राजमाता जिजाऊ दहा ओळी मराठी भाषण निबंध | rajmata jijau daha Oli marathi bhashan nibandh|rajamata jijau ten line speech and essay
नमस्कार ! शाळा,महाविद्यालयांमध्ये विविध जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम साजर होत असतात. अलीकडच्या काळात जर आपण पाहिले तर अनेक आई-वडील आपल्या मुलांनी शाळेमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रम व स्पर्धांमध्ये भाग घ्यावा. यासाठी कसोशीने प्रयत्न करतात. 12 जानेवारी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती. या दोन्हीही महान व्यक्तींच्या कार्याला सलाम देण्यासाठी राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती अगदी धुमधडाक्यात साजरी होत असते.
या जिजाऊ जयंतीच्या निमीत्ताने विद्यार्थ्यांना अगदी मोजके शब्दात परंतु शॉर्ट बट स्वीट( short but sweet) भाषण आणि निबंध याविषयी मार्गदर्शन करण्याचे काम आजच्या राजमाता जिजाऊ दहा ओळी मराठी भाषण,निबंध या लेखातून आम्ही करणार आहोत. राजमाता जिजाऊ यांचे दहा ओळींचे मराठी भाषण आणि निबंध छोटा वाटत असला तरी या दहा वाक्यांमधून किंवा ओळींमधून त्यांच्या संपूर्ण जीवनातील घडामोडी आपल्याला यातून समजतील. चला तर मग आजच्या लेखातून rajmata jijau daha oli bhashan nibandh पाहूया.
राजमाता जिजाऊ दहा ओळी मराठी भाषण निबंध |
जिजाऊ दहा ओळी भाषण निबंध (toc)
राजमाता जिजाऊ दहा ओळी निबंध आणि भाषण तयारी कशी करावी | rajmata jajau daha oli nibandh tayari Kashi karavi
आपल्याला राजमाता जिजाऊ निबंध या घटकाची तयारी करत असताना ,त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांच्या अगोदर नोंद करावी लागेल. साधारण घटना वगळून ठळक घटना आपल्याला या निबंधात घ्याव्या लागतील तरच आपला निबंध वजनदार होईल. त्याच पद्धतीने राजमाता जिजाऊ दहा ओळी भाषण तयार करत असताना आपली शब्द फेक प्रभावी वाटण्यासाठी आपण निवडलेले शब्द, भावनांनी ओतप्रोत भरलेले असावेत.असे केले तर राजमाता जिजाऊ दहा ओळींचे भाषण प्रेक्षक वर्ग अतिशय मन लावून ऐकेल. हे विवेचन सांगण्याचे तात्पर्य एवढेच की प्रचंड माहितीचे स्त्रोत आपल्यासमोर असताना त्यातील नेमकी माहिती वाचक आणि श्रोते यांना देणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्याला राजमाता जिजाबाई यांच्या विषयी माहिती देणारे जे भाषण आणि निबंध देत आहोत.ते पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच एक वेगळी दृष्टी मिळेल यात शंका नाही. आपण या घटकाची तयारी करत असताना या वरील सर्व बाबी लक्षात ठेवाव्यात. तर आपण भविष्यामध्ये छोटी छोटी भाषणे देऊन ख्यातनाम वक्ते देखील म्हणू शकता. चला तर मग आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया.
राजमाता जिजाऊ दहा ओळी मराठी भाषण निबंध | rajmata jijau daha Oli marathi bhashan nibandh |rajmata jijabai marathi speech and essay in ten line
राजमाता जिजाऊ यांच्या विषयी भाषण देत असताना सर्वप्रथम आपल्यासमोर असणारे व्यासपीठ आणि व्यासपीठांसमोर असलेल्या व्यक्ती कोण आहेत याचा अंदाज घेऊन भाषणाच्या आकर्षक सुरुवात करावी. जसे की -
नमस्कार! आज 12 जानेवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस तथा जयंती. राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यासाठी येथे उपस्थित असलेल्या मान्यवर मंडळी, माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीं त्याच बरोबर ,पालक वर्ग यांना सर्वप्रथम राजमाता जिजाऊ जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा! राजमाता जिजाऊ यांच्या विषयी मी माझे छोटे विवेचन आपणापुढे सादर करीत आहे हे विवेचन आपण शांतचित्ताने ऐकावे ही माझी विनंती! (अशी आकर्षक सुरुवात करा)
राजमाता जिजाऊ दहा ओळी भाषण व निबंध | rajmata jijau ten line marathi speech and essay
१. राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड या ठिकाणी 12 जानेवारी 1598 रोजी झाला.
२. राजमाता जिजाऊ अतिशय लहान असताना त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.
३. पती शहाजीराजे विविध मोहिमांवर असत. त्यावेळी शहाजीराजांच्या जहांगीऱ्यांची संपूर्ण जबाबदारी राजमाता जिजाऊ यांच्याकडे असे.
४. पुणे येथील जहांगीरीचा कारभार बघत बघत पुत्र शिवबा वरती संस्कार करण्याचे काम राजमाता जिजाऊ यांनी केले.
५.जसे पूर्वी रामराज्य होते तसे हिंदवी स्वराज्य निर्माण केले पाहिजे. अशी प्रेरणा त्या कायम शिवाजी महाराज यांना देत होत्या. त्यांच्या या संस्कारातच बाल शिवाजी घडत होते.
६. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये आपण असंख्य गुण पाहतो,परंतु कुठेतरी ते गुण राजमाता जिजाऊ यांच्याकडील शिकवणुकीमुळे वर संस्कार यातून आल्याचे दिसतात. अफजलखानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलून त्याचा खात्मा करावा ही योजना देखील राजमाता जिजाऊ यांचीच होती.
७. राजमाता जिजाऊ अतिशय धाडसी होत्या. शाहिस्तेखान हिंदवी स्वराज्यावर चाल करून आला होता त्यावेळी शिवाजी महाराज मोहिमेत व्यस्त असताना संपूर्ण स्वराज्याची जबाबदारी राजमाता जिजाऊ जातीने पाहत होत्या.
अशाच पद्धतीने सोप्या इंग्लिश मध्ये माहिती हवीय
राजमाता जिजाऊ दहा ओळी इंग्रजी निबंध व भाषण
८. राजमाता जिजाऊ अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. तानाजी मालुसरे स्वराज्याच्या कामी आल्यानंतर रायबाच्या लग्नासाठी स्वतः हजर होत्या.
९. राजमाता जिजाबाई यांच्याविषयी सांगायचे झाले तर
हिंदवी स्वराज्य निर्माण करण्या
ज्या राजमातेने मागे पुढे न पाहिले
स्वराज्याच्या कामी राजमाता जिजाऊने
शिवबाच्या रुपाने आपले काळीजच वाहिले
१०. अशा थोर पराक्रमी राजमातेस त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.
एवढे बोलून मी माझे राजमाता जिजाऊ अगदी छोटे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र.
राजमाता जिजाऊ दहा ओळी भाषण निबंध व्हिडिओ |rajmata jijau daha oli nibandh essay vedeo
अशा पद्धतीने आपण राजमाता जिजाऊ दहा ओळींचे भाषण प्रभावीपणे करू शकता. त्याचबरोबर छोट्या गटाला दिला जाणारा राजमाता जिजाऊ दहा ओळी निबंध देखील वरील वाक्यांच्या आधारे आपण अतिशय छानपणे लिहू शकता.
आमचा आजचा हा छोट्या बाळगोपाळांसाठी लिहिलेला rajmata jijau daha Oli marathi bhashan nibandh आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.