मकर संक्रांतीला पतंग का उडवला जातो? | Why flying kites on makar sankranti | मकर संक्रांतीला पतंग का उडवावी ? | Makar Sankrantila patang udavnya magil karane | Sankrantila patnag udvatat yamgil katha goshth
नवीन वर्षाची सुरुवात होताच मोठ्या धुमधडाक्यात जो पहिला सण साजरा केला जातो तो सण मकर संक्रांति. संक्रांतीच्या सणाला सगळीकडे आनंदी आनंद असतो. लोक एकमेकांना तिळगुळ वाटतात आणि तिळगुळ घ्या! गोड गोड बोला !अशा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतात. मकर संक्रांतीच्या सणाला महिला प्रचंड खुश असतात. रंगीबिरंगी साड्या नेसतात.महाराष्ट्र राज्यात मात्र काही ठिकाणी काळया रंगाची वस्त्रे परिधान केली जातात.असो शेतात पिकणारी अन्नधान्य व त्यांचा वाण म्हणून उपयोग करून पूजा करतात. निसर्गाचे आपल्यावरती असंख्य असणारे उपकार. त्याच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी ह्या वाणाच्या मदतीने संक्रांतीची पूजा केली जाते. संपूर्ण भारतभर मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महिला अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन भगवंताकडे अखंड सौभाग्याचे देणं मागतात. छान छान उखाणे घेतात.या दिवशी महिला खुश असतात. या दिवशी मुले,मुली मात्र प्रचंड खुश असतात कारण, त्यांना या दिवशी आकाशामध्ये उंच उंच पतंग उडवायला मिळत असतो.म्हणूनच संक्रांती विशेष या आजच्या लेखात आपण संक्रांतीच्या दिवशी पतंग का उडवली जाते? तसेच संक्रांतीच्या दिवशी पतंग का उडवावी? या मागील सर्व पार्श्वभूमी अभ्यासणार आहोत.
मकर संक्रांतीला पतंग का उडवला जातो ? |
मकर संक्रांती आणि पतंग (toc)
सहज मकर संक्रांतीच्या दिवशी पाहिलं तर मुले मोकळ्या मैदानामध्ये,गच्ची वरती पतंग उडवताना दिसत होती. मग मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की,संक्रांतीच्या दिवशी मुले रंगीबिरंगी पतंग का उडवत आहेत? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्याचा मन प्रयत्न करू लागले. या संदर्भात एक पुस्तक माझ्या हातात पडले. या पुस्तकांमध्ये मकर संक्रांतीला पतंग का उडवला जातो ? यामागील एक कथाच अगदी छानपणे सांगितले होते. उडवण्याला संदर्भ खूप जुना आहे. चला तर मग ही गोष्ट पाहूया.
मकर संक्रांतीला पतंग का उडवला जातो? याबाबतची एक दंत कथा | makar Sankrantila patang udvnya magil katha sabdrbh
मर्यादा पुरुषोत्तम ,एक बानी, एक वचनी एक आदर्श राजा म्हणजे प्रभू राम.राम यांच्या विषयी आपल्याला देखील बरीचशी माहिती असेल. पतंग उडवण्याशी देखील प्रभू राम यांचा जवळचा संबंध आहे. जसे वाल्मीक ऋषीने वाल्मिकी रामायण लिहिले.तसेच तमिळ भाषेत तंदनान या एका महान ऋषीने जे रामायण लिहिले. त्याला तंदनान रामायण म्हटले जाते.
तंदनान यांनी लिहिलेला रामायणामध्ये सर्वप्रथम राम यांनी पतंग उडवल्याबाबत उल्लेख आढळतो. राम ज्यावेळी भुताला वरती आपले अवतार कार्य करीत होते. एके दिवशी प्रभू राम आपल्या मित्र मंडळींना घेऊन आकाशात पतंग उडवत होते.काही अभ्यासकांच्या मते पतंग उडवण्याची सुरुवात राम यांनीच केली आहे. प्रभू राम यांनी जो पतंग उडवला तो पतंग खूप उंचावरती गेला. तो खूप उंचावर असताना त्याचा दोरा तुटून तो पतंग स्वर्गात जाऊन पोहोचला.
राम यांनी आपला पतंग शोधून आणावा यासाठी हनुमंत राया यांची नेमणूक केली.स्वर्गात आकाशाच्या दिशेने गेलेला पतंग अनेक देव देवतापैकी . इंद्राच्या सुनेला म्हणजे इंद्र पुत्र जयंताच्या पत्नीला एका उद्यानात सापडला. हा खूप उंचा वरती म्हणजे स्वर्गात गेलेला पतंग प्रभू रामाने मला तो हवा आहे? असे म्हणून मारुतीला तो पतंग आणण्यासाठी स्वर्गात पाठवले. पवनपुत्र हनुमान श्रीरामाच्या आदेशानुसार पतंग आणण्यासाठी वायु वेगाने स्वर्गात गेले.
मकर संक्रांती फक्त दहा ओळींचे भाषण
स्वर्गात गेल्यानंतर इंद्राच्या सुनेने सांगितले की , जर हा पतंग प्रभू राम यांचा असेल तर त्यांनी मला दर्शन द्यावे मगच मी त्यांना तो पतंग देईन.हनुमान प्रभू राम यांच्याजवळ आले. त्यांना ही सर्व हकीकत सांगितली.प्रभू राम यांनी इंद्रदेव पुत्र जयंतीच्या पत्नीला मी तिला चीत्रकुटात माझे दर्शन देईन. या अटीवर इंद्राच्या सुनेने तो पतंग प्रभू राम यांना परत केला. थोडक्यात पुराण कथेनुसर मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची सुरुवात प्रभू राम यांनी केली.
संक्रांतीला पतंग का उडवावी? | Sankratila patang ka udvavi ?
मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग का उडवावी? याविषयी आता वेगळे काही सांगण्याची आवश्यकता नाही. ज्या प्रभू आम्हाला सर्वजण मानत होते.त्या रामाने ज्या दिवशी पतंग उडवली तो दिवस म्हणजे मकर संक्राती. म्हणूनच आपण देखील प्रभू रामाच्या आठवणीत मकर संक्रांतीला पतंग उडवावी. ज्या प्रभू राम व त्यांनी चालवलेल्या राज्याला एक उत्तम राज्य म्हणून महात्मा गांधी यांनी या कलियुगामध्ये रामराजे यावे.असे उगीच म्हंटले न्हवते. प्रभू राम यांच्या स्मरणार्थ मकर संक्रांतीला पतंग उडवावी. अलीकडच्या काळामध्ये मुलांना आपली संस्कृती कळत नाही.पतंग उडवत असताना केवळ मुलांना पतंग आणून दिले. आपले काम संपले असे न करता. प्रभू रामचद्रांनी दिलेली शिकवण पतंग उडवत असताना आपण त्यांना द्यायला हवी.
मकर संक्रांतीला पतंग उडवावी यामागे शास्त्रीय कारण sankratila patang udavnya magil vaidnyanik karan / reason
मकर संक्रांतीला पतंग का उडवावी? या मागील आपण धार्मिक पार्श्वभूमी पाहिली. धार्मिक अंगानुसार प्रभू राम यांनी पतंग उडवली.पण आपण पतंग आजच्या काळात का उडवावी. पतंग उडवण्यामागे शास्त्रीय कारण म्हणजेच वैज्ञानिक कारण काय? हे खालील मुद्द्यातून आपल्या लक्षात येईल.
१.शरीराचा व्यायाम |shariracha vyayam
संक्रांतीचा सण हा कडाक्याच्या थंडीमध्ये असतो. माणसाचे संपूर्ण शरीर थंडीमुळे आकडत असते. आपण जर दररोज पतंग उडवायला गेलो तर आपल्या शरीराची हालचाल होते थंडीच्या दिवसात देखील आपला व्यायाम होतो.
२. ड जीवनसत्व | vitamin increase in makar sankranti
मकर संक्रातिच्या दिवशी पतंग उडवल्यामुळे आपल्याला ड जीवनसत्व मिळते. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश मिळत नाही. ज्यावेळी आपण पतंग उडवायला जातो त्यावेळी ड जीवनसत्व आपल्याला मिळते.
३.शरीराला उष्णता
आपल्या शरीराला थंडीचा सामना करता यावा, म्हणून आपण आपल्या शरीरावर काही काळ उन्हात थांबून शरीराला उष्णता द्यायला हवी. विनाकारण माणूस उन्हामध्ये थांबू शकत नाही, परंतु जर आपण पतंग उडवायला गेलो तर आपले उन्हाकडे ध्यान नसते.साहजिकच शरीराला त्या दिवसांमध्ये खूप उष्णता मिळते.असे वैज्ञानिक कारण पतंग उडवण्यामागे सांगता येईल.
४. शरीरातील रक्तप्रवाह
पतंग उडवल्यामुळे आपल्या शरीरात रक्त प्रवाह सुरळीत होतो.थंडीत आकडलेले स्नायू या पतंग बाजीमुळे मजबूत व्हायला मदत होते.
संक्रांतीला पतंग उडवण्यामागील मानसिक कारणे | patang udavnya magil psychological causes | patang ka udvavi manas shastriy karane
आपण मकर संक्रांतीला पतंग का उडवतो ? यामागे काही मानसिक कारणे देखील सांगता येतील. आकाशात पतंग उडवत असताना पतंग सहजासहजी हवेमध्ये जात नाही. हा पतंग उडवत असताना जे कष्ट घ्यावे लागतात,यातून मुलांना कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही याची कल्पना येते. कधी कधी आपला पतंग उंच आकाशात असतो ज्यावेळी कधीतरी आपला पतंग कापला जातो .यातून जीवनात तर संकटे येतच राहणार..... परंतु आपण त्याला घाबरून न जाता त्या संकटांचा सामना केला पाहिजे. हवा बंद असली आपला पतंग एकदा वरच्या हवेत गेला तर तो खाली येत नाही यातून हेच शिकायला मिळते की, आपण जर प्रचंड कष्ट घेतले तर मिळणारे फळ देखील सुंदरच असते यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचा छोट्या घटनेतून आपल्याला समजते.
थोडक्यात आज आपण मकर संक्रांतीला पतंग का उडवला जातो? तसेच मकर संक्रांतीला पतंग का उडवावा? याची अध्यात्मिक पार्श्वभूमी व मानस शास्त्राच्या दृष्टिकोनातून देखील मकर संक्रांतीला पतंग का उडवतात ? याची चर्चा सर्व अंगाने केली. आमचा आजचा मकर संक्रांतीला पतंग का उडवली जाते/ किंवा का उडवावी याची माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल.ही माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा. पुन्हा भेटू मकर संक्रांती विशेष लेखात तोपर्यंत धन्यवाद!
आमचे हे लेख वाचा
राजमाता जिजाऊ दहा ओळी इंग्रजी निबंध व भाषण