कॉपीमुक्त अभियान 2023 माहिती | copymukt abhiyan mahiti 2023
दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी म्हणजेच कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये कॉपीमुक्त अभियान राबवले जाणार आहे त्याबाबत शासनाचा निर्णय देखील 14 फेब्रुवारी 2020 रोजी पारित करण्यात आलेला आहे. या कॉपीमुक्त अभियान 2023 ची माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.यातून बोर्ड परीक्षेला कॉपी का करू नये हे आपल्याला समजेल.
कॉपीमुक्त अभियान 2023 माहिती |
महाराष्ट्र कॉपीमुक्त अभियान 2023 माहिती (toc)
कॉफिमुक्त अभियान अंमलबजावणीतील महत्त्वाच्या बाबी | copymukt abhiyan niyam
शासकीय यंत्रणा यांना कॉपीमुक्त अभियानासाठी जबाबदारी
१. संपूर्ण राज्यामध्ये होणाऱ्या दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात या दृष्टिकोनातून या वर्षी महाराष्ट्र शासनाने अतिशय अशी अशी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.
हॉल तिकीटावरील या बाबी तपासून पहा
क्लिक 👆
2. माध्यमांद्वारे कॉपीमुक्त अभियानाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे जास्त गरजेचे आहे. अशा सूचना करण्यात आलेले आहेत.
दहावी बारावी प्रश्नपत्रिका वाटप नवीन नियम
क्लिक करा 👆
3. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारची कॉपी होणार नाही यासाठी आवश्यक ती नियमावली कॉपीमुक्त अभियानामध्ये देण्यात आलेले आहे. परीक्षा केंद्रावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी केवळ बंदोबस्ताचे काम पार पाडावयाचे आहे.
कॉपीमुक्त अभियान विद्यार्थ्यांना सूचना
4. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष पेपर सुरू होण्याच्या वेळा अगोदर अर्धा तास हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
5. ज्या ठिकाणी कॉपी सारखे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी याची दखल घ्यावी.
पेपर वेळेत पूर्ण होण्यासाठी या टीप्स वापरा
क्लिक करा 👆
6. शाळा महाविद्यालय यांचे जे विद्यार्थ्यांसाठी असलेले ग्रुप आहेत या ग्रुप वरती विद्यार्थ्यांना कॉपी केल्यानंतर होणारे नुकसान याविषयी माहिती देण्याबाबत सूचना करण्यात आलेले आहेत. बोर्ड परीक्षा 2023 अतिशय व्यवस्थितरीत्या पार पाडावी हाच यामागील उद्देश आहे.
7. परिक्षा केंद्रावर पन्नास मीटरच्या आत जी व्यक्ती अनधिकृत असेल अशा व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही.
8. परीक्षा केंद्रापासून पन्नास मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवले जातील जेणेकरून प्रश्नपत्रिका झेरॉक्स करून त्या व्हायरल होऊ नये.
9. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मोबाईल फोन कोणत्याही परिस्थितीत अलाउड केला जाणार नाही.
10. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची संपूर्ण झडती घेतली जाणार आहे.
हॉल तिकीट वरील चुका कशा होतील दुरुस्त
क्लिक 👆
11. शाळेचे कर्मचारी शिपाई यांच्याकडून विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल.
12. यावर्षी भरारी पथके नेमण्यात आल्यामुळे ती भरारी पथके पेपर सुरू असताना अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांची झडती घेतील.
बाह्य संस्था आणि कॉपीमुक्त अभियान
13. परीक्षा कालावधीमध्ये अचानक स्क्वाड म्हणजेच भरारी पथक येणार आणि परीक्षा केंद्रावर कशा पद्धतीने कामकाज सुरू आहे याविषयी माहिती घेणार.
ही सर्व नियमावली वाचल्यानंतर आपल्या लक्षात आले असेल की महाराष्ट्र शासनाने दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2023 पूर्णपणे कॉपीमुक्त झाली पाहिजे यासाठी अतिशय कडक असे नियम केलेले आहेत.
परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी ही खबरदारी घ्यावी :
महाराष्ट्र शासनाने कॉपीमुक्त परीक्षा पार पाडल्या जाव्या त्यासाठी अतिशय काटेकोर नियमावली केलेली आहे.हे आपल्या ध्यानात आले असतीलच. आम्ही आपणास आवाहन करतो की, आपले परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या आदल्या दिवशी नीट पहा. पेपर सुरू होण्याअगोदर अर्धा तास परीक्षा केंद्रावर पोहोचा. जर शहरी भागात राहत असाल तर ट्रॅफिकचा विचार करा. पहिल्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात पालक वर्ग परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येत असतात आणि बऱ्याच ठिकाणी
दहावी बारावी बोर्डाचे वेळापत्रक एकदा जरूर पहा
क्लिक 👆
ट्रॅफिकच्या समस्या येत असतात.याचा विचार करून शक्य तेवढ्या लवकर आपल्या परीक्षा केंद्रावर पोहोचा.या वर्षी कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना उशीर आल्यानंतर परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमांवर पेपर फुटीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नका. बोर्ड परीक्षेच्या कालावधीमध्ये पेपर फुटी बाबत कोणताही संदेश आपल्याकडे आला तरी तो संदेश कोणाकडे फॉरवर्ड करू नका.नाहीतर आपण त्या गुन्ह्यामध्ये अडकू शकता. आपल्याकडून कोणत्याही प्रकारे बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्या. परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी आपले कंपास खिसे यांची झडती स्वतःच घ्या कारण एखादा कॉफीचा सहज राहिलेला कपटा देखील आपले प्रचंड नुकसान करू शकतो.
कॉपीमुक्त अभियान 2023 माहिती शासन निर्णय पीडीएफ | copymukt abhiyan mahiti 2023 paripatrak pdf
कॉपीमुक्त अभियान 2023 pdf DOWNLOAD
अशा पद्धतीने आपण कॉपीमुक्त अभियानाचा घटक बनावे ही अपेक्षा कॉफीसारख्या गैरप्रकारांना प्रोत्साहन देऊ नका. आपण वर्षभर अभ्यास केलेला आहे याची जाणीव असू द्या आणि आपल्याला बोर्डाची परीक्षा अतिशय सोपी जाणार आहे या वातावरणामध्ये रहा.पुन्हा भेटूया नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!
आमचे हे लेख वाचा
rte मोफत प्रवेश अर्ज कसा भरावा