Type Here to Get Search Results !

मकर संक्रांती दहा ओळी मराठी भाषण निबंध | makar sankranti daha oli marathi bhashan nibandh

मकर संक्रांती दहा ओळी मराठी भाषण निबंध | makar sankranti daha oli marathi bhashan  nibandh | makar sankaranti ten lines marathi essay and  speech

नमस्कार!मकर संक्रांती सन साजरा करीत असताना आपण आतापर्यंत मकर संक्रांती सणाची संपूर्ण माहिती पहिली. मकर संक्रांतीला काही भागांमध्ये काळे कपडे का वापरले जातात? संक्रांतीला पतंग का उडवला जातो? मकर संक्रांतीच्या दिवशी महिला कसे छान छान उखाणे घेऊन मकर संक्रांत साजरी करतात.. अशी कितीतरी नाविन्यपूर्ण माहिती या मकर संक्रांतीच्या मागील लेख मालिकेमध्ये पाहिली. परंतु शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मकर संक्रांतीचे काय महत्व आहे ? हे जाणून घेण्यासाठी आज आपण लहान मुलांना मकर संक्रांती विषयी म्हणजेच आपल्या संस्कृती विषयी काही एक माहिती सोप्या भाषेमध्ये सांगता यावी.यासाठी मकर संक्रांती दहा ओळी मराठी भाषण निबंध आज आपण पाहणार आहोत.

मकर संक्रांती दहा ओळी मराठी भाषण निबंध
मकर संक्रांती दहा ओळी मराठी भाषण निबंध


मकर संक्रांती छोटे भाषण निबंध(toc)

आज शाळा , महाविद्यालयामध्ये परिपाठाच्या वेळेस वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या सणाची माहिती देखील सांगायची असते.ही माहिती सांगत असताना विद्यार्थ्याने मकर संक्रांति दहा ओळी भाषण जरी त्या ठिकाणी सांगितले तरी तो छान पद्धतीने परिपाठ गाजवू शकतो. भाषा विषयाचे शिक्षक देखील एखादा सण झाल्यानंतर त्या सणाविषयी निबंध लिहायला सांगतात म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण मकर संक्रांती दहा ओळी निबंध भाषण /makar sankranti ten lines essay speech in marathi पाहणार आहोत. इंग्रजी माध्यमांच्या मुलांना मराठीतून भाषण निबंध तयारी करत असताना खूप अडचणी येतात यांचाच विचार करून आम्ही दहा ओळींचे निबंध आणि भाषण असे लेख तयार करीत आहोत.


प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम दहा ओळींचे भाषण


मकर संक्रांती जबरदस्त मराठी शुभेच्छा 

आमचा आजचा शॉर्ट बट स्वीट (short but sweet) म्हणजेच मकर संक्रांतीचे छोटे भाषण निबंध आपल्याला नक्की आवडेल. या अगोदरचा बालिका दिन साजरा करत असताना बालिका दिम दहा ओळींचे भाषण आणि लेखन हा लेख अनेकांना खूप आवडला. चला तर आपल्या मुख्य विषयाला makar sankranti ten lines essay and marathi speech सुरुवात करुया.

 संक्रांती दहा ओळी भाषण निबंध मांडणी कशी करावी | makar sankaranti daha oli bhashn ani nibandh presentation 

आपल्याला कोणत्या घटकाची तयारी करीत असताना, आपण त्या विषयाची मांडणी कशी करणार आहोत. याचा कच्चा आराखडा आपल्याजवळ हवा. फक्त मकर संक्रांती दहा ओळी भाषण असो की निबंध. आपण नेमकी कोणती माहिती मांडणार ? याच्या नोंदी आपल्याजवळ असणे गरजेचे आहे. तरच आपण आत्मविश्वासाने बोलू शकतो. दहाच ओळीत आपल्याला आपला मकर संक्रांती भाषण आणि निबंध मांडायचा असल्याने मोजकेच पण महत्त्वाची विधाने आपल्याला यामध्ये घ्यावी लागतील. या निबंधातील विधाने जरी छोटी असली तरी , ती अर्थपूर्ण असायला हवीत. वाचकांचे आणि श्रोत्यांचे लक्ष वेधून घेणारी असायला हवीत. आपण आम्ही देत असलेला हा नमुना पाहिल्यानंतर आपल्या ध्यानात येईल. ती खरोखरच हे दहा ओळींचे भाषण आणि निबंध असले तरी यातून निघणारा आशय हा खूप व्यापक आहे.


#प्रजासत्ताक दिन माहिती व निबंध 


मकर संक्रांती दहा ओळी मराठी भाषण निबंध | makar sankranti daha oli marathi bhashan  nibandh | makar sankranti ten line essay and speech 

नमस्कार! आज 15 जानेवारी मकर संक्रांतीचा दिवस. या मकर संक्रांतीच्या दिवशी व्यासपीठावरती विराजमान असलेल्या सर्वांना  मकर संक्रांतीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा! तीळ गुळ घ्या! गोड गोड बोला!असा हा गोडवा निर्माण करणारा सण. या गोड सणाच्या निमित्ताने मी मकर संक्रांती निमित्त अगदी थोडक्यामध्ये माझे विचार मांडणार आहे. ते आपण अगदी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.एवढे बोलून मी  मकर संक्रातीच्या भाषणाला सुरुवात करतो. 


१. नवीन वर्ष सुरू होताच जानेवारीमध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती होय.


२. मकर संक्रांती हा सन जानेवारी महिन्यामध्ये कधी 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी या दिवशी येत असतो. या वर्षीची मकर संक्रांत ही रविवारी १५ जानेवारीला आहे.


3. ज्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. तो दिवस म्हणजे मकर संक्रांत होय.


@प्रजासत्ताक दिन अप्रतिम रांगोळी संग्रह 


4. मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याची किरणे तिरप्या दिशेने पृथ्वीवरती येतात.


5. मकर संक्रांत का साजरी केली जाते, याविषयी एक पुराणात एक कथा सांगितली जाते. या कथेनुसार तिळासुर हा राक्षस देव दानव यांना प्रचंड त्रास देत होता. या तिळासूराचा सूर्यनारायणाने वत केला तो दिवस मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो.


6. मकर संक्रांत हा सण सुवासिनी महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी महिला भगवंताकडे आपले अखंड सौभाग्य असेच राहावे यासाठी प्रार्थना करतात.


हे देखील वाचा 


प्रजासत्ताक दिन/प्रभात फेरीसाठी अप्रतिम घोषणा pdf सह 


26 जानेवारी अप्रतिम भाषण 


7. मकर संक्रांतीला मोकळ्या मैदानात, टेरेसवर मुले या दिवशी पतंग बाजी करतात.


8. मकर संक्रांतीला लोक एकमेकांच्या घरी जातात. एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या! गोड गोड बोला! अशा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतात.


9. मकर संक्रांती हा सन कडाक्याच्या थंडीमध्ये असतो. या थंडीत आपल्याला उष्णतेची गरज असते आणि ती उष्णता निर्माण करण्याचे ताकद तिळाच्या लाडू मध्ये असते.



10. वर्षभरामध्ये झालेले वाद विसरून आता पण यापुढे प्रेमाने वागूया. असा लोकांना रिफ्रेश करणारा सण म्हणून मला मकर संक्रांति असं खूप आवडतो.


एवढे बोलून मी माझे विचार थांबवतो. पुन्हा एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा! माझे आजचे मकर संक्रांतीचे छोटे भाषण मी थांबवतो.जय हिंद! जय भारत! 

अशा पद्धतीने आपण मकर संक्रांति दहा ओळी भाषण आणि निबंध अतिशय छानपणे आपल्या लहान वयोगटातील मुलांसाठी देऊ शकता त्यांच्याकडून तयारी करून घेऊ शकता.

आमचा आजचा लहान मुलांसाठी असलेला मकर संक्रांति दहा ओळी मराठी भाषण निबंध हा विशेष लेख कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद! 

आमचे मकर संक्रांती विशेष लेख 

मकर संक्रांती संपूर्ण माहिती 

मकर संक्रांती हसवणारे उखाणे 

मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? 

@प्रजासत्ताक दिन अप्रतिम रांगोळी संग्रह








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area