Type Here to Get Search Results !

मराठवाड्यातील शिक्षकांना द्यावी लागणार परीक्षा | marathvadyatil shikshkaana dyavi lagnar pariksha

मराठवाड्यातील शिक्षकांना द्यावी लागणार परीक्षा | marathvadyatil  shikshkana dyavi lagnar pariksha 

शिक्षण क्षेत्रातील एक अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे मराठवाड्यातील शिक्षकांना परीक्षा द्यावी लागणार आहे. शिक्षकांना परीक्षा कशासाठी किंवा का द्यावी लागणार? या संदर्भात आजच्या लेखांमध्ये आपण माहिती पाहणार आहोत.


मराठवाड्यातील शिक्षकांना द्यावी लागणार परीक्षा
मराठवाड्यातील शिक्षकांना द्यावी लागणार परीक्षा

मराठवाड्यातील शिक्षकांच्या परीक्षेचा निर्णय कोणी घेतला? व का घेतला? 

मराठवाड्यामध्ये जवळजवळ आठ ते दहा हजार जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये 35000 पेक्षा जास्त शिक्षक कार्यरत आहेत. कोरोना काळात मध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू होते. परंतु खेडेगावामध्ये म्हणावे तसे ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत गेलेले नाही.आणि याचाच परिणाम विद्यार्थ्यांची गुणवत्ता किंवा त्यांचा अभ्यास यामध्ये विद्यार्थी मागे पडलेले दिसत आहेत. मराठवाड्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे सुरु आहे, याबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर शिक्षणाचा आढावा घेण्यासाठी मराठवाड्यातील काही शाळांना भेटी दिल्या.या भेटीनदरम्यान त्यांच्याशी लक्षात आले की, विद्यार्थी अभ्यासामध्ये खूप मागे पडलेले आहेत. अशावेळी शिक्षक तर  आपल्या विषयात याबाबत अपडेट आहेत का? या शिक्षकांना देखील कोरोना काळामध्ये विद्यार्थी समोर नसल्यामुळे कुठेतरी अपडेट होण्यामध्ये अडचणी आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण हे जरी विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा दर्जा ढासलण्यामागे कारणीभूत असले तरी, कुठेतरी शिक्षकांचा बुद्ध्यांक देखील तपासणे गरजेचे आहे.असा विचार यातून पुढे आला; म्हणूनच मराठवाड्यातील पहिली ते दहावीच्या वर्गाना शिकवणाऱ्या जिल्हा परिषद, खाजगी ,अनुदानित ,विनाअनुदानित अशा सर्वच शाळांच्या शिक्षकांना परीक्षा द्यावी लागणार आहे.

शिक्षकांची परीक्षा घेतल्यावर त्यातून काय साध्य होईल?

मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना प्रसारमाध्यमांनी असे विचारले की  अशी शिक्षकांची परीक्षा घेतल्यामुळे काय होईल? या प्रश्नाला उत्तर देताना विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी सांगितले की, शिक्षक आपल्या ज्ञानामध्ये अपडेट होतील. आपण जे त शिकवतो त्यापेक्षा किमान पुढील तीन ते चार इयत्तांचा अभ्यास किंवा आपल्या विषयाचे अधिकचे ज्ञान शिक्षकाला असले पाहिजे. त्यासाठी शिक्षकाने वाचन केले पाहिजे. स्वतःच्या संबोध, संकल्पना स्पष्ट केल्या पाहिजेत. थोडक्यात काय तर अधिकची तयारी केली पाहिजे. ही अधिकची तयारी  व्हावी म्हणून शिक्षकांच्याच परीक्षा होणार आहेत. परीक्षा आल्या की शिक्षक आपोआप परीक्षेची तयारी करतील. व त्याचा फायदा विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी होईल असे मत विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी मांडले.

शिक्षकांच्या परीक्षा संदर्भात या अगोदर झालेले प्रयोग

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना ही कल्पना कुठून सुचली? या संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले ज्यावेळी ते सोलापूर जिल्ह्यामध्ये शिक्षणासंदर्भात काम करत होते त्यावेळी त्यांच्याशी निदर्शनास आले की विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावला आहे. तो सुधारण्यासाठी त्यांनी 2007 मध्ये असा प्रयोग सोलापूर मध्ये केला. त्यानंतर त्यांना त्यांचे परिणाम हे खूप चांगले दिसले.शिक्षकांनी आपला अधिकचा वेळ देऊन ज्ञानामध्ये ते अद्यावत झाले. शिक्षक अपडेट झाले की विद्यार्थी, आपोआपच अपडेट होतात अशी भूमिका त्यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखवली.

मराठवाड्यातील शिक्षकांच्या परीक्षेचे स्वरूप

मराठवाड्यातील इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गाला शिकवणारे शिक्षकांची परीक्षा होणार म्हटल्यानंतर शिक्षकांनाही बातम्या ऐकून थोडासा ताण आला असेल. नेमकी परीक्षा कशा स्वरूपाची होणार याबाबत देखील विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी मत मांडले की स्पर्धा परीक्षेसाठी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची ही परीक्षा असणार आहे. या परीक्षेमध्ये निगेटिव्ह गुणदान पद्धत असणार आहे. गणित विज्ञान इंग्रजी या विषयांवर अधिकचा भर या परीक्षेमध्ये दिला जाणार आहे.

मराठवाड्यातील शिक्षकांच्या परीक्षेची अनिवार्यता

मराठवाड्यामध्ये पहिली ते दहावीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांची परीक्षा होणार. परंतु ती परीक्षा अनिवार्य म्हणजेच कंपल्सरी असेल का ?याबाबत केंद्रेकर यांनी असे सांगितले की, ही परीक्षा अनिवार्य असणार नाही. परंतु त्यांनी शिक्षकाना आवाहन केले की ,अधिकाधिक शिक्षकांनी या परीक्षेला सकारात्मकता दाखवावी.जेणेकरून आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल.या निमित्ताने शिक्षक अधिकचे वाचन करतील. शिक्षकांवर अविश्वास किंवा दबाव अशी भूमिका केंद्रेकर यांची नसून शिक्षकांना ज्ञानामध्ये अध्यायवत्ता व दृढीकरण व्हावे हीच भूमिका त्यांची आहे. असे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

काही शाळांचे शिक्षकांची मते अभिप्राय घेतल्यानंतर त्या शाळांनीही प्रसार माध्यमांशी बोलताना अशी सांगितले की आम्ही अशा परीक्षेचे स्वागत करतो. परंतु त्या अगोदर शिक्षकांच्या गुणवत्तेचा दर्जा किंवा विद्यार्थ्यांची गुणवत्ता असल्याने मागील इतर जे काही कारणे आहेत त्या कारणांचा शोध घेऊन शासनाने देखील शिक्षकांना सहकार्य करावे.

अशा पद्धतीने मराठवाड्यातील शिक्षकांची परीक्षा असल्याची बातमी आम्ही आपणापर्यंत पोहचवत आहोत आमचा लेख आपणास कसा वाटला. हे नक्की कळवा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

FAQ 

१. मराठवाड्यातील शिक्षकांच्या परीक्षेचा निर्णय कोणी घेतला?

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

२. मराठवाड्यातील शिक्षकांच्या परीक्षा अनिवार्य आहेत का?

नाही

३. मराठवाड्यातील शिक्षकांच्या परीक्षांबाबत कधी निर्णय घेण्यात आला?

9 डिसेंबर

४. मराठवाड्यातील शिक्षकांच्या परीक्षा घेण्यामागील हेतू काय आहे?

शिक्षकांना ज्ञानाच्या बाबतीत UPDATE KARNE 

५. महाराष्ट्रात या अगोदर शिक्षकांच्या परीक्षा झालेल्या आहेत का?

सोलापूर मध्ये असा पहिल्यांदा प्रयोग करण्यात आला होता 


आमचे हे लेख जरूर वाचा 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area