आरटीई प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 2023 24 (अंदाजे) | rte admission process time table 2023 24 (andaje)
6 ते 14 वयोगटातील बालकाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणारा 2009 चा अधिनियम आला.या अधिनियमाने बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार मिळाला. 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या मोफत सुविधा उपलब्ध करून देणे.ही सरकारची जबाबदारी आहे. असा हा कायदाच करण्यात आला.या कायद्यालाच आपण शिक्षण हक्क कायदा तर इंग्रजीमध्ये यालाच RTE ACT 2009 म्हणून ओळखला जातो. शिक्षण हक्क कायद्यामुळे बालकांना आनंददायी शिक्षण मिळू लागले.एवढेच नव्हे तर जे लोक सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या घटकातील आहेत.त्यांना अगदी खाजगी संस्थांमध्ये देखील 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जाऊ लागल्या. म्हणूनच आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण आज आरटीई प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 2023 24 अंदाजे कशा पद्धतीचे असू शकेल? या विषयी माहिती पाहणार आहोत. आपल्याला rte admission process time table 2023 24 andaje. गेल्या वर्षी झालेल्या आरटीई प्रवेशाच्या वेळापत्रकाचा बारकाव्याने अभ्यास केल्यानंतर नक्कीच आपल्याला काही अंदाज बांधता येतो.याचा आधार घेऊन हे अंदाजे वेळापत्रक देत आहोत.
आरटीई प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 2023 24 अंदाजित |
Rte admission 2023 24 time table (toc)
आरटीई प्रवेश अर्ज 2023 24 भरण्याच्या तारखा (अंदाजे) | RTE admission form fill date 2023 24 (संभाव्य)
आपण जर आपल्या पाल्याचे आरटीई मधून प्रवेश निश्चित करणार असाल तर आपण आम्ही देत असलेली माहिती मनापासून वाचा आणि त्या तारखा दरम्यान अवश्य आरटीई प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावरती लॉगिन करावे लागेल.
Rte प्रवेश संपूर्ण माहिती अटी पात्रता वयोमर्यादा
RTE प्रवेशासाठी ही कागदपत्रे हवीतच
आर टी प्रवेश प्रक्रिया संकेतस्थळ महाराष्ट्र | rte admission website Maharastra
आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार बालकाचा मोफत प्रवेश इयत्ता पहिलीसाठी निश्चित करावयाचा असेल तर आपण अधिकृतपणे आरटीई प्रवेशासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex या संकेतस्थळावर भेट देऊन सर्व माहिती व्यवस्थित रित्या घेऊन आर टीई प्रवेश 2023 24 साठी अर्ज करावेत.rte प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.RTE प्रवेश अधिकृत संकेतस्थळ अर्थात student.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपण प्रवेश प्रक्रिये संदर्भात योग्य कार्यवाही केल्यास व विहित वेळेत केल्यास आरटीई प्रवेश प्रक्रिया 2023 24 आपल्याला किचकट न वाटता ती अतिशय सोपी वाटेल.
आरटीई प्रवेश 2023 24 संभाव्य वेळापत्रक | rte admission sambhavya vrlaptrak 2023 24
आर टी प्रवेश प्रक्रिया 2023 24 साठी आपण जर अर्ज करणार असाल तर साधारणपणे मार्च महिन्याच्या अगदी सुरुवातीला म्हणजेच पहिल्या आठवड्यामध्ये या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते असा आमचा अंदाज आहे.
आरटीई प्रवेश नोंदणी 2023 24 संभाव्य|rte admission registration 2023 24 andaje
आपल्याला आरटीई प्रवेश प्रक्रियेनुसार खाजगी शिक्षण संस्थांमध्ये देखील एकूण उपलब्ध असणाऱ्या जागांपैकी सामाजिक आणि आर्थिक आरक्षणाच्या निकषांवर 25% जागांवरती मोफत प्रवेश दिले जातात. या मोफत प्रवेशासाठी आपल्याला आरटीई प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवाराची नोंदणी करावी लागते.
Rte प्रवेश नोंदणी कशी होते ?| Rte prvesachi nondni Kashi hote?
Rte प्रवेश अर्ज ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होत असते. शैक्षणिक वर्ष 2023 24 इयत्ता पहिलीच्या आरटीई प्रवेशासाठी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आर टी ई चे फॉर्म भरायला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. Rte प्रवेशाचा ऑनलाइन फॉर्म आपण भरला नि आपला प्रवेश निश्चित झाला असे नाही. आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यानंतरच आपण भरलेला अर्ज बरोबर असेल व आवश्यक असणाऱ्या सर्व अटींची पूर्तता केलेली असेल तर उपलब्ध जागा आणि आरटीई प्रवेशासाठी आलेले अर्ज यांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते.
आरटीई प्रवेशासाठी लॉगिन करताना आवश्यक बाबी | rte online aaplication 2023 24
आरती प्रवेश प्रक्रिया 2023 24 मध्ये सहभागी होण्यासाठी जर आपण ऑनलाइन अर्ज करणार असाल तर तो अर्ज करण्यासाठी उमेदवाराने सर्वप्रथम वैध भ्रमणध्वनी क्रमांक टाकून म्हणजेच बरोबर मोबाईल नंबर तसेच आपल्याकडे उपलब्ध असलेला वैध ई-मेल आयडी टाकून आर टी प्रवेश 2023 24 साठी आपली नोंदणी करावी. आपली नोंदणी केल्यानंतर संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरावा. हा अर्ज कसा भरावा? यासाठी स्वतंत्र असा लेख आपल्यासाठी प्रकाशित केला जाईल. भरलेले भरलेले अर्जाची प्रिंट मात्र आपल्याजवळ काढून ठेवावी. आवश्यक कागदपत्रे uplod करा. आरटीई प्रवेश अर्ज भरल्यानंतर त्यासाठी लागणारी फी online भरा. व त्याची पावती देखील जवळ ठेवा.
आरटीई प्रवेश महाराष्ट्र 2023 24 संभाव्य वेळापत्रक अंदाजे|rte admission 2023 24 provisional time table sambhavya
1. आरटीई प्रवेश 2023 24 अर्ज भरण्याची अंदाजे मुदत | rte admission online application fill up date andaje
१ मार्च ते 2023 ते 15 मार्च 2023 (अंदाजे )
2. आरटीई प्रवेश सोडत 2023 24| rte admission maharashtra lottery declaration andaje
पंधरा ते वीस मार्च पर्यंत अर्ज भरण्यासाठी अंदाजे कालावधी दिला जाऊ शकतो.त्यानंतर साधारणपणे आठवड्याभरानंतर म्हणजेच मार्च अखेरीस किंवा १एप्रिलच्या दरम्यान आरटीई प्रवेश सोडत म्हणजेच लॉटरी जाहीर केली जाऊ शकते.
3. Rte प्रवेश निश्चित करणे |asmission confirmation ( andaje)
सोडतीनंतर साधारणपणे एका आठवड्याच्या म्हणजेच पाच ते सहा एप्रिल च्या दरम्यान आरती प्रवेश प्रक्रिया दरम्यान प्रवेश भेटलेला आहे त्यांनी आपला प्रवेश आवश्यक ती कागदपत्रे आणि त्याची पुनर् तपासणी करून प्रवेश निश्चित करावा.
4.rte प्रवेश महाराष्ट्र 2023 24 प्रतीक्षा याद्या | rte admission wating list
पहिल्या प्रवेश फेरीनंतर प्रवेश फेरीचे आयोजन केले जाते. अशा साधारणपणे चार प्रतीक्षा यादी किंवा प्रवेशाच्या फेरी मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण केल्या जातील. असा आमचा अंदाज आहे.(हे संभाव्य वेळापत्रक देत असताना मागील वर्षाचे म्हणजेच 2022 23 आरटी प्रवेश प्रक्रिया यांच्या तारखांचा काही एक संदर्भ घेऊन आम्ही आपणाला संभाव्य माहिती देत आहोत)
आरटीई प्रवेश प्रक्रियेची प्रक्रिया ज्यावेळी महाराष्ट्र शासनाकडून जाहीर केली जाईल त्यावेळी मात्र याबाबतची सविस्तर माहिती आम्ही आपणाला पुरवू. या लेखाच्या माध्यमातून आम्ही केवळ 2023 24 आरटीई प्रवेश प्रक्रिया संभाव्य वेळापत्रक आपल्यापुढे मांडले. आपणासमोर अद्ययावत अशी माहिती आम्ही नक्की पुरवू.यासाठी आमच्या wtp ग्रुपला नक्की जॉईन व्हा. आम्ही आपणास आवश्यक ती सर्व माहिती पुरवू.
आमचे हे लेख वाचा