Type Here to Get Search Results !

स्वदेशी दिन बाबू गेनू स्मृतिदिन शहीद दिन मराठी माहिती | swadeshi din babu genu shahid din marathi mahiti

 स्वदेशी दिन बाबू गेनू स्मृतिदिन शहीद दिन मराठी माहिती| swadeshi din babu genu shahid din marathi mahiti 

आजच्या लेखात आपण स्वदेशी दिन म्हणजेच बाबू गेनू स्मृतिदिन किंवा ज्याला शहीद दिन म्हणून ओळखले जाते. यासंदर्भात मराठी माहिती पाहणार आहोत. बाबू गेनू स्वदेशीच्या लढ्यामध्ये शहीद झालेले पहिले सत्याग्रही होते. म्हणूनच त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्वदेशी दिन साजरा केला जातो. त्या स्वदेशी दिनाची सर्वप्रथम थोडक्यात माहिती बघूया.

स्वदेशी दिन बाबू गेनू स्मृतिदिन शहीद दिन मराठी माहिती
स्वदेशी दिन बाबू गेनू स्मृतिदिन शहीद दिन मराठी माहिती


स्वदेशी दिन बाबू गेणू शहीद दीन मराठी माहिती|swadeshi din babu genu shahid din marathi mahiti 

१२ डिसेंबर 1930 हा दिवस संपूर्ण भारतभर स्वदेशी दिन म्हणून साजरा केला जातो. या स्वदेशी दिनाची पार्श्वभूमी सांगायची झाली तर, 1930 च्या दरम्यान महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला होता. या मिठाच्या सत्याग्रहामध्ये लहान मुले, स्त्रिया, पुरुष,वृद्ध अशा सर्वांनी सहभाग घेतला होता. या सत्याग्रहाचा एक भाग म्हणून भारतातील नागरिकांनी मिठाचा कायदा मोडला होता. त्याचबरोबर विदेशी कपड्यांची होळी करून आम्ही विदेशी कपडे वापरणार नाही. अशा घोषणा देखील देण्यात आल्या होत्या.सर्वत्र आंदोलने सुरू होती.

१२ डिसेंबर 1930 रोजी मुंबईमधील वरळी भागामध्ये एक घटना घडली. मँचेस्टर मिल मधून परदेशी कपड्यांनी व विदेशी वस्तूंनी भरलेले ट्रक बाहेर निघत असताना त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. हजारोंचा समुदाय त्या ठिकाणी गोळा झाला होता व या समुदायाने परदेशी माल आणि सामान या मीलमधून बाहेर काढण्यास विरोध केला. हे ट्रक रस्त्यावरती येत असतानाच स्वदेशीसाठी काम करणारे स्वयंसेवक रस्त्यावर आडवे झाले आणि आम्ही येथून ट्रक बाहेर निघू देणार नाही अशी मागणी करू लागले. वंदे मातरम ! भारत माता की जय ! अशा घोषणा होऊ लागल्या. याच दरम्यान पोलिसांनी लोकांवर लाठीचार्ज देखील केला,परंतु काही केल्या लोक या ट्रकला पुढे जाऊ देत नव्हते. पोलिसांनी देखील हात टेकले होते.अशावेळी ब्रिटिश अधिकारी सार्जंट मात्र या घटनेमुळे प्रचंड रागावला. तो स्वतः ट्रक मध्ये बसला आणि आंदोलनकर्त्यांच्या दिशेने तो ट्रक घेऊन जाऊ लागला. या ट्रकने 22 वर्षीय बाबू गेनू यांचा जीव घेतला.अक्षरशा स्वदेशीच्या लढाईत बाबू गेनू शहीद झाले. दवाखान्यात नेईपर्यंत त्यांचा अंत झाला. सर्व आंदोलनकर्ते स्तब्ध झाले. तो दिवस म्हणजे १२ डिसेंबर 1930.एक तरुण तडफदार मुलगा स्वदेशीच्या हट्टा पायी किंवा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी शहीद झाला म्हणूनच हा दिवस बाबू गेनू शहीद दिन किंवा बाबू गेनू स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. स्वदेशीच्या लढ्यासाठी शहीद झालेला पहिला शहीद म्हणून बाबू गेनू यांचा उल्लेख इतिहासात आढळतो.

अशा पद्धतीने आपल्याला स्वदेशी दिन व बाबू गेनू शहीद दिन किंवा स्मृतिदिन याविषयी माहिती सांगता येते. तदनंतर हे बाबू गेनू नेमके कोण होते? त्यांचे बालपण याविषयी जरा थोडक्यात माहिती पाहूया.


बाबू गेनू सैद यांची मराठी माहिती| babu genu said yanchi marathi mahiti 

बाबू गेनू यांचा जन्म 1 जानेवारी 1908 रोजी झाला. पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या म्हाळुंगे, पडवळ तालुका आंबेगाव या ठिकाणी  बाबू गेनू सैद यांचे बालपण गेले. घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्यामुळे बाबू गेनू यांना मिळेल ते काम करावे लागत होते.तसेच त्यांच्या भावंडांना देखील घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे रोजी रोटी साठी संघर्ष करावा लागला. त्यांच्या वडिलांचे नाव गेनू आईचे नाव कोंडाबाई होते.

बाबू गेनू नोकरीच्या शोधासाठी मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये आल्यानंतर कापड गिरण्यांच्या मीलमध्ये ते सुरुवातीला ते काम करू लागले. गोदीकाम ते करत होते.कापड गिरण्यांमध्ये काम करत असताना त्यांची ओळख वडाळा काँग्रेस स्वयंसेवक यांच्याशी झाली. आणि ते महात्मा गांधी यांच्या कार्याने भारावून गेले. त्यांनी महात्मा गांधी यांच्या अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला.प्रसंगी अटक देखील झाली.

महात्मा गांधी यांनी  1930साली मिठाचा सत्याग्रह केला. त्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये वडाळा या ठिकाणी जो मीठ सत्याग्रह चालू होता ,त्या मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व बाबू गेनू यांनी केले. थोडक्यात काय तर बावीस वर्षाचा तरुण मात्र देश प्रेमाने भारावून गेलेला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपला हातभार हवा त्या प्रेरणेने बाबू गेनू आपल्या परीने योगदान देत होते. १२ डिसेंबर 1930 रोजी वडाळा मीलमधून परदेशी कपड्यांचा ट्रक बाजारात आणला जाणार होता. ते कपडे संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा भारतभर विकले जाणार होते.त्याला विरोध म्हणूनच अनेक स्वयंसेवक व बाबू गेनू त्या ट्रकला आडवे झाले. ब्रिटिश अधिकारी सार्जेंट याने मात्र आंदोलन करणारे व  बाबू गेनू यांच्या अंगावरून ट्रक घातला. ट्रक अंगावरून गेल्यामुळे बाबू गेणु ट्रक खाली शहीद झाले.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात ज्यावेळी स्वदेशी आंदोलन याविषयी चर्चा होईल, त्यावेळी स्वदेशीसाठी शहीद म्हणून बाबू गेनू यांचे नाव घ्यावे लागेल. म्हणूनच त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी या घटनेची आठवण म्हणून १२ डिसेंबर 1930 हा दिवस बाबू गेनू शहीद दिन तथा स्वदेशी दिन म्हणून साजरा केला जातो.


आजच्या काळात काळात स्वदेशी चे महत्व| aajchya kalat swdeshiche mhttav

बाबू गेनू यांनी स्वदेशी साठी दिलेले बलिदान आणि आज आपण मात्र सर्रास परदेशी वस्तूंचा नको इतका वापर करीत आहोत.याचाच विपरीत परिणाम म्हणून परदेशी अर्थव्यवस्था मजबूत होत आहेत. या उलट भारतीय अर्थव्यवस्था अतिशय धीम्या  गतीने पुढे जात आहेत.बाबू गेनू शहीद दिनाच्या निमित्ताने किंवा स्वदेशी दिनाच्या निमित्ताने आपण थोडे मागे वळून बघूया. हळूहळू का होईना स्वदेशी वस्तूंच्या वापराला सुरुवात करूया. हीच खरी बाबू गेनू यांच्या बलिदानाला वाहिलेली आदरांजली असेल.

अशा पद्धतीने आमचा हा आजचा स्वदेशी दिन व बाबू गेनू शहीद दिन स्मृतिदिन मराठी माहिती हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करा.आमची नवीन माहिती स्वदेशी दिनाच्या निमित्ताने आपले मित्र मैत्रिणी यांना नक्की पाठवा धन्यवाद!


आमचे हे लेख जरूर वाचा


योगा व योगाचे प्रकार


- शिक्षक दिन बातमी लेखन 


-  सॅलरी खाते असण्याचे फायदे 


- गणेश स्थापना विधी ,उत्तरपूजा व विसर्जन


- सरकारी कर्मचाऱ्यास धमकावले तर .....ही शिक्षा होणार 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area