Type Here to Get Search Results !

मैत्री म्हणजे काय? | What is frienship marathi information

मैत्री म्हणजे काय? | What is frienship marathi information | मैत्री कशी असावी |friendship Kashi asavi|मैत्रीवर कविता | marathi poem in friend(friendship)|मैत्री विषयी शायरी | marathi quotes in friends 

आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी गरजेच्या असतात. आई वडील नातेवाईक यांच्यासोबत आपण सर्वच गोष्टी शेअर नाही करू शकत त्यासाठी गरजेचे असतात मित्र आणि मैत्रिणी. मित्र आणि मैत्रिणी असे ठिकाण असते ज्या ठिकाणी आपण आपली सुखदुःख अगदी मनमोकळेपणाने मांडू शकतो. रक्ताच्या नात्यांपेक्षाही जवळच काय असेल तर ती असते मैत्री. आजच्या लेखाच्या माध्यमातून मैत्री म्हणजे काय? What is friendship information in Marathi, या लेखाच्या माध्यमातून आपली मैत्री कशी असावी ? याची माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत. मैत्रीविषयी अप्रतिम कविता शायरी ही देखील आपण आज पाहणार आहोत. चला तर मग मैत्री म्हणजे काय ते आपण थोडक्यात पाहूया.

मैत्री म्हणजे काय 


मैत्रीचे महत्त्व (toc)

मैत्री म्हणजे काय? | Maitri mhanje kay | what is friendship

मैत्री म्हणजे काय...... यामध्ये आपण लिंगभेद करणार नाही. आयुष्य विचार मांडत असताना मैत्री संकल्पना आपण व्यापक अर्थाने पाहणार आहोत. मैत्री म्हणजे अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीला आपण आपली सर्व सुखदुःख सांगू शकतो.आपल्या जीवनात अशा काही टॉप सिक्रेट बाबी असतात. शक्यतो आपण त्या कोणाशी शेअर करत नाही परंतु मित्र किंवा मैत्रीण अशी जागा असते त्या ठिकाणी मात्र मित्र म्हणजे जणू आपला आरसा. आपण काय आहोत याचे  प्रतिबिंब त्याच्या मनामध्ये इतरांना देखील दिसत असते.म्हणूनच मित्राला आपली सावली देखील म्हटले जाते.


मैत्रीचे महत्व | maitriche mhattv

आपल्या जीवनामध्ये मैत्री अतिशय गरजेचे आहे. अगदी लहान वयापासून आपण जे काही घडत असतो ते आपल्या समवयस्क गटामुळे अर्थात आपल्या मित्रांमुळे. आपल्यामधील असणारे सुप्त गुण दाखवण्याचे काम मित्रच करत असतात. कधी कधी आपल्यातील अवगुण दाखवणारा देखील आपलाच मित्र असतो. एखादी गोष्ट करत असताना आपला आत्मविश्वास कमी झाला तर तो आत्मविश्वास वाढवणारा देखील मित्रच असतो. याची दुसरी बाजू देखील आहे बरं. नको असलेल्या सवयी लावणारा देखील आपलाच मित्र असतो.परंतु सारासार विचार केला तर असे म्हणता येईल की , व्यक्ती जे काही चांगले किंवा वाईट घडत असेल ती सर्व मैत्रीमुळे घडते. आपल्या जीवनामध्ये मैत्रीचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. ज्याचे जितके जास्त तो मित्र तितका नातेसंबंधांमध्ये श्रीमंत. असे मैत्रीचे महत्व आपल्याला सांगता येते.


मैत्री कशी असावी | maitri Kashi asavi 

मित्र कसा असावा त्याच पद्धतीने मैत्री देखील कशी असावी याविषयी सांगायचे झाले तर मैत्री ही दुधामध्ये विरघळलेल्या साखरेसारखे असावी. आपण आणि आपला मित्र यामधे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. मैत्री ही वेळप्रसंगी आपल्याला त्रास देणारी देखील असू शकते. निर्भय आनंद देणारी देखील मैत्रीच असते. ही मैत्री नेमकी कशी असावी हे एका कवितेच्या माध्यमातून बघूया.


मैत्रीवर मराठी कविता |friendship poem in marathi | मैत्रीवर आधारित चारोळी |friendship charoli in marathi| मैत्री शायरी| friend marathi shayari 

नेमकी मैत्री कशी असते हे एका मैत्रीवर आधारित मराठी कवितेतून पाहूया. मैत्रीचे महत्व सांगणारी कविता आपल्याला नक्कीच आवडेल. चला तर मग friendship poem in Marathi. मैत्रीचे महत्व सांगणारी ही कविता संकलित स्वरूपाची आहे. कवीची ही रचना असेल त्या कवीचे आभार.


         कविता मैत्री |friendship marathi poem 


मैत्री केली तर......

जात पाहू नका.....

आणि मदत केली तर.....

ती बोलून दाखवू नका ....


कारण कोणत्याही

बाटलीचा सील

आणि दोस्तांचा दिल

एकदा तोडला की

विषय संपला.


मित्र गरज म्हणून नाही

तर सवय म्हणून जोडा,

कारण गरज संपते पण

सवय कधीच सुटत नाहीत.


मित्र" नावाची ही दैवी देणगी

जीवापाड जपून ठेवा,

कारण..जीवनांतील

अर्धा गोडवा हा

मित्रांमुळेच असतो.


कोणीतरी विचारले

मित्रांमध्ये एवढे काय विशेष

नातेवाईकां पेक्षा त्यांना सांगितले,

मित्र हे फक्त मित्र असतात


मित्र सख्खे,चुलत,

मावस, सावत्र

असं काही नसते.

ते "थेट" मित्रच असतात.


मैत्रीचे धागे हे 

कोळ्याच्या जाळ्या पेक्षाही

बारीक असतात.

पण लोखंडाच्या तारेहुनही

मजबूत असतात.


मैत्रीचे धागे तुटले तर

 श्वासानेही तुटतील,

नाहीतर वज्राघातानेही

तुटणारच  नाहीत.


प्रत्येक दुखण्यावर

दवाखान्यात उपचार

होतातच असे नाही

काही दुखणी

कुटुंब आणि मित्र मंडळी

यांच्या बरोबर हसण्या आणि

खिदळण्यानेही बरी होतात.

 

माणसाने कितीही प्रयत्न केले तरी

अंधारात "सावली

म्हातारपणात "शरीर

आणि..आयुष्याच्या

शेवटच्या काळात "पैसा"

कधीच साथ देत नाहीत ,

साथ देतात ती

फक्त आपण जोडलेले

"जवळचे मित्र.


मित्र बोलवित आहे,

पण तुम्हाला जावेसे

वाटत नसेल तर..

समजा की तुम्ही म्हातारे झालात

म्हातारपण येवू न देणे

आपल्या हातातच आहे ना .

म्हणून मित्र जपा

सरते शेवटी ते तुम्हाला जपतील... 


कवी अज्ञात संग्रही कविता


 अशा पद्धतीने आजच्या लेखातून आपण मैत्री म्हणजे काय? आपल्या जीवनात मैत्रीचे महत्व, मित्र किंवा मैत्री कशी असावी तसेच मैत्रीवर आधारित कविता आपण पहिली.हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा.


आमचे हे लेख वाचा 

शिक्षण नेमके कशासाठी घ्यावे 

अध्यात्म व मानवी जीवन 

पैसा म्हणजे सर्व नाही 

आनंद कसा मिळवावा?  












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area