Type Here to Get Search Results !

सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य | savitribai phule shaikshnik v samajik kary

सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य | savitribai phule shaikshnik v samajik kary 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच बालिका दिनाचे औचित्य साधून आजच्या लेखात आपण सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य यावरती प्रकाश टाकणार आहोत.

बालिका दिन विशेषांक मध्ये या अगोदरच्या लेखांमध्ये आपण सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. त्याचबरोबर बालिका दिनाचे एक आदर्श भाषण आपल्याला कशा पद्धतीने करता येईल.याचा देखील नमुना आपण पाहिलेला आहे. आजच्या लेखाचा विषय हा केवळ savitribai phule shaikshnik v samajik kary या वरतीच आपण लक्ष केंद्रित करून आजची माहिती पाहणार आहोत. चला तर मग सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेऊया.

सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य
सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य

सावित्रीबाई फुले कार्य (toc)

सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य | savitribai phule yanche shaikshnik kary 

१.मुलींसाठी पहिली शाळा pahili shala 

सावित्रीबाई फुले यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले एक थोर समाज सुधारक होते. महात्मा फुले यांनी समाज सुधारण्यासाठी अनेक सामाजिक कार्य केली ही सामाजिक कार्य करत असताना मुलींना देखील शिक्षण मिळाले पाहिजे. परंतु हे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांना एका महिलेची गरज होती म्हणूनच महात्मा फुले यांनी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना आपल्या घरामध्ये शिक्षण दिले. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी पुणे या ठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.

2. भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका| bhartatail pahilya stree shikshika 

महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी योगदान दिले आणि समाजाचा प्रचंड करून सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. एक प्रकारे भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचे योगदान खरोखरच खूप उल्लेखनीय आहे.

३. पहिल्या महिला मुख्याध्यापिका| pahilya mukhyadhyapika 

सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका म्हणून जशा ओळखल्या जातात. अगदी त्याच पद्धतीने पहिल्या महिला मुख्याध्यापका म्हणून देखील त्यांना ओळखले जाते.

३. भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षण तज्ञ | bhartatil pahilya stree shikshan tadnya 

शाळेमध्ये अभ्यासक्रम सुनियोजित रित्या शिकवला गेला पाहिजे तर तो विद्यार्थ्यांपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने पोहोचतो असा विचार सावित्रीबाई फुले यांनी मांडला या त्यांच्या विचारावरून भारतामधल्या पहिल्या महिला स्त्री शिक्षण तज्ञ याचा मान देखील सावित्रीबाई फुले यांनाच द्यावा लागतो.

४. आनंददायी शिक्षणाची सुरुवात| anand dayi shikshnachi suruvat 

सावित्रीबाई फुले यांनी मुलींना अध्यापन करत असताना वर्गातील वातावरणाने नेहमी आनंददायी असले पाहिजे. च्या काळामध्ये आनंददायी शिक्षण ही संकल्पना स्वीकारली गेली आहे परंतु सावित्रीबाई फुले यांनी आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये आनंददायी शिक्षणाला अग्रक्रम दिला होता.

५. गणवेश वाटपाची सोय करणाऱ्या पहिल्या शिक्षिका | ganvesh vatap

विद्यार्थ्यांचा गणवेशा एकसारखा असला पाहिजे अशी भूमिका मांडून एकसारखा गणवेश विद्यार्थ्यांना असावा. म्हणून शाळेमध्येच गणवेशाचे वाटप करणाऱ्या पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. इकडे शासनाने मोफत गणेश वाटप योजना सुरू केली आहे. या योजनेचे मूळ आपल्याला सावित्रीबाई फुले यांच्या गणेश वाटपाच्या योजनेमध्ये सापडते यावरूनच सावित्रीबाई फुले यांचा दूरदृष्टीपणा आपल्याला दिसतो.

६. सहशिक्षणाच्या पुरस्कर्त्या | sah shikshnacha purskar 

सावीत्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू करत असताना पुण्यामध्ये मुले आणि मुली यांची एकत्र शाळा देखील सुरू करण्याचा प्रयोग केला होता परंतु त्याला पुरोगामी विचारांच्या काही लोकांनी विरोध केला. म्हणून मुला मुलींसाठी स्वतंत्र शाळा करण्यात आल्या. परंतु त्यांनी जी सुरुवात केली होती यावरून सहशिक्षणाच्या सावित्रीबाई या पुरस्कार करत होत्या हे आपल्याला विसरून चालणार नाही.

७. गोरगरिबांसाठी नेटिव्ह वाचनालयाची स्थापना स्थापना | native library 

सावित्रीबाई फुले यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांचा जर आपल्याला खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर त्यांना शिक्षणाबरोबर शिक्षणासाठी लागणारे सर्व साहित्य मिळाले पाहिजे म्हणूनच अशा नेटिव्ह वाचनालयाची याची स्थापना केली.

८. मुलींच्या उपस्थितीसाठी शैक्षणिक भत्ता |mulina upstithi bhatta 

पूर्वीच्या काळामध्ये महिलांना शिक्षण दिले जात नव्हते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शाळा सुरू केल्या, परंतु या मुलींना दररोज शाळेत येण्यासाठी भत्ता सुरू करण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले साहजिकच मुलींचे आई-वडील मुलींना भत्ता मिळतो म्हटल्यानंतर शाळेमध्ये पाठवू लागले.

९. शेतकरी आणि मजूर वर्गाच्या मुलांसाठी रात्र शाळा | ratrshalechi soy 

जी मुले किंवा मुली दिवसभर शेतामध्ये मोलमजुरी करतात. त्या मुलांना किंवा मुलींना शाळेमध्ये दिवसा उपस्थित राहणे शक्य नसते अशा मुलांसाठी रात्र शाळेचा प्रयोग सावित्रीबाई फुले यांनी केला.

१०. प्राथमिक शाळेपासूनच इंग्रजी विषय  अध्यापन   prathmik vargapasun engraji adhyapan 

सावित्रीबाई फुले यांच्या मते मुलांना मातृभाषेतून शिक्षण मिळाले पाहिजे. परंतु त्याच्या जोडीला जर विद्यार्थ्यांना इंग्रजी वरती प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्राथमिक स्तरापासूनच त्यांना इंग्रजांविषयी शिकवला गेला पाहिजे. अशी भूमिका मांडली मधल्या काळामध्ये विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी पासून इंग्रजी विषय शिकवला जात होता. सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी मांडलेला विचार हा शासनाला लागू करावा लागत आहे,कारण कोणती भाषा शिकत असताना ती लहान वयामध्येच विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रास्पिंग करू शकतात म्हणूनच आता इंग्रजी विषयाचे महत्त्व वाढलेले आहे.

अशी कितीतरी शैक्षणिक कार्य सावित्रीबाई फुले यांनी केली. सावित्रीबाई फुले यांना ही कार्य पुढे घेऊन जात असताना त्यांचे पती थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले. सावित्रीबाई फुले यांची शैक्षणिक कार्य पाहिल्यानंतर आपण त्यांनी समाजासाठी जी काही सामाजिक कार्य केलेले आहेत त्या सामाजिक कार्यांचा देखील आढावा यापुढे घेऊया.

सावित्रीबाई फुले यांची सामाजिक कार्य savitribai phule yanche samajik karya 

१. अस्पृश्यांसाठी पाण्याची विहीर खुली | asprushya lokansathi vihir khuli 

सावित्रीबाई फुले यांनी आपल्या घरासमोर असणारी स्वतःच्या मालकीची पाण्याची विहीर अस्पृश्य लोकांसाठी खोली केली. खरोखरच ज्या काळामध्ये जातिभेदाचा इतका पगडा समाजावरती असताना समाजातील उच्चवर्णीय काय म्हणतील ? याचा विचार न करता अस्पृश्यांसाठी पाण्याची विहीर खुली करणे हा खरोखरच क्रांतिकारक निर्णय सावित्रीबाई फुले यांनी घेतला होता.

२. विधवा स्त्रियांसाठी वसतीगृहाची सोय  vidhava mahilana vastigruhachi soy 

पूर्वीच्या काळी मुलींचे लग्न अतिशय लहान वयामध्ये केले जात होते. कधीकधी अतिशय लहान वयाच्या मुलींना देखील वैधव्य येत होते. विधवा स्त्रियांना समाजामध्ये अतिशय मानहानीचे जीवन जगावे लागत होते. अशा स्त्रियांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभे करण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी विधवा स्त्रियांसाठी वसतीगृहाची सोय केली.

३. धर्मनिरपेक्ष शिक्षणाचा पुरस्कार |dharm nirpeksh shikshnachi soy 

सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण देत असताना मानवतावादी विचारांचा पुरस्कार केला. विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण हे धर्मनिरपेक्ष शिक्षण असले पाहिजे.शिक्षणातून सर्व धर्मांचा आदर केला गेला पाहिजे. अमुक धर्म श्रेष्ठ आणि अमुक धर्म कनिष्ठ अशी भूमिका कोणी स्वीकारता कामा नये.

४. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार vidhava punrvivahacha purskar 

सावित्रीबाई फुले यांनी विधवा पुनर्विवाह चा पुरस्कार केला. राजश्री चा पती मरण पावल्यानंतर त्या महिलेला अतिशय दुय्यमत्वाची वागणूक दिली जात होती. म्हणून समाजामध्ये या महिलांना मानाने जगता यावे म्हणून या विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार असला पाहिजे याचा पुरस्कार सावित्रीबाई फुले यांनी केला.

५. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना | balhatya prtibandhak gruhachi sthapna 

सावित्रीबाई फुले यांनी कुमारी माता त्याचबरोबर विधवा माता यांच्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. मला त्या प्रतिबंधक ग्राम मध्ये अशा महिला काही विशिष्ट काळ राहत होत्या. त्या वेळच्या समाजाचा जर आपण विचार केला तर अशा महिलांना घरामध्ये ठेवणे शक्य नव्हते अशा महिलांचा विचार करून सावित्रीबाई फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली.

६. हुंड्याला विरोध |hunda dene ghene yala virodh 

सावित्रीबाई फुले आणि हुंडा देणे आणि घेणे हे दोन्ही प्रकारचे गुन्हे आहेत. त्यामुळेच मुलीच्या वडिलांना अतिशय खडतर जीवन जगावे लागते वेळप्रसंगी त्यांना आत्महत्या देखील करावी लागते म्हणूनच सावित्रीबाई फुले यांनी हुंडा पद्धतीचा विरोध केला.

७. केशवपन प्रथेचा विरोध | kesh vapan prthela virodh 

पूर्वीच्या काळी एखाद्या महिलेचा पती निधन झाल्यानंतर त्या महिलेच्या डोक्यावरील केस काढून तिचे मुंडन केले जायचे. हे खरोखरच अमानवीय आहे हे समाजाला पटवून देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले आणि त्यांनी केशवपण प्रतिचा कडाडून विरोध केला.

८. खादीचा प्रसार करणाऱ्या पहिल्या आंदोलक | khadicha purskar 

सावित्रीबाई फुले यांनी खादीच्या वापराला महत्व दिले. सावित्रीबाई फुले यांनी खादीचा प्रसार केला. जास्तीत जास्त लोकांनी खाली वापरावी असे आवाहन त्यांनी केले.

कवयित्री सावित्रीबाई फुले | kavyitri savitribai phule 

सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण आणि सामाजिक कार्य पाहिल्यानंतर त्यांच्यामधील अजून एक महत्त्वाचा पहिलं म्हणजे सावित्रीबाई फुले या एक उत्तम कवयित्री होत्या. काव्यफुले हा गाजलेला कविता संग्रह. सावित्रीबाई फुले यांच्या नावावरती दोन काव्यसंग्रह आहेत.

पहिल्या स्त्री संपादिका| pahilya stree sampadika 

एखादे पुस्तक संग्रह करून ते संपादके स्वरूपात प्रकाशित करण्याचा मान देखील सावित्रीबाई फुले यांना जातो. रस्त्या पहिल्या स्त्री संपादिका म्हणून देखील मान त्यांनाच द्यावा लागतो.

अशा पद्धतीने या लेखातून सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा आढावा आपण अतिशय छान पद्धतीने घेतलेला आहे. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त किंवा बालिका दिनानिमित्त विविध कार्यक्रम होतात या कार्यक्रमांमध्ये. सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य यावरती आपण निबंध लेखन स्पर्धा भाषण स्पर्धा यामध्ये भाग घेऊ शकता. या स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर आजच्या लेखांमध्ये दिलेली माहिती नक्कीच आपल्याला मोलाची मदत करेल यात शंका नाही.

आमचा आजचा हा सावित्रीबाई फुले शैक्षणिक व सामाजिक कार्य हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद! 


आमचे हे लेख जरूर वाचा 


#बालिका दिनाची बातमी तयार करा


सावित्रीबाई फुले शिक्षणविषयक अवतरणे (विचार)














टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area