Type Here to Get Search Results !

मकर संक्रांत सणाची मराठी माहिती निबंध | makar sankrant sanachi marathi mahiti nibnadh

मकर संक्रांत सणाची मराठी माहिती निबंध | makar sankrant sanachi marathi mahiti nibnadh 

जानेवारी महिना आला की लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना ज्या सणाची आवड होते असा हिंदू धर्मातील एक सण म्हणजे मकर संक्रांत होय. संक्रांतीच्या दिवशी सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. लेखाच्या माध्यमातून मकर संक्रांत सणाची मराठी माहिती आपण पाहणार आहोत. ही माहिती आपल्याला मकर संक्रांत मराठी निबंध लिहीत असताना नक्कीच उपयोगी पडेल. चला तर मग आपल्या makar sankrant sanachi marathi mahiti nibnadh या विषयाला सुरुवात करूया.

मकर संक्रांत सणाची मराठी माहिती निबंध
मकर संक्रांत सणाची मराठी माहिती निबंध


मकर संक्रांती माहिती (toc)

सणांचे मानवी जीवनात महत्त्व |sanananche manvi jivant mhattav

धर्म कोणताही असो, प्रत्येक धर्मामध्ये सण उत्सव साजरे केले जातात. जीवनामध्ये या सण उत्सवांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील सर्व सुख दुःख विसरून लोक विविध सणांच्या निमित्ताने एकत्र येतात.दिवाळी दसरा गुढीपाडवा नाताळ यासारख्या सणांना एकमेकांच्या घरी जातात. मानवी भावनांचे विरेचन सणांमुळेच होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये माणूस आत्मकेंद्री बनत चालला आहे. माणूस समाजामध्ये मिसळायला मागत नाही.नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देखील मी पाहिले काही लोक एक एकटेच दिसत होते.परंतु हे बदलायला हवे.नेमके सुख म्हणजे काय?हे माणसाला कळत नाही अलीकडे माणूस माणसांमध्ये देखील रमत नाही ही वस्तुस्थिती आहे. माणूस चार चौघात मिसळण्यापेक्षा मोबाईलच्या आभासी दुनियेमध्ये रमताना दिसत आहे. प्रत्येकजण पैश्याच्या मागे लागला आहे.म्हणूनच आजच्या या नव्या पिढीला सण उत्सवांचे महत्त्व समजावे, आणि अमुक एक सण का साजरा केला जातो? यामागील पार्श्वभूमी काय आहे.हे कळण्यासाठी,जानेवारी  महिन्यातील पहिला सण मकर संक्रांत या मकर संक्रांती सणाविषयी संपूर्ण माहिती आपण पाहूया.

मकर संक्रात सणाची माहिती निबंध | makar sankranti sanachi mahiti marathi essay


मकर संक्रांत म्हणजे काय |makar sankrant mhanje kaay?

अनेकांना असा प्रश्न पडतो की मकर संक्रांत म्हणजे नेमके काय? ज्या दिवशी सूर्य मकर राशी मध्ये प्रवेश करतो, त्या दिवसाला मकर संक्रांत म्हणतात. साधारणपणे 14 जानेवारीला  सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. म्हणून या दिवसाला मकर संक्रांत असे म्हणतात. मकर संक्रांत या सणाचा संबंध सूर्याशी आहे.

मकर संक्रांत आणि सुर्य उपासना |makar sankarant anj surya

सूर्य हा संपूर्ण पृथ्वीचा आत्मा आहे. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण सूर्य आहे म्हणूनच दिवस रात्र आहे.सजीवांना  लागणारा प्रकाश सूर्यामुळेच मिळतो. सूर्याच्या प्रकाशावरतीच सर्व जीवसृष्टी अवलंबून आहे. आपले उत्तम आरोग्य राहण्यासाठी सूर्यकिरणा इतके फायदेशीर काहीच नाही. अशा या मकर संक्रांत या सणाला विशेष असे महत्व हिंदू धर्मामध्ये दिले गेले आहे.

दर महिन्यातील संक्रांत |dar mahinyala sankrant

आपण जर खगोलशास्त्राचा अभ्यास केला तर ,आपल्या ध्यानात येईल की संक्रमण म्हणजे सरकणे या अर्थाने संक्रांत ही दर महिन्यात असते. वर्षाचे एकूण बारा महिने आहेत. बारा महिन्या प्रमाणे 12 राशी देखील आहेत. आणि या बारा राशी नुसारच सृष्टीचे चक्र चालत असते.

सूर्याच्या बारा राशी |suryachya bara rashi

सूर्य संपूर्ण वर्षभरामध्ये दर महिन्याला एका राशी मधून दुसऱ्या राशीमध्ये जात असतो. यामध्ये मकर संक्रातीला विशेष असे महत्त्व आहे, कारण सूर्य मकर राशीमध्ये ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेला तो उत्तर दिशेकडे झुकलेला किंवा कललेला दिसतो. यालाच भूगोलाच्या भाषेमध्ये उत्तरायण असे म्हणतात. यानंतरच्या कालावधीमध्ये कर्क संक्रांतीच्या काळापासून मकर संक्रांति पर्यंतचा काळ दक्षिणायन म्हणून ओळखला जातो. थोडक्यात सूर्याच्या बारा राशींमध्ये मकर राशि मध्ये सूर्याचा प्रवेश हा सर्व दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला आहे. का ते आपल्याला पुढील स्पष्टीकरणांमधून समजेलच.

मकर संक्रातीचे धार्मिक महत्त्व | makar sankranti dharmik mhattav

मकर संक्रांत सणाला विशेष असे धार्मिक महत्त्व आहे. मकर संक्रांत या सणाच्या दिवशी पुराणांमध्ये नेमके काय घडले होते याविषयी माहिती पाहिल्यानंतर आपल्याला मकर संक्रांतीचे एकंदरीतच धार्मिक महत्त्व पूर्णपणे समजून जाईल.

मकर संक्रांति विषयी पुराणातील कथा १| makar sankrant katha 

संक्रांति विषयी पुरानात एक कथा सांगितली आहे, या पुराणातील कथेनुसार आदिमाया महाशक्ती देवी ज्यावेळी वेगवेगळ्या देवींच्या अवतारामध्ये या सृष्टीतील अनिष्ट शक्तींचा म्हणजेच दानवांचा नाश करण्यासाठी जन्माला आली तो दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस होय. व सामान्य लोकांना त्रास देणाऱ्या संकटा सुराचा वध तिच्या दिवशी केला म्हणून त्या देवीला संक्रांती देवी असे म्हटले गेले.

मकर संक्रांति विषयी पुराणातील कथा २

संक्रांत सण नेमका कधीपासून सुरू झाला याविषयी पुराणात अजून एक कथा सांगितली जाते. या पुराणातील कथेनुसार या भुतलावरती तिलासूर नावाचा एक प्रचंड राक्षस होता. या तिळासुराने खूप मोठी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाचे वरदान प्राप्त करून घेतले होते. ब्रह्मदेवाच्या वरदानाचा तो गैर उपयोग करत होता. तिन्ही लोकातील लोक यामुळे नाराज झाले होते. घाबरलेल्या मनुष्यप्राण्याने ब्रह्मदेवाची प्रार्थना केली. ब्रह्मदेवाला विनंती केली की तूच आता आमचे रक्षण करू शकतो या तिळासुराने आमचे जगणे मुश्किल केले आहे. मनुष्य प्राण्याची केविलवाणी विनंती ऐकून ब्रह्मदेवाने सांगितले की हे कार्य करण्याचे सामर्थ्य केवळ सूर्यदेवाजवळ आहे. सर्वांनी सूर्य देवाची आळवणी सुरू केली. सूर्य देव प्रसन्न झाले नि तिळा सुराचा वध केला. आणि तोच हा दिवस ज्या दिवशी सूर्यनारायण मकर राशि मध्ये प्रवेश करतो. पुराणातील घटनेपासून मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो.कदाचित  कदाचित टिळासुराचा वध व या घटनेची आठवण म्हणून या दिवशी तिळगुळ वाटले जातात.

विविध राज्यात मकर संक्रांत सण साजरा| itar rajyatjl makar sankrant |bharatatil makar sankranti sakta krnari rajye

आपल्या महाराष्ट्रामध्येच मकर संक्रांतीचा सण साजरा होतो असे नाही तर संपूर्ण भारतामध्ये मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. बुंदेलखंडात या सणाला सुकरात किंवा बुडकी म्हणून ओळखले जाते. उत्तर प्रदेश राज्यांमध्ये याला खिचडी असे म्हणतात. तर काही भागांमध्ये वेगवेगळ्या  नावांनी याला ओळखले जाते.

दक्षिण भारतातील मकर संक्रांत | dakshin bhartatil sankrant |pongal sanachi mahiti 

Aapn जर दक्षिण भारताचा विचार केला तर दक्षिण भारतामध्ये मकर संक्रांती या सणाला पोंगल म्हणून ओळखले जाते. आपण ज्याला बैलपोळा म्हणतो. तशाच प्रकारचा सण मकर संक्रांतीला दक्षिण भारतामध्ये साजरा केला जातो. त्यांच्या दृष्टीने हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. दक्षिण भारतामध्ये याच दिवशी शेतकरी नांगराची पूजा करतो. आपल्या शेतीमध्ये नवनवीन पिक घेण्यासाठी शेतीच्या नांगरणीच्या कामाला सुरुवात करतो. दक्षिणेकडील भागामध्ये पोंगल सण उत्साहात साजरा केला जातो.

आंध्र प्रदेशातील मकर संक्रांत |aandhra pradeshatil sankranti

आपण जर विचार केला तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये मकर संक्रातीला धनु संक्रांत असे म्हटले जाते. या दिवशी आंध्र प्रदेशातील लोक आपल्या धनाची पूजा करतात.

थोडक्यात मकर संक्रांत हा सण संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या स्वरूपात जरी साजरा केला जात असला तरी, हा सण साजरा करण्यामागे एकच भूमिका आहे सूर्य देवाची उपासना.

मकर संक्रांत आणि अभ्यंग स्नान | makar sankranti abhyang snaan

संक्रातीच्या सणाच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष असे महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी अभ्यांग स्नान करणे म्हणजे खूप पवित्र मानले जाते. गंगेमध्ये स्नान करणे पुण्याचे मानले जाते. प्रयाग येथील गंगासागर या ठिकाणी अनेक लोक एकत्र येतात आणि गंगा स्नान करतात.संक्रातीच्या दिवशी या गंगासागरावर लाखोंचा जनसमुदाय एकत्र आलेला असतो. जनसमुदाय गंगासागरावर अभ्यंग स्नान करतो. व सूर्य देवाची देखील उपासना करतो.

मकर संक्रांत सणाचा आरोग्याशी संबंध |makar sankranti ani arogya

आपण धार्मिक दृष्टिकोनातून मकर संक्रांतीचे महत्व पहिले, त्या दृष्टिकोनातून आपण आरोग्यशास्त्राच्या नजरेतून मकर संक्रांत पाहिला गेलो तर आपले सण उत्सव किती विचारपूर्वक साजरे केले जातात. त्यांची कुठेतरी निसर्गाशी मिळते जुळते घेण्याचा प्रयत्न असतो. मनुष्य किंवा या सृष्टीतील प्रत्येक जीव हा निसर्गाशी समायोजन साधत असतो. जानेवारी महिन्यामध्ये सर्वत्र कडाक्याची थंडी असते. या थंडीमध्ये आपल्याला निसर्गाशी जुळवून घ्यावे लागते.हे सगळं करत असताना, आपल्या शरीरामध्ये प्रचंड ऊर्जा असावे लागते. ती ऊर्जा किंवा उष्णता निर्माण करण्याची क्षमता तिळ व गुळामध्ये प्रचंड असते म्हणूनच या दिवशी मोठ्या प्रमाणात तिळगुळ वाटले जाते. अशा अंगाने देखील आपल्याला संक्रांत सणांची माहिती मिळवावी लागेल.

संक्रांत सण कसा साजरा करतात |sankrant san kasa Shara kartat

साधारणपणे मकर संक्रांत हा सण स्त्रियांचा आहे असे मानले जाते. या दिवशी सुवासिनी असलेल्या स्त्रिया पाच मातीच्या भांड्यांमध्ये म्हणजेच मडक्यांमध्ये भुईमुगाच्या शेंगा, गाजर बोरे ,तीळ, सुपारी अशा अनेक जिनसा मडक्यामध्ये टाकतात.याला वान म्हणतात. निसर्गाप्रती असलेले नाते यातून जपले जाते. महिला  पूजा करतात. महिला एकमेकांना तिळगुळ देतात. अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात.


मकर संक्रांती फक्त दहा ओळींचे भाषण 


मकर संक्रांत आणि देवदर्शन |makar sankranti ani devdarshan

आपण वर पाहिल्याप्रमाणे निसर्गापासून मिळणाऱ्या गोष्टींनी देवाची पूजा केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक स्त्रिया आपल्या आसपासच्या परिसरात मंदिरात जाऊन देवदर्शन घेतात. त्या दिवशी स्त्रिया आपल्या भागामध्ये कुंकू भरतात. आखंड सौभाग्याची मागणी करतात. सुवासिनींसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा आहे

मकर संक्रांत आणि तिळगुळ वाटप |makar sankranti ani tilgul vatap 

मकर संक्रांतीच्या दिवशी वर्षभरामध्ये कोनाशी झालेले वाद विवाद सोडून देऊन आपण आता यापुढे एक जीवाने राहू या. तीळ आणि गूळ यांची गोडी एकमेकांमध्ये कशी सामावते अगदी त्याच पद्धतीने आपण देखील एकाजीवने एकत्र राहूया अशी शिकवण या मकर संक्रातीच्या तिळगुळ वाटपातून दिसते.


जिजाऊ जयंती short but sweet marathi भाषण


संक्रांत सणापासून मिळणारा संदेश |sankrant sanatun milnara sandesh 

आपण कधीही अहंकारी राहू नये. व्यक्तीचा अहंकाराचा बुडबुडा फुटत असतो. नेहमी वाईट बाबींपासून लांब राहावे, नेहमी चांगल्या सवयी लावाव्यात,गोडी गुलाबीने राहावे.

अशी शिकवण मकर संक्रांत आपल्याला देताना दिसते. 

आपण अशा पद्धतीने मकर संक्रांत /संक्रांती सणाची मराठी माहिती आपल्या घरातील लहान मुले यांना सांगून आपण जे सण साजरे करतो त्यामागील शास्त्रीय भूमिका समजावून सांगावी.

आमचा आजचा makar sankrant sanachi marathi mahiti nibnadh  आपल्याला कसा वाटला.हे नक्की कळवा.पुन्हा भेटू एका नवीन विषयासह .धन्यवाद!


आमचे हे लेख वाचा 

शिक्षण नेमके कशासाठी घ्यावे 

सुख म्हणजे काय 

 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area