आरटीई 25%ऑनलाइन प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे | Required Documents for RTE 25% Online Admission | rte praveshasathi lagnari mahtvachi kagapatre,document | rte admission 2023 24 document list in marathi |maharashtra rte admission documents list 2023 24 in marathi
आपल्याला माहितीच असेल की शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार कोणत्याही माध्यमाच्या म्हणजे शाळा मराठी माध्यमाची असो की हिंदी इंग्रजी अशा कोणत्याही माध्यमाची शाळा असो एवढेच नव्हे तर ती शाळा खाजगी व्यवस्थापनाची जरी असली किंवा या पलीकडे जाऊन ती शाळा एसएससी बोर्डाची असो की सीबीएससी बोर्डाची. अशा सर्व शाळांमध्ये आरटीई अंतर्गत 25% ऑनलाईन प्रवेश देणे शाळांसाठी बंधनकारक करण्यात आलेले आहे. साधारण या प्रवेश प्रक्रियेला दर वर्षी फेब्रुवारीमध्ये याचे वेळापत्रक येते. ज्या शाळा आपल्या एकूण प्रवेश क्षमतेच्या 25 टक्के जागा सामाजिक आरक्षण आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवत नाही त्यांच्यावरती सरकार कारवाई देखील करणार आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा मुलांना देखील दर्जेदार शिक्षण मिळावे एक प्रकारे शिक्षणातील भेदभाव पूर्णपणे नाहीसा व्हावा या व्यापक दृष्टिकोनातून शिक्षणाच्या मूलभूत हक्का नुसार प्रत्येक शालेय संस्थेला आपल्या एकूण प्रवेश क्षमतेच्या 25% जागांवरती ही सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण जर आरटीई 25% ऑनलाईन प्रवेशाचा लाभ घेणारा असाल तर आपल्याकडे आरटीई 25%ऑनलाइन प्रवेशासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे असावीत? याविषयी माहिती आज आपण पाहणार आहोत. आपल्या पाल्याचे rte अंतर्गत अर्ज दाखल करताना किंवा शाळा भेटल्यानंतर आपल्याजवळ Required Documents for RTE 25% Online Admission 2023 24 साठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे हवीत. अन्यथा आपला प्रवेश रद्द होऊ शकतो.
आरटीई 25%ऑनलाइन प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे |
RTE कागदपत्रे 2023 24 (toc)
आरटीई 25%ऑनलाइन प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे | Required Documents for RTE 25% Online Admission | rte praveshasathi lagnari mahtvachi kagapatre,document 2023
आपल्याला आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होत असताना खालील कागदपत्रे जवळ असावीत.
2023 24 RTE प्रवेशासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे | rte admission 2023 24 document list marathi
1.राहण्याच्या ठिकाणचा/रहिवास पुरावा (पत्त्याचा पुरावा) | rte Admission address proof
Rte 25% प्रवेश देत असताना ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे. त्यांना आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा वास्तव्याचा याचा अर्थ रहिवास पुरावा प्रवेशाच्या वेळीच सादर करावा लागतो. या रहिवास adress proof/ पुराव्यामध्ये आपण आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, विद्युत देयक म्हणजेच लाईट बिल, पण भाड्याच्या खोलीमध्ये राहत असाल तर त्या घरमालकाशी केलेले एग्रीमेंट म्हणजेच भाडे करारनामा तसेच ड्रायव्हिंग लायसन या सर्वांपैकी कोणताही एक पुरावा ऍड्रेस proof म्हणून rte प्रवेशासाठी आपल्याला सादर करावा लागतो. विद्यार्थी ज्या परिसरात राहतो त्या परिसरातच त्याला शाळा उपलब्ध व्हावी. या दृष्टिकोनातून आर टी प्रवेश देतेवेळी रहिवास पुरावा याला विशेष महत्त्व आहे.
2. जातीचा दाखला |cast certificate
Rte प्रवेश प्रक्रियेमध्ये जर आपण सामाजिक आरक्षणाचा(sc,st,obc,nt) लाभ घेत असाल तर आपल्याला ज्या पाल्याला प्रवेश घ्यायचा आहे त्याच्या वडिलांचा किंवा त्या विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे. जातीचा दाखला तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी यांनी प्रमाणित केलेला असावा.
3. अपंगत्व प्रमाणपत्र |disability certificate
25% आरटीई अंतर्गत होणाऱ्या प्रवेश यामध्ये अपंगांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. मात्र या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अपंगत्व प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. जय विद्यार्थी 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग म्हणजेच अपंग आहेत. त्यांच्याकडे प्रमाणपत्र उपलब्ध आहे अशाच विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल. साठी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
RTE 25% प्रवेश प्रक्रिया अर्ज कसा भरावा? संपूर्ण माहिती
4. जन्माचा दाखला | birth certificate
Rte प्रवेश घेत असताना अमुक एका इयत्तामध्ये कोणत्या वयाच्या मुलाला प्रवेश मिळेल याचे कमाल आणि किमान वय निश्चित करण्यात आले आहे. जेणेकरून यामध्ये कोणत्या प्रकारचा गैरप्रकार होणार नाही. म्हणूनच आर टीई प्रवेशाच्या वेळी जन्म नोंदणीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. पंचायत नगरपंचायत महानगरपालिका यांनी निर्गमित केलेला जन्माचा दाखला आपल्याला आरतीई प्रवेशाच्या वेळेस सादर करावा लागतो. अधिक माहितीसाठी भेट द्या.👇
RTE प्रवेशाची माहिती देणारे संकेतस्थळ
5. उत्पन्नाचा दाखला| income certificate
6. घटस्फोटीत असल्याबाबतचा पुरावा
एखादी महिला घटस्फोटीत आहे आणि त्या महिलेच्या बालकाला rte जुने चा लाभ घ्यायचा असेल तर ,न्यायालयाने घटस्फोटीत असल्याबाबत जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची प्रत, रहिवास पुरावा तसेच आपण आर्थिक दुर्बल गटातील आहोत म्हणजेच आपले उत्पन्न एक लाखाच्या आत आहे. हे देखील सादर करावे लागते.
7. विधवा महिला | vidhava mahila
माता विधवा आहे आणि तिला आपल्या पाल्याचा प्रवेश आरटीओ अंतर्गत करावयाचा आहे. केलेला आपला रहिवास पुरावा बालक जर वंचित गटातील असेल तर वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र आणि आई दुर्बल गटात मोडत असेल तर आईचा उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो.
8. अनाथ बालके |anath balke
कोरोना महामारी नंतर नंतर सर्व क्षेत्रांमध्ये नाद बालकांसाठी आरक्षण देण्यात आलेले आहे. अनाथ बालकांना कोणी दत्तक घेतलेले असेल तर त्यांना त्याबाबतची हमीपत्र सादर करावे लागेल. जर समजा तो बालक संबंधित संस्थेमध्ये राहत असेल तर त्या संस्थेची तो अनाथ असल्याबाबतची सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील.
9. आधार कार्ड | adhar card
Rte 25% ऑनलाइन प्रवेशाचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर उमेदवाराचे तथा त्याच्या वडिलांचे आधार कार्ड आपल्याला ऑनलाईन अर्ज करतेवेळी गरजेचे असते.
10. आय कार्ड साईज फोटो
Rte अंतर्गत आपला प्रवेश निश्चित झाल्यानंतर आपल्याला संबंधित उमेदवाराचे पासपोर्ट साईज फोटो म्हणजेच बालकाचे आयकर फोटो प्रवेशाच्या वेळी जमा करावे लागतात.
11. पालकांचे हमीपत्र | self declaration by parent
Rte प्रवेश घेण्यासाठी सोबत जी सर्व कागदपत्रे किंवा माहिती जोडलेली आहे ती सर्व माहिती खरी आहे.या माहिती मध्ये तफावत आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. पालकांकडून हमीपत्र भरून घेतले जाते.
आरटीई 25%ऑनलाइन प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे पीडीएफ | Required Documents for RTE 25% Online Admission pdf| rte praveshasathi lagnari mahtvachi kagapatre,document pdf | rte admission 2023 24 document list in marathi pdf |maharashtra rte admission documents list 2023 24 pdf rte प्रवेश सर्व कागदपत्रे pdf
आपल्याला जर अगोदरपासूनच पार्टी प्रवेश व्यवस्थित रित्या घ्यावयाचा असेल आणि सर्व कागदपत्रांची जमवाजमव करायचे असेल तर आपण महाराष्ट् शासनाने आर टीई प्रवेशासाठी जी कागदपत्रे सांगितलेले आहेत त्याची पीडीएफ आपल्याजवळ कायम ठेवा.
Rte 2023 प्रवेशासाठी महत्त्वाची कागदपत्रे pdf
Rte प्रवेश कागदपत्रे व्हिडिओ | rte Admission documents vedeo
वरील सर्व कागदपत्रे आपल्याला rte प्रवेश घेत असताना अतिशय गरजेची आहेत.आरटीई 25%ऑनलाइन प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?याची आपल्याला कल्पना आली असेल.
आमचे हे लेख वाचा
90% पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी कसा करतात अभ्यास
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची शिक्षण विभागात अंमलबजावणी 1 मे 2022 पासून