Type Here to Get Search Results !

स्वामी विवेकानंद दहा ओळींचे भाषण | swami vivekananda daha olinche bhashan

स्वामी विवेकानंद दहा ओळींचे भाषण | swami vivekananda daha olinche bhashan |swami vivrkananda speech in marathi ten line  

स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारीला संपूर्ण भारतभर अगदी उत्साहाने साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आपण युवक दिन म्हणून साजरा करतो. शाळा महाविद्यालयामध्ये युवक दिन साजरा करत असताना अनेक वेगवेगळे विविध उपक्रम राबवले जातात.जसे की स्वामी विवेकानंद निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,वाद विवाद स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा आणि सर्वांच्या आवडीच्या भाषण स्पर्धा होय. या उपक्रमांपैकीच एक उपक्रम म्हणजे भाषण स्पर्धा. या भाषण स्पर्धेत भाग घेण्याचा लहानग्यांना तर खूपच उत्साह असतो.पालक  वर्ग देखील आपल्या मुलांनी भाषणात भाग घ्यावा यासाठी उत्साही असतात.स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार शब्दरुपी माळेत ओवण्यासाठी भाषण हे कौशल्य खूप कामी येते. म्हणूनच आज स्वामी विवेकानंद दहा ओळींचे भाषण मराठी आपण पाहणार आहोत.

स्वामी विवेकानंद दहा ओळींचे भाषण
स्वामी विवेकानंद दहा ओळींचे भाषण



स्वामी विवेकानंद भाषण (toc)


स्वामी विवेकानंद दहा ओळींचे भाषण | swami vivekananda daha olinche bhashan |युवक दिन दहा ओळींचे भाषण | स्वामी विवेकानंद छोटे भाषण मराठी 

स्वामी  विवेकानंद दहा ओळींचे भाषण तयार करत करत असताना आपल्याला या भाषणांमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरती प्रकाश टाकणाऱ्या अतिशय महत्वपूर्ण बाबी नोंद करून घ्यावे लागतील. जरी हे swami vivekananda bhashan daha oli असे जरी आपण याला म्हणत असलो तरी भाषणातील प्रत्येक शब्द ना शब्द अतिशय वजनदार असायला हवा. शॉर्ट बट स्वीट (short but sweet) असे स्वामी विवेकानंद यांचे छोटे भाषण असे देखील आपण याला म्हणू शकतो. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीतील स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती सांगणारी महत्त्वाची 10 वाक्य आम्ही सांगत आहोत. आपल्याकडे या व्यतिरिक्त माहिती असेल तर आपण ती देखील यामध्ये ऍड करू शकता. चला तर मग विवेकानंदांचे दहा ओळींचे भाषण पाहूया.


विवेकानंद दहा वाक्यांचे भाषण | vivekanada daha vakyanche bhashan 

आपण आज पाहत असलेले भाषण स्वामी विवेकानंद भाषण याला पण दहा ओळींचे किंवा दहा वाक्यांचे भाषण देखील म्हणू शकतो.swami vivekanada daha olinche bhashan 


१. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकाता या ठिकाणी झाला.



२. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. शालेय जीवनात स्वामी विवेकानंद अतिशय  कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते.



३. स्वामी विवेकानंद यांना अभ्यासाबरोबर घोडेसवारी,लाटी युद्ध ,वादन ,गायन यांची देखील आवड होती थोडक्यात स्वामी विवेकानंद यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते.



4. स्वामी विवेकानंद महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला तो प्रश्न म्हणजे या जगामध्ये ईश्वर आहे का? आणि असेल तर त्याला कोणी पाहिले आहे का?



५. स्वामी विवेकानंद यांनी ईश्वराचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मी ईश्वराला पाहिले आहे! असे म्हणणारा त्यांना कोणीही भेटला नाही. यामुळे स्वामी विवेकानंद हाताश झाले.



६. एके दिवशी स्वामी विवेकानंद यांची रामकृष्ण परमहंस यांच्याशी भेट झाली. या भेटीनंतर स्वामी विवेकानंद यांना अध्यात्मिक उन्नतीचा एक नवा  मार्ग सापडला.नरेंद्र आता विवेकानंद बनले.




७. रामकृष्ण परमहंस यांच्या मार्गदर्शनानंतर अध्यात्माला लोकसभेची जोड असावी असा विचार स्वामी विवेकानंद यांना सुचला आणि म्हणूनच त्यांनी सेवाभावी कार्य करण्यासाठी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.


@@स्वामी विवेकानंद दहा ओळींचे इंग्रजी भाषण 



८. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे शिकागो येथे भरलेली सर्वधर्म परिषद या परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद भाषणाला उठले आणि त्यांनी येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो असे आपल्या भाषणाची सुरुवात करून सर्वांची मते जिंकली.



९. विवेकानंद यांनी मांडलेला विश्वबंधुत्वाचा विचार सर्वांनाच पटला. संपूर्ण युरोपीय राष्ट्रांमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या विषयी प्रचंड आदर वाढला.


१०. स्वामी विवेकानंद तत्त्वज्ञ होते त्याच पद्धतीने लेखक देखील होते प्रेमयोग , राजयोग व कर्मयोग अशा प्रसिद्ध ग्रंथांचे लेखन स्वामी विवेकानंद यांनी केले.



अशा पद्धतीने आपण स्वामी विवेकानंद यांच्या विषयी दहा ओळींमध्ये आपले विचार मांडू शकता. विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांची छोटी भाषणे प्रचंड आवडतात. हे स्वामी विवेकानंद यांचे दहा ओळींचे भाषण वाद विवाद स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा गाजवत असताना विद्यार्थ्यांना नक्कीच कामे येऊ शकते. 

स्वामी विवेकानंद भाषण व्हिडिओ | swami vivekananda bhashan video 



आमचा आजचा हा swami vivekananda daha olinche bhashan हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.

स्वामी विवेकानंद भाषण पीडीएफ | swami vivekananda marathi speech pdf |युवक दिन भाषण pdf 

              DOWNLOAD


याच  पद्धतीने आपण स्वामी विवेकानंद दहा ओळींचे इंग्रजी भाषण देखील तयार करू शकता. ही छोटी छोटी भाषणे विद्यार्थ्यांना व्यासपीठावर उभे राहून बोलण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करायला अतिशय मदत करतात. इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांचे दहा ओळींचे भाषण नक्कीच आवडेल. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद! 


आमचे हे लेख वाचा 


स्वामी विवेकानंद जयंती प्रभावी सूत्रसंचालन   


स्वामी विवेकानंद यांचे शैक्षणिक तत्वज्ञान /विचार 



 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area