मकर संक्रांतीला का घातले जातात काळया रंगाचे कपडे ? | Makar sankratila kalya rangache kapde ka ghatle jatat ?
नवीन वर्षाची सुरुवात ज्या सणाने होते तो सण म्हणजे मकर संक्रांती होय. या मकर संक्रांतीच्या सणाला अनेक जण एकमेकांना शुभेच्छा देतात. तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे देखील बोलतात. मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी एक गोष्ट मात्र आपल्याला विचार करायला भाग पाडते. मकर संक्रांतीला काळया रंगाचे कपडे का घातले जात असतील ? आजच्या लेखाच्या माध्यमातून या प्रश्नाचे शास्त्रीय आणि धार्मिक उत्तर यावरती आपण चर्चा करणार आहोत.
मकर संक्रांतीला का घातले जातात काळया रंगाचे कपडे |
मकर संक्रांत व काळा रंग (toc)
हिंदू धर्मात काळा रंग अपवित्र |hindu dharmat kala rang apvitra
हिंदू धर्मामध्ये काळा रंग अशुभ रंग म्हणून ओळखला जातो. दिवाळी दसरा पाडवा यासारख्या अनेक हिंदू धर्मातील सणांच्या वेळी काळया रंगाचे कपडे किंवा महिलांनी साडी नेसणे अशुभ मानले जाते. परंतु मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी अगदी आवडीने महिला मंडळी काळया रंगाची वस्त्रे परिधान करतात.
संक्रांती सणाला काळया रंगाची कपडे घालतात यामागील कारणे|sankranti sanala kalya rangachi kapde ghlnyamagil karne
मकर संक्रांति 14 जानेवारीला येत असते. आपण जर या जानेवारी महिन्यातील वातावरणाचा विचार केला तर अतिशय कडाक्याची थंडी या जानेवारी महिन्यामध्ये असते. या जानेवारी महिन्यामध्ये सूर्य हा मकर राशि मध्ये प्रवेश करत असतो. सूर्याची किरणे हे जमिनीवरती सरळ रेषेत न पडता तिरपी पडत असतात. कारण या कालावधी सूर्य उत्तर दिशेकडे कललेला असतो. म्हणजेच थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणातील उष्णता ही कमी झालेली असते.
या कडाक्याच्या थंडीमुळे लहान मुले वृद्ध यांना प्रचंड त्रास होत असतो. रंगांचा जर आपण विचार केला तर सफेद रंग हा आपल्याला उष्णता लागू नये यासाठी शक्यतो परिधान केला जातो. आपण टीव्ही वरती पाहतो की भर उन्हामध्ये ज्यावेळेस खेळाचे विविध सामने होत असतात त्यावेळी खेळाडू अंगावरती सफेद रंगाचे कपडे घालत असतात जेणेकरून उन्हाची झळ बसू नये. याउलट आपण विचार केला तर काळा रंग हा थंडी पासून आपला बचाव करतो. शास्त्रीय कारणामुळेच खास करून महाराष्ट्र मध्ये संक्रांतीच्या वेळी त्या काळया रंगाची साडी परिधान करतात. महाराष्ट्र सोडून इतरत्र ज्या ठिकाणी मकर संक्रांति सन साजरा केला जातो त्या ठिकाणी मात्र रंगीबेरंगी कपडे घातले जातात.
@ मकर संक्रांतीला पतंग का उडवतात
काळा रंग आणि उबदारपणा |kala rang ani ubdarpana
मकर संक्रांतीच्या दरम्यान हिवाळा अंतिम टप्प्यात असतो असे असले तरी अतिशय कडाक्याची थंडी यानंतर हळू कमी होणार असते मग अशावेळी शरीराला उबदारपणा मिळण्यासाठी काळया रंगाचे कपडे घातले जातात.
संक्रांतीला काळया रंगाचे कपडे घालण्यामागील धार्मिक कारण | sankratila kalya rangache kapde ghalnyamagil karan
पुराण कथेत सांगितल्याप्रमाणे तिळासुर राक्षसाने खूप मोठी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले होते. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यामुळे तिळा सुराचा गर्व प्रचंड वाढला होता.हा तीलासुर त्रिलोकावर राज्य करण्याचे स्वप्न पाहत होता. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो देव,मानव सर्वांनाच त्रास देत होता. एक प्रकारे सर्वजण नरक यातना भोगणारे करणारे जिने जगत होते. अशावेळी त्या तिळासुराचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रह्मदेवाने सूर्यदेवाला आमंत्रित केले. एक प्रकारे आपल्यावरती आलेले काळरूपी संकट सूर्य देवाने घालवले. वाईट बाबीशी लढा देण्यासाठी किंवा त्याचा निषेध करण्यासाठी आजही आपण अनेकदा काळा रंग वापरतो. अगदी त्याचाच दाखला घेतला तर आपल्याला वाईटाशी लढायचे आहे. आपल्या जवळ एक ताकद हवी म्हणूनच काळया रंगाचे कपडे परिधान केले जात असावेत. परंतु तसे पाहिले तर याबाबत असे कोठेही प्रमाण देण्यात आलेले नाही.
संक्रांतीला काळा रंगाची कपडे कोणत्या राज्यात वापरली जातात ?
मकर संक्रातीला महाराष्ट्र राज्य वगळता इतर राज्यांमध्ये मात्र रंगबिरंगी कपडे वापरले जातात. महाराष्ट्रात देखील ग्रामीण भागामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हिरव्या रंगाचे कपडे घालताना दिसतात. परंतु बहुतांश भागांमध्ये काळया रंगाचे कपडे घालण्यावर भर दिसतो.
मकर संक्रांत साजरा करण्याची पद्धत |makar sankrant sajra karnyachi padhat
साधारणपणे महाराष्ट्रामध्ये काळया रंगाचे कपडे परिधान करतात. त्या दिवशी सुवासिनी मातीच्या मडक्यामध्ये शेतातून निघणाऱ्या गाजर भुईमुगाच्या शेंगा तीळ सुपारी ऊस अशा बाबी त्या पाच मडक्यामध्ये पूजन करतात. आपल्या आसपास असणाऱ्या मंदिरात सुवासिनी गटागटांनी जातात. अखंड सौभाग्याची प्रार्थना मकर संक्रांतीच्या दिवशी महिला करत असतात. एकमेकींना तिळगुळ देऊन प्रेमाने राहण्याची आशा व्यक्त करत असतात.
मकर संक्रांतीचे उखाणे |makar sankranti ukhane
मकर संक्रांतीच्या वेळी आपल्या पतीचे कौतुक म्हणून महिला मकर संक्रांति सणाचे छान छान उखाणे घेत असतात. या उखाण्यांमधून अनेकदा महिला आपले दुःख देखील वेगळ्या शब्दांमध्ये मांडत असतात. पूर्वीच्या काळी महिलांना व्यक्त होण्याची संधी मिळत नव्हती. अप्रत्यक्षरीत्या उखाण्यांच्या माध्यमातून महिला आपले दुःख किंवा आनंद व्यक्त करू शकत होत्या. उखाणे हे एक ते दोन वाक्यांची यमक साधलेली रचना असते.चला तर काही मकर संक्रांतीचे उखाणे पाहूया.
मकर संक्रांतीच्या सणा दिवशी घ्या आमचे तिळगुळ
..... रावांचे नाव घेते नका करू चुळबुळ.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
...... चे नाव घेते आता तुमचे तोंड खोला.
तिळगुळ खाऊन बाई थकले
..... कुठे गेले आमचे टकले.
असे मजेशीर उखाणे देखील मकर संक्रांतीला घेतले जातात. आजच्या लेखाच्या माध्यमातून मकर संक्रांतीला काळया रंगाचे कपडे का घातले जातात याविषयीची माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कळवा.