26 जानेवारी दहा ओळी मराठी भाषण | 26 January speech in marathi 10 lines 2023
26 जानेवारी हा दिवस आपण संपूर्ण भारतभर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताने आपल्या संविधानाची अंमलबजावणी केली. प्रजासत्ताक दिनाला शाळा,महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम होत असतात. या विविध कार्यक्रमातील एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे 26 जानेवारीला होणाऱ्या भाषण स्पर्धा. सध्याच्या काळातील पालक हे आपल्या पाल्याने शाळा,महाविद्यालयात होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यावा. त्याच्यामध्ये stage daring यावे यासाठी विशेष प्रयत्न करत असतात. अगदी लहान वयापासूनच त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. या लहान बाळ गोपाळांना प्रजासत्ताक दिनासाठी मराठी भाषणाच्या माध्यमातून आपले विचार मांडता यावेत.
बालकांना खाजगी संस्थेत विनामूल्य/मोफत प्रवेश मिळवून देणारा हा कायदा आपल्याला माहिती आहे का ??
लहान मुलांमधे बिनधास्तपणे व्यासपीठावरती जाऊन बोलण्याची हिंमत यावी. यासाठीच आम्ही आमच्या 26 जानेवारी विशेष लेखमालेमध्ये आज 26 जानेवारी दहा ओळी मराठी भाषण अर्थात 26 January speech in 10 lines marathi हे भाषण घेऊन आलेलो आहोत. आमचे 26 जानेवारी विषयी भाषण मराठी आपल्याला नक्की आवडेल.
जानेवारी दहा ओळी मराठी भाषण |
प्रजासत्ताक दिन भाषण (toc)
26 जानेवारी भाषणाची तयारी| 26 January bhashanachi tayari prepration
आपल्याला 26 January speech in marathi 2023 ती उत्कृष्ट तयारी करायची असेल तर, आपण प्रथम 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन याविषयी गुगल,इंटरनेट, यूट्यूब तसेच वर्तमानपत्र, छापील पुस्तके यातून काही महत्त्वाची माहिती notes स्वरूपात काढायला हवी. जरी हे भाषण 26 जानेवारीचे लहान मुलांसाठी भाषण असले तरी आपल्याला त्यामध्ये दिली जाणारी माहिती ही थोडक्यात जरी असली तरी ती महत्त्वपूर्ण असायला हवी. अन्यथा ते भाषण रटाळ होईल.आपले 26 जानेवारीचे भाषण जरी दोन मिनिटांचे असले तरी त्यामागे आपण जी तयारी करत असतो. ती कित्येक तासांची तयारी असते. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.
* दिनाच्या कार्यक्रमात सादर करा अप्रतिम कविता*
26 जानेवारीच्या दहा ओळी भाषणाचे महत्वाचे मुद्दे | 26 January ten line marathi speech
आपल्याला 26 जानेवारी चे छोटे भाषण त्याची तयारी करीत असताना या भाषणामध्ये आपण कोणते मुद्दे घेणार आहोत? हे अगोदरच निश्चित करायला हवे. सुरुवातीला भाषणाची तयारी करत असताना आपण प्रजासत्ताक दिनाबाबत महत्वाची माहिती देणारी पंधरा-वीस वाक्ये संग्रह स्वरूपात समोर ठेवावीत. मात्र यातील महत्वाची 10 वाक्य आपल्या भाषणामध्ये असावीत.पण ती अर्थपूर्ण असावीत. चला तर आता आपण 26 जानेवारी च्या शॉर्ट बट स्वीट मराठी भाषणाला सुरुवात करूया.
26 जानेवारी दहा ओळी मराठी भाषण | 26 January speech in marathi 10 lines 2023|26 जानेवारी भाषण मराठी लहान मुलांसाठी |26 January marathi speech for small child |प्रजासत्ताक दिनाचे दहा ओळींचे लहान मुलांसाठी भाषण
आपण आजचे हे भाषण लहान मुलांसाठी देत आहोत. हे भाषण मोठ्या गटातील मुलांसाठी द्यावयाची असेल तर आपण यामध्ये अधिकची भर घालावी.26 जानेवारी दहा ओळी मराठी भाषण हा आजचा नमुना आपल्याला नक्कीच आवडेल.
१. नमस्कार ! मी ...... माझ्या प्रजासत्ताक दिनाच्या भाषणाला सुरुवात करण्याअगोदर,व्यासपीठावरती विराजमान असलेले मान्यवर, माझे शिक्षक,गुरुजन वर्ग त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले माझे मित्र आणि मैत्रिणींनो! तुम्हा सर्वांना 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
२. भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले. तो दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या दिमाखात साजरा करतो.असे असले तरी २६ जानेवारी देखील धुमधडक्यात साजरा करतो?यामगील काय इतिहास आहे असा अनेकांना प्रश्न पडतो.
REPUBLIC DAY प्रजासत्ताक दिन दहा ओळींचे सोपे इंग्रजी भाषण
३. भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे स्वातंत्र्य अखंडपणे टिकावे.आपल्या देशाचा राज्यकारभार व्यवस्थितपणे चालावा यासाठी काही एक नियमावली असणे गरजेचे होते आणि ही नियमावली म्हणजे आपली राज्यघटना होय.
३. नव्याने स्वतंत्र झालेल्या विविधतेत एकता असलेल्या भारत देशामध्ये त्या तोडीची राज्यघटना तयार करणे हे मोठे आवाहन होते.
४. भारताची राज्यघटना निर्माण करण्यासाठी घटना समिती स्थापन करण्यात आली. या घटना समितीमध्ये जी मसुदा समिती होती. या मसुदा समितीचे प्रमुख म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नेमणूक करण्यात आली.
५. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारतीय समाज व्यवस्थेचा अभ्यास करून, त्याचबरोबर इतर लोकशाही देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून परिपूर्ण अशा भारतीय संविधानाची निर्मिती केली.
६. भारताचे हे संविधान तयार करण्यासाठी एक दोन महिने नव्हे तर तब्बल 2 वर्षे 11 महिने 8 दिवस इतका मोठा कालावधी लागला.
७. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेऊन भारतीय संविधानाची निर्मिती केली. या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली.याचीच आठवण म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो.
८. भारतीय संविधान निर्मिती करत असताना आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता वर लोकशाही यावर विशेष भर देऊन भारताची लिखित राज्यघटना तयार केली.
९. जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटनेची ओळख सर्वदूर आहे.
१०. मित्रांनो! 26 जानेवारी १९५० या दिवसापासून खऱ्या अर्थाने प्रजेचे राज्य भारतात अस्तित्वात आले म्हणूनच हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
Also read /हे पण पहा
अशा पद्धतीने आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा का करतो ? याविषयी मी माझे विचार आपणांसमोर मांडले. माझे हे बोबडे बोल आपण शांत चित्ताने ऐकून घेतले. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जय हिंद!जय भारत! भारत माता की जय!
अशा पद्धतीने आपण जर 26 जानेवारी छोट्या मुलांचे भाषण याची तयारी नीट केली तर, 26 जानेवारी दहा ओळी मराठी भाषण हे जरी दहा ओळींचे वाटत असले तरी घागर मे सागर असे हे मौल्यवान भाषण होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो! 26 January marathi speech for small child या भाषणाची तयारी करत असताना आपल्याला जर एखादे वाक्य बोलताना विसरले तर घाबरून जाऊ नका.अगदी बिनधास्तपणे आपण तयार केलेल्या 26 जानेवारीच्या छोट्या भाषणाची अदाकारी प्रेक्षकांसमोर सादर करा. आम्हाला खात्री आहे.आपण जर अशा पद्धतीने सुरुवातीपासूनच छोट्या छोट्या स्टेजवरील तथा व्यासपीठावरील बोलण्याची संधी घेतली तर नक्कीच तिचे आपण सोने करू शकता.
26 जानेवारी दहा ओळी मराठी भाषण पीडीएफ | 26 January speech in marathi 10 lines pdf 2023 pdf|26 जानेवारी भाषण मराठी लहान मुलांसाठी पीडीएफ |26 January marathi speech for small child pdf|प्रजासत्ताक दिनाचे दहा ओळींचे लहान मुलांसाठी भाषण पीडीएफ
26 जानेवारी भाषण pdf
26 जानेवारी दहा ओळी मराठी भाषण व्हिडिओ| 26 January speech in marathi 10 lines video
आमचा आजचा हा प्रजासत्ताक दिन विशेष लेख प्रजासत्ताक दिनाचे दहा ओळी मराठी भाषण आपल्याला.कसा वाटला हे नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!
आमचे हे लेख वाचा
प्रजासत्ताक दिन हार्दिक शुभेच्छा
सामान्य माणूस आणि शेअर मार्केट
MPSC सर्वात मोठी ८००० जागांसाठी मेगा भरती