नवीन कोरोना बी एफ सातची लक्षणे आणि उपाययोजना | new vareint bf 7 jankari and precotion| navin korona bf 7 lakshane Ani upayyojan
गेल्या दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जगात हाहाकार माजविला तो कोरोना व्हायरस ने.आता पुन्हा एक नविन कोरोना थैमान घालू पाहत आहे. तो म्हणजे कोरोना बी. एफ.सात होय.म्हणूनच आजच्या लेखात नवीन कोरोना बी एफ सातची लक्षणे आणि उपाययोजना याविषयी माहिती पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला आवश्यक ती काळजी घेता येईल.
नवीन कोरोना बी एफ सातची लक्षणे आणि उपाययोजना |
कोरोना bf 7(toc)
कोरोनाची पहिली लाट | corona pahili lat
आपण दोन वर्षांपूर्वी पाहिले की, संपूर्ण जगाला एका अस्थिरतेच्या छायेमध्ये लोटणारा भयंकर विषाणू म्हणजे कोरोना. या कोरोनाची दहशत अवघ्या जगाने पाहिली. कित्येकांना तर हा आजार झाल्यानंतर ऑक्सिजन मिळाला नाही, योग्य वेळी उपचार करता आला नाही. त्याचबरोबर लोकांच्या मनात असलेली भीती यामुळे कितीतरी तरुण आबाला विरुद्ध या कोरोनाने गिळंकृत केले.
जगभरातील आरोग्य यंत्रणा कामाला लागल्या व लस शोधली व लसीकरणाला वेग आला.आता कुठेतरी कोरोना गेला असे चित्र निर्माण झाले.लोक बिनधास्त वागू लागले. गेल्या काही महिन्यांपासून सर्व काही सुरळीत होते. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. सध्याच्या स्थितीला कोटींच्या घरात लोक चीनमध्ये कोरोना bf 7 वर उपचार घेत आहेत. नव्याने आलेला कोरोना म्हणजेच कोरोना बी.एफ. 7 corona bf7. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण या नव्याने पसरत असलेल्या कोरोणा व्हेरियंट bf7 विषयी माहिती पाहणार आहोत.
कोरोना पहिल्यांदा संक्रमित झाला तो देश | corona sankraman pahila desh country
दोन वर्षांपूर्वी पूर्ण जगभर कोरोनाने आपले हातपाय पसरले.या कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्ये आढळला. अगदी सुरुवातीला या कोरोनाकडे कोणीही तितके गांभीर्याने पाहिले नाही,मात्र ज्यावेळी तो चीन, अमेरिका, भारत देशांमध्ये वेगाने पसरू लागला त्यावेळी मात्र त्याची भयावहता सर्वांना समजली.
कोरोना पहिल्या लाटेत मृत्यदर जास्त | pahilya latet mrutyu mothya prmanat
कोरोणाच्या पहिल्या लाटीचा जर आपण विचार केला तर, हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे तसेच हवेतून पसरत असल्यामुळे लोकांना हजार झाल्यानंतर प्रचंड भीती वाटत होती. याचबरोबर डॉक्टरांसाठी देखील या शतकातला हा असा झपाट्याने पसरणारा पहिलाच आजार होता. कोरोनाच्या पहिल्या लाटीमध्ये कित्येक डॉक्टर देखील रुग्णसेवा करीत असताना कोरोनाच्या संक्रमण झाल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.
कोरोना लसीकरण |korona lasikaran
एकीकडे कोरोना रुग्ण संख्या इतकी वाढत चालली होती की लोकांना बेड मिळत नव्हते. अनेक लोक ऑक्सिजन नाही म्हणून गुदमरून मरण पावले. काही लोक तर भीतीपोटी त्या पहिल्या लाटेमध्ये लोक मृत्यूला प्यारे झाले. यानंतर दुसरी लाट आली या लाटेतही अनेकांनी आपले प्राण गमावले. आता मात्र या सगळ्यावर एकच उपाय तो म्हणजे लसीकरण. शास्त्रज्ञांनी अतिशय झपाट्याने संशोधन करून कोरोनावरील लस काढली. लसीकरणाचे दोन डोस आणि एक गोष्ट बूस्टर डोस अनेकांनी घेतले.लोकांच्या मनामध्ये जी कोरोना विषयी भीती होती ती कमी झाली. परंतु आता नव्याने आलेला कोरोना बीएफ सेवन वेरियंट अतिशय भयानक आहे. चला तर मग याच्या विषयी माहिती पाहूया.
नवा कोरोना वायरस| कोरोना बी एफ सात माहिती |corona bf 7 marathi mahiti | corona bf7 information in marathi
सध्या गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचा एक नवीन व्हेरियंट आला आहे. तो वेरीएंट म्हणजे कोरोना बी एफ सात व्हेरियंट होय. हा corona bf 7 हा व्हेरियंट अतिशय वेगाने पसरणारा आहे.हेच मोठे चिंतेचे कारण आहे.अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार एका व्यक्तीला झालेला कोरोन bf7 हा वेगाने किमान अठरा लोकांपर्यंत पोहोचू शकतो.किंवा अठरा लोकांना बाधित करेल अशी क्षमता या नव्या कोरोनात आहे. बीएफ सात वायरसची पसरण्याची गती जास्त आहे. सांगण्याचे तात्पर्य आहे की याचा प्रसारणाचा वेग अतिशय भयानक आहे. म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून आपल्याला काय करता येईल? हे पाहणे जास्त गरजेचे आहे.
कोरोना बी.एफ.7 verient lakshane | Corona bf 7 symptom
कोरोनाचा हा नवा वेरियंट बी एफ आला आहे. त्याचे संक्रमण आपल्याला झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काही बदल होतात.आणि साधारणपणे यातील काही किंवा सर्व कमी अधिक प्रमाणात चेन आपल्याला जाणवायला लागतात अशावेळी अंगावरती न काढता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व आवशक्य योग्य तपासण्या कराव्यात.
1.ताप |taap feever
ज्यांना कोणाला कोणाचा नवा व्हेरियंट बीएफ सेवनचे संक्रमण झालेले असेल त्याला हलका किंवा जास्त ताप येऊ शकतो. या नवीन वेरीएंट साठी केवळ ताप म्हणजे कोरोना.असे समीकरण डोक्यात न ठेवता इतरही काही लक्ष नाही ती कमी अधिक प्रमाणात जर आपल्याला दिसत असतील तरच योग्य त्या तपासण्या कराव्यात. येतो घाबरून जाण्याची गरज नाही लवकरात लवकर उपचार करण्याकरता आहे.
2. सर्दी|sardi
कोणाचा नवा bf7 वेरियंट बीएफ सेवन यामधील अजून एक लक्ष म्हणजे सर्दी होय. जर सर्दी असेल आणि ताप असेल तरी देखील कोरोना हे असे समजू नये.
3.खोकला | khokla cough
जर आपल्याला ताप ,सर्दी व त्याच्या जोडीला खोकला देखील येत असेल तर आपल्याला हा कोरोना बी सेवन झाला आहे की काय याबाबत डॉक्टरांना भेटावे. परंतु घाबरून जाऊ नये आवश्यक ती काळजी घ्यावी.
4. घशात खवखव | ghashat khavkhav
आपल्याला वरील तीन अक्षरांच्या जोडीला घसा आत खवखवल्यासारखा वाटत असेल हेदेखील एक कोरोनाच्या नव्या verient चे लक्षण सांगितले आहे.
5. उलटी व जुलाब| ulati v julab
जर आपल्याला सर्दी,ताप,खोकला त्याच्या जोडीला घशात खवखव व उलट्या आणि जुलाब असा एकत्रित त्रास होत असेल तर आपण तात्काळ डॉक्टरांना भेटून कोरोनाची तपासणी करून घ्यावी.
सर्वात महत्त्वाचे या कोरोना बी सेवन हे व्हेरियंट जरी खूप मोठ्या प्रमाणात प्रसारित होणारे असले तरी आपण जर यावरती योग्य वेळी उपचाराला सुरुवात केली तर साध्या सर्दी खोकल्यासारखे आहे.म्हणून याला घाबरून जाऊ नये.
कोरोना व्हेरियंट बी एफ सेवन पासून बचाव करण्यासाठी उपाय व काळजी| corona bf7 pasun bachav karnyasathi upaay v kalji
1मास्कचा वापर | use mask
कोरोनाचा नवा व्हेरियंट बीएफ सेवन यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी म्हणून या अगोदर आलेल्या कोरोना व्हायरसची लढताना सर्वात महत्त्वाची भूमिका जी बजावली होती ती म्हणजे मास्कने. कारण हा कोरोना हवेद्वारे पसरत असतो आणि साहजिकच हवाई आपल्या शरीरामध्ये नाकाद्वारे जात असते, म्हणूनच पुन्हा एकदा या नव्या बेरियंटचा सामना करण्यासाठी सर्वांनी मास वापरणे गरजेचे आहे. मास्क वापरताना देखील आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे.
2.भरपूर व पुरेशी झोप |bharpur zop
कोणताही आजार असो त्यावरती आपल्याला मात करायचे असेल तर आपली प्रतिकारशक्ती जास्त असणे गरजेचे असते. आणि आपल्यालाही प्रत्येकाला शक्ती वाढवायचे असेल तर आहाराबरोबर शांत आणि किमान सात तासांची झोप आवश्यक आहे म्हणून सध्याच्या कोरोना बीएफ सेवन वेरियंट पासून आपला बचाव करण्यासाठी खबरदारी म्हणून आपण पुरेशी आणि शांत झोप घेतली पाहिजे.
3. सकस व प्रोटीन युक्त आहार| sakas v protin yukt aahar
कोरोना व्हेरिएंट बीएफ सेवन पासून आपला बचाव करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये प्रोटीन युक्त पदार्थ जास्त खाल्ले पाहिजे. प्रोटीन युक्त पदार्थ शरीरात आपल्या जेवढे जास्त असतील तेवढी एखाद्या आजाराची लढण्याची क्षमता आपली वाढत असते. आहारामध्ये अंडी, चिकन ,मटण चे प्रमाण या काळामध्ये वाढवले पाहिजे.
4. सॅनिटायझर चा वापर| sanitiser cha vapar
कोरोनाचे विषाणू आपल्या हातावरती असतील आणि तो हात आपला नाकाजवळ गेला की नाकातून ते शरीरामध्ये प्रवेश करतात. म्हणूनच हातांची स्वच्छता चांगली ठेवण्यासाठी किंवा हात निर्जंतुक करण्यासाठी सॅनिटायझर चा वापर आता पुन्हा एकदा करणे गरजेचे आहे. लेकी साहजिकच कोरोनाचा वेरियंट बीएफ सेवन पासून आपला बचाव होईल.
5. गाफीलपणा सोडणे |gafil n rahane
कोणाच्या पहिल्या आणि दुसऱ्याला त्याच्या वेळी एकच आपल्या निदर्शनास आले की बरेच लोक हा कोरोना खरा नाही.हा एक पसरवलेला आजार आहे. अफवा आहेत. अशी भूमिका घेऊन अगदी बिनधास्तपणे फिरत होते किंवा अति आत्मविश्वास म्हणून कोरोना मला काही करू शकत नाही आमची प्रतिकारशक्ती जास्त आहे या भूमिकेतून वावरत असल्यामुळे अशा लोकांनी कोरोनाचा अतिशय प्रसार करण्याचे काम केले आणि यामुळे कित्येकांना ज्यांची शक्ती कमी होती अशा लोकांना यामुळे आपला जीव गमवावा लागला.
6. लसीकरण करून घेणे| lasikaran
बऱ्याच व्यक्ती अशा आहेत की दुसऱ्या लाटीनंतर कोरोना आटोक्यात आला. कोरोना आटोक्यात आल्यानंतर आता जवळजवळ एक वर्षे उलटून गेली आहे. अनेकांनी लसीचे डोस घेतलेले नाहीत. अशांनी तात्काळ सरकारी आरोग्य केंद्रात जाऊन कोरोना लसीकरण करून घ्यावे.
7. गर्दीच्या ठिकाणी न जाणे|gardichya thikani n jane
कोरोना हा जास्तीत जास्त लोक एका ठिकाणी जमतात गर्दी होते त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पसरताना दिसतो. म्हणूनच कोरोनाचा नवाबेरियन बीएफ सेवन हा तर एका रुग्णापासून 18 रुग्णापर्यंत तात्काळ पसरतो. इतका त्याचा वेग आहे म्हणूनच गरजेच्या ठिकाणी जाणे टाळावे.
8. योगा प्राणायाम करणे|yoga ani pranayam karne
कोरोना पासून बचाव करण्यासाठी मी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगा आणि प्राणायाम अतिशय गरजेचे आहे. मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली योग आणि प्राणायाम शिकून घ्यावे.
9. अफवांकडे दुर्लक्ष|afvankde durlaksh
कोणताही संसर्गजन्य आजार आल्यानंतर त्याच्याविषयी मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जातात. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या बाबतीतही असा अनुभव आपल्याला आलेलाच आहे आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट बीएफ सेवन आलेला आहे याबाबत देखील अनेक आपोआप बसवले जाऊ शकतात. कोणी आयुर्वेदिक औषधे च्या मदतीने आम्ही आपला कोरोना बरा करू अशा अफवा पसरवतात म्हणूनच अशा आपण कडे दुर्लक्ष करावे.
10. मनाची तयारी| mannachi tayari
कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे याचा अर्थ आपण किती खबरदारी घेतली तरी कळत नकळतपणे तो आपल्याला होऊ शकतो. अशी मनाची तयारी असणे गरजेचे आहे.जेणेकरून तो झाल्यानंतर आपल्याला मानसिक ताण येणार नाही.कोरोना झाल्यानंतर त्यातून कसा बचाव करावा याविषयी आपले मन तयार असेल. या postive विचाराने मात्र एक वेगळीच ऊर्जा आपल्या शरीरात तयार होत असते.म्हणूनच मलाही कोरोना होऊ शकतो अशी मनाची तयार हवी. कोरोना वेरियंट बी एफ सेवन वरील नामी उपाय होऊ शकतो.
11. विटामिन सी युक्त आहार|vitamin c
आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त राहावे यासाठी विटामिन सी शरीरात असणे गरजेचे असते. म्हणूनच आपल्या आहारामध्ये लिंबू संत्री तसेच विटामिन च्या गोळ्या आपण घेणे गरजेचे आहे.
12. आरोग्याची काळजी| aarogyachi kalji
या कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये आपण आजारी कशी पडणार नाही.यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून आपल्याला दवाखान्यामध्ये जावे लागणार नाही आणि आरोग्यवस्थेवर येणारा ताण वाढणार नाही.
अशा पद्धतीने आजच्या लेखामध्ये आपण नवीन कोरोना बीएफ सातची लक्षणे आणि उपाय योजना याविषयी माहिती पाहिली.ही माहिती नक्कीच आपल्याला आवडली असेल. या माहितीच्या मदतीने कोरोना बीएफ सेवन किती भयंकर आह. त्याचबरोबर या काळामध्ये कोणती काळजी घ्यावी. या कोरोना बी एफ सेवन ची लक्षणे कोणती आहेत माहिती मिळाली असेल. शेवटी एकच सांगेन काळजी करू नका काळजी घ्या. या लेखाच्या खाली दिलेल्या शेर बटणाच्या मदतीने आपले मित्र मैत्रिणी यांना पोहोचवा. धन्यवाद.काळजी करू नका तर आपली काळजी घ्या.
FAQ
1. कोरोनाचा कोणता नवा व्हेरियंट झपाट्याने पसरत आहे?
BF7
2. कोरोनाचा नवा वेरियंट बीएफ सेवन कोणत्या देशामध्ये आढळला?
चीन
3. कोरोना वेरियंट बीएफ सेवन पसरण्याचे प्रमाण किती आहे?
एका व्यक्तीपासून अठरा लोकांना
आमचे हे लेख वाचा
बोर्डात टॉप येणारी मुले अभ्यास कसा करतात?
- 11 वी प्रवेश भाग 2 कसा भरायचा
- मराठी पेपेरला बोर्ड परीक्षेत अनेकदा रिपीट झालेली बातमी /प्रश्न
- कॉलेज करताय कोणाच्या प्रेमात नाहीत ना मग आमचा एकतर्फी प्रेम कसे घातक असते जरूर वाचा.