स्वामी विवेकानंद निबंध मराठी | swami vivekananda nibandh in marathi
भारतामध्ये ज्यांना एक दैवी पुरुष किंवा योगी पुरुष म्हणून गणले जाते ते म्हणजे स्वामी विवेकानंद होय. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर युवक दिन म्हणून साजरा केला जातो. या युवक दिनाच्या दिवशी शाळा कॉलेजेस महाविद्यालय यांच्यामध्ये विविध कार्यक्रमांच्या आयोजन केले जाते. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा यांच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समजून घेतले जातात. स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आपण देखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास सर्वांगाने करण्यासाठी आज आपण स्वामी विवेकानंद निबंध मराठीत पाहणार आहोत.
स्वामी विवेकानंद निबंध मराठी |
स्वामी विवेकानंद निबंध (toc)
Swami Vivekananda nibandh in marathi म्हटल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम स्वामी विवेकानंद यांच्या विषयी वर्तमानपत्रे, कात्रणे, विविध लेख यातील माहिती संकलित करावी लागेल. संकलित केलेल्या माहितीच्या आधारे स्वामी विवेकानंद हा मराठी निबंध आपल्याला प्रभावीपणे लिहिण्यासाठी या माहितीची नक्कीच मदत होईल. एखाद्या थोर व्यक्तीची माहिती लिहिणे हा माहितीपर निबंध असतो. अगोदर त्या व्यक्तीचा जन्म त्या व्यक्तीने केलेली मुख्य कार्य निबंधातून उलघडून दाखवावी त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती हवी. लागतात.चला तर मग swami vivekanand essay in marathi पाहूया.
स्वामी विवेकानंद निबंध मराठी १ | swami vivekananda nibandh in marathi 1
पाश्चात्य आणि पौरात्य राष्ट्रांमध्ये भारतीय संस्कृती आणि विश्वबंधुत्वाची शिकवण देणारा हिंदू धर्माची ध्वजा युरोपियन राष्ट्रांमध्ये सन्मानाने फडकवणारा एक आध्यात्मिक नेता अशी ज्यांची संपूर्ण जगाला ओळख आहे ती व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद होय.
संपूर्ण भारतात ज्यांच्या वक्तृत्वाने नवयुवकांना प्रेरणा दिली नवयुवकच राष्ट्राचे खरे भाग्यविधाते आहेत याची जाणीव नवयुकांना करून दिली ती म्हणजे स्वामी विवेकानंदांनी. अखिल मानव जातीचे प्रश्न समजून घेण्यासाठी ज्या व्यक्तीने संपूर्ण भारतभ्रमण केले आणि आता अंधारात असलेल्या भारतीयांनी काय केले पाहिजे याविषयी प्रवचनाच्या माध्यमातून खरे समाज प्रबोधन केले ती थोर व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद होय.
भारतीयांचे दुःख समजावे, सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजून घेता याव्यात यासाठी स्वामी विवेकानंद 1890 साली संपूर्ण भारत फिरले. संपूर्ण भारत भ्रमण केल्यानंतर आपली अस्मिता गमावलेली भारतीय जनता,तरुण वर्गाचा नाकर्तेपणा याविषयी स्वतःचे एक वेगळी मांडणी करून भारतीय जनतेला आत्मविश्वास देण्याचे काम स्वामी विवेकानंद यांनी केले.
@ स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन
स्वामी विवेकानंद यांनी अजून एक महत्वाची कामगिरी केली ती म्हणजे 1893 साली अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी जागतिक सर्वधर्म परिषद भरली होती या सर्वधर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचे तथा संपूर्ण भारतीयांचे प्रतिनिधी म्हणून वैदिक संस्कृती आणि आपला हिंदू धर्म याविषयी आपले विचार प्रस्तुत करणार होते. स्वामी विवेकानंद यांचा भारतीय संस्कृती विषयी असणारा अभ्यास अतिशय दांडगा होता. विवेकानंद यांनी शिकागो धर्म परिषदेत आपल्या भाषणाची सुरुवात येथे जमलेल्या बंधू आणि भगिनींनो अशी करून एक प्रकारे आमची भारतीय संस्कृती विश्वबंधुत्व जपणारी संस्कृती आहे.अशा अंगाने त्यांनी आपल्या व्याख्यानाची मांडणी केली आणि संपूर्ण जगाला दाखवून दिले की भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. त्यामध्ये प्रसिद्ध असलेले स्वामी विवेकानंद या घटनेमुळे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले हिंदू संस्कृतीचा सर्वांना हेवा वाटू लागला या शिकागो धर्म परिषदेनंतर अनेक पाश्चात्य संस्कृती अभ्यासक या हिंदू धर्माचा अभ्यास करू लागले. याचे सर्व श्रेय स्वामी विवेकानंद यांना जाते. स्वामी विवेकानंद यांचे शिकागो धर्म परिषदेत एक भाषण त्याला डोळ्यात अंजन घालायला लावणारे आहे.
स्वामी विवेकानंद एक अलौकिक व्यक्तिमत्त्व होते ही त्यांची वरील कामगिरी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलेच. त्यांच्या लहानपणा विषय सांगायचे झाले तर स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त. स्वामी विवेकानंद अतिशय बुद्धिमान होते. त्याचबरोबर खोडकर देखील होते. कुस्ती , घोडे सवारी यातदेखील ते तरबेज होते. स्वामी विवेकानंद यांनी बीएपर्यंत शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना नोकरी व्यवसाय करण्यामध्ये रस वाटत नव्हता. विवेकानंद लहानपणापासूनच आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. धर्मग्रंथांचे त्यांनी वाचन केले होते. या जगात ईश्वर आहे का? हा प्रश्न त्यांना प्रचंड भेडसावत होता. या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधासाठी त्यांनी अनेकांशी चर्चा देखील केली परंतु त्यांना कायम निराशा आली. एके दिवशी त्यांची रामकृष्ण परमहंस यांच्याशी भेट झाली
रारामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंदांची आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी प्रयत्न केले. ईश्वर आहे की नाही या शोधामध्ये रस्ता भरकटलेले स्वामी विवेकानंद यांना एका अध्यात्मिक उंचीवर नेण्याचे काम रामकृष्ण परमहंस यांनी केले. स्वामी विवेकानंद यांना रामकृष्ण परमहंस भेटले ते एखाद्या परिसासारखे. गुरु रामकृष्ण परमहंस यांच्यामुळे स्वामी विवेकानंद अध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक उंची प्राप्त करू शकले.
#राजमाता जिजाऊ जयंती आदर्श फलक लेखन
अध्यात्माला लोकसेवेची जोड असली पाहिजे असे तत्त्वज्ञान स्वामी विवेकानंद यांनी मांडले आणि यासाठीच त्यांनी रामकृष्ण परमहंस आणि रामकृष्ण मठाची स्थापना केली. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून शाळा महाविद्यालय कॉलेज सुरू केली आजही ती सुरू आहेत. लोकसेवेला त्यांनी प्राधान्य दिले.त्या काळात समाजात असणाऱ्या अनेक अनिष्ट प्रथा यांना कडाडून विरोध करण्याचे काम स्वामी विवेकानंद यांनी केले.
स्वामी विवेकानंद तत्त्वज्ञ होते.त्याच पद्धतीने एक उत्तम लेखक देखील होते. विवेकानंद यांनी उदारमतवादी सहिष्णुता भावनेने अनेक भूतदयावादी ग्रंथांचे लेखन केले.राज योग, भक्ती योग व प्रेम योग यासारख्या ग्रंथांचे लेखन स्वामी विवेकानंद यांनी केले. स्वामी विवेकानंद यांचे विचार इतके लोकांना भाववत होते की त्यामुळे अमेरिका इंग्लंड मधील अनेक विचारवंत त्यांच्या विचारांनी भारावून जात होते. सिस्टर निवेदिता या परदेशी विदूषणे राष्ट्रीय हिंदू धर्म या ग्रंथाचे लेखन स्वामी विवेकानंद यांच्यापासून प्रेरणा घेऊन गेले होते.
असा अवलिया भारतामध्ये जन्माला आला हे भारताचे परमभाग्य . वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी स्वामी विवेकानंद यांचे चार जुलै 1902 रोजी महापरिनिर्वाण झाले. म्हणजेच स्वामी विवेकानंद यांनी या दिवशी जगाचा निरोप घेतला.
अशा पद्धतीने स्वामी विवेकानंद निबंध मराठी आपण लिहू शकता. आपली मांडणी ही वाचकाला खेळवून ठेवणारी असेल तर तो निबंध लोकांना आवडतो. वर दिलेल्या swami vivekananda nibandh in marathi पाहिल्यानंतर आपल्या ते ध्यानात आलेच असेल. निबंध लिहिण्याची प्रत्येकाची हातोटी वेगळी असते. आता आपण स्वामी विवेकानंद निबंध मराठी नमुना एक पहिला आता अजून कशा पद्धतीने हा निबंध लिहिता येईल यासाठी आपण दुसरा नमुना पाहूया.
स्वामी विवेकानंद निबंध मराठी 2 | swami vivekananda nibandh in marathi 2
निबंध लेखन हे कौशल्य आहे. निबंध लिहीत असताना केवळ माहिती देणे हा उद्देश नसून विद्यार्थ्याला त्याच्या जवळ असलेली माहिती किती प्रभावीपणे सादर करता येते याचे मूल्यमापन करण्यासाठी निबंध लेखन या लेखन कौशल्याचा उपयोग केला जातो. आपण अगोदर पाहिलेला स्वामी विवेकानंद निबंध मराठी एक आणि आता आपण पाहणार आहोत तो स्वामी विवेकानंद मराठी निबंध क्रमांक दोन हा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की दोन्ही ठिकाणची माहिती वेगवेगळी आहे परंतु निबंध वाचावासा वाटतो चला तर मग swami vivrkananda essay in marathi 2 पाहूया.
हिंदू धर्म आणि हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान भारतालाच नव्हे तर पाश्चात्य जगाला देखील पटवून देण्याचे काम ज्या महान व्यक्तीने केले असा महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद होय. अध्यात्माला लोकसभेची जोड असेल तर कोणत्याही राष्ट्राची प्रगती अतिशय झपाट्याने होते असे विचार ज्यांनी मांडले ते म्हणजे स्वामी विवेकानंद होय.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्त्याचे प्रसिद्ध वकील विश्वनाथ दत्त आणि त्यांची पत्नी भुवनेश्वरी यांच्या पोटी झाला. स्वामी विवेकानंदांचे वडील आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते साहजिकच स्वामी विवेकानंद यांच्यावरती त्यांच्या वडिलांच्या आध्यात्मिक प्रवृत्तीचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात दिसतो. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्र होय. नरेंद्र एक अतिशय बुद्धिमान आणि हुशार विद्यार्थी म्हणून त्यांच्या शाळा महाविद्यालयांमध्ये प्रसिद्ध होते. नरेंद्र केवळ अभ्यासातच हुशार होते असे नाही तर इतर कला कौशल्य करण्यामध्ये देखील नरेंद्र अतिशय दक्ष होते.
स्वामी विवेकानंद यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच पाश्चात्त्य आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा अतिशय बारकाव्याने अभ्यास केला. हा अभ्यास करत असताना त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न त्यांना सतत भेडसावत होता.' जगामध्ये ईश्वर आहे का?' या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेत असताना त्यांची खूप ससे होलपट झाली. अनेक विद्वान अभ्यासक पंडित यांच्याशी चर्चा करून त्यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर ते शोधत होते. परंतु त्यांना कोणी समाधानकारक उत्तर दिले नाही म्हणून त्यांच्याकडे प्रचंड नैराश्य आले ते नैराश्य इतके प्रचंड होते की विवेकानंद आता नास्तिक बनतील की काय? अशी त्यांच्या मनाची घालमेल सुरू होती.
एके दिवशी 1882 मध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रचंड ज्ञान असलेले रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांची भेट झाली. स्वामी विवेकानंद यांनी त्यांना पडणारा प्रश्न रामकृष्ण परमहंस यांना विचारला. नंतर खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंद यांची खडतर साधना सुरू झाली. स्वामी विवेकानंद यांचे आध्यात्मिक उंची वाढत गेली. स्वामी विवेकानंद यांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे आता त्यांना या साधनेतून मिळू लागली. साहजिकच स्वामी विवेकानंद स्वतंत्र असे आपले तत्त्वज्ञान मांडू लागले.
अध्यात्माला लोकसेवेची जोड असली पाहिजे असा विचार त्यांनी मांडला. आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून तो विचार जन माणसांमध्ये पोहोचवण्याचे काम स्वामी विवेकानंद यांनी केले. स्वामी विवेकानंद यांच्या महाविद्यालय शिक्षणाविषयी सांगायचे झाले तर स्वामी विवेकानंद 1881 मध्ये डफ कॉलेजातून बी ए ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. बी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी संन्यासी मार्ग पत्करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी संन्याशी बोलण्याचे आपले मित्र, मंडळी, नातेवाईक यांना सांगताच सुरुवातीला त्यांना त्यांचे हसू झाले. स्वामी विवेकानंद यांचा निग्रह पाहून सर्वजण अवाक झाले. 6 ऑगस्ट 1886 ला रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाले.
आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे जे लोकसेवेचे कार्य होते ते पुढे चालू ठेवण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी गुरुबंधूंचा एक महासंघ स्थापन केला. संघाच्या माध्यमातून रामकृष्ण मठाची स्थापना केली. शाळा महाविद्यालय कॉलेजेस सुरू करून गोरगरिबांना शिक्षण देण्याचे काम या रामकृष्ण मठाच्या माध्यमातून केले. स्वामी विवेकानंद केवळ रामकृष्ण मठ थांबून त्यावरच थांबले नाहीत तर संपूर्ण भारताचा उद्धार झाला पाहिजे या प्रेरणेने स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करू लागले. आता बरोबर हिमालय तिबेट अशा ठिकाणी देखील त्यांनी संचार केला. हिंदू धर्म आणि हिंदू धर्माचे उदार तत्त्वज्ञान याविषयी त्यांनी प्रवचन आणि व्याख्यानांच्या माध्यमातून लोकांना साक्षात्कार घडवला.
हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती यांचा त्यांचा गाडा अभ्यास पाहून त्यांना शिकागो या ठिकाणी सर्वधर्म परिषदेचे आमंत्रण देण्यात आले. शिकागो धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी हिंदू संस्कृती हिंदू धर्म यांचे श्रेष्ठत्व सर्वांना पटवून दिले. या शिकागो धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या विषयी एक किस्सा सांगितला जातो तो म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भाषणाची मांडणी करत असताना इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो! अशी सुरुवात पाहताच तेथे उपस्थित असणारे इतर राष्ट्रांचे प्रतिनिधी त्यांच्या भुवया उंचावल्या. खरोखरच हिंदू संस्कृती किती श्रेष्ठ आहे की जी संस्कृती आपल्याला विश्वबंधुताची शिकवण देते. यानंतर स्वामी विवेकानंद यांचे अनेक अनुयायी युरोपियन राष्ट्रांमध्ये बनले. त्यामध्ये असणारी त्यांची ख्याती आता सातासमुद्रा पल्याड गेली.
स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषदेनंतर कलकत्त्याला परत आले. आपले काम रामकृष्ण परमोद च्या माध्यमातून चालू ठेवले .काही दिवसांनी स्वामी विवेकानंद यांना प्रकृती अस्वास्थ्याचा सामना करावा लागला. स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या अनुयायांना एकत्र केले आणि रामकृष्ण परमहंस यापुढे कशा पद्धतीने काम करेल यासाठी कामाची विभागणी करून दिली. वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी 4 जुलै 1902 रोजी स्वामी विवेकानंद यांनी जगाचा निरोप घेतला. स्वामी विवेकानंद यांची समाधी पश्चिम बंगाल येथील बेलूर मठ या ठिकाणी आहे.
खरोखरच आपल्या भारतामध्ये जे अनेक महान व्यक्ती जन्माला आले त्या महान व्यक्तींमध्ये त्यांचे नाव अगदी अग्रक्रमाने घ्यावी अशी व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद.
स्वामी विवेकानंद निबंध मराठी vedeo |swami vivrkananda nibandh marathi vedo
अशा पद्धतीने आपण स्वामी विवेकानंद निबंध मराठी लिहू शकता. हा निबंध लिहीत असताना माहिती बरोबरच म्हणी वाक्प्रचार यांचा देखील उपयोग आपण निबंधामध्ये केला पाहिजे. जो मी swami vivrkananda nibandh in marathi मांडत असताना केलेला आहे. दिलेला नमुनाच आपण स्वामी विवेकानंद निबंध लिहिताना जसाच्या तसा लिहिला पाहिजे असे नाही. तर आपण यातील बाबींचे निरीक्षण करून अतिशय छानपणे निबंध लिहू शकता.