पठाण सिनेमातील बेशरम रंग गाण्यावरून वाद | pathaan movie besharam rang song varil vad
ज्ञानयोगी डॉट कॉम च्या माध्यमातून आपण आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेत असतो. गेल्या काही दिवसांपासून पठाण सिनेमा त्याच्यातील एका गाण्यावरून वादाचा ठरत आहे. ते गाणे म्हणजे बेशरम रंग आजचा लेखात आपण या गाण्यावरून वादंग का निर्माण झाला आहे याविषयी माहिती पाहणार आहोत.पठाण सिनेमातील बेशरम रंग गाण्यावरून वाद
पठाण या चित्रपटामध्ये मुख्य कलाकार शाहरुख खान व अभिनेत्री दीपिका पदुकोण आहे. त्याचबरोबर विलनच्या भूमिकेत जॉन अब्राहम दिसणार आहे. पठाण चित्रपट सिनेमागृहामध्ये 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्ममार्फत करण्यात आलेले आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीचा भाग म्हणून कोणत्याही चित्रपटातील काही गाणी किंवा ट्रेलर रिलीज केले जातात. अगदी त्याच पद्धतीने पठाण सिनेमातील बेशरम रंग हे गाणे देखील रिलीज करण्यात आलेले आहे.
पठाण सिनेमातील बेशरम रंग या गाण्यावरून खूप मोठा वादंग उसळलेला आहे. बेशरम रंग या पठाण चित्रपटातील गाण्यांमध्ये दीपिका पदुकोनने जी बिकिनी किंवा पोशाख केलेला आहे. तो पोशाख अतिशय तोकडा आहे. त्याचबरोबर या तोकड्या कपड्यांचा रंग देखील केसरी (भगवा) असल्या कारणामुळे एक प्रकारे हिंदू धर्मियांच्या भावना यातून दुखावल्या गेल्या आहेत.असा काही संघटनांचा आरोप आहे. हिंदू धर्मामध्ये केसरी रंगाला खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. हिंदू धर्मातील ध्वज हे केसरी रंगाचे असतात. त्याच बरोबर बऱ्याच मूर्तींना शेंदूर लावला जातो. त्या शेंदुराचा रंग देखील केसरीच असतो. अशा हिंदू धर्मातील पवित्र केशरी रंगाचा उपयोग या गाण्यांमधील कपड्यात करायला नको होता. असा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला आहे.
भारतातील मध्य प्रदेश, बिहार ,राजस्थान ,गुजरात, छत्तीसगड महाराष्ट्र या राज्यांमधून या सिनेमातील बेशरम रंग या गाण्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. चित्रपटातील सिने अभिनेत्री दीपिका पदुकोण केसरी रंगाचे तोकडे कपडे घातलेले आहेत. या गाण्याचे बोल देखील ए बेशरम रंग असे असल्याकारणाने शाब्दिक आणि कपड्यांचा असलेला केशरी रंग या दोन्हींवरून जाणीवपूर्वक हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. असा आरोप अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.
पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे शिल्पा राव या गायिकेने गायले आहे. पठाण हा चित्रपट यशराज फिल्म द्वारे प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाने किंवा चित्रपटातील बेशरम रंगाने एक नवा वादंग निर्माण केला असला तरी ,माणसाचा एक स्वभाव असतो असं असे काही चर्चिले गेले की त्याला अजूनच जास्त प्रसिद्ध मिळते. अगदी बेशरम रंग या पठाण चित्रपटातील गाणे विषयी असेच म्हणावे लागेल. तिकडे हा चित्रपट बॉय कट म्हणजेच या चित्रपटाला प्रेक्षकांनी जाऊ नये.असे आवाहन होत असताना आपण जर सोशल मीडियावरील आकडे पाहिले तर या बेशरम रंग रिलीज झालेल्या गाण्याला एका आठवड्यातच 100 मिलियन पेक्षा जास्त view आलेले आहेत. आकड्यात सांगायचे झाले तर दहा कोटी लोकांपेक्षा लोकांनी हे गाणे पाहिले आहे.
इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युब यावर देखील या गाण्याने खूप मोठा धुमाकूळ घातलेला आहे.
बेशरम रंग या गाण्याच्या बाबतीमध्ये अभिनेता शाहरुख खान रंगाचे कपडे घातलेले ते देखील हिरव्या रंगाचे कपडे आहेत. थोडक्यात काय तर केसरी आणि हिरवा रंग वापरल्याने यातून हिंदू आणि मुस्लिम धर्म यांच्या भावना दुखावणारे आहेत. कारण का तर या दोन्ही धर्मामध्ये या दोन रंगांना अतिशय पवित्र मानले जाते. असा हा नवा वादंग बेशरम रंग या गाण्यावरून उठलेला आहे. हा वादंग पाहता हा चित्रपट किंवा या चित्रपटातील गाणे एडिट केले जाते की काय? औत्सुक्याचा विषय आहे.
काही असो पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरती खरोखरच जर काही आक्षेप असतील तर यावरती शासकीय यंत्रणांनी हवे ते बदल करून कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, यासाठी प्रयत्न करावेत. भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात.विविधतेत एकता हे भारताचे खास वैशिष्ट्य आहे. हे जपण्याचा सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे. या लेखाच्या माध्यमातून वाचक मंडळींना आम्ही एकच आव्हान करतो, या गाण्याच्या वादावरून सामाजिक शांतता आपल्यामुळे भंग होणार नाही यासाठी दक्ष राहूया. चित्रपट येतील जातील, परंतु यातून जर समाजामध्ये दूफळी निर्माण होत असेल तर मात्र आपण विचार करायला हवा. लोकांना सजग करणे. हाच आमचा या लेखा मागे प्रामाणिक हेतू आहे.
निष्कर्ष : आजच्या या पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याच्या निमित्ताने आम्ही कोणत्याही बाबीचे समर्थन करत नाही. तर नेमका वाद कशामुळे ?याविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
आमचा आजचा हा दैनंदिन घडामोडी वरील बेशरम रंग गाण्यावरील लेख आपणास कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.
आमचे हे लेख वाचा
सरकारी कर्मचारी यांना धमकावणे पडेल महागात