१ ली ते १० वी दाखल्याविना प्रवेश देण्याबाबत शासन निर्णय pdf |pahili te dahavi dakhlya vina pravesh denyababt shashan nirany pdf| pahili te dahavi vayanurup pravesh denyababat shashan nirnay pdf|पाहिली ते 10 वी वयानुरूप दाखल करण्याबाबत परिपत्रक
या लेखामध्ये आपण महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशीच एक शासन निर्णय आलेला आहे. खरोखरच निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. या शासन निर्णयानुसार इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दाखल्याविना प्रवेश देण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. त्याला शासनाने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शासकीय व माध्यमिक शाळेमध्ये सुलभ रीतीने प्रमुख प्रवेश मिळवून देण्याबाबतचा देश असे शीर्षक दिलेले आहे.१ ली ते १० वी दाखल्याविना प्रवेश देण्याबाबत शासन निर्णय पीडीएफ |
विद्यार्थ्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीदेखील त्या विद्यार्थ्याला प्रवेशापासून कोणीही वंचित ठेवू शकणार नाही असा या शासन निर्णयाचा गाभा आहे चला तर मग या शासन निर्णयाविषयी थोडक्यात माहिती पाहूया.
१ ली ते १० वी दाखल्याविना प्रवेश देण्याबाबत शासन निर्णय येण्यामागील कारणे | pahili te dahavi dakhlyavina pravesh denyababt shashan nirany yenyamagil karane
इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शासकीय व अनुदानित माध्यमिक शाळेत सुलभरीत्या प्रवेश मिळावा असा शासनाने जारी झालेला आहे हा शासन आदेश सहा डिसेंबर 2022 रोजी जारी करण्यात आला यामागे नेमकी कोणती कारणे आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश देतेवेळी शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच LC LEAVING CERTIFIACTAE हा महत्त्वाचा दस्तऐवज मानला जात होता. पण कोरोना काळामध्ये आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या पालकांना आपल्या पाल्याची फी भरता आली नाही कारण कोरोना मामानी मध्ये अनेक लोकांची रोजगार गेले मजूर वर्गाला काम मिळत नव्हते सांगण्याचे तात्पर्य हे की कोरोना काळामध्ये सर्वच कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटलेली होती त्यामुळे अनेक पालकांना आपल्या पाल्याच्या भी भरण्यामध्ये अनेक अडचण येत होत्या. काही ठिकाणी तर पालकांनी फी भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून आपल्या पाल्याचा ऑनलाईन प्रवेश देखील घेतला नाही. अशा विद्यार्थ्यांना पुढील इयत्तांमध्ये प्रवेश घेत असताना अनेक खाजगी शाळा आमची फी अगोदर द्या! तरच आम्ही आपणास शाळा सोडल्याचा दाखला देऊ, असा दबाव टाकताना दिसत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे कोणते प्रकारचे नुकसान होऊ नये, म्हणूनच शासनाकडून एक निर्णय घेण्यात आला त्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यामधील कोणतेही शासकीय महानगरपालिका नगरपालिका खाजगी अनुदानित विनाअनुदानित स्वयं अर्थसाहित अशा कोणत्याच व्यवस्थापनाच्या शाळेने जर त्यांच्याकडे एकादा विद्यार्थी प्रवेशासाठी आला तर त्याच्याकडे दाखला नाही हे कारण सांगून त्याचा प्रवेश नाकारू नये.शाळेला प्रवेश देणे बंधनकारक | SHALELA PRAVESH DENE BANDHANKARAK
कोणत्याही शाळेमध्ये एखादा विद्यार्थी प्रवेशासाठी आला आणि तो इयत्ता पहिली ते दहावी अशा कोणत्याही इयत्तेमध्ये प्रवेशासाठी आला असेल तर, त्या विद्यार्थ्याला प्रवेश हा दिला गेलाच पाहिजे असा स्पष्ट उल्लेख या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे.एखाद्या शाळेने विद्यार्थ्यांचा प्रवेश ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजेच LC nahi म्हणून नाकारला तर अशा शाळांवर कारवाई केली जाईल. थोडक्यात आपल्याकडे जर प्रवेशासाठी कोणत्याही कागदपत्राविना विद्यार्थ्याला तर त्याला प्रवेश देणे हे शाळांना बंधनकारक करण्यात आलेले आहे. अशा विद्यार्थ्यांना प्रवेश कशाच्या आधारावर द्यायचा याबाबत देखील स्पष्ट सूचना देण्यात आलेले आहेत.
शाळा सोडल्याचा दाखला नसताना कसा द्यावा प्रवेश | SHALA SODLYACHA DAKHLA NASTANA KASA DYAVA PRAVESH
महाराष्ट्र राज्यामध्ये सहा डिसेंबर 2022 रोजी निघालेल्या शासन निर्णयानुसार ; जर एखाद्या विद्यार्थ्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नसेल आणि तो विद्यार्थी इयत्ता पहिली ते दहावी कोणत्या इयत्तेमध्ये अगोदरच्या शाळेमध्ये शिकत असेल परंतु काही कारणास्तव तो शाळेमध्ये जाऊ शकला नाही. त्या शाळेची फी भरलेली नसेल आणि त्या विद्यार्थ्याला ती शाळा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा टीसी देत नसेल,अशावेळी ज्या शाळेमध्ये तो मुलगा प्रवेशासाठी आलेला आहे त्या मुलाचे जन्म दाखला, आधार कार्ड अशा जन्मतारखेचा पुरावा देणाऱ्या दस्तऐवजांची मदत घेऊन संबंधित विद्यार्थ्याला त्याच्या वयानुसार प्रवेश द्यावयाचा आहे आणि त्याचे नाव पटावरती नोंदवून घ्यायचे आहे.वयानुरूप दाखल विद्यार्थी सरल नोंद | navarup dakhal vidhyarthi saral nond
अलीकडे शासनाकडून पट नोंदणीचा गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी सरल पोर्टल वरती असणे अतिशय गरजेचे आहे. त्याचे शाळेच्या दप्तरातील नाव आणि आधार कार्ड वरील नाव मॅच असणे देखील तितकेच गरजेचे आहे. थोडक्यात काय तर जी पट नोंदणी आहे त्या पट नोंदणी आहे, मध्ये कुठल्याही प्रकारचा फसवेपणा असता कामा नये मग अशावेळी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला नसताना वयानुरूप प्रवेश देत असताना या विद्यार्थ्यांची सरळ नोंद कशी घ्यावी याबाबत देखील स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. अशा वयानुरूप दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे ट्रान्सफर सर्टिफिकेट नसताना देखील वयाचे पुरावे मागवून त्यांना संबंधित इयत्तेत प्रवेश दिल्यानंतर ज्या शाळेमध्ये तो अगोदर शिकत होता त्या शाळेशी संपर्क करून सात दिवसाच्या त्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेच्या पाटावरती सरल पोर्टलच्या माध्यमातून देखील दाखवायचा आहे.सरल पोर्टल वर रिक्वेस्ट अप्रो करण्यास शाळा नकार देत असल्यास काय करावे?
आपल्याकडे एखादा विद्यार्थी वयानुरूप आपण पहिली ते दहावी मध्ये कोणत्या वर्गामध्ये दाखल केला, परंतु त्याची जुनी शाळा सरल पोर्टल वरील आपली रिक्वेस्ट मान्य करत नसल्यास केंद्रप्रमुखांशी संपर्क साधावा अशा सूचना देण्यात आलेले आहेत.१ ली ते १० वी दाखल्याविना प्रवेश देण्याबाबत शासन निर्णय pdf | pahili te dahavi dakhlyavina pravesh denyababt shashan nirany pdf
पहिली ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्याकडे ट्रान्सफर सर्टिफिकेट नसताना म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला त्याच्याकडे नसताना leaving certificate नसताना त्याला वयानुरूप येते मध्ये दाखल करून घेण्याबाबत जो शासन निर्णय देण्यात आलेला आहे.त्या शासन निर्णयाची पीडीएफ आम्ही आपणास देत आहोत. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शासकीय अनुदानित माध्यमिक शाळेत सुलभ रीतीने प्रवेश मिळवून देण्याबाबत पीडीएफ पाहण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर विद्यार्थ्याकडे दाखला नसता नाही त्याला शाळेच्या पटावर घेण्याबाबत आलेले परिपत्रक पीडीएफ.1 ली ते 10 वी वयानुरूप प्रवेश देणेबाबत परिपत्रक | pahili te dahavi vayanurup pravesh denebabat pariptark pdf
vayanurup pravesh denyababat shashan nirnay pdf|पाहिली ते 10 वी वयानुरूप दाखल करण्याबाबत परिपत्रक
FAQ
१. दाखला नसताना प्रवेश देता येतो का?
होय
२. Lc नसताना प्रवेश देण्याबाबत परिपत्रक gr आहे का?
हो
३.दाखला नसताना वयाचा पुरावा पाहून प्रवेश द्यावा असा शासन निर्णय कधी आला ?
६ डिसेंबर 2022
4.वयानुरूप वर्गात दाखल करण्याचा gr का आला आहे?
मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी
आमचे हे लेख वाचा