Type Here to Get Search Results !

प्रजासत्ताक दिन मराठी कविता |republic day marathi poem

प्रजासत्ताक दिन मराठी कविता |republic day marathi poem|26 जानेवारीसाठी मराठी कविता |26 januaray marathi poem kavita

आपण यावर्षी 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिनाच्या भव्य - दिव्य कार्यक्रमांमध्ये प्रत्येकालाच आपापल्या पद्धतीने आपले काहीतरी योगदान असावे असे वाटत असते. म्हणून तर काही विद्यार्थी 26 जानेवारी तथा प्रजासत्ताक दिनाच्या निबंध लेखन स्पर्धेमध्ये भाग घेतात. काही विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा,भाषण स्पर्धा यामध्ये भाग घेतात. तर काही विद्यार्थी आर एस पी स्काऊट गाईड यांच्या माध्यमातून आपली देशभक्ती, देशप्रेम दाखवत असतात.जे सर्जनशील आणि कवी मनाचे असतात ते विद्यार्थी मात्र प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये आपल्या कवितांच्या माध्यमातून एक बहार आणत असतात.नवकवी यांना प्रेरित करण्यासाठी आम्ही आज आपणासाठी प्रजासत्ताक दिन मराठी कविता घेऊन आलेलो आहोत.या कवितेला आपण 26 जानेवारीसाठी मराठी कविता अशी देखील म्हणू शकता. चला तर मग republic day marathi  poem आपण पाहूया.


प्रजासत्ताक दिन मराठी कविता
प्रजासत्ताक दिन मराठी कविता


प्रजासत्ताक दिन कविता (toc)


कवी मन आणि कविता | kavi man ani kavita

विद्यार्थी मित्रांनो! आपण जर कवितेच्या प्रांगणामध्ये नवीन असाल तर आम्ही आपणाला सांगू इच्छितो की, मैदानामध्ये क्रिकेट खेळणारा सचिन एकादाच असू शकतो.सर्वजण सचिन बनू शकत नाहीत. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला जर एक कवी म्हणून आपली ओळख निर्माण करायची असेल तर आपल्या जवळ कवी मन असावे.एखादा विद्यार्थी अभ्यासामध्ये खूप हुशार आहे.म्हणून तो चांगली कविता करू शकेल मात्र असे अजिबात नसते. कारण कविता  करण्यासाठी रचण्यासाठी आपल्याजवळ ती कवीची दृष्टी असावी. घडलेल्या घटनेकडे पाण्यासाठी आणि ती घटना शब्दांमध्ये मांडण्यासाठी आपली शब्दांवरती पकड असावी. थोडक्यात आपल्याला वाटते तेवढे कविता करणे सोपे नाही.

सरावातून कविता फुलते | sarav ani kavita 

आपण पाहिले की आपल्याला कविता रचण्यासाठी आपल्याजवळ कवी मन हवे तरच आपण कविता करू शकतो.असे जरी असले तरी आपण जर शब्दांशी खेळ खेळू लागलो तर सरावातून देखील आपली कविता फुलू शकते. सुरुवातीला आपण केलेल्या रचना एखाद्या पाठासारख्या म्हणजेच गद्य वाटू शकतात. परंतु हळूहळू आपण त्यांच्या रचनांचा अभ्यास केला.यमक अलंकार, अतिशयोक्ती अलंकार अशा इतर अलंकारांचा अभ्यास केल्यानंतर आपली कविता बहरू शकते यात शंका नाही.

प्रजासत्ताक दिन मराठी कविता |republic day marathi poem 


 प्रजासत्ताक दिन कविता |
 prajasattak dinachi कविता 


भारताचा खरे विजयपर्व प्रजासत्ताक दिन आहे


स्वतंत्र  भारताची ती एक ओळख आहे

 

लाखो लोकांना ज्याने दिला आत्मसन्मान 


तेच आहे आपले भारतीय संविधान


हवा त्याचा आपल्याला अभिमान 


चला वाढवू भारत मातेची शान.


इंग्रजांच्या दीडशे वर्षाच्या गुलामीतून


  देश  आपुला स्वतंत्र झाला 


स्वातंत्र्य,समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता


 घेऊनी हा प्रजासत्ताक दिन आला 


ज्यांनी दिली या भारत देशासाठी 


आपुल्या प्राणांची आहुती 


व्यर्थ न जावो  त्यांची राष्ट्रभक्ती


आता कुठे भेदभाव दिसणार नाही कारण


भारताचे संविधान आता पसरले लवलाही 


आला आला प्रजासत्ताक दिन आला 


समता व मानवतेची तुतारी वाजवीत आला 


चला चला आज प्रजासत्ताक दिन आला 


वंदू त्या भारतीय संविधानाला 


नि आसमंतात डौलाने फडकणाऱ्या तीरंग्याला.


प्रजासत्ताक दिनाच्या कवितेचे सादरीकरण | praja sattak dinachya kaviteche sadrikaran |republic day poem presentation

आपल्याला प्रजासत्ताक दिनाची कविता सादर करत असताना, हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रजासत्ताक दिन हा एक राष्ट्रीय उत्सव आहे आपल्याला एका आवेशात कवितेचे सादरीकरण करावे लागणार आहे. आपण करीत असलेल्या शब्दफेकीतून समोरच्या व्यक्तीमध्ये उत्स्फूर्त राष्ट्रभक्ती निर्माण झाली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने तिला पण प्रजासत्ताक दिनाची कविता म्हणू शकतो.

प्रजासत्ताक दिन मराठी कविता pdf |republic day marathi poem pdf 

आपल्याकडे आमची ही प्रजासत्ताक दिनाची मराठी कविता कायमस्वरूपी संग्रही राहावी यासाठी आम्ही आपल्याला ती पीडीएफ स्वरूपात देत आहोत. आपण ती कायम संग्रही ठेवावी तसेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शुभेच्छा देत असताना या कवितेच्या माध्यमातून देखील आपले मित्र मंडळ यांना शुभेच्छा देऊ शकता.

प्रजासत्ताक दिन मराठी कविता pdf

                     DOWNLOAD 


अशा पद्धतीने आपण प्रजासत्ताक दिनाची मराठी कविता स्वतः देखील तयार करून 26 जानेवारी कविता कार्यक्रम यामध्ये सादर करू शकता. republic day marathi poem आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!


आमचे २६जानेवारी विशेष अप्रतिम लेख 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area