शिक्षक योगिता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत माहिती | TAIT exam 2022 online application date detail | tait परीक्षा 2023 बाबत माहिती | tait exam 2023 information mahiti
महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये गेल्या काही वर्षांपासून पवित्र या संगणकीय प्रणाली द्वारे शिक्षक भरती केली जाते. शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात TAIT टेट परीक्षा 2022 घेतली जाणार आहे. या TAIT परीक्षेचे ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मागविण्यात येत आहेत. तशी अधीसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपायुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांनी दिलेले आहे. पण ही TAIT परीक्षेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी असेल याविषयी आज माहिती पाहणार आहोत.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत माहिती |
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT परीक्षा 2022 चे वेळापत्रक| TAIT EXAM TIME TABLE | TAIT PARIKSHA 2023 VELAPTARK | टेट परीक्षा 2023 ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया
TAIT परीक्षा 2023 सर्व माहिती | tait exam all details
1. TAIT परीक्षेसाठीऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी | TAIT EXAM ONLINE APPLICATION DATE
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022(TAIT) या परीक्षेसाठी अर्ज करण्याचा कालावधी 31 जानेवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023 पर्यंत असणार आहे. TAIT परीक्षा सर्व माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ.
2.TAIT परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत | TAIT EXAM ARJ KASA KRAVA
TAIT परीक्षेसाठी आपल्याला ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करायचे आहेत.
MAHATAIT परीक्षेला अर्ज करण्यापूर्वी ही माहिती वाचा
3.TAIT ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख | TAIT EXAM ONLINE FORM FILLL UP LAST DATE
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT 2022 या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 8 फेब्रुवारी 2023 रात्री अकरा वाजेपर्यंत आहे.
4.शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022प्रवेश पत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा दिनांक |TAIT EXAM HALL TICKET DATES
15 फेब्रुवारी 2023 पासून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेचे हॉल तिकीट आपल्याला डाऊनलोड करून घेता येतील.
6.शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा दिनांक
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 ही ऑनलाईन परीक्षा 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. येणारे अर्ज आणि उपलब्ध सुविधा यांचा विचार करून ते वेळापत्रक बनवले जाईल.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे माध्यम | TAIT EXAM MEDIUM
स्टेट परीक्षेचे माध्यम अभ्यासक्रम पात्रता अर्ज करण्याची पद्धत याबाबतची सर्व माहिती WWW.MSCEPUNE.IN संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 साठी लागणारी कागदपत्रे | TAIT EXAM 2023 DOCUMENTS
आपल्याला जर या परीक्षेसाठी अर्ज करावयाचा असेल तर दहावी बारावी गुणपत्रिका, पदवी परीक्षेची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र तसेच व्यावसायिक शिक्षणाची सर्व कागदपत्रे आपल्याला स्कॅन करून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
TAIT परीक्षा केंद्र आणि त्यातील बदल याबाबत |TAIT PRIKSHA KENDRA ANI ITAR MAHITI
परीक्षा दिनांक आपले केंद्रावर ती आहे आणि त्यात जर काही बदल असतील तर आपल्याला मोबाईल वरती त्या संदर्भात ते बदल तात्काळ कळवले जातील यासाठी आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक द्यावा.
TAIT परीक्षेसाठी मूळ कागदपत्रे सादर करणेबाबत | TAIT EXAM DOCUMENTS VERIFAICAT ION
परीक्षेसाठी आपण सर्व माहिती व्यवस्थित भरावयाची आहे. ऑनलाइन आवेदन पत्र सादर करत असताना कुठलीही मूळ प्रमाणपत्र आपल्याला सादर करावयाचे नाही. परंतु सदर परीक्षा पास झाल्यानंतर नोकरीच्या वेळी आपण दिलेली माहिती आणि आपल्याकडे असलेली कागदपत्रे यामध्ये तफावत असल्यास आपली उमेदवारी रद्द केली जाऊ शकते अशी फक्त टाकीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेले आहे.
अशा पद्धतीने महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे उपायुक्त संजय कुमार राठोड महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी स्टेट परीक्षेच्या परीक्षा संदर्भात सर्व माहिती सविस्तर दिलेले आहे.
शिक्षक योगिता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 ऑनलाइन अर्ज माहिती परिपत्रक आदेश PDF | TAIT exam 2022 online application CIRCULAR PDF
आपल्याला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात थेट परीक्षा 2022 याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या आदेशाची पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटणावर क्लिक करा.
FAQ
1.TAIT परीक्षा 2023 साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार आहे?
31 जानेवारी 2023
2.TAIT परीक्षा 2023 कधी होणार आहे?
22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 या कालावधीत
3. TAIT परीक्षेच्या आधी सूचना कोणत्या संकेतस्थळावर येते येते?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या संकेतस्थळावर
आमचे हे लेख वाचा
जागतिक साक्षरता दिन मराठी माहिती निबंध
नवे शैक्षणिक धोरण संपूर्ण माहिती