स्वामी विवेकानंद यांचे शैक्षणिक विचार | swami vivekananda yanche shaikshnik vichar
आजच्या लेखात आपण स्वामी विवेकानंद यांचे शैक्षणिक विचार पाहणार आहोत.तसेच स्वामी विवेकानंद यांच्या शिक्षणविषयक विचारावर चर्चा देखील करणार आहोत.
12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आपण युवक दिन म्हणून साजरा करतो. या युवक दिनाच्या लेखमाले अंतर्गत आतापर्यंत आपण स्वामी विवेकानंदांची संपूर्ण माहिती , स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेले प्रेरणादायी विचार,स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन व स्वामी विवेकानंद निबंध अशी माहिती आपण मागील लेखात पाहिली. आजच्या या लेखातून स्वामी विवेकानंद यांचे शैक्षणिक विचार पाहूया. swami vivekananda yanche shaikshnik vichar सरळ, साध्या भाषेत पाहणार आहोत. आजच्या या स्वामी विवेकानंद शिक्षण विषयक विचार लेखातून नक्कीच आपला शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. प्रा. मिलिंद जोशी हे एक ख्यातनाम लेखक आहेत. त्यांचा स्वामी विवेकानंदांचे शिक्षण विचार हा लेख मनाला खूप भावला आणि म्हणूनच त्या लेखाच्या आधारे आज मी आपणाला स्वामी विवेकानंद यांचे शैक्षणिक विचार सांगणार आहे.
स्वामी विवेकानंद यांचे शैक्षणिक विचार |
स्वामी विवेकानंद शिक्षण माहिती (toc)
नरेंद्र ते विवेकानंद परिवर्तन | narendra te vivrkananda parivartan krnari ghatana
स्वामी विवेकानंद यांना नरेंद्र म्हणून ओळखले जात होते. परंतु कालांतराने स्वामी विवेकानंद म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले. या घटनेविषयी प्रा. मिलिंद जोशी म्हणतात,स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात नरेंद्र ते विवेकानंद परिवर्तन जे घडले त्यासाठी कारणीभूत घडलेला एक प्रसंग म्हणजे स्वामी विवेकानंद कोलकाता येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्राध्यापक हेस्टी नावाचे गृहस्थ स्वामी विवेकानंद यांना वर्डस्वर्थ ची इस्करशन ही कविता शिकवत होते. या कवितेमध्ये वर्णन केलेली रानावनातील शांतता अशा प्रकारची आहे की ती शांतता म्हणजे परमेश्वर आहे का? असा प्रश्न स्वामी विवेकानंद यांच्या मनामध्ये आला. विवेकानंदयांनी या जगात ईश्वर आहे का? असा प्रश्न त्यांच्या प्राध्यापकांना विचारला . सरांनी उत्तर दिले.मी देव आहे असे मानतो परंतु मी तो देव पाहिलेला नाही. त्यामुळे मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. जर या प्रश्नांची उत्तरे हवे असतील तर तू रामकृष्ण परमहंस या साधकांची भेट घे.असा सल्ला प्राध्यापकांनी स्वामी विवेकानंद यांना दिला. ज्यावेळी स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांना भेटले. त्या दोघामध्ये जो आध्यात्मिक संवाद झाला त्यानंतर विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले. या घटनेने नरेंद्राचे विवेकानंद झाले. खरोखरच माणसाच्या जीवनात कोणत्या वेळी कोणता टर्निंग पॉईंट येईल, हे आपण सांगू शकत नाही.जसा की स्वामी विवेकानंद यांच्या जीवनामध्ये आला.
@@स्वामी विवेकानंद अनमोल विचार
स्वामी विवेकानंद यांचे भारत भ्रमण | swami vivekananda Bharat bhraman
स्वामी विवेकानंद यांना रामकृष्ण परमहंस यांनी दीक्षा दिली. यानंतर स्वामी विवेकानंद अनेक गोष्टीवर चिंतन करू लागले.रामकृष्ण परमहंस यांच्या निधनानंतर स्वामी विवेकानंद यांनी भारत भ्रमण केले. एकेकाळी सुसंपन्न असलेला भारत परंतु त्याची आज वाईट दशा झाली आहे? यामागील कारणांचा शोध भारत भ्रमण करत असताना स्वामी विवेकानंद यांना लागला. भारतीय संस्कृतीला पाश्चात त्यांनी स्वीकारलेल्या विज्ञानाचा स्पर्श हवा. आणि आपल्याकडील सत्वशील वृत्तीचा युरोपीयनांना उपयोग व्हावा. थोडक्यात विश्वबंधुत्व किंवा जागतिकीकरण या अंगाने आपल्याला स्वामी विवेकानंद यांचा विचार करावा लागतो. स्वामी विवेकानंद यांनी सर्व धर्म संमेलनामध्ये मानव जातीच्या उत्थानासाठी काय केले पाहिजे? याविषयी मार्गदर्शन केले आहे.स्वामी विवेकानंद यांनी शिकागो धर्म परिषदेत जे भाषण केले त्या भाषणांमध्ये शिक्षणाबाबत काही विचार मांडलेले आहेत.
स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण विषयक विचार | swami vivekananda educational thought ,shikshan vaishayk vichar
स्वामी विवेकानंद यांनी शिक्षणातून खालील चार बाबी साध्य झाल्या पाहिजेत असे विचार मांडले.
१. चारित्र्य निर्मिती | charitrya nirniti
स्वामी विवेकानंद यांच्या मते चारित्र्य निर्मिती ही अनेक गोष्टीच्या संस्कारातून घडत असते. स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्यावेळी एखादा सोन्याचा दागिना घडतो त्यावेळी त्याला बनवणारा कार्यकार हा तेवढाच ताकतीचा असावा लागतो. विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवत असताना पालक आणि शिक्षक यांची जबाबदारी अतिशय महत्त्वाची आहे. विवेकानंद म्हणतात, मूल्यशिक्षण औषधाच्या गोळी सारखे बाहेरून देता येत नाही. त्यासाठी शिक्षकांनी आपले चरित्र उत्तम राखले पाहिजे. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मूल्य शिक्षणाचे शिक्षण दिले पाहिजे अशी भूमिका स्वामी विवेकानंद यांनी मांडली.
स्वामी विवेकानंद दहा ओळींचे इंग्रजी भाषण
२.शिक्षणातून मनाचे सबलीकरण | mnache sablikaran
स्वामी विवेकानंद यांच्यामध्ये दुर्बलता म्हणजे जिवंतपणे मृत्यू. म्हणून माणूस हा शिक्षणातून सबल बनला पाहिजे. संकुचितपणे माणूस वागतो,त्यावेळी त्याला खरे जीवन जगता येत नाही. कारण माणसाच्या जीवनामध्ये व्यापकता असणे अतिशय गरजेचे आहे. माणसाचे मन दुरुस्त होण्यासाठी शरीर तंदुरुस्त होत असले पाहिजे. शरीर निरोगी असेल तरच मन निरोगी असते असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे.
३. शिक्षणातून बुद्धीचा विकास | shikshnatun buddhicha vikas
एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये गुण मिळाले? म्हणजे तो हुशार असतो हे स्वामी विवेकानंद यांना मान्य नव्हते, घोका आणि ओका या परीक्षा पद्धतीने मुलांचा कधीच विकास होत नाही. मुलांचा खरा विकास करायचा असेल तर,म्हणजेच मुलांच्या बुद्धीचा विकास तर शिक्षणातून करायचा असेल तर परीक्षांना दिले जाणारे अवास्तव महत्त्व कमी केले पाहिजे असे स्वामी विवेकानंद यांचे ठाम मत होते. एका प्रश्नाची अनेक उत्तरे असू शकतात, म्हणून सध्या जे आपण वर्गामध्ये शिक्षण प्रणाली राबवत होती चुकीची आहे असे स्वामी विवेकानंद यांचे मत आहे. स्वामी विवेकानंद यांच्या मते शिक्षकाने केवळ पुस्तक शिकवणे अपेक्षित नाही तर जीवन कसे जगायचे हे देखील विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे. जय समस्येवर मात करण्याची ताकद शिक्षणातून आली पाहिजे अशी अपेक्षा स्वामी विवेकानंद शिक्षणाविषयी व्यक्त करतात.
४. शिक्षणातून स्वावलंबी | shikshnatun swawlambi
विवेकानंद यांच्या मते शिक्षणातून माणूस स्वावलंबी बनला पाहिजे.शिक्षणातून पोटाचा प्रश्न सुटला पाहिजे असे विवेकानंद म्हणतात, पुढे जाऊन शिक्षण माणसाला त्याचं पोट भरण्याचा सामर्थ्य देत असेल तेच खरे शिक्षण होय. ज्या शिक्षणाने माणूस स्वतःच्या पायावर उभा राहतो असे शिक्षण मिळायला हवे. विवेकानंदांचे त्याकाळी मांडलेले विचार आजच्या शिक्षण प्रणालीला देखील विचार करायला लावणारे आहेत , कारण का तर आज आपण बेरोजगार लोकांच्या फौज्याच्या फोदा पाहत आहोत. शिक्षणातून लोकांना रोजगार मिळत नाहीत. हे धडधडीत वास्तव टाळून चालणार नाही.
स्वामी विवेकानंद यांच्या विषयी संपूर्ण महाराष्ट्रभर व्याख्यानांच्या मदतीने स्वामी विवेकानंदांचे विचार घराघरापर्यंत पोहोचले असे प्राचार्य शिवाजीराव भोसले. आपल्या व्याख्यानात नेहमी म्हणत, चिमणीची पिले चाळीस दिवसात आकाशात भरायला घेतात. परंतु माणूस चाळीस वर्षाचा झाला तरी तो उत्कर्ष साधू शकत नाही. कारण चिमणीच्या पिलाला आलेले पंख हे आतून आलेले असतात. मला मिळालेल्या पदव्या ह्या बाहेरून लावलेल्या असतात. म्हणून माणसाला आतून ज्ञानाचे पंख देणारे शिक्षण मिळाले पाहिजे. आणि हीच भूमिका स्वामी विवेकानंद यांच्या देखील विचारांमध्ये होती.
स्वामी विवेकानंद यांच्या शैक्षणिक विचारांचे महत्त्व | swami vivrkananda yanchya shaikshnik vicharanche mahttva
आज जर आपण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार केला तर काही ठिकाणी रोजगार उपलब्ध आहेत.परंतु गुणवत्ता असणारी माणसे मिळत नाहीत. घोका आणि ओका हे शिक्षण प्रणाली मध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. शिक्षणातून मानव्याची प्रतिष्ठापना ज्यावेळी होईल त्यावेळी शिक्षणाचे ध्येय साध्य होईल असे स्वामी विवेकानंदांचे मान्य होते. आजच्या काळामध्ये स्वामी विवेकानंदांचे विचार शिक्षण तज्ञ अभ्यासक यांनी विचारात घेऊन त्या दृष्टिकोनातून अभ्यास क्रम तयार केले पाहिज त असे मला वाटते.
शिक्षणामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेदभाव स्वामी विवेकानंद यांना मान्य नव्हता. स्वामी विवेकानंद यांनी स्त्री शिक्षणासाठी देखील खूप मोठे योगदान दिले आहे.
स्वामी विवेकानंद यांचे शैक्षणिक विचार तत्वज्ञान,निष्कर्ष | vivekanadana educational thought philosophy
आजच्या स्वामी विवेकानंद यांच्या शैक्षणिक विचारांचे कन्क्लूजन काय? तर शिक्षण हे व्यवहारभिमुख व्हायला हवे. क्षणातून लोकांना रोजगार मिळायला हवा. शिक्षणातून माणूस हा मनाने सबल व्हायला हवा. आज किती तरी व्यक्ती मनाने खचलेल्या दिसतात. खरोखरच स्वामी विवेकानंद यांनी मांडलेले विचार त्या शिक्षण प्रणालीने स्वीकारणे अतिशय गरजेचे आहे. शिक्षणातून गुणवत्तेचा शोध गेला घेतला गेला पाहिजे. त्याचा शोध घेणे शिक्षकांचे काम आहे. असे स्वामी विवेकानंद म्हणतात.
आजच्या लेखाच्या माध्यमातून विवेकानंद यांचे शैक्षणिक विचार आपण पाहिले. शिक्षक विद्यार्थी यांनी या स्वामी विवेकानंद यांच्या swami vivrkananda educational though ला महत्व दिले पाहिजे. जर आपण स्वामी विवेकानंद यांच्या शिक्षण विषयक विचारांवर पुढे गेलो तर नक्कीच आपण एक दिवस आर्थिक महासत्ता बनू. कारण देशाचा विकास आणि रोजगार यांचा जवळचा संबंध आहे. तो संबंध जोडण्याचे काम स्वामी विवेकानंद यांनी आपल्या विचारांमध्ये केलेले आहे. व्यवहाराबरोबरच मानवता देखील वाढीस लागली पाहिजे हे देखील तितकेच महत्त्वाचे असे स्वामी विवेकानंद म्हणतात.
स्वामी विवेकानंद शिक्षण विषयक विचार व्हिडिओ | swami vivekananda shikashan vidhay vichar video
आजच्या लेखाच्या माध्यमातून आपल्याला जर स्वामी विवेकानंद यांचे विचार व्हिडिओ स्वरूपात ऐकायचे असतील तर आपण संदर्भासाठी हा व्हिडिओ पाहू शकता.
आमचा आजचा स्वामी विवेकानंदांचे शिक्षण विषयक विचार हा लेख आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा.पुन्हा भेटूया एका नवीन विषय असतो तोपर्यंत धन्यवाद!
FAQ