Type Here to Get Search Results !

सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण विषयक मराठी कोट्स | savitribai phule yanche shikshan vishayk quotes

सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण विषयक मराठी कोट्स विचार  | savitribai phule yanche shikshan vishayk marathi quotes thought 

महाराष्ट्रमध्ये अनेक स्त्री समाजसुधारक होऊन गेले. जर आपण महिला समाज सुधारक यांचा विचार केला तर अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ अशी कितीतरी नावे आपल्याला घेता येतील की ज्यांनी आपापल्या परीने समाजाच्या उभारणीमध्ये काम केलेले आहे. आजच्या लेखामध्ये आपण सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण विषयक मराठी कोट्स म्हणजेच शिक्षणाबाबत सावित्रीबाई फुले यांनी मांडलेले शिक्षण विषयक विचार पाहणार आहोत. सावित्रीबाई फुले यांच्या वरती त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांचा प्रभाव होता हे आपल्याला त्यांचे शिक्षण विषयक कोट्स पाहताना जाणवते.

सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण विषयक मराठी कोट्स
सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण विषयक मराठी कोट्स


सावित्रीबाई फुले(toc)

 सावित्रीबाई फुलेयांचा जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. या बालिका दिनाचे औचित्य म्हणूनच आपण विविध लेख मालिका सादर केली. यामध्ये सर्वप्रथम आपण सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती पाहिली, त्यानंतर सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा करतो या बालिका दिनाचे भाषण उत्कृष्टपणे कसे देता येईल ? याचा एक नमुना आपण पाहिला. चला तर मग आज आपण सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण विषयक मांडलेले काही कोट्स पाहूया.

सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणविषयक कोट्स विचार| savitribai phule yanche shikshan vishayk quotes thought 


स्वर्गाचे दार उघडण्याचा म्हणजे सुखाने जगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण होय.


 व्यक्तीला स्वतःला जाणून घेण्याची खरी संधी देते ते म्हणजे शिक्षण.


साक्षर स्त्रीच संस्कृत समाज घडवू शकते.


शिक्षण हा स्त्रीचा अधिकार आहे.


माणसाकडे ज्ञान नसेल तर तो पशु आहे.


अज्ञानाला सोडा अज्ञानावर जोरदार प्रहार करा आणि त्याला आपल्या जीवनातून काढून टाका.


समाजामधल्या प्रत्येक स्त्रीला सुखी करायचे असेल तर तिला शिक्षण आणि स्वातंत्र्य द्या.


स्त्रियांना देखील सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.


ज्ञान ही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे.


ज्ञानापेक्षा या जगात काहीच मोठे नाही.


समाजात बदल घडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण.


मुलांना केवळ शिक्षण देऊ नका तर त्यांना शिक्षित करा संस्कार करा.


आपल्याजवळ जर ज्ञान असेल तर आपल्याला घाबरण्याचे कारण नाही.


जगातील कोणती भीती नष्ट करण्याचे सामर्थ्य शिक्षणात आहे.


आपल्या मधील चुकांवर मात करण्याची शक्ती भक्ती शिक्षणात आहे.


माणसाने सुशिक्षित असावे अज्ञानी नसावे.



savitribai phule yanche shikshan vishayk marathi quotes thought आपल्याला नक्की आवडतील.आपण बालिका दिनाच्या दिवशी आपले मित्र मैत्रिणी यांना पाठवा.


ज्या स्त्रीला शिक्षण नाही ती पाणी आणि मुळ्या नसलेल्या वटवृक्षासारखे आहे.


अशिक्षित स्त्री आपल्या मुलांना नीट वाढवू शकत नाही.


शिक्षण हा भविष्याचा मार्ग आहे यशाचा मार्ग नाही.


दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा स्वतः शिक्षित होणे जास्त गरजेचे आहे.


स्वावलंबी बनण्याचा एकमेव मार्ग शिक्षण.


जीवनामध्ये किती मोठे काम करण्याची ताकद फक्त शिक्षणामुळे येते.


स्त्रीमुक्तीचे एकमेव साधन शिक्षण.


जग बदल घडवण्याचे सर्वात प्रभावी अस्त्र म्हणजे शिक्षण.


पुस्तकांमध्ये समस्या सोडवण्याची ताकद आहे पण ते वाचण्याचा संयम आपल्याजवळ हवा.


विचार कसा करावा हे शिकायचं असेल तर पुस्तके वाचा.


असे सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण विषयक विचार व कोट्स मांडले. खरोखरच सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण विषयक मराठी कोट्स वाचल्यानंतर त्या किती प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या होत्या याची आपल्याला कल्पना येते. सावित्रीबाई फुले यांना केवळ महिला समाज सुधारक एवढ्या संकुचित दृष्टिकोनातून न पाहता एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. सावित्री बाई फुले एक शिक्षण तज्ञ होत्या. त्यांचे शिक्षण विषयक कार्य पाहिल्यानंतर आपल्या नक्कीच ध्यानात येईल.

बालिका दिन विशेष सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण विषयक मराठी कोट्स हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.


आमचे हे लेख आपल्याला नक्की आवडतील


बालिका दिन दहा ओळींचे सोपे इंग्रजी भाषण












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area