वीर बाल दिवस मराठी माहिती निबंध भाषण | veer bal divas marathi mahiti nibandh bhashan |veer bal divas essay in marathi| bal divas marathi speech
संपूर्ण जगामध्ये एखाद्या चांगल्या घटनेची आठवण म्हणून, तसेच एखाद्या व्यक्तीचे पराक्रमी कार्य व त्या कार्याची आठवण म्हणून विविध दिवस साजरे केले जातात.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जाईल असे 9 जानेवारी2022 रोजी जाहीर केले आहे. आजच्या लेखाच्या माध्यमातून नेमका 26 डिसेंबर 2022 पासून हा दिवस वीर बाल दिवस म्हणून का साजरा केला जाणार आहे? याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
वीर बाल दिवस मराठी माहिती निबंध भाषण |
या माहितीच्या साह्याने आपल्याला वीर बाल दिवस निबंध त्याचबरोबर वीर बाल दिवस साजरा करीत असताना त्यावर छानपणे भाषण देखील देऊ शकता. चला तर मग veer bal divas information in marathi,veer bal divas marathi speech,veer bal divas marathi essay लिहीत असताना आपल्याला या सविस्तर माहितीचा नक्कीच उपयोग होईल.
वीर बाल दिवस साजरा करण्यामागील पार्श्वभूमी| veer bal divas ka sajra kela jato
सर्वप्रथमच 2022 मध्ये वीर बाल दिवस साजरा होत आहे. अनेकांना हा प्रश्न पडला आहे की या दिवसाचे नेमके काय महत्त्व आहे, की या दिवशी 22 डिसेंबर वीर बाल दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. घटनाही तशीच आहे. कारण याच दिवशी आपल्या धर्माच्या रक्षणार्थ गुरुगोविंद सिंग यांच्या २ मुलांनी बलिदान पत्करले. परंतु आपला नाही. चला तर मग ही धर्मांतराबाबतची नेमकी घटना काय आहे ती पाहूया.
वीर बाल दिवसाचा इतिहास | veer bal divas history
गुरुनानक यांच्यापासून प्रेरणा घेऊन पंजाब प्रांतामध्ये गुरुगोविंद सिंग यांनी शीख खालसा पंथाची स्थापना केली. गुरुगोविंद सिंग यांनी गुरुनानक यांनी सांगितलेल्या तत्त्वांना समोर ठेवून खालसा पंथाची स्थापना केली होती. सर्वांनी जाती, धर्म विसरून एकत्र यावे या विचारावर खालसा पंथ आधारलेला होता, गुरुगोविंद सिंग यांनी एका पात्रामध्ये अमृता सारखा पदार्थ तयार केला. हा पदार्थ सर्वांनी एकाच पात्रामध्ये प्यावा. कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये. कारण आपण सगळे एकाच ईश्वराची लेकरे आहोत. आपण सर्वजण गुरुनानक यांचे पाईक आहोत. आपल्याला सर्व भेदभाव विसरून एकत्र यावे लागेल. असे त्यांनी सर्व जनतेला अवाहन केले.
गुरुगोविंद सिंग यांनी सर्वांना हे अमृत पिण्याचे आवाहन केले परंतु जुन्या विचारांना चिकटून असलेले धर्माभिमान बाळगणारे काही व्यक्ती यामुळे दुखावले गेले. गुरुगोविंद सिंग यांच्या दरबारात असलेले पंडित, विद्वान व काही रजपूत राजे त्यांच्या या भूमिकेने नाराज झाले. गुरुनानकांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळे एक समान आहोत. असे सांगून देखील त्या नाराज झालेल्या लोकांनी त्या पात्रातील अमृत पिणे नाकारले मंडळी औरंगजेबाला मिळाली.
औरंगजेबाची धर्मांतराची मोहीम | aurangjebachi dhrmantar mohim
सोळाव्या सतराव्या शतकाच्या दरम्यान मुघलांचा सम्राट औरंगजेब यांनी आपला मुस्लिम धर्म वाढला पाहिजे. यासाठी धर्मांतराची एक मोठी मोहीम हाती घेतली होती. जोर जबरदस्ती करून मुस्लिम धर्माचा स्वीकार करावा साम ,दाम दंड भेद अशा सर्व शक्तींचा वापर औरंगजेब आणि त्याचे अनुयायी करत होते.
धर्मांतराला खालसा पंथाचा विरोध | dhrmantrala khalsa panthacha virodh
मुगल सम्राट औरंगजेबाने मुस्लिम धर्म स्वीकारावा यासाठी जी जबरदस्ती सुरू केली होती. त्याला विरोध गुरु गोविंद सिंग आणि त्यांच्या खालसा पंथाने केला. साहजिकच औरंगजेबाची फौज व गुरुगोविंद सिंग यांच्यामध्ये एक लढाई झाली आणि ती लढाई चमकौर लढाई किंवा युद्ध म्हणून ओळखले जाते.
चमकौर युद्ध लढाई | chamkour chi ladhai
गुरुगोविंद सिंग आणि औरंगजेबाची फौज यांच्यामध्ये चमकौर या ठिकाणी मोठी लढाई झाली. लढाईमध्ये गुरुगोविंद सिंग यांचे चार पुत्र अजित सिंग, झुझार सिंग, जोरावर सिंग व बाबा फत्तेसिंग या चारही पुत्रांनी अतिशय निकराने लढा दिला. ते चारही राजकुमार औरंगजेबाच्या बलाढ्य फौजापुढे यांचा काही टिकाऊ लागला नाही. साहजिकच या चमकोरच्या लढाईमध्ये शिखांचा पराभव झाला. व यातील २ राजकुमार यांना बंदी करण्यात आले.
गुरुगोविंद सिंग यांच्या मुलांवर धर्मांतरासाठी आग्रह | muslim dharm swikranyavha aagrah
चमकौर लढाईमध्ये गुरुगोविंद सिंग आणि त्यांच्या मुलांचा पराभव झाल्यानंतर २ मुलांना कैद करण्यात आले. ज्या काळामध्ये ही लढाई झाली. त्या काळामध्ये थंडीचे दिवस होते.अशा थंडीच्या दिवसांमध्ये त्यांना गारठत्या थंडीमध्ये कमी कपड्यांमध्ये या पुत्रांना ठेवण्यात आले. त्याचबरोबर त्यांना उपासमारीचा देखील सामना करावा लागला.एवढेच नव्हे तर चाबकाचे फटके देखील या मुलांवरती ओढण्यात आले. गुरुगोविंद सिंग यांच्या चारही मुलांनी अखेरच्या श्वासापर्यंत आपण मुस्लिम धर्म स्वीकारणार नाही. भले आम्ही आमच्या खालसा पंथासाठी आमच्या जीवाचे बलिदान देऊ. खरोखरच झाले देखील तसेच औरंगजेबाला गुरुगोविंद सिंग यांच्या मुलांची ही भूमिका आवडली नाही.या या २ मुलांना एका भिंतीमध्ये गाढण्यात आले.या मुलांनी जिवंतपनी मरण पत्करले परंतु, त्यांनी आपला धर्म सोडला नाही. मुस्लिम धर्माचा स्वीकार केला नाही. भिंतीचे बांधकाम करीत असताना वारंवार त्यांना इस्लाम धर्माचा स्वीकार करण्याचा आग्रह करण्यात आला. आम्ही तुम्हाला मानाची पदे देऊ, जहागिरी देऊ, पैसा देऊ, हे धन देव अशी आश्वासने देण्यात आली. परंतु गुरुगोविंद सिंग यांच्या मुलांनी कोणत्याही प्रकारे कॉम्प्रमाईज केले नाही. खरोखरच त्यांनी दाखवलेल्या पराक्रमाची, शौर्याची त्याचबरोबर आपल्या धर्माप्रती असलेल्या एकनिष्ठतेची आठवण म्हणून 26 डिसेंबर हा दिवस गुरुगोविंद सिंग यांच्या राजपुत्रांच्या बलिदानाची आठवण म्हणून हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.
अलीकडच्या काळामध्ये धर्मांतराबाबत कितीतरी बाबी आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु गुरुगोविंद सिंग आणि त्यांच्या मुलांनी जी शिकवण दिलेली आहे. आपल्या धर्माप्रती एकनिष्ठ राहणे. ही शिकवण पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.
बाल दिवस साजरा करण्यामागील मुख्य भूमिका| bal divas sajra karnyamagil bhumika
पूर्ण भारतभर वीर बाल दिवस साजरा केला जाणार आहे. हा साजरा यामागे एकच भूमिका आहे. केवळ धर्मच नव्हे तर प्रसंगी आपल्या देशावर देखील अशा काही अडचणी आल्यानंतर आपण बलिदानाची तयारी ठेवली पाहिजे. असा संदेश या वीर बाल दिनाच्या निमित्ताने आपण करू शकतो.
वीर बाल दिवस व्हिडिओ | veer bal divas vedeo
वीर बाल दिवसाची माहिती आपल्याला अतिशय सविस्तरपणे हवे असल्यास खाली दिलेला व्हिडिओ आपण पाहू शकता.
अशा पद्धतीने आज आपण वीर बाल दिवस माहिती त्याचबरोबर वीर बाल दिवस निबंध लिहीत असताना या माहितीचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. 26 जानेवारीला वीर बाल दिवस साजरा केला जाईल. त्यावेळी या दिवसाचे महत्त्व सांगत असताना वीर बाल दिवसाचे भाषण करत असताना आपल्याला आमची माहिती नक्कीच उपयोगी पडेल. आमचा हा वीर बाल दिवस लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करा. आज बरोबर हा लेख आपल्याला आवडला असल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. करून यावर्षीच नव्याने सुरू होत असलेला 26 डिसेंबर वीर बाल दिन म्हणून का साजरा केला जातो हे समजेल.
FAQ
१. वीर बाल दिवस किती तारखेला साजरा केला जाणार आहे?
26डिसेंबर
2.वीर बाल दिवस 26 डिसेंबरला साजरा होईल अशी घोषणा कोणी केली?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचे हे लेख वाचा
- माणूस पैश्यात सुख बघतो पण नेमके सुख काय एकदा क्लिक करा नि समजून घ्या
@ मुले अभ्यास करत नाहीत हा लेख वाचून दाखवा