Type Here to Get Search Results !

संत गाडगे बाबा भाषण मराठी माहिती | sant gadge Baba bhashan nibandh marathi mahiti

 संत गाडगे बाबा भाषण| sant gadge Baba marathi bhashan |संत गाडगे महाराज मराठी माहिती | sant gadge Baba marathi mahiti | sant gadge baba marathi information 

  आपल्याला शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी तसेच थोर व्यक्तींबद्दल नवनवीन माहिती देण्याचे काम आम्ही विविध लेखांच्या माध्यमातून  करत आहोत. आजच्या लेखात आपण लोकसेवा हीच ईश्वरसेवा. स्वच्छता हाच परमेश्वर असे मानणाऱ्या संत गाडगेबाबा मराठी माहिती पाहणार आहोत. संत गाडगेबाबा जयंती/ पुण्यतिथी कार्यक्रमांमध्ये संत गाडगेबाबा यांच्या विषयीच्या भाषणातून आजकालच्या तरुण पिढीला स्वच्छता आणि श्रमप्रतिष्ठा यांच्या विषयी जाणीव जागृती करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.ही माहिती संत गाडगे बाबा जयंती भाषण करताना आपल्याला उपयोगी पडेल तसेच संत गाडगेबाबा मराठी निबंध लिहिताना देखील आम्ही देत असलेली माहिती खूपच उपयुक्त आहे.

संत गाडगे बाबा एका दृष्टिक्षेपात | गाडगे बाबा ठळक मुद्दे माहिती | gadge baba important point in marathi 


संत गाडगे बाबा महत्वाची माहिती
संत गाडगे बाबा यांचा जन्म दिनांक 23 फेब्रुवारी 1876
संत गाडगे बाबा यांचे जन्मस्थान अमरावती शेंडगाव
संत गाडगे बाबा यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर
संत गाडगे बाबा यांचे गुरू संत तुकाराम
संत गाडगे बाबा यांच्या आईचे नाव सखुबाई
गाडगे बाबा यांचे महत्वाचे कार्य अंधश्रद्धा निर्मूलन
 


संत गाडगे बाबा भाषण मराठी माहिती
संत गाडगे बाबा भाषण मराठी माहिती 

संत गाडगे बाबा संपूर्ण माहिती (toc) 


संत गाडगे बाबा मराठी माहिती | sant gadge Baba marathi mahiti | sant gadge Baba marathi information| gadge baba yanchi marathi mahiti | gadge baba jaynti marathi mahiti

संत गाडगेबाबा यांच्या विषयी विशेषत्वाने सांगायचे झाले तर त्यांनी संपूर्ण आयुष्य जनमानसांना स्वच्छतेचे महत्व आणि शिक्षणाचे महत्व पटवून देण्यामध्ये घालवले. त्यांनी स्वच्छता हा परमेश्वर मानला. देव दगडात नाही तर माणसात आहे अशी शिकवण देखील दिली.

संत गाडगे बाबा जीवन परिचय | sant gadge Baba jivan Parichay  

गाडगेबाबा यांचा जीवन परिचय करून घेत असताना सुरुवातीला आपण त्यांचे बालपण कसे होते याविषयी जाणून घेऊया.

संत गाडगे बाबा यांचे बालपण | sant gadge baba yanche balpan

संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 मध्ये महाराष्ट्रातील एका छोट्या खेडेगाव मध्ये झाला. ते खेडेगाव म्हणजे शेंडगाव होय. संत गाडगेबाबा किंवा संत गाडगे महाराज म्हणून ज्यांना आपण ओळखतो,त्यांचे संपूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर होते. संत गाडगेबाबा त्यांच्या आजोळी म्हणजे मुर्तीजापुर तालुक्यातील दापोरे या ठिकाणी मामाच्या गावी लहानाचे मोठे झाले. संत गाडगेबाबा यांचे मामा मोठे जमीनदार होते. गाडगेबाबा लहानपणापासूनच आपल्या मामांना त्यांच्या कामामध्ये मदत करत होते.

संत गाडगेबाबा यांच्या वडिलांचा म्हणजे झिंगराजी यांचा व्यवसाय कपडे धुण्याचा म्हणजेच परिटाचा व्यवसाय होता. संत गाडगेबाबा यांच्या वडिलांना दारूचे व्यसन होते या दारूच्या व्यसनाबाई ते मरण पावले. त्यानंतर संपूर्ण जबाबदारी संत गाडगेबाबा यांच्या आई वरती येऊन पडली साहजिकच संत गाडगेबाबा त्यांची आई यांना कायमच कष्ट उपसावे लागले. संत गाडगेबाबा यांचे लहानपणी लवकरच लग्न करण्यात आले. परंतु गाडगेबाबा यांचे मन कधी संसारामध्ये रमले नाही. 1892 साली त्यांच्या जीवनात एक घटना घडली ती घटना म्हणजे गाडगेबाबा यांच्या मुलीच्या  बारशाच्या वेळी रूढी परंपरेप्रमाणे दारू आणि मटणाचे जेवण दिले जात होते.परंतु गाडगेबाबा यांना आपल्या वडिलांचे निधन या दारूपायी झाली असल्याने त्यांनी या परंपरेला छेद द्यायचे ठरवले आणि पुरणपोळीचे जेवण दिले. यातूनच त्यांच्यातील समाज सुधारक जागा झाला आणि सर्वसामान्य लोकांना अंधश्रद्धा बुवाबाजी कर्मकांड यापासून अलिप्त करून शिक्षण आणि स्वच्छतेचे महत्व समजून सांगावे असे त्यांना वाटू लागले.


संत गाडगे बाबा यांचे कार्य | sant gadge Baba yanche kary | संत गाडगे बाबा यांचे विचार | sant gadge baba yanche vichar 

संत गाडगे महाराज यांनी कोणते कार्य केले.ते कार्य पाहिल्यावर गाडगे बाबा यांची विचार प्रणाली समजते.गाडगे बाबा  याविषयी सांगायचे झाले तर,त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकशिक्षण देण्याचे काम केले. अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या गावोगावी स्वच्छता कार्यक्रम हाती घेतले. जनक ठिकाणी विशेष स्वच्छता ठेवली जात नव्हती अशा ठिकाणी म्हणजेच शाळा, महाविद्यालये,मंदिरे, मोकळी मैदानी यांचे स्वच्छता त्यांनी करून घेतली.


संत गाडगे बाबा यांचे मराठी विचार |sant gadge Baba yanche vichar 

संत गाडगेबाबा लोकांना समजावून सांगत की,देवळात देव नाही तर माणसात देव आहे. संत गाडगे बाबा यांनी भुकेल्याला अन्न मिळाले पाहिजे,तहान लागलेली आहे त्याला पाणी मिळाले पाहिजे, जे उघडे नागडे आहेत त्यांना कपडे मिळाले पाहिजेत, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, आणि ज्यांच्या डोक्यावर छतच नाही त्यांना राहण्यासाठी आसरा मिळाला पाहिजे. ज्यांना नोकरी नाही रोजगार नाही त्यांना रोजगार मिळाले पाहिजे, जे ताण तणावात किंवा नैराश्याने ग्रासलेले आहेत त्यांना आधार दिला पाहिजे. या विचारांनी संपूर्ण आयुष्यभर संत गाडगेबाबा यांनी कार्य केले. गाडगेबाबा यांचे विचार आजच्या समाजसुधारकांनी नेत्यांनी आचरणात आणणे अतिशय गरजेचे आहे.sant gadge baba marthi information देत असताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये आपल्याला शिक्षण,स्वच्छता ,आरोग्य नि माणुसकी या गोष्टींचा प्रत्यय आल्या खेरीज राहत नाही. 


संत गाडगे बाबा भाषण | sant gadge Baba bhashan| sant gadge Baba speech in marathi | संत गाडगे बाबा छोटे भाषण | sant gadge baba ten line speech in marathi 

संत गाडगेबाबा महाराज यांच्या विषयी कोणताही स्वच्छतेचा उपक्रम असला किंवा संत गाडगेबाबा जयंती पुण्यतिथी असो त्यावेळी त्यांच्या कार्याचा परिचय करून देण्यासाठी संत गाडगेबाबा भाषण करून आपण लोकांना त्यांच्या विचाराचा परिचय करून देऊ शकतो. चला तर मग संत गाडगेबाबा यांचा जीवन परिचय, त्यांचे कार्य व विचार, पाहिल्यानंतर आता आपण संत गाडगेबाबा यांना भाषणाच्या स्वरूपातून समजून घेऊया. संत गाडगेबाबा यांच्या विषयी मराठी  भाषण आपल्याला करीता देत असताना त्यांच्याविषयी सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत परंतु या ठिकाणी नमुनावजा भाषण आपण देत आहोत.आपण यात नव्याने भर घालू शकता.

अध्यक्ष !महाशय!, गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो! आज आपण गाडगे महाराज जयंती/पुण्यतिथी कार्यक्रमासाठी एकत्रित जमलेलो आहोत. आजच्या या दिनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला केवळ पुष्पहार अर्पण करून आपले काम संपले .असे म्हणून चालणार नाही,तर आपल्याला संत गाडगे महाराज यांनी आपल्या वाणीने आणि कृतीने केलेल्या कार्याची ओळख करून घेणे अतिशय गरजेचे आहे.म्हणूनच आज मी आपणास संत गाडगे बाबा यांच्याविषयी माझे दोन शब्द संत गाडगेबाबा एक परिचय भाषण रूपाने आपल्यापुढे मांडत आहे.तरी आपण माझे विचार शांतचित्ताने ऐकावे आपणास विनंती.


तिर्थी धोंडा पाणी,

देव रोकडा सज्जनी.


तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. असा सडेतोड उपदेश करणारे, की ज्या काळामध्ये लोक कर्मकांड , उपास तपास देवधर्म यामध्ये अडकलेले होते. अशावेळी अगदी स्पष्ट शब्दांमध्ये या भक्तीच्या अवडंबरावर परखड बोलणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे संत गाडगेबाबा होय. त्यांनी लोकांना सांगितले तुम्ही तीर्थस्थळी भेटी देता ,त्या ठिकाणी मंदिरामध्ये मूर्ती म्हणजे धोंडा आहे आणि पाणी आहे तर तुम्हाला देव पाहायचा असेल तर,तो देव सज्जनामध्ये म्हणजेच चांगल्या माणसांमध्ये पहा आणि स्वतः देखील चांगले बनण्याचा प्रयत्न करा असा त्यांनी संदेश दिला.

देव माणसात माणसात 

का रे जाता देवळात.

असा आयुष्यभर संदेश गाडगेबाबा यांनी दिला.एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या मुलीच्या बारशाच्या कार्यक्रमांमध्ये मटन आणि दारू देण्याचा रिती रिवाज होता. त्या रीतीरीवाजाला सर्वप्रथम छेद देऊन गोडधोड जेवण करणारे एक आगळे वेगळे रसायन किंवा एक आधुनिक  समाज सुधारक म्हणजे संत गाडगेबाबा होय. संत गाडगेबाबा लोकांना नेहमी संदेश द्यायचे की,


जो भुकेलेला आहे त्याला अन्न मिळाले पाहिजे,

 ज्याला तहान लागली आहे अशा व्यक्तीला पाणी मिळायला हवे, 

ज्यांच्याकडे अंगभर वस्त्रे नाहीत त्यांना कपडा रक्ता मिळाला पाहिजे, 

गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे,

 बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, 

अंध अपंग रोगी यांना मोफत उपचार मिळाला पाहिजे.



 या त्यांच्या विचारावरून खरोखरच ते एक जाणता सुधारक म्हणून त्यांच्याकडे आपल्याला पाहावे लागेल.त्यांच्या समाज कार्यातून आपण प्रेरणा घ्यायला हवी.

संत गाडगेबाबा यांनी आपला गृह त्याग करून आपले संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी खर्ची घातले. अशा या स्वच्छतेच्या पुजाराचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 ला महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये असणाऱ्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये झाला. संत गाडगेबाबा त्यांचे वडील दारूच्या व्यसनामुळे मरण पावले.त्या घटनेनंतर  लहान वयापासूनच संत गाडगेबाबा आपल्या आजोळी  लहानाचे मोठे झाले.आपल्या मामाच्या गावी शेतीतील तसेच जनावरांच्या गोठ्यातील पडतील ती कामे संत गाडगेबाबा यांनी केली,परंतु कालांतराने लहान वयात लग्न झाल्यानंतर ते फार काळ संसारात रमले नाहीत पत्नी चार मुली असं संसार त्याग करून त्यांनी समाजसेवेचे व्रत स्वीकारले.


संत गाडगेबाबा यांनी लोक कीर्तनाच्या माध्यमातून देव दगडात नाही तर माणसात आहे हे जन माणसांना पटवून दिले. मंदिरावर होणारा खर्च शिक्षणासाठी केला पाहिजे. यासाठी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण आणि स्वच्छते प्रति जागरूक करण्याचे काम संत गाडगेबाबा यांनी केले. संत गाडगेबाबा यांनी अनेक शाळा धर्मशाळा दवाखाने सुरू केले त्याचबरोबर दारूबंदी झाली पाहिजे यासाठी देखील प्रयत्न केले.



गोपाला गोपाला ,

देवकीनंदन गोपाला .


असे म्हणत त्यांनी लोकांना भक्तीच्या जोडीला मानवतावादी दृष्टिकोन किती गरजेचा आहे. याविषयी जागरूक करण्याचे काम संत गाडगेबाबा यांनी केले. माझ्या विचारांना विराम देण्या अगोदर त्यांच्याविषयी एवढेच म्हणेल,


स्वच्छतेचे दुत होते,

शिक्षणाचे प्रसारक होते,

दारू, व्यसनाधीनता याचे विरोधक होते,

शिक्षणाने क्रांती होते,

असे सांगणारे संत गाडगेबाबा अद्वितीय होते.


अशाप्रकारे ज्यांच्या पुढे संत उपाधी लागते परंतु ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून सर्वच पातळीवर लोक जागृती करण्याचे काम केले असे एक आगळे वेगळे संत म्हणजे संत गाडगेबाबा होय.एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण थांबवतो.


माझे संत गाडगेबाबा यांच्या विषयी चे जे दोन शब्द आपण शांत चित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद ! जय हिंद जय महाराष्ट्र! 

अशा पद्धतीने आपण संत गाडगेबाबा भाषण किंवा sant gadge Baba speech in marathi च्या माध्यमातून लोकांना संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा परिचय करून देऊ शकता.

संत गाडगे बाबा जयंती मराठी माहिती व्हिडिओ | gadge baba jaynti marathi mahiti vedeo




आमच्या आजच्या लेखाच्या  माध्यमातून संत गाडगेबाबा मराठी माहिती  त्याचबरोबर संत गाडगेबाबा यांचे विचार व संत गाडगेबाबा मराठी निबंध ,संत गाडगे बाबा भाषा या सगळ्यांची एकत्रित माहिती आपण पाहिली.आमची गाडगेबाबा मराठी माहिती  आपणाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद ! 


FAQ 

1. संत गाडगेबाबा यांचे संपूर्ण नाव सांगा?

डेबुजी झिंगराजी जानोरकर 

2. संत गाडगेबाबा यांची जयंती कधी साजरी केली जाते?

23 फेब्रुवारी 

3. पंढरपूर या ठिकाणी चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?

संत गाडगे बाबा 

4. महात्मा गांधी व संत गाडगेबाबा यांची पहिली भेट कधी व कोठे झाली?

27 नोव्हेंबर 1935 वर्धा या ठिकाणी 

5. संत गाडगेबाबा यांचे शेवटचे कीर्तन कोणत्या ठिकाणी झाले?

पंढरपूर 

6. संत गाडगेबाबा यांचे स्मारक कोठे आहे?

अमरावती वलगाव 


आमचे हे लेख वाचा 


गॅदरिंगसाठी फिश pond 


शिक्षक दिनाची बातमी तयार करा


 salary अकाउंट काढण्याचे फायदे


सरकारी कर्मचारी यांना धमकावणे पडेल महागात


राष्ट्रीय क्रीडा दिन माहिती 



















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area