रमाची रूपरेषा ठरवत असताना या लेखाचा नक्की उपयोग होईल. व आजच्या लेखातून तेच देण्याचा प्रयत्न करीत आहोत.आपण यामध्ये आपल्या सोयीनुसार बदल करू शकता.


महापरिनिर्वाण दिन सूत्रसंचालन| mahaprinirvan din Sutra sanchalan |बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी सूत्रसंचालन | doctor babsaheb ambedkar punyatithi sutra sanchalan2024 


महापरिनिर्वाण दिन म्हणजेच ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी असते तो दिवस होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. या बौद्ध धर्मामध्ये निर्वानाला अतिशय महत्व आहे. निर्वाण म्हणजे जगाचा निरोप घेणे होय. तो निरोप घेत असताना आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा यांच्यावर मात करून निरपेक्ष भावनेने या जगाचा निरोप घेणे यात अपेक्षित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण ६ डिसेंबर 1956 रोजी झाले. या महापरिनिर्वाणदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मुंबईतील दादर या ठिकाणी चैत्यभूमी वर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळावरती एकत्र जमतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून त्यांनी जो दलितांच्या उद्धारासाठी लढा चालू केला होता, तो लढा जोमाने चालू ठेवण्यासाठी संकल्प करतात. चला तर मग आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया आणि महापरिनिर्वाण दिनाचे सूत्रसंचालन पाहूया.



6 डिसेंबर सूत्रसंचालन |6december sutrsanchaln

महापरिनिर्वाण  दिनाचे सूत्रसंचालन करीत असताना आपली सुरुवात ही आकर्षक करा.

आगतम ! स्वागतम ! सुस्वागतम ! स्वागतम ! स्वागतम सुस्वागतम !

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व प्रज्ञासूर्य,ज्ञानसूर्य, कायद्याचे अभ्यासक,थोर विचारवंत, लेखक,अर्थशास्त्रज्ञ,समाज सुधारक अशा कितीतरी बिरुदावली ज्यांना लावल्या जातात ते महान व्यक्त म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज ,6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. आजच्या या महापरिनिर्वाण दिनाचे सूत्रसंचालन करण्या अगोदर मी अ ब क विश्वरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करतो. नि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो.

सहा डिसेंबर हा दिवस म्हणजे भारताच्या  इतिहासातील एक काळरात्रच जणू.याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सोडून गेले आणि तो दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक बनून त्यांचे अनमोल कार्य तसेच आपल्याला त्यांचे संघटन कार्य पुढे चालू ठेवायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण म्हणजे केवळ पोपटा सारखे  बोलून दाखवणे उपयोगाचे नाही. तर आपल्या चालण्या बोलण्या वागण्यात दिसायला हवी. आज कालच्या पिढीला वाचन नको आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात,

जर तुमच्याकडे दोन रुपये असतील,
तर त्यातील एक रुपया किंवा एका 
नाण्याची भाकरी घ्या. आणि तुमच्याकडे 
जे दुसरे नाणे आहे त्या नाण्याचे पुस्तक 
विकत घ्या.कारण भाकरी तुम्हाला
 जगायला शिकवेल.मात्र
 पुस्तक तुम्हाला कसे जगावे
 याची कला शिकवेल.

                                                                          डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 
 त्यांच्या या विचारातूनच शिक्षणाप्रती ते किती अग्रेसर होते.याची आपल्याला कल्पना येईल. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते जर आपल्याला आपली खरी गुणवत्ता सिद्ध करायची असेल तर शिक्षणासारखे दुसरे साधन नाही. त्यांनी दलितांना सन्मानाने वागणूक मिळावी यासाठी एक संदेश दिला.

तरुणांनो जागे व्हा !
शिका संघटित व्हा !
आणि संघर्ष करा !

चला तर मग अशा या महामानवाला आजच्या या महापरिनिर्वाणदिनी पुन्हा एकदा अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करूया.


मान्यवर स्थानापन्न करणे  manyavr sthanapan karane 

अध्यक्ष स्थान ग्रहण 


मंजिल जरूर मिलती है I

इरादे बुलंद होने चाहिए I


यानुसार आपली कार्यशैली असणारे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री---- अबक यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. अशी मी त्यांना विनंती करतो. 

प्रमुख पाहुणे pahune sthan grahan 

असं म्हणतात, 

जे न देखे  रवी I

वह देखे  कवी I

असेच दूरदृष्टी लाभलेले प्रचंड ज्ञानी आणि आपल्या ज्ञानाच्या जोरावर आपली किर्ती  साता समुद्रा पल्याड  घेऊन जाणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री---------- यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो. 


दीप प्रज्वलन आणि प्रतिमापूजन dip prajvalan aani pujan 

आजच्या या बाबसाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन म्हणजेच  डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर पुण्यतिथी म्हणा की  स्मृतिदिन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की, त्यांनी दीपप्रज्वलन करून  डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून वंदन करावे व आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी.


एक दिवा पेटला तर ज्योत तयार होते

हजारो दिवे पेटले तर मशाल तयार होते

लाखो दिवे पेटले तर अंगार तयार होतो.


असेच काहीसे कार्य करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरण करून मान्यवरांनी दीपप्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करतो.

( यूट्यूब च्या माध्यमातून किंवा गायक मंडळी उपस्थित असतील तर सरस्वती वंदना घ्यावी)


प्रतिमा पूजन झाल्यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व सन्माननीय अध्यक्ष यांनी पुन्हा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो.


महापरिनिर्वाण दिन ,बाबासाहेब आंबेडकरांची माहिती 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण देणे त्यांच्या कार्याचा लेखाजोखा पाहत असताना खरेतर दिन दलितांचा कैवारी यासाठीच  त्यांनी आपले आयुष्य वेचले.ज्या लोकांना माणसांकडूनच माणसा प्रमाणे वागणूक मिळत नव्हती. अस्पृश्य मानले जात होते आणि ज्या लोकांना अशी वागणूक मिळत होती; त्या लोकांना देखील आपल्याला स्वाभिमानाची वागणूक मिळत नाही. याची कल्पना नव्हती.शा लोकांना एकत्र आणून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे काम आणि वेळप्रसंगी इथल्या धर्म संस्थेशी दोन हात करून अगदी हिंदू धर्माचा त्याग व तदनंतर बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यापर्यंत महामानवाने धाडस केले. या धाडसामागे एकच हेतू होता की,समाजातील अगदी तळागाळातील दिन- दलित शोषित अशा सर्वच लोकांना सन्मानाची वागणूक मिळावी. निसर्गतः प्राणीदेखील कोणताही भेदभाव न करता गुण्यागोविंदाने राहतात.आपण तर चालती बोलती माणसे आहोत परंतु इथली वर्णव्यवस्था आपल्याला माणसाप्रमाणे वागू देत नाही. अशा वर्णव्यवस्थेवर कडाडून टीका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केली. भारतीय राज्यघटनेची मांडणी करत असताना सर्व समावेशक अशी मांडणी करून कायद्यापुढे सर्व समान अशी राज्यघटना निर्माण केली. म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. चला तर आपण आता आपल्या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख अतिथींचे स्वागत करूया.


व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय आणि स्वागत manyavr parichay swagat 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी ,महापरिनिर्वाण दिन सूत्रसंचालन करताना मी आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती विराजमान असलेले मान्यवर यांचे शब्द सुमनांनी स्वागत तर झाले आता  पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सुहास्य वदनांनी स्वागत करूया.  चला तर मग मान्यवरांसाठी होऊ द्या जोरदार टाळ्या. 


कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वागत अध्यक्षांचे स्वगत 

आजचे आपल्या बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ,  पुण्यतिथी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अध्यक्ष अ ब क यांचे स्वागत आपल्या शाळेतील श्री यांनी करावे


प्रमुख पाहुणे यांचे स्वागत pahune swgat 

सन्मा. पाहुणे यांचे स्वगत श्री --------- यांनी करावे.  


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथि  |महापरिनिर्वाण दिन प्रास्ताविक prastavik 


पुस्तकाची अनुक्रमणिका पाहिले की,

 पुस्तकात काय दडले आहे हे कळते,

आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय हे,

 प्रस्ताविकातून कळते. 


चला तर मग मी श्री अबक---- यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. 


प्रास्ताविक (महापरिनिर्वाण दीन )

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलावे तेवढे कमीच आहे. अस्पृश्य वर्गामध्ये जन्माला येऊन आपल्या ज्ञानाच्या जोरावर जगत मान्यता पावलेले,अतिशय हुशार व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था यांचे चटके स्वतः सोसले ,परंतु यापुढे असे चटके दिन दलित वर्गाला बसू नये त्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो तो हिंदू धर्म वर्णव्यवस्था भेदाभेद सोडायला तयार नाही, म्हणून मानवतेची शिकवण देणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. अवघ्या जगाला मानवतेची शिकवण दिली.अशा या महामानवाचा प्रवास  कायमचा थांबला तो दिवस म्हणजे महापरिनिर्वाण दिन होय.या महापरिनिर्वाणदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदना करतो आजच्या या महापरिनिर्वाणदिनी आपल्या शाळेतील काही विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आपल्या भाषणातून उजाळा देतील.


विद्यार्थी भाषणे महापरिनिर्वाण दिन

ज्यावेळी  एकापाठोपाठ एक विद्यार्थी भाषणे देतील, त्यावेळी अगोदरच्या विद्यार्थ्याने कोणता भाग सांगितला याविषयी थोडक्यात सांगून त्यानंतर आपले विचार व्यक्त करण्यासाठी जो विद्यार्थी येणार आहे. त्याविषयी थोडक्यात माहिती द्यावी अशा पद्धतीने प्रेक्षक वर्ग कंटाळणार नाही अशी शब्द फेक सूत्रसंचालकाने करावी.


प्रमुख पाहुणे विचार | pramukh pahune margdarshan 

कार्यक्रमाला लाभलेले प्रमुखाते तीन अ ब क यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आपले विचार सांगावेत.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे,


 समाजामध्ये आपल्याला परिवर्तन करावयाचे असेल तर, त्या परिवर्तनासाठी शिक्षणासारखे दुसरे प्रभावी शस्त्र नाही. 

जोपर्यंत दिन दलित लोकांना आपला स्वाभिमान काय आहे,? हे समजत नाही तोपर्यंत त्यांना आपल्यावर अन्याय होतायेत याची जाणीव होणार नाही. ही जाणीव होण्यासाठी शिक्षण घेणे अतिशय गरजेचे आहे. शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला स्व ची जाणीव होणार आहे.आणि या स्व ची जाणीव झाल्यानंतरच आपण आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी संघटित होणार आहोत. अशी बाबासाहेबांची धारणा होती.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते शाळा महाविद्यालयातून धार्मिकतेचे अवडंबर माजवणारे शिक्षण त्यांना नको, तर माणसाला माणसाशी माणसाप्रमाणे वागवणारे शिक्षण हवे.अशी त्यांची भूमिका होती. दिन दलित वर्गाने जास्तीत जास्त  शिक्षण घेतले पाहिजे. यासाठी मुंबई या ठिकाणी सिद्धार्थ कॉलेज औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद कॉलेज सुरू करून दिंनलितांना ज्ञानाची दारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खुली करून दिली. थोडक्यात यावर असे म्हणता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजचा नव्हे तर पुढच्या शंभर वर्षांचा विचार करून बोलत होते.खरोखरच हा दिन दलित वर्ग जसा शिक्षण घेऊ लागला तस तसा तो माणसांमध्ये येऊ लागला. त्याला मानाची वागणूक मिळू लागली. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलेत वर्गाला शिक्षणाचे जे महत्व सांगितले होते.ते किती गरजेचे आहे.हे आपल्या ध्यानात येते.

अध्यक्षीय भाषण महापरिनिर्वाण दिन


जोडण्यासाठी हात हवे,

रुसण्यासाठी मित्र हवे,

जगण्यासाठी बळ हवे,

आणि आमच्या जीवनाला,

 योग्य दिशा मिळण्यासाठी,

कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे मार्गदर्शन हवे. 


होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्या ----- आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष  ज्ञानाचा सागर नि  अनुभवाचा डोंगर असलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व श्री ----- यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय  भाषण करावे.



महापरिनिर्वाण दिन आभार प्रदर्शन



फुलांमुळे बागेला शोभा आली,


 श्रोत्यांमुळे आजच्या कार्यक्रमाला रंगत आली,


आजच्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनामुळे,


 कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली,


 चला चला आता आभार प्रदर्शनाची वेळ झाली. 


 बरोबर ना. घडयाळ हे  कोणासाठीच थांबत नाही,म्हणजेच वेळ कधी कुणासाठी कसी थांबेल.बघा ना पाहता पाहता दोन तास कसे गेले ते कळलेच नाही. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवरांनी जे मार्गदर्शन केले. ते निश्चितच आम्हाला जीवन जगत असताना कामी येईल. आजच्या या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपल्या विनंतीला मान दिला आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून मी अ ब क------- सर्वांचे आभार मानतो.

अशा पद्धतीने आपल्याला महापरिनिर्वाण दिन सूत्रसंचालन करता येईल. सांगितल्याप्रमाणे आपल्या सोयीनुसार या सूत्रसंचालनात बदल करू शकता सूत्रसंचालनाचा हा एक नमुना आहे हा नमुना आपणाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.


आमचे हे लेख वाचा 















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area