स्वामी विवेकानंद मराठी कविता | swami vivekananda marathi kavita |swami vivekananda poem in mrathi |युवक दिन कविता |yuav din marathi poem
नमस्कार ! आपण स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारीला अतिशय उत्साहात साजरी करतो. विवेकानंद यांनी तरुण पिढीसाठी दिलेले योगदान अतिशय मोलाचे आहे. म्हणूनच त्यांचा जन्मदिन आपण युवक दिन म्हणून साजरा करतो. या युवक दिनाच्या दिवशी अनेक ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम होतात. वक्तृत्व स्पर्धा, भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा यासारख्या स्पर्धा देखील होतात. अशीच एक आगळीवेगळी स्पर्धा म्हणजे काव्यवाचन स्पर्धा म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण स्वामी विवेकानंद मराठी कविता पाहणार आहोत.
स्वामी विवेकानंद मराठी कवितेच्या माध्यमातून विवेकानंद यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना मांडून कवितेतून स्वामी विवेकानंद समजावून देण्यासाठी swami vivekananda marathi kavita देत आहोत.ही एक छोटीसी कविता विवेकानंद यांना जाणून घ्यायला नक्कीच आपल्याला मदत करेल. स्वामी विवेकानंद यांना कवितेतून समजावून घेऊया.ही कविता आपण युवा दिन कविता म्हणून देखील सादर करू शकता.
स्वामी विवेकानंद मराठी कविता |
स्वामी विवेकानंद कविता (toc)
स्वामी विवेकानंद मराठी कविता सादरीकरण | swami vivekananda marathi kavita sadrikaran |Swami vivekananda poem in mrathi
कवी किती प्रतिभा संपन्न आहे.यापेक्षा तो आपण रचलेली कविता कशा पद्धतीने सादर करतो हे तितकेच महत्त्वाचे आहे. आजची स्वामी विवेकानंद मराठी कविता ही गद्य स्वरूपासारखी वाटत असली तरी ,आपण हिला चाल देखील लावू शकता. परंतु सादरीकरण करत असताना आपण स्वामी विवेकानंदांचा परिचय या कवितेतून करून देत आहोत अशी शब्द फेक असायला हवी. चला तर मग स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी अतिशय अप्रतिम कविता बघूया.
राजमाता जिजाऊ दहा ओळींचे मराठी भाषण व निबंध
स्वामी विवेकानंद मराठी कविता | swami vivekananda marathi kavita |vivekananda poem in marathi
स्वामी विवेकानंद हे अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्याचबरोबर हिंदू संस्कृतींचा अतिशय गाडा अभ्यास त्यांचा होता. शिकागो धर्म परिषदेमध्ये त्यांनी हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे पटवून दिले. भारतातल्या तरुणांनी कशा पद्धतीने राष्ट्र विकासात हातभार लावावा. यासाठी देखील प्रयत्न केले. ही सर्व त्यांची महत्त्वाची कामगिरी आपण आता कवितेच्या रूपात पाहूया.
स्वामी विवेकानंद कविता
आज आहे 12 जानेवारी
स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन
का होता तुम्ही हवालदिलं अहो
जरा त्यांना ऐका,थांबेल मनातील घालमेल
असं म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी
स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे पालन करून
आपण होऊ यशाचे मानकरी
विवेकानंदांचे कार्य इतके महान की
जन्मदिन साजरा होतो युवक दिन म्हणुनी
कशाला जाता काट्याकुट्यातूनी
चला जाऊ स्वामी विवेकानंदांच्या वाटेवरूनी
देव आहे की नाही या शोधात ते निघाले
या तरुणाईसाठी देवासम बनुनी अवतरले
आत्मविश्वास व प्रेरणा ज्यांनी अखंड भारतास दिल्या
आमच्या मनात यशाच्या आशा त्यांनी जागवल्या
शिकागो धर्म परिषदेत ज्यांनी
भाषणाची सुरुवात केली माझ्या बंधू आणि भगिनी
विश्वबंधुत्वाची ही हाक पाहुनी
भारतीय संस्कृतीची मान उंचावली
किती आले किती गेले
किती येतील किती जातील
परी स्वामी विवेकानंद
आता होणे नाही
स्वामी विवेकानंद जयंती निमित्त या स्वरचित कवितेतून खूप खूप शुभेच्छा!
आमची स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरती प्रकाश टाकणारी स्वामी विवेकानंद मराठी कविता आपल्याला कशी वाटली. आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद !