सावित्रीबाई फुले दहा ओळींचे भाषण | savitribai phule daha olinche bhashan
आजच्या लेखात आपण सावित्रीबाई फुले यांचे दहा ओळींचे भाषण पाहणार आहोत.सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला साजरी केली जाते म्हणून याला सावित्रीबाई जयंती दहा ओळींचे भाषण देखील म्हणता येईल.तसेच सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो त्या अर्थाने याला आपण बालिका दिन दहा ओळींचे भाषण म्हणून देखील कार्यक्रमात सादर करू शकता.
बालिका दिन छोटे भाषण (toc)
बालिका दिन /सावित्रीबाई फुले जयंती दहा ओळी भाषण | balika din daha olinche bhashan
१.अध्यक्ष ,महाशय,गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बाल मित्र आणि मैत्रिणींनो आज मी आपणास सावित्रीबाई फुले जयंती / बालिका दिन निमित्त अगदी दहा च वाक्यात माझे भाषण सांगणार आहेत तरी आपण शांत चित्ताने ते ऐकावे
२.सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३जानेवारी १८३१ रोजी झाला.
३.सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिन सर्वत्र बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.
४.सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या ८व्या वर्षी महात्मा फुले यांच्याशी झाला.
५.महात्मा फुले यांनी आपले सामाजिक कार्य करीत असताना आपली पत्नी सावित्रीबाई यांच्यावर मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी दिली
६.सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्याकडून शिक्षण घेऊन पुणे या ठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली
७.सावित्रीबाई फुले यांनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला.
८. १८७६ साली सावित्रीबाई फुले यांनी कुमारी माता व विधवा माता यांच्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
@बालिका दिन दहा ओळींचे सोपे इंग्रजी भाषण
९. सावित्रीबाई एक कवयित्री देखील होत्या त्यांनी काव्यफुले हा कविता संग्रह रचला.त्यातील तयास मानव म्हणावे का ही कविता खूप गाजली
१०. सावित्रीबाई फुले यांचा प्लेगच्या रुग्णाची सेवा करताना संसर्ग झाल्याने मृत्यू झाला.
एवढे बोलून मी माझे सावित्रीबाई फुले जयंती / बालिका दिन भाषणाला विराम देतो/देते.
सावित्रीबाई फुले दहा ओळी भाषण व्हिडिओ
सावित्रीबाई फुले शैक्षणिक व सामाजिक विचार
सामान्य माणूस आणि शेअर मार्केट