सावित्रीबाई फुले यांची गाजलेली कविता | savitribai phule yanchi gajleli prashiddh kavita | famous marathi poem in savitribai phule | tayas manav mhnave ka kavita
बालिका दिन साजरा करत असताना आज आपण सावित्रीबाई फुले यांची स्वरचित कविता तयास मानव म्हणावे का? पाहणार आहोत
या कवितेत मानव कोणाला म्हणावे याविषयी सावित्रीबाई बोलत आहेत या व्यवस्थेवर टीका करत आहेत चला तर मग तयास मानव म्हणावे का? कविता पाहूया.
सावित्रीबाई फुले यांची गाजलेली कविता |
तयास मानव म्हणावे का सावित्रीबाई फुले यांची कविता | Tayas manav mhnave ka? savitribai phule kavita|
तयास मानव म्हणावे का?
ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का?
दे रे हरी पलंगी काही
पशूही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार नाही
तयास मानव म्हणावे का?
पोरे घरात कमी नाहीत
तयांच्या खाण्यासाठीही
ना करी तो उद्योग काही
तयास मानव म्हणावे का?
सहानुभूती मिळत नाही
मदत न मिळे कोणाचीही
पर्वा न करी कशाचीही
सावित्रीबाई फुले यांची कविता | savitribai phule yanchi kavita
तयास मानव म्हणावे का?
दुसऱ्यास मदत नाही
सेवा त्याग दया माया नाही
जयापाशी सदगुण नाही
तयास मानव म्हणावे का?
ज्योतिष रमल सामुद्रीकही
स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशुत नाही त्या जो पाही
तयास मानव म्हणावे का?
बाईल काम करीत राही
ऐतोबा हा खात राहतो
पशू पक्षात ऐसे नाही
तयास मानव म्हणावे का?
पशु-पक्षी माकड माणुसही
जन्ममृत्यु सर्वा नाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव म्हणावे का?
आमचा आजचा सावित्रीबाई फुले यांची कविता हा लेख आपल्याला नक्की आवडेल.
हे लेख एकदा जरूर वाचा
सावित्रीबाई फुले शिक्षणविषयक अवतरणे (विचार)