प्रजासत्ताक दिन मराठी माहिती 2023| republic day information in marathi |26 जानेवारी मराठी निबंध 2023|republic day essay in marathi | प्रजासत्ताक दिन मराठी निबंध 2023
प्रजासत्ताक दिन हा भारतामध्ये एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने आपल्या संविधानाची अंमलबजावणी सुरू केली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाला शाळा महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते वक्तृत्व स्पर्धा, भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून देशभक्ती रुजवण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेमध्ये वाद विवाद स्पर्धेमध्ये 26 जानेवारी तथा प्रजासत्ताक दिना विषयी माहिती सखोल पणे मिळावी. तसेच भारतीय संविधानाची निर्मिती त्याची प्रक्रिया समजावी या दृष्टिकोनातून आज आम्ही आपल्याला प्रजासत्ताक दिन मराठी माहिती निबंध देत आहोत.republic day information in marathi 2023 ही माहिती आपल्याला आम्ही अतिशय सोप्या शब्दांमध्ये देत आहोत जेणेकरून आपल्याला सर्व संकल्पना स्पष्ट व्हाव्यात. ज्या दिवशी भारतामध्ये संविधान लागू झाले तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन तर सर्वप्रथम आपण संविधान म्हणजे काय ते थोडक्यात पाहूया.
प्रजासत्ताक दिन मराठी माहिती निबंध 2023 |
संविधान म्हणजे काय ?| What is meanning of constitution
ज्या पद्धतीने शाळा महाविद्यालयांमध्ये शाळेतील विद्यार्थ्याना एक विशिष्ट शिस्त राहावी. यासाठी शाळा भरण्याची तसेच सुटण्याची वेळ निश्चित केली जाते. थोडक्यात शाळेची काही एक नियमावलीतयार केलेली असते.अगदी त्याच पद्धतीने 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. परंतु या स्वतंत्र भारताला पुढे आपली वाटचाल योग्य दिशेने करण्यासाठी इथल्या जनतेला स्वातंत्र्याचा पुरस्कार करता येण्यासाठी ,काही एक नियम कायदे जाणून लिखित स्वरूपात बनवणे गरजेचे होते. थोडक्यात देश चालवण्याचे नियम किंवा कायदे करून ज्या ठिकाणी संग्रह स्वरूपात ठेवलेले आहेत. याला आपण भारतीय संविधान म्हणू शकतो.
प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम दहा ओळींचे मराठी भाषण
REPUBLIC DAY प्रजासत्ताक दिन दहा ओळींचे सोपे इंग्रजी भाषण
@@२६ जानेवारी अप्रतिम फलक लेखन
बालकांना खाजगी संस्थेत विनामूल्य/मोफत प्रवेश मिळवून देणारा हा कायदा आपल्याला माहिती आहे का ??
भारतीय संविधानाचे महत्व | importance of constitution in India
आज आपल्या भारत देशामध्ये असंख्य घडामोडी घडत असतात.न्यायालयीन प्रक्रिया घडत असतात.कायद्यापुढे सर्व समान हे सूत्र आपल्याला पाहायला मिळते. परंतु हे सर्व आपल्याला कशामुळे शक्य झाले? तर ते आपल्या राज्यघटनेमुळे. म्हणजेच आपल्या संविधानामुळे.
संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता व लोकशाही या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वतंत्र झालेला भारत देश स्वातंत्र्यानंतर कशा पद्धतीने मार्ग क्रमन करणार? देशाच्या स्वातंत्र्याच्या आड जर काही विघातक बाबी येत असतील किंवा व्यक्ती व्यक्ती समूह येत असतील तर त्यांना कसा अटकाव करणार ? याबाबतची सर्व माहिती भारतीय संविधानामध्ये आहे. एक प्रकारे संविधान हा लोकशाहीचा आत्मा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आजच्या लेखच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन मराठी माहिती निबंध पाहत आहोत.
@प्रजासत्ताक दिन अप्रतिम रांगोळी संग्रह
26 जानेवारी मराठी निबंध 2023 |republic day essay in marathi 2023|प्रजासत्ताक दिन मराठी निबंध |26 janevari marathi nibandh 2023
प्रजासत्ताक दिन म्हणजे काय |what is meaning of republic day in marathi
ज्या दिवशी भारतीय संविधान सर्वानुमते या स्वतंत्र भारत देशासाठी लागू करण्यात आले. तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन होय. 26 जानेवारी 1950 ला भारत देश या संविधानाशी बांधील झाला.
संविधान निर्मितीच्या अगोदरचा भारतीय राज्यकारभार |rajya ghatana nirmiti agodarcha bhartatil rajya karbhar
26 जानेवारी 1950 रोजी भारताने आपले संविधान लागू केले परंतु त्या अगोदर भारत देश नेमका कशा पद्धतीने चालत होता तर यासाठी ब्रिटिश सरकारने भारत सरकार कायदा 1935 ला अनुसरून राज्यकारभार चालत होता. परंतु भारताने स्वतंत्र अशा राज्यघटनेची निर्मिती केल्यानंतर या भारत सरका 1935 च्या कायद्याला संपुष्टात आणले.
भारताने राज्यघटनेचा स्वीकार | bhartiy rajya ghatnecha swikar
भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना म्हणजे संविधान स्वीकारले, परंतु या संविधानाला प्रत्यक्षात येण्यासाठी किंवा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तब्बल 2 वर्ष 11 महिने 8 दिवस हा कालावधी जावा लागला. यानंतर 1950 मध्ये 26 जानेवारी या दिवशी या संविधानानुसार भारतीय राष्ट्राचा कारभार सुरळीतपणे होऊ लागला.
@प्रजासत्ताक दिन अप्रतिम रांगोळी संग्रह
राज्यघटना निर्मिती आणि मसुदा समिती | masuda samiti information
भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताला स्वतंत्र राज्यघटना हवी होती आणि यासाठीच घटना समितीची स्थापना करण्यात आली. या घटना समितीमध्ये जवळजवळ 308 सदस्यांचा समावेश होता. या घटना समितीमध्ये मसुदा समितीचे प्रमुख म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नेमणूक करण्यात आली. 29 ऑगस्ट 1947 ला घटना समितीच्या नेमणुकीबाबत एक ठराव मांडण्यात आला.या ठरावा नंतर आपली राज्यघटना कायमस्वरूपी अस्तित्वात येईपर्यंत ही मसुदा समिती काम करणार होती. मसुदा समितीने तयार केलेला आपला अभ्यासपूर्ण संविधानाचा मसुदा नोव्हेंबर 1947 रोजी जी संविधान सभा भरली होती या सभेमध्ये मांडला. निर्मिती होईपर्यंत जो तब्बल तीन वर्षांचा कालावधी गेला होता यामध्ये सुधारणा करण्यासाठी बऱ्याच बैठका झाल्या. कालावधीचा पण विचार केला तर जवळजवळ 166 दिवस सार्वजनिक अधिवेशनामध्ये विधानसभेच्या बैठकी झाल्या.
भारतीय संविधानावर सदस्यांच्या सह्या | sanvidhan prtinvar saddyachya sahya
24 जानेवारी 1950 या दिवशी विधानसभेच्या 308 सदस्यांनी भारतीय राज्यघटनेच्या ज्या हिंदी आणि इंग्रजीतून दोन प्रति होत्या त्या प्रतींवरती सह्या करण्याचे काम केले. एक प्रकारे सर्व सदस्यांनी भारतीय राज्यघटनेला मान्यता दिली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या सर्व सदस्यांनी राज्यघटनेमध्ये मांडलेल्या बाबींवर चर्चा घडवून आणली. हवा असेल त्या ठिकाणी बदल देखील करण्यात आला. ही सर्व चर्चा आटोपल्यानंतर 26 जानेवारी 1950 ला मोठ्या धुमधडाका भारतीय संविधान भारतीय जनते प्रती अर्पण करून भारतीय संविधानानुसार देशाचा राज्यकारभार सुरू व्हायला सुरुवात झाली तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन होय.
भारतीय राज्यघटने संदर्भात 25 नोव्हेंबर 1949 रोजीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण | reoublic day speech in babsaheb ambedakar
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भाषणामध्ये या संविधानाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर कोणत्या बाबी प्रकर्षाने जाणवणार आहेत. याविषयी आपले मत मांडलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते , या राज्यघटनेमुळे राजकारणामध्ये एक प्रकारची समानता येईल परंतु दुसरीकडे समाजामध्ये मात्र सामाजिक आणि आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात दिसेल. हा विरोधाभास कमी होणे अतिशय गरजेचे आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक माणूस एक मत आणि एक मूल्य हे तत्व स्वीकारले. जर आपल्याला आपले संविधान बळकट करायचे असेल तर त्यासाठी समाजात असणारी विषमता कमी करावी लागेल. असे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले. पण आज देखील ही विषमता काही प्रमाणात का होईना आपल्याला दिसते यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती दूरदृष्टीचे होते याची कल्पना येते.
प्रप्रजासत्ता दिन सोहळा | republic day celebration
प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा भारताची राजधानी नवी दिल्ली या ठिकाणी अगदी दिमागदारपणे पार पडत असतो. दिल्लीतील राजपथ या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा अतिशय जल्लोष करत साजरा केला जातो.
प्रजासत्ताक दिनाची परेड |republic day pared
राजपथावर तिनही सैन्यदले आपली परेड करत असतात. एनसीसी चे विद्यार्थी देखील या ठिकाणी परेडमध्ये सहभागी होत असतात. परेडमध्ये सहभागी झालेल्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांची पंतप्रधान स्वतः चर्चा करतात. भारत देशासाठी बलिदान देणाऱ्या थोर पुरुषांना त्यांच्या कार्यांना सलाम देखील या दिवशी केला जातो. दिल्ली या ठिकाणी होणाऱ्या परेड कार्यक्रम सुमारे तीन दिवस चालत असतो. या परेडच्या माध्यमातून भारताची संरक्षणाविषयीची मजबूत मजबूत बाजू याचे प्रदर्शन केले जाते.
प्रजासत्ताक दिन आणि चित्ररथ | republic day ani chitra rath
तिन्ही सैन्य दला बरोबरच भारताची सांस्कृतिक आणि सामाजिक एकता यांचे प्रतीक असलेले विविध देखावे,चित्र रथ या परेडमध्ये सहभागी असतात. दरवर्षी या सोहळ्यामध्ये प्रत्येक राजे आपापल्या परीने आपली संस्कृती संपूर्ण भारतीयांपर्यंत तथा अवघ्या जगापर्यंत पोहोचवण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जाते. या देखाव्याना पुरस्कार देखील दिले जातात.
प्रजासत्ताक दिन संचालन| prajasattak din sanchalan pared
तिन्ही दलांच्या उपस्थितीत पार पडत असलेली परेड अतिशय लक्षवेधी असते. हेलिकॉप्टर, विमाने यांच्या साह्याने अनेक साहसी खेळ करून दाखवले जातात. विमान हेलिकॉप्टर यातून भारतीय तिरंग्यावरती पुष्पवृष्टी केली जाते. खरोखरच हा सोहळा अतिशय नयनरम्य असतो. राष्ट्रपती या परेडला भेट द्यायला आल्यानंतर आपल्या तिरंग्याला सलामी देतात.यावेळी एका तालासुरामध्ये जनगणमन हे राष्ट्रगीत वाजवले जाते. बँड च्या साह्याने हे सादर केले जाणारे राष्ट्रगीत खरोखरच अतिशय देशाभिमानजागा करणारे असते. सरते शेवटी सारे जहाँ से अच्छा या देशभक्तीपर गीताची धुन बँडच्या साह्याने वाजवली जाते. भारताच्या नागरिकांनी एकदा तरी हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आवर्जून पहावा. 26 जानेवारी या दिवशी दूरदर्शन वरून या संपूर्ण सोहळ्याचे लाईव्ह टेलिकास्ट केले जाते आपण ते अवश्य पाहावे.
प्रजासत्ताक दिन व पुरस्कार वितरण | 26 january purskar vitran
सत्ता दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट अशी कामगिरी करणाऱ्या भारतातील नागरिकांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले जाते. पुरस्कार हा भारतरत्न पुरस्कारानंतर दोन नंबरचा सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो आणि त्याचे वितरण प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली या ठिकाणी पार पडते.
प्रजासत्ताक दिनासाठी परदेशी पाहुणे | prajasattak din pardeshi pahune
प्रजासत्ताक दिनाला दरवर्षी एखाद्या राष्ट्राच्या प्रमुख व्यक्तीला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाते. मागील दोन वर्षांमध्ये कोरोना काळा असल्यामुळे हा कार्यक्रम भव्यदिव्यरित्या साजरा करण्यामध्ये अनेक अडचणीत गेल्या. शक्यतो एखाद्या राष्ट्रांच्या राष्ट्र प्रमुखांना या दिवशी आवर्जून आमंत्रित केले जाते.
प्रजासत्ताक दिन मराठी माहिती निबंध 2023 व्हिडिओ| republic day information in marathi essay video
अशा पद्धतीने प्रजासत्ताक दिन मराठी माहिती आपल्याला सांगता येते.republic day information in marathi ही आपल्याला प्रजासत्ताक दिनाविषयी कोणताही कार्यक्रम असला तरी त्यामध्ये प्राथमिक स्वरूपाची माहिती म्हणून अतिशय उपयुक्त अशी माहिती आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताने संविधान लागू करेपर्यंतची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून आपणापुढे उलगडून दाखवली.आमची ही माहिती आपल्याला नक्कीच आवडेल अशी आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!
आमचे हे लेख वाचा
प्रजासत्ताक दिन हार्दिक शुभेच्छा
लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी विचार