Type Here to Get Search Results !

महात्मा गांधी पुण्यतिथी माहिती भाषण निबंध अभिवादन | mahatma gandhi punyatithi mahiti bhashan nibandh abhivadan

 महात्मा गांधी पुण्यतिथी माहिती भाषण निबंध अभिवादन | mahatma gandhi punyatithi mahiti bhashan nibandh abhivadan |Mahatma Gandhi Death Anniversary Information marathi Speech Essay Greetings | mahatma gandhi punyatithi marathi speech 

 आपल्या भारतात महापुरुष होऊन गेले. लोकमान्य टिळक ,स्वातंत्र्यवीर सावरकर ,पंडित नेहरू , सुभाषचंद्र भोस अशी कितीतरी नावे सांगता येतील.या महापुरुषांपैकी ज्यांचे नाव अगदी अग्रक्रमाने घेतले जाते असे महापुरुष की ज्यांना आपण महात्मा या नावाने ओळखतो ती व्यक्ती म्हणजे अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी होय. 30 जानेवारी हा त्यांचा पुण्यदिन तथा पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली जाते. त्यांना अभिवादन केले जाते. आजच्या लेखाच्या माध्यमातून महात्मा गांधी पुण्यतिथी माहिती भाषण निबंध आणि अभिवादन यावर आपण आज प्रकाश टाकणार आहोत.


महात्मा गांधी पुण्यतिथी माहिती भाषण निबंध अभिवादन
महात्मा गांधी पुण्यतिथी माहिती भाषण निबंध अभिवादन


गांधी जयंती माहिती भाषण निबंध (toc)

महात्मा गांधी पुण्यतिथी माहिती भाषण निबंध अभिवादनहात्मा गांधी पुण्यतिथी माहिती भाषण निबंध अभिवादन | mahatma gandhi punyatithi mahiti bhashan nibandh abhivadan |Mahatma Gandhi Death Anniversary Information Speech Essay Greetings


शाळा महाविद्यालये तथा सरकारी कार्यालयांमध्ये गांधीजींची पुण्यतिथी साजरी करीत असताना आपल्याला महात्मा गांधी यांच्या जीवनातील महत्वाच्या घडामोडी यांची माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपण गांधी जयंती पुण्यतिथी माहिती तसेच गांधी जयंती भाषण  करू शकता एवढेच न्हवे तर गांधी जयंती व पुण्यतिथी निबंध जरी लिहायचा म्हंटले तरी आपल्याला काही एक माहिती जवळ हवी. चला तर मग सविस्तर माहिती पाहूया.


गांधी जयंती भाषण | gandhi jayanti bhashan| गांधी जयंती मराठी निबंध | mahtama gandhi jayanti marathi nibandh (essay )| गांधी जयंती मराठी माहिती | gandhi jayanti marathi mahiti |mahatma gandhi punyatithi marathi speech 

आपल्याला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वेगवेगळ्या स्वरूपात माहिती न देता एक अतिशय आगळीवेगळी आणि नाविन्यपूर्ण माहिती आम्ही देत आहोत. ही माहिती आपल्याला  गांधीजींच्या पुण्यतिथी कार्यक्रमांमध्ये त्यांच्याविषयी माहिती सांगत असताना किंवा छान असे छोटे भाषण करत असताना तसेच निबंध लेखन करताना देखील उपयोगी पडेल.


नमस्कार! मी अबक.आज ३० जानेवारी भारताच्या इतिहासातील हृदय पिळवटून टाकायला लावणारा दिवस. कारण याच दिवशी महात्मा गांधीजी अनंतात विलीन झाले. महात्मा गांधी यांनी आपल्या भारत देशासाठी जे योगदान दिले त्या योगदानाबद्दल आजच्या दिवशी म्हणजे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी सर्व प्रथम मी त्यांना अभिवादन करतो, त्यांचे कार्य सांगताना अकाशाचा कागद नि समुद्राची शाई केली तरी त्यांची महती वर्णन करता येणार नाही. अशा महान व्यक्तिमत्वाविषयी मी जी माहिती सांगणार आहे ती आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावी ही नम्र विनंती.

गांधीजी काय होते? क्या थे बापू तो सूनो..... 


जिनकी सोच एक कमाल थी,

सत्य ,अहिंसा की जलती मशाल थी,

जिन्होने बदल दिये ,

भारत की गुलामी के हाल,

वे बापू थे जीन्होने किया सारा कमाल.


आधुनिक जगाला हिंसेने नाही तर अहिंसेने  जिंकता येते,न्याय मिळवता येतो. असे भूतो न भविष्यती कार्य ज्या महान व्यक्तीने केले ती व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी होय.त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी झाला. महात्मा गांधी यांचे वडील पोरबंदर संस्थानांमध्ये दिवाण म्हणून काम करत होते. गांधीजींचे घराणे वैष्णव धर्मीय होते.गांधीजींच्या आईचे नाव पुतलीबेन होते. महात्मा गांधीजींच्या घरातील वातावरण कर्मठ असून गांधीजींचा स्वभाव मात्र  अतिशय  हळवा नी प्रेमळ होता.

महात्मा गांधी यांना आपण सत्याचे पुजारी म्हणून ओळखतो. परंतु त्यांच्या लहानपणाविषयी 'माझे सत्याचे प्रयोग' या आत्मकथनामध्ये गांधीजी म्हणतात, " मी लहानपणी बऱ्याचदा खोटे बोलायचो परंतु , जसे माझे  वय नी स्व वाढत गेला तसा माझा  विकास होत गेला." नंतरच्या काळात मात्र  महात्मा गांधीजी तीळमात्र म्हणजेच एक शब्दही खोटे बोलले नाहीत.त्यांनी अगदी सरळ पद्धतीने संपूर्ण जीवन व्यतीत केले. महात्मा गांधीजींच्या घरातील वातावरण धार्मिक आणि सात्विक असून देखील गांधीजी म्हणतात की, मी लहानपणी मित्रांच्या संगतीमुळे अनेक वाईट गोष्टी केल्या आहेत.परंतु आता मी माझे मन जाणीवपूर्वक चांगल्या मार्गाकडे वळवले आहे. यातून गांधीजींचा सत्यनिष्ठपणा आपल्याला दिसतो.

महात्मा गांधीजी यांचे लग्न झाले त्यावेळी ते अवघ्या तेरा वर्षांचे असताना त्यांचा विवाह  कस्तुरबा गांधी यांच्याशी झाला. महात्मा गांधी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर बॅरिस्टर बनण्यासाठी  इंग्लंडला गेले. अतिशय मन लावून त्यांनी आपले बॅरिस्टरकीचे शिक्षण पूर्ण केले. परदेशात शिक्षण घेत असताना मी, मद्य,मांस यांचे सेवन करणार नाही. हे आईला दिलेले  वचन त्यांनी मोडले नाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर गांधीजी 1891 मध्ये  भारतामध्ये आले. महात्मा गांधीजी बॅरिस्टर बनले हे पाहण्याचा योग मात्र त्यांची आई पुतळीबेन यांना आला नाही.

इंग्लंड मधून आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर,महात्मा गांधी बॉम्बे कोर्टात वकिली करू लागले. तेथे त्यांना म्हणावे तसे यश मुंबईमध्ये वकिली करताना आले नाही. त्याच दरम्यान मुस्लिम व्यापाऱ्याची केस त्यांच्याकडे आली. तो दावा लढण्यासाठी महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले.जवळ जवळ एक वर्ष खटला त्या व्यापाऱ्यासाठी लढले. नि पुढे २० वर्षे आफ्रिकेत राहिले.

आफ्रिकेत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे दक्षिण आफ्रिकेत जे भारतीय लोक आहेत  त्यांच्यावर इंग्रज प्रशासन जुलूम,जबरदस्ती नि अन्याय करत आहे.याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी महात्मा गांधीजी यांनी दक्षिण आफ्रिकेत असणाऱ्या सर्व भारतीयांना एकत्र केले. आणि आफ्रिकेतील सरकार विरूद्ध आवजा उठवला. महात्मा गांधजीं यांनी हा आफ्रिकेतील लढा अहिंसेच्या मार्गाने लढला व भारतीय लोकांना न्याय मिळवून दिला. महात्मा गांधीजी यांनी जवळजवळ वीस वर्षे दक्षिण आफ्रिकेमध्ये काढली. दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांचा एक दरदरा निर्माण झाला. कालांतराने ते भारतामध्ये आले आणि सर्व भारतीयांचे महात्मा बनले.

1920 साली लोकमान्य टिळक यांचे निधन झाले टिळकांच्या निधनानंतर हा स्वातंत्र्यलढा व त्याचे संपूर्ण नेतृत्व महात्मा गांधीजीनी स्वीकारावे अशी मागणी होऊ लागली. महात्मा गांधीजी यांनी आफ्रिकेप्रमाणे अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गावर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला बळकटी द्यायचे ठरवले.

गांधीजींनी सर्वप्रथम चंपारण्य या ठिकाणी मळेवाले मजूर वर्गावर जो अन्याय करीत होते त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.  मजुरांवरील अन्याय कायमचा दूर केला. आता गांधीजींची ख्याती हळूहळू भारतामध्ये पसरत होती. महात्मा गांधीजी यांनी इंग्रज प्रशासनाला अहिंसा वर सत्याग्रह मार्गाने धडा शिकवत असताना सर्वप्रथम मिठाचा सत्याग्रह केला. मिठावर जे जाचक कर होते. ते कर आम्ही देणार नाही असा पवित्रा आंदोलनात घेतला. या त्यांच्या पवित्रामुळे इंग्रज देखील वरमले.

महात्मा गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देत असताना सत्याग्रह ,सविनय कायदेभंग , असहकार आंदोलन अशा वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला.सविनय कायदेभंग,असहकार आंदोलन, चले जाओ आंदोलन असे कितीतरी कार्यक्रम त्यांनी हाती घेतले. 1942 च्या मोठ्या आंदोलनामुळे तर इंग्रजांना आता भारत सोडल्याखेरीस पर्याय नाही याची जाणीव झाली. सरते शेवटी वैतागून इंग्रजांनी आपल्या देशाला 150ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य दिले.  मात्र पुढे काही महिन्यांमध्येच  दिली या ठिकाणी एका तरुणाने गांधीजींवर गोळ्या झाडल्या.तो दिवस म्हणजे 30 जानेवारी 1948 की जो आज आपण गांधी पुण्यतिथी म्हणून साजरा करतोय. अशा या महान आत्म्याला माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम.


सत्य अहिंसा के थे वह पुजारी ,

लाख संकट आये हिंमत कभी ना हार,

सौफ दी हमे भारत की आजादी ,

वे थे महात्मा गांधी .


एवढे बोलून आज मी माझे आजचे गांधीजी पुण्यतिथीच्या वाढलेल्या भाषणाला विराम देतो.  

अशा पद्धतीने आपण महात्मा गांधीजी पुण्यतिथी चे भाषण करू शकता. आपल्याकडे जर यापेक्षा काही नवीन माहिती असेल ती देखील ॲड करू शकता. ही माहिती आपल्याला महात्मा गांधी मराठी निबंध,किंवा महात्मा गांधी यांना अभिवादन करत असताना देखील सांगता येईल.

महात्मा गांधी जयंती भाषण निबंध व्हिडिओ |

 mahatma gandhi bhashan vedeo



आमचा आजचा हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा.


आमचे हे लेख वाचा 









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area