Type Here to Get Search Results !

राजमाता जिजाऊ समाधी स्थळ माहिती | rajmata jijau samadhi sthal mahiti

राजमाता जिजाऊ समाधी स्थळ माहिती | rajmata jijau samadhi sthal mahiti 

राजमाता जिजाऊ यांचा जयंती उत्सव साजरा करीत असताना विविध लेखातून आपण त्यांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला.राजमाता जिजाऊ यांची संपूर्ण माहिती पहिली यात राजमाता यांच्या अंगी असलेले गुण पाहिले.आज आपण राजमाता जिजाऊ समाधी स्थळ याबाबत माहिती पाहणार आहोत.

राजमाता जिजाऊ समाधी स्थळ माहिती
राजमाता जिजाऊ समाधी स्थळ माहिती


जिजाऊ समाधी स्थळ (toc)

राजमाता जिजाऊ समाधी | rajmata jijau samadhi 

आपल्याला कोणतीही व्यक्ती असो त्या व्यक्तीचे जनमस्थल ,कर्मभूमी आणि त्या व्यक्तीचा शेवट याबाबत माहिती हवी.राजमाता जिजाऊ म्हणजेच जिजाबाई यांची समाधी नेमकी कोठे आहे ?असा अनेकांना प्रश्न पडतो.अशी माता की ज्या मातेने छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार करून एक जाणता राजा घडवला.त्यांनी नातू संभाजी महाराज यांच्यावर देखील खूप चांगले संस्कार केले. लहान संभाजीला राजनीतीचे धडे दिले.चला आपल्या मुख्य विषयाकडे वळूया.राजमाता जिजाऊ यांची समाधी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड या गावी आहे.शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा झाला त्यावेळी पाचाड शहरात येणाऱ्या पाहुण्यांची सोय करण्यात आली होती.

जिजाऊ यांच्या समाधी स्थळाचे महत्त्व |jijau samadhi sthal mahttv 

राजमाता जिजाऊ यांची समाधी रायगडाच्या पायथ्याशी आहे.आपण किल्ले रायगडाला भेट देतो त्यावेळी सर्वप्रथम पाचाड या ठिकाणच्या जिजाऊ समाधीला वंदन करून मग जिजाऊ पुत्र शिवबा यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या रायगडाला भेट देतो.म्हणून या पाचाड ठिकाणाला महत्त्व आहे.

जिजाऊ समाधी स्थळ | jijau samadhi sthal

आपण  पाचाड या जिजाऊ यांच्या समाधी स्थळाला भेट दिल्यावर आपल्याला एक राजमाता जिजाऊ यांचा पुतळा पहायला मिळतो.राजमाता जिजाऊ यांचा हा पुतळा अतिशय सुंदर कलाकृती आहे.राजमाता जिजाऊ समाधी स्थळाच्या परिसरात सुंदर बाग आहे.तिचे सौंदर्य पर्यटक यांना आकर्षित करते.


राजमाता जिजाऊ दहा ओळींचे मराठी भाषण व निबंध 


जिजाऊ समाधी स्थळ नूतनीकरण | jijau samdahi sthal nutnikaran 

राजमाता जिजाऊ समाधी स्थळाच्या विस्तारासाठी शासन प्रयत्न करत आहे.या समाधी स्थळाच्या आजूबाजूच्या सुमारे ३एकर जागेत पर्यटक यांना अनेक ऐतिहासिक बाबीचे दर्शन घडवले जाणार आहे. शासनाची यासाठी खूप मोठी योजना आहे.रायगडच्या माथ्यावर संग्रहालय किंवा इतर बाबी करणे जिकिरीचे आहे म्हणूनच या पाचाड च्या परिसरात भव्य दिव्य माहिती केंद्र,एक ऐतिहासिक वास्तूंचे संग्रहालय ,मराठा इतिहास संशोधन केंद्रे उभारण्याची योजना आहे.हे सर्व झाल्यास राजमाता जिजाऊ यांचे समाधी स्थळ पाचाडला खूप महत्त्व प्राप्त होईल हे नक्की.

आजच्या लेखाच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ जयंती महोत्सव साजरा करत असताना आज आपण त्यांच्या समाधी स्थळाची माहिती पहिली. तसेच भविष्यात पाचाड हे एक पर्यटन स्थल म्हणून का नावारुपास येणार आहे हे देखील पाहिले.

आमचा आजचा हा राजमाता जिजाऊ समाधी स्थळ माहिती हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा.आपल्याला अधिकची माहिती असल्यास कमेंट करा.आपली माहिती या लेखात मोलाची भर घालेल.धन्यवाद!


आमचे हे लेख वाचा 

अभ्यास कसा करावा

शेअर बाजारात होणाऱ्या चुका 

महात्मा ज्योतिबा फुले माहिती मराठी 

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची शिक्षण विभागात अंमलबजावणी 1 मे 2022 पासून 

आनंद कसा मिळवावा? 

शेअर बाजारात कायम नफा मिळवून देणारे काही शेअर्स 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area