Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2023 24 प्रक्रिया अटी नियम पात्रता अर्ज करण्याची पद्धत महत्त्वाची कागदपत्रे वयोमर्यादा |Maharashtra RTE Admission 2023 24 Procedure Terms Rules Eligibility Apply Method Important documents

महाराष्ट्र rte प्रवेश 2023 24 अटी नियम पात्रता अर्ज करण्याची पद्धत महत्वाची कागदपत्रे वयोमर्यादा |Maharashtra RTE Admission 2023 24 Procedure Terms Rules Eligibility Apply Method age criteria | महाराष्ट्र rte प्रवेश 2023 24 अटी नियम पात्रता अर्ज करण्याची पद्धत

Rte act अर्थात right to eduction त्यालाच आपण शिक्षणाचा हक्क म्हणतो. 2009 मधे भारत सरकारने बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार बहाल केला. या कायद्याची अंमलबजावणी 2010 पासून झाली. rte अर्थात शिक्षणाच्या हक्कामुळे बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला सुरूवात झाली. भारतात आनंददायी शिक्षण ही संकल्पना नव्याने आकारास येऊ लागली. शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाहीत. याच दृष्टिकोनातून सरकारी शाळांमध्ये तर मुलांना 6 ते 14 वयोगटातील शिक्षण मोफत मिळेल. परंतु त्या बदल्यात जोडीला अगदी खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा मग त्या एसएससी बोर्डाच्या असो की सीबीएससी बोर्डाच्या अशा सर्व शाळांमध्ये एकूण जागेच्या पंचवीस टक्के जागांवरती आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून मागासलेल्या लोकांसाठी मोफत शिक्षणाची सुविधा पुरवली जाते. महाराष्ट्र राज्यामध्ये देखील शिक्षणाच्या हक्काचा एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे खाजगी संस्थांमध्ये पंचवीस टक्के जागा या वंचित वर्गासाठी ठेवल्या जातात आणि त्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्जांच्या माध्यमातून ही rte ची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पार पडली जाते.

महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2023 24 प्रक्रिया अटी नियम पात्रता अर्ज करण्याची पद्धत महत्त्वाची कागदपत्रे वयोमर्यादा
महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2023 24 प्रक्रिया अटी नियम पात्रता अर्ज करण्याची पद्धत महत्त्वाची कागदपत्रे वयोमर्यादा

Rte प्रवेश 2023 24संपूर्ण माहिती (toc)


महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2023 24 |Maharashtra RTE Admission 2023 24

Rte admission 2023 24 म्हणजेच आरटीई (rte)प्रवेश प्रक्रिया 2023 24 ला आता  सुरुवात झाली आहे.सध्या शालेय नोंदणी झाल्यानंतर ऑनलाइन प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल.थोड्याच दिवसांमध्ये  rte admisson  2023 24 ला सुरुवात होणार आहे. सध्या rte प्रवेशासाठी शाळा स्तरावरून प्रत्येक शाळेने आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जागांचा तपशील seat details संकेतस्थळावर देणे बंधनकारक आहे. ज्या शाळा आर टी ई प्रवेशासाठी सहकार्य करणार नाहीत.अशा शाळांवर कारवाई देखील होऊ शकते. आणण्याचा मुद्दा हा की rte प्रवेश प्रक्रिया 2023 24 ला सुरुवात झालेली आहे. परंतु अजून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. साधारणपणे पहिल्या टप्प्यात शाळांची नोंदणी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आर टी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाऊ शकते.


Rte प्रवेश प्रक्रिया 2023 24 | Rte Admission Procedure 2023 24

Rte प्रवेश प्रक्रिया 2023 24 आपल्या लक्षात आले असेल की ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू असते. आर टीई प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला सहभागी होण्यासाठी आर टी प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी करावी लागते. Maharashtra gov .in he अधिकृत संकेत स्थळ आहे.


Rte प्रवेशासाठी पात्रता | Eligibility for admission to Rte | rte प्रवेशासाठी या अटींची पूर्तता करा.

rte  प्रवेशासाठी कोण पात्र आहे ? किंवा आर टी ए ऍडमिशन 2023 24 साठी कोण अर्ज करू शकते? तर यासाठी ज्या मुलांचे वय साडेचार वर्षापेक्षा जास्त आणि साडेसात वर्षापेक्षा कमी आहे ( ४.५वर्षे ते ७.५वर्षे) योगातील आर्थिक आणि सामाजिक गटातील यालाच आपण वंचित गटातील मुले मुली म्हणतो ते अर्ज करू शकतात. 


Rte ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ | rte admisson 2023 24 website 

Rte प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक संकेतस्थळ अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले आहे त्या Rte संकेतस्थळ ला भेट द्या व आपला अर्ज भरा.


Rte admission 2023 24 अर्ज करण्याची पद्धत | Rte admission 2023 24 Application Method 

आपल्याला आरती अंतर्गत प्रवेश घ्यायचा असेल तर rte admission 2023 24 साठी आपल्याला विहित वेळेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

Rte प्रवेश 2023 24 मध्ये आपल्याला जर rte प्रवेशासाठी साठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी अर्ज करण्याची पद्धती केवळ ऑनलाइन आहे. त्यासाठी आपल्याला  दिलेल्या  maharashtra gov.in या शासनमान्य संकेतस्थळावर लॉगिन करावे लागेल. लॉग इन करत असताना आपल्याला आपला मोबाईल नंबर ई मेल आयडी या बाबी सोबत ठेवणे गरजेचे आहे. ऑनलाइन पद्धतीने आपल्याला उमेदवाराचा सर्व वैयक्तिक तपशील त्या ठिकाणी अचूकपणे भरावा लागेल. आपल्याकडे असलेले उपलब्ध पुरावे म्हणजेच कागदपत्रे यासंदर्भात देखील आपल्याला हमीपत्र भरून द्यावे लागेल. प्रवेशाच्या वेळी सर्व कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी सादर करवी लागतील.

Rte ऑनलाइन अर्ज कसा करावा मार्गदर्शिका | rte online application booklet in marathi | rte parents booklet marathi

आरती पंचवीस टक्के आरक्षणाच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपण rte online Rte प्रवेश अर्ज कसा भरावा यासाठी आरटीओ ऑनलाईन अर्ज कसा करावा याची एक मार्गदर्शक पुस्तिका म्हणजेच बुकलेट दिलेल्या आहे. ते booklet पाहण्यासाठी डाउनलोड बटनावर क्लिक करा. ही rte ची मार्गदर्शक पुस्तिका पाहिल्यानंतर आपल्यालाकोणत्याही प्रकारच्या शंका राहणार नाहीत.

Rte admisson marathi booklet pdf 

Download 


Rte 2023 24 च्या प्रवेशासाठी महत्वाची कागदपत्रे | Important documents for admission to Rte 2023 24

Rte प्रवेश 2023 24 साठी आपण जर ऑनलाइन अर्ज सादर करणार असाल तर आर टी प्रवेशासाठी महत्त्वाची कागदपत्रे कोणती आहेत हे माहीत असणे आपल्याला गरजेचे आहे. कागदपत्राच्या माहितीसाठी आम्ही स्वतंत्र असा लेख लिहिलेला आहे. तो आपण पाहू शकता. खाली देत असलेल्या यादीतील सर्व कागदपत्रे आपल्या जवळ असणे गरजेचे आहे.

1.बालकाचा जन्म दाखला |birth certificate 

त्याच्या वेळी बालकाच्या जन्म प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला मूळ पुरत आपल्याला दाखवावे लागते.

2. बालकाचे आधारकार्ड| aadhar card 

उमेदवाराला प्रवेश मिळाला आहे त्या उमेदवाराचे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे.

3.सामाजिक आरक्षण 

लाभ हवा तर जातीचा दाखला विद्यार्थी अथवा पालक यांचा आरक्षित संवर्ग असेल तर आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्याची अट नाही. यापूर्वी मात्र तशी ती होती

4. आर्थिक दृष्ट्या दुर्बल

आपण जर  आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्यास 1 लाखाच्यात उत्पन्न असलेला दाखला जोडावा लागतो.

5. घटस्फोटीत माता Relevant certificate in case of divorced mother

 घटस्फोटीत महिलेला आपल्या पाल्याचा प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी घटस्फोटाची सर्व कागदपत्रे आणि उत्पन्नाचा दाखला हवा.

6. अपंगत्वाचे प्रमाणपत्र|handicapped certificate 

बालक अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र किंवा दाखला  असणे गरजेचे आहे.

7.  रहिवास पुरावे |Proof of residency

सर्वात महत्वाचे म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी असलेले रहिवास पुरावे सोबत जोडावे लागतात.रहिवास पुराव्यामध्ये आधार कार्ड बँकेचे पासबुक गॅस चे पुस्तक जर आपण भाड्याने राहत असाल तर भाडेपट्टा करार घरपट्टी विद्युत देयक पाणीपट्टी या कागदपत्रांपैकी कोणतेही कागदपत्र आपल्या जवळ असणे आवश्यक आहे.

8. विद्यार्थ्यांचा फोटो |Photo of students 

मुख्य प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांचा फोटो आपल्याला आरटीई प्रवेशासाठी जोडावा लागतो.

अशी सर्व कागदपत्रे आपल्याला आरटी प्रवेश 2023 24 घेत असताना ठेवणे गरजेचे आहे.

Rte प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाने कागदपत्रात संदर्भात दिलेली पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

Rte 2023 प्रवेशासाठी महत्त्वाची कागदपत्रे pdf | Rte 2023 admission important documents pdf

DOWNLAOD 


Rte प्रवेश 2023 24 वयाच्या अटी | आरटी प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी वयोमर्यादा 

आर टी प्रवेशनासाठी मागील काही वर्षांपासून असलेल्या वयोमर्यादा यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आता नव्याने ज्या वयोमर्यादा देण्यात आलेले आहेत त्या वयोमर्यादा लक्षात घेऊन आपण पार्टीसाठी अर्ज दाखल करावा.

१. इयत्ता पहिलीसाठी आर टी प्रवेशाची वयोमर्यादा | rte first 1st standards age limit 

इयत्ता पहिली मध्ये आपल्याला आरती अंतर्गत प्रवेश घ्यायचा असेल तर 31 डिसेंबर 2023 पर्यंत बालकाचे वय सात वर्ष पाच महिने तीस दिवस इतके असावे.

2. सिनियर केजी अर्थात मोठा गट | rte limit for senior kg 

आपल्याला आरटीई अंतर्गत सीनियर केजी मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर बालकाचे सहा वर्ष पाच महिने 30 दिवस एवढे वैद्याने पूर्ण केलेल्या असावे.

3. ज्युनिअर केजी rte प्रवेश वयाची |junior kg rte admission 

ज्युनिअर केजी साठी प्रवेश घ्यायचा असेल तर पाच वर्ष पाच महिने तीस दिवस

4. प्ले ग्रुप अर्थात नर्सरी | play group rte age criteria 

प्ले ग्रुप मध्ये सर्वात लहान गट या लहान गटामध्ये प्रवेश घेण्यासाठी चार वर्ष पाच महिने तीस दिवस अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 

Rte वयोमर्यादा शासन निर्णय नवीन परिपत्रक pdf| rte age criteria government gr,shashan nirnay 

शासनाने वरील इयत्तांसाठी जी वयोमर्यादा निश्चित केली त्याच्या निर्णयाची पीडीएफ पाण्यासाठी क्लिक करा.

Rte प्रवेश वया संदर्भात आदेश pdf  

DOWNLOAD  


Rte प्रवेश प्रक्रिया 2023 24 दिनांक | Rte admission process 2023 24 

Rte प्रवेश प्रक्रिया 2023 24 मध्ये वेळापत्रक कसे असेल याविषयी सविस्तर माहितीसाठी क्लिक करा.


RTE संपूर्ण प्रवेश प्रक्रिया तपशील| rte admission sheduled 2023 24 

आपल्याला वर दिलेल्या माहितीतून शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये आर टी अंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रिया संदर्भात संपूर्ण कल्पना आलेली असेल. सध्या शाळांची नोंदणी  https://www.dnyanyogi.com/2023/01/2023-24-rte-admission-process-time.html  या संकेत स्थळावर सुरू आहे .शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष आर टी प्रवेशासाठी अर्ज भरले जातील.

Rte प्रवेशासाठी अटी व नियम |Terms and Conditions for Entry Rte | rte admission term and condition | rte praveshachya ati 

आरती प्रवेश २०२३२४ घेण्यासाठी आपल्याला कोणत्या अटींची पूर्तता करावी लागेल? प्रश्न आपल्याला पडलेला असेल तर खालील अटी पूर्ण केल्यानंतर आपण rte प्रवेशासाठी पात्र होऊ शकता.

१. आपल्याला ज्या इयत्तेमध्ये प्रवेश घ्यायचा इयत्तेसाठी साठी असणारी वयोमर्यादा आपण पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे.

2. आपण महाराष्ट्र आरटीई प्रक्रिया 2023 24 मध्ये सहभागी होणारा असाल तर आपण महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे. तसे रहिवासाबाबतचे पुरावे आपल्याजवळ असावे लागतील तरच आपण अर्ज करू शकता.

3. आपण सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या असाल आणि आपल्याकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून प्राप्त जातीचे प्रमाणपत्र असेल तर आपण प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र होऊ शकतात.

4. आपण खुल्या गटातील असाल तथा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर आपली उत्पन्नाचे मर्यादा एक लाखाच्या आत हवी तरच आपण आर टी प्रवेश २०२३२४ साठी प्राप्त होऊ शकता.

rte 25% प्रवेशाची लॉटरी पद्धत |rte admission lotry system in marathi

आपण पाहिले की बालकाला मोफत आणि सक्तीचे शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर खाजगी व्यवस्थापनाच्या कोणत्याही मीडियम आणि बोर्डाच्या शाळेमध्ये त्या बालकाला प्रवेश घेता येईल. मात्र तो प्रवेश घेत असताना 25% जागा राखीव ठेवल्या जातील. कोणत्या उमेदवाराला प्रवेश द्यायचा यासाठी अर्ज भरून घेतल्यानंतर लॉटरी पद्धतीने शाळा निश्चित केल्या जातात. ही लॉटरी पद्धत अतिशय पारदर्शक पद्धतीने राबवली जाते. आरटीओ ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले विद्यार्थी पालक यांच्यासमोर हा लकी ड्रॉ काढला जातो. ज्या विद्यार्थ्यांना या लॉटरी प्रक्रियेतून तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश प्राप्त होतो त्यांना मुख्य प्रवेशाच्या वेळी मात्र सर्व मुख्य कागदपत्रे सादर करावे लागतात. जर एखादे कागदपत्र सादर केले नाही किंवा दिलेली माहिती खोट्या स्वरूपाची आहे असे आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर प्रवेश नाकारण्याचा आणि रद्द करण्याचा अधिकार शासनाने आपल्याकडे ठेवलेला आहे.शासन असं जरी लॉटरी पद्धती राबवत असले तरी प्रवेशाच्या जागा आणि येणारी अर्ज यांचा विचार करता अनेकांना हा शिक्षण हक्क कायदा आणि मोफत प्रवेश याबाबत माहिती नाही. शासन वारंवार वर्तमानपत्रातून , विविध उपक्रमातून या प्रवेश प्रक्रियेला प्रसिद्धी देत असते. परंतु तितक्याशा प्रमाणात जाणीव जागृती झाली दिसत नाही.

या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्र आरटी प्रवेश 2023 24 प्रक्रिया यासाठी असणाऱ्या अटी नियम तसेच पात्रता व rte प्रवेशासाठी अर्ज करण्याची पद्धत,वयोमर्यादा यांची आपल्याला नक्कीच माहिती मिळाली असेल. आपल्याला जर rte प्रवेश प्रक्रिया 2023 24 या संदर्भात काही शंका असतील तर कमेंट करा. आम्ही आपल्या सर्व शंका निवारण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.

आमचे हे  लेख वाचा 

बालकाला समजून घेताना  

कोरोना काळातील शाळेचे आत्मकथन 

भारताचे नवे शैक्षणिक धोरण २०२० 

शेअर मार्केट मूलभूत माहिती काही संकल्पना  

वाक्प्रचार 

अध्यात्म व मानवी जीवन 

दहावी नंतर पुढे काय ? 











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area