विना अनुदानित तुकडी किंवा शाळेतून अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदली बाबत आदेश स्थगिती |vina anudanit tukdi kinva shaletun anudanit tukdivar shikshk bdali karnyachya nairnayla sthagiti
आजच्या लेखात महाराष्ट्र राज्यातील खाजगी विनाअनुदानित शाळेतून किंवा तुकडीतून अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदली करण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत 1 डिसेंबर 2022 रोजी एक शासन आदेश आलेला आहे. यासंदर्भात माहिती पाहणार आहोत.
विना अनुदानित तुकडी किंवा शाळेतून अनुदानित तुकडी किंवा शाळेत बदली बाबत आदेश स्थगिती |
महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती अधिनियम 1977 | maharashtra khajagi shalatil karmchari sevechya sharti adhiniyam 1977
महाराष्ट्र राज्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये त्यांना त्यांची कर्तव्य परिणामकारकरीत्या व कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी जो अधिनियम करण्यात आला तो म्हणजे, महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती अधिनियम 1977 होय या अधिनियमांतर्गत 1981 साली खाजगी कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत एक नियमावली तयार करण्यात आली.या नियमावलीमध्ये नियम क्रमांक 41 असा होता की, विनाअनुदानित शाळा किंवा तुकडीवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याला जर अनुदानित शाळेमध्ये जर एखादी जागा रिक्त झाल्यास विना अनुदानित तुकडीवर काम करणाऱ्या व्यक्तीला रीतसर मान्यता घेऊन सदर व्यक्तीला अनुदानित शाळा किंवा तुकडीवर नियुक्ती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या .तसे त्या संदर्भात एक परिपत्रक देखील निर्गमित करण्यात आले होते.परंतु अलीकडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पदभरती बाबत बंदी असताना देखील नियमांचे उल्लंघन करून अनेक संस्थांमध्ये विनाअनुदानित तुकड्यातील शिक्षक अनुदानितला घेतल्याची गैरप्रकार उघडकीस आलेले आहेत. शासन आदेशाचे पालन न झाल्याचे उघड झाले आहे.म्हणूनच एक डिसेंबर 2022 रोजी एक शाशन आदेश काढण्यात आलेला आहे ,त्यानुसार विनंतीवरून अनुदानित तुकड्यांमध्ये शिक्षकांची बदली करू नये त्या आदेशाला स्थगिती मिळालेली आहे.
महाराष्ट्र राज्यातील खाजगी विनाअनुदानित शाळेतून किंवा तुकडीतून अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदली करण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती आदेश | vina anudanit tukditun anudanit tukdivar niyukti karnyala sthgiti
1 डिसेंबर 2022 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निघालेला आहे .त्या शासन निर्णयानुसार राज्यातील खाजगी शाळातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरती वरती बंदी असताना विनाअनुदानित तुकड्यात कार्यरत असणारे शिक्षक अनुदानित तुकड्यांवरती रिक्त पदांवरती बदली होत असल्याची बाब शासनाच्या लक्षात आल्यामुळे तूर्तास अशी बदली करण्याला अटकाव करण्यात आलेला आहे.पुढील आदेश येईपर्यंत त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे अशी या परिपत्रकात माहिती देण्यात आलेली आहे.
खाजगी संस्थातील कर्मचाऱ्यांच्या विनाअनुदानित तुकडीवरून अनुदानित तूकडीवर बदली बाबत जुने आदेश | khajgi shaikshnik sanstha karmchari vina anudanit tukdivarun anudanit tukdivar badlibabat june aadesh
या अगोदर शासनाने काढलेले 6 जून 2020 चा शासन निर्णय व 1एप्रिल 2021 चा शासन निर्णय यांचे पालन झाले आहे की नाही याची देखील तपासणी करण्याच्या सूचना शिक्षणायुक्त यांना देण्यात आलेल्या आहेत. तशी तपासणी देखील होऊ शकते.
थोडक्यात काय तर जे शिक्षक सध्या विनाअनुदानित शाळांवरती कार्यरत आहेत असे शिक्षकांना परस्पर अनुदानित तुकड्यांना बदली देणे याबाबत नियम व अटी पालन न झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने या निर्णयाला शासनाने स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर या अगोदरच्या संस्थांनी अशा बदल्या दिले असतील त्यांनी नियमांचे पालन केलेले आहे की नाही शासनाला त्याबाबत माहिती दिली दिलेली आहे की नाही याबाबत देखील चौकशी होणार आहे.
विनाअनुदानित तुकडीवरील शिक्षक अनुदानित शाळेत बदली न करण्याबाबत आदेश | vina anudanit tukdivaril shikshk anudanit tukdivar niyukt n karnya babat adesh
विनाअनुदानित तुकडी वरील शिक्षक अनुदानित तुकडीवर नियुक्त करू नये याबाबत शासनाच्या आदेश खाली दिलेला तो सविस्तर वाचा.
- माणूस पैश्यात सुख बघतो पण नेमके सुख काय एकदा क्लिक करा नि समजून घ्या
@ मुले अभ्यास करत नाहीत हा लेख वाचून दाखवा