मकर संक्रांती उखाणे 2023 |makar sankranti ukhane 2023 | मकर संक्रांतीचे उखाणे |sankranti special marathi ukhane
नवीन वर्षाचे कॅलेंडर,दिनदर्शिका वर्षातील सुट्ट्या उघडतात वर्षाच्या सुरुवातीचा पहिला मोठा सण म्हणून ज्या सणाचा मान आहे. तो सण म्हणजे 14 जानेवारी. या मकर संक्रांतीच्या दिवशी लोक एकमेकांना तिळगुळ देतात. एकमेकांमध्ये आपला स्नेह वृद्धिंगत होण्यासाठी एकमेकांकडून गोड गोड बोलण्याची अपेक्षा व्यक्त करतात. मनातील सर्व कटुता सोडून आपण आनंदाने राहूया. अशी एक प्रकारे अप्रत्यक्ष वचने या संक्रांतीच्या शुभेच्छातून दिली जातात. म्हणून हा सण सर्वांनाच आवडतो. आज आपण मकर संक्रांती उखाणे 2023 म्हणजे संक्रांतीचे अगदी नवनवीन उखाणे पाहूया.
मकर संक्रांती उखाणे 2023 |
मकर संक्रांत उखाणे (toc)
मकर संक्रांती सण साजरा करण्याची पद्धत | makar sankranti Kashi krtat sajari
मकर संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांना पतंग उडवतात, अनेक ठिकाणी पुरुष मंडळी या दिवशी वेगवेगळे खेळ खेळतात, महिलांसाठी मकर संक्रांति म्हणजे पर्वणीच असते. मकर संक्रांतीला महिला छान नटत असतात. महिला रंगीबिरंगी साड्या घालतात.मात्र काही ठिकाणी विशेष करून महाराष्ट्रातील स्त्रिया अलीकडे काळया रंगाच्या साड्या परिधान करतात. हे विशेष.
संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया आपल्या शेतीतून जे अन्नधान्य मिळते(हरभरा,लोंब्या,गाजर,ऊस, तीळ,शेंगा) ते वाणाच्या रूपाने त्याची पूजा करतात. देवाकडे सौभाग्याचे रक्षण व्हावे यासाठी भगवंताकडे मागणी करतात.संक्रांतीला घरामध्ये हळदी कुंकवाचे कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांमध्ये सर्वात मजेशीर बाब म्हणजे हळदी कुंकू उखाणे होय. मकर संक्रांतीच्या दिवशी महिला एकमेकींना उखाणे घ्यायला सांगतात.
@ मकर संक्रांती लाजवाब शुभेच्छा संग्रह
उखाणे म्हणजे काय |ukhane mhanje kay| what is meaning of ukhane
अलीकडील तरुण पोरा पोरींना आपल्या संस्कृतीतील बऱ्याच बाबी माहीत नसतात. त्यांना ते समजावे आणि थोडा मोठ्यांनी समजावून देखील सांगावे. तरच ते त्यांना समजेल. उखाना म्हणजे एक प्रकारे यमक साधून शब्दांची केलेली रचना. ज्या रचनेच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या मनातील भावना व्यक्त करत असते. मकर संक्रांतीच्या दिवशी महिला आपल्या पतीविषयी ,सासर व माहेर या विषयी तसेच मैत्रिणीं विषयी उखाणे घेत असतात. एक प्रकारे याला आजच्या भाषेत चारोळ्या म्हटले तरी चालेल.पण त्या चारच ओळी असतात असे नाही दोन ओळींचे देखील उखाणे असतात. उखाणे का घेतले जातात तर....
@ मकर संक्रांतीला पतंग का उडवतात
उखाणे म्हणजे व्यक्त होण्याची संधी | ukhane manatil bhavna vyakt krnyache sadhan
आपण जर अनेक वर्षे मागे गेलो तर भारतामध्ये पुरुषप्रधान संस्कृती होती. महिलांना मुक्तपणे बोलण्याच्या संधी कमी भेटत होत्या. सासुरवाशीन महिलेला जर आपल्या मनातील खेद, आनंद व दुःख सार्वजनिक करायचा असेल किंवा अप्रत्यक्षरीत्या सांगायचं असेल तर तिला या उखाण्यांची खूप मदत व्हायची. घरातील नणंद, जाऊ, सासू-सासरे ,पती हे कसे आहेत ? याविषयी व्यक्त होण्याची संधी म्हणजे उखाणे. अशा अंगाने उखाण्यांकडे आपण बघितले की लक्षात येते हे उखाणे काहीतरी सुचवत असतात.आपल्या व्यवस्थेने एकप्रकारे महिलांना दिलेली आगळी वेगळी अभिव्यक्ती म्हणजे उखाणे होय.
#प्रजासत्ताक दिन माहिती व निबंध
उखाणे म्हणजे स्त्री कविता | ukhane mahilachya manaril kavita poem
या उखण्यांकडे आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहण्यासाठी आपल्याला हे उखाणे म्हणजे छोट्या छोट्या स्त्री कविता आहेत.उखण्यातून आपल्याला स्त्रीवादी साहित्य म्हणून याची दखल घेता येईल.
या सर्व बाबी उखाण्यांचा इतिहास पार्श्वभूमी सांगणारे आहेत. आजचा आपला मुख्य विषय आहे तो म्हणजे मकर संक्रांति उखाणे 2023. आम्ही आपणासाठी देत असलेले मकर संक्रांति अप्रतिम मराठी उखाणे आपल्याला नक्की आवडतील. चला तर मग makar sankranti ukhane 2023 पाहूया.
मकर संक्रांती उखाणे 2023 |makar sankranti marathi ukhane 2023 |उखाण्यांची संक्रांत | मकर संक्रांतीचे उखाणे | मकर संक्रातीसाठी मराठी उखाणे
म कर संक्रांतीचे उखाणे आपल्याला कोणत्या विषयावरती हवेत. यानुसार काही वर्गीकरण केलेले आहे. पतीचे महत्व सांगणारे उखाणे, सासू सासरे यांच्या विषयी उखाणे, मकर संक्रांति खास उखाणे. नवरा बायको मकर संक्रांती विनोदी उखाणे अशा रीतीने देत आहोत.
मकर संक्रांतीला पतीसाठी घ्यावयाचे उखाणे | मकर संक्रांती नवरा /नवरोबा साठी खास उखाणे | makar sankranti husband releted ukhane navryasathi sankratila ghyavyache ukhane | पत्नीसाठी संक्रांती उखाणे
हिमालयाच्या पर्वतावर पसरल्या असतील बर्फांच्या राशी,
..... रावांचे नाव घेते आजच्या गोड मकर संक्रांतीच्या, दिवशी.
मकर संक्रांतीच्या दिवशी हातावर ठेवते तिळगुळ,
....... गावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांतीचे मूळ.
आज घातलाय मी सोन्याचा साज ,
...... पती देवांचे नाव घेते मकर संक्रात आहे आज.
उसाची कांडी लागते गोड,
माझ्या आयुष्याला मिळाली ....
रावांची जोड.
प्रजासत्ताक दिन/प्रभात फेरीसाठी अप्रतिम घोषणा pdf सह
आजच्या दिवशी घरी जमले सर्व पै पाहुणे ,
...... रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांच्या आग्रहाने.
हातातील बांगड्यांना चमक आहे आज,
......रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज .
गळ्यात आहे मंगळसूत्र व डोरले,
....रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले.
मकर संक्रांती फक्त दहा ओळींचे भाषण
गुलाबाचे फुल,
दिसतेय कसे गोड ,
....... रावांना नाही कुणाची तोड.
माझी संक्रांत जावी गोड.
धर्म पती व्रतेचा नम्रतेने वागते ,
..... रावांचे नाव घेऊन,
पै पाहुणे यांचा संक्रांती दिनी आशीर्वाद मागते.
मंगळसुत्राला आहेत दोन वाटी,
एक आहे सासर आणि एक आहे माहेर ,
....... रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.
आज संक्रांती ते गेलेत बाहेर
नववधू पहिली संक्रांती उखाणे | नव्या नवरीसाठी संक्रांतीचे उखाणे | nav vadhu makar sankranti special ukhane | sasar maher sathi ukhane
जानेवारी येताच संक्रांतीची
मनाला लागली चाहूल,
...... रावांनी माझ्या संक्रांतीला
जीवनात टाकले पाऊल.
आज आहे माझी पहिली संक्रांत,
..... रावांचे नाव घेते नि टाकते कुंकु भांगात.
आज आहे मकर संक्रांत,
झाली .... रावांच्या संगे,
नव्या संसाराला सुरुवात.
नको मकर संक्रांतीला,
जुनी पुरान बात,
..... रावांचा माझ्या हातात हात.
भरून आणते लाडवाचे ताठ,
मकर संक्रात आहे करू ,
आज मोठा थाट.
मकर संक्रांती हळदी कुंकू उखाणे 2023 | haldi kunku ukhane | haldi kunku navin ukhane 2023
वेळेचे कालचक्र दिवसेंदिवस,
..... रावांचे नाव घेते,
आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.
हिरवी साडी तिला पिवळा काठ आहे जरतारी,
...... रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी,
आज आहे हळदी कुंकू,
सर्वांचा मान राखून.
पहिल्याच भेटीत पसंद केली मला,
..... राव म्हणतात हीच आमची सौंदर्य कला.
सासू सासरे माहेरची मंडळी यांच्यासाठी संक्रांतीचे उखाणे| sasar ani maher yanche mhattv sanganrr ukhane
माझे सासर म्हंजे आहे जणू गोकुळ,
सासू - सासरे सारेच आहेत हौशी,
...... रावांचे नाव घेते,
मकर संक्रांती दिवशी.
कपाळावरील कुंकू म्हणजे
जिवित्वाचा ठसा,
...... रावांचे नाव घेते सासूबाई
आता जेवायला बसा,
मामांजी आता तुम्ही जरा हसा.
गरगर फिरतो भवरा,
सासुबाई जरा तोंड आवरा,
सण आहे मकर संक्रांतीचा,
पाढा नको किरकिरीचा .
..... राव बैलाला लावा कासरा,
खडूस आहे माझा सासरा,
पण त्यांचाच आहे घराला आसरा
सर्व काही विसरा .
कारण आज आहे सण संक्रांती ,
गोड गोड बोला.
जन्म दिला माता पित्याने,
.... रावांचे नाव घेते,
आपल्या अगत्याने .
शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराला पायबंद घालणारा POCSO कायदा संपूर्ण माहिती
संसार करता पडली खून,
...... रावांचे नाव घेते
..... घराण्याची मी आहे सून.
मंगळसूत्रात काळे मणी जोडले,
..... रावांसाठी मी आई वडील सोडले.
संक्रांतीला गोड नाते या घराशी जोडले.
इंग्रजीत सूर्याला म्हणतात सन,
नि चद्राला म्हणतात मून,
सासुबाई आता
I am पहिल्यांदा
संक्रांतीला come in.
@प्रजासत्ताक दिन अप्रतिम रांगोळी संग्रह
मकर संक्रांती नवर बायको भांडणाचे उखाणे | makar sankranti funny ukhane | pati ani patni funny ani comedy ukhane
वय झाले चाळीस ,
डोक्यावर पडले टककल,
.... राव कधी येईल आपल्याला अक्कल.
मकर संक्रांती विनोदी उखाणे | makr sankranti comedi ukhane | makar sankranti hasvnaare ukhane
....... स्वताला समजतेस शाहणी,
पण आहे मोठा झिरो,
मी आहे तुझा हिरो.
काल बाजारातून आणले सातारचे कंदी पेढे,
...... आमचे सोडून बाकी आहेत सर्व वेडे.
सर्दित देखील आमचे ...... खातात कुल्फी,
शेंबूड येतो खालती मी काढते सेल्फी.
कोकणात गेली रेल्वे,
मध्ये लागतात बोगदे,
आमचे हे लय ..... घाब्रे.
आरचीला आवडतो पर्श्या,
मला तर आवडतो बाई आमचा नर्श्या
मकर संक्रांती कॉमेडी उखाणे हसवणारे संक्रांतीचे उखाणे टोमणे
मकर संक्रांती उखाणे 2023 व्हिडिओ | makar sankranti ukhane video
अनेकांना एखादी माहिती वाचण्यापेक्षा ती ऐकायला आवडत असते. म्हणूनच ज्यांना मकर संक्रांतीचे उखाणे व्हिडिओ स्वरूपात हवे आहेत. त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओ संकलित स्वरूपात उखाणे देत आहोत नक्कीच ही आपल्याला खूप खूप आवडतील.
आमचा आमचा हा संक्रांति विशेष लेख मकर संक्रांति उखाणे 2023 आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. आपल्याकडे जर अजून काही मकर संक्रांतीचे उखाणे असतील तर नक्की कमेंट करा आम्ही त्यांचा या लेखांमध्ये समावेश करू. आजच्या लेखातील हटके मकर संक्रांति उखाणे आपल्याला नक्की आवडतील. तुला भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!
आमचे हे लेख वाचा
राजमाता जिजाऊ दहा ओळी इंग्रजी निबंध व भाषण