बालिका दिन प्रतिज्ञा | balika din pratidnya
सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण बालिका दिन म्हणून साजरी करतो.या बालिका दिनाच्या दिवशी अनेक छान छान कार्यक्रम सादर केले जातात.बालिका दिनाच्या दिवशी परिपाठाच्या वेळी एक प्रतिज्ञा घेतली जाते.आजच्या लेखात आपण balika din pratidnya पाहणार आहोत.या बालिका दिन प्रतिज्ञेतून आपल्याला खरी खुरी समानता काय असते व ती जनमानसात यायल हवी यासाठी ही प्रतिज्ञा बोलली जाते.
बालिका दिन प्रतिज्ञा | balika din pratidnya
चला तर मग बालिका दिन साजरा करूया व ही प्रतिज्ञा आचरणात आणूया.
मी एक स्वातंत्र्य बालिका आहे.माझे भवितव्य मी
स्वतः घडवणार आहे.यासाठी येणाऱ्या संकटाना
तोंड देऊन, मी माझे शिक्षण पूर्ण करण्याची माझी
तयारी आहे. माझे शिक्षण मी अर्धवट सोडणार
नाही. मी माझ्या इतर बहिणींना देखील
शिक्षणासाठी प्रोत्साहित करणार आहे.व्यक्ती
म्हणून मला मिळालेल्या अधिकारांचा मी योग्य तो
वापर करणार आहे .सावित्रीबाईंनी दिलेल्या
परंपरेची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी
सदैव प्रयत्न करणार आहे.कायम देशाला
प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी दक्ष असणार आहे.
जय हिंद.जय भारत.
वरील प्रतिज्ञा ही मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात केली पाहिजे अशी सकारात्मक ऊर्जा देणारी आहे.
आमचा आजचा बालिका दिन प्रतिज्ञा हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा.
आमचे बालिका दिन विशेष लेख जरूर वाचा