मराठी भाषा गौरव दिन भाषण निबंध 2023 | marathi bhasha gaurav din bhashan nibandh |marathi bhasha gaurav din marathi speech
मराठा तितुका का मेळवावा
महाराष्ट्र धर्म वाढवावा
आहे तितुके जाताना करावे
पुढे आणिक मिळवावे
महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे
या ओळी वाचल्यानंतर मातृभाषा आपल्या जीवनामध्ये किती स्वाभिमानाची बाब असते याची कल्पना आपल्याला येते. मराठी भाषेबद्दल चा स्वाभिमान आणि अभिमान व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मराठी भाषा गौरव दिन होय. हा मराठी भाषा गौरव दिन आपण 27 फेब्रुवारी रोजी साजरा करतो. आजच्या लेखात मराठी भाषा गौरव दिन भाषण निबंध आपणासाठी घेऊन आलेलो आहोत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जे विविध कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांमध्ये आपण नक्कीच आजच्या marathi bhasha gaurav din bhashan nibandh या माहितीचा उपयोग करू शकता.बोर्ड परीक्षेत मराठी भाषा दिनाची बातमी यावर बऱ्याचदा देखील प्रश्न विचारला जातो.
मराठी भाषा गौरव दिन भाषण निबंध 2023 |
मराठी भाषा गौरव दिन भाषण (toc)
मराठी भाषा गौरव दिन भाषण निबंध 2023 | marathi bhasha gaurav din bhashan nibandh
मराठी भाषा गौरव दिन भाषण आणि निबंध मांडणी करत असताना भाषणाची सुरुवात वगळता बाकी सर्व माहिती आपण निबंधामध्ये जशीच्या तशी लिहू शकता. चला तर मग मराठी भाषा गौरव दिनाच्या भाषणाला सुरुवात करूया.
मराठी भाषा गौरव दिनाचे भाषण | marathi bhasha gaurav dinache bhashan
नमस्कार! आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित मान्यवर तसेच माझे गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो! सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! आज मी मराठी भाषा गौरव दिनाच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये मराठी भाषेबद्दल तिच्या अभिमानाबद्दल आणि स्वाभिमानाबद्दल माझे जे विचार मांडणार आहे ते विचार आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.
माझा मराठीची बोलू कौतुके
परी अमृता तेही पैजा जिंके
असे मराठी भाषेविषयीचे गौरव उद्गार संत ज्ञानेश्वर यांनी काढले खरोखरच अमृता पेक्षाही गोड असणारी भाषा म्हणजे मराठी भाषा. आज मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. आज 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिन. मराठी भाषा साता समुद्रा पल्याड जावी. मराठी भाषेने सांस्कृतिक वारसा घराघरांमध्ये पोहोचावा मराठी भाषा ज्ञान भाषा व्हावी. यासाठी कुसुमाग्रज यांनी प्रचंड मेहनत घेतली. या त्यांच्या मेहनतीचे चीज व्हावे म्हणूनच त्यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा करतो.
कुसुमाग्रज यांनी साहित्य क्षेत्रात दिलेले योगदान हे अजरामर योगदान आहे. त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला साहित्यामध्ये सर्वोत्कृष्ट समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता यातूनच साहित्यिक उंची आपल्या ध्यानात येते. कुसुमाग्रज यांनी विशाखा, जीवनलहरी, किनारा यासारखे अप्रतिम असे काव्यसंग्रह रचले. कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर यांचे नटसम्राट नाटक आजही प्रेक्षकांच्या ध्यानात आहे.आजही त्यांच्या या नाटकाचे शो हाउसफुल होतात. कविता नाटक याचबरोबर कल्पनेच्या तीरावर, वैष्णव यासारख्या कादंबऱ्यांच्या निर्मितीतून त्यांनी मराठी भाषेची सेवा केली. असे ला गौरवाचे स्थान मिळावे यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत केली.
आज आपण पाहतो की परकीय भाषा लोकांच्या डोक्यामध्ये एक वेगळाच प्रभाव टाकताना दिसत आहेत. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाले तर आज बरीच मुले मातृभाषा मराठीतून शिक्षण न घेता इंग्रजी सारख्या परकीय भाषेतून शिक्षण घेण्याकडे पालकांचा कल दिसत आहे. अनेक शिक्षण तज्ञांनी तर भविष्यात यामुळे प्रचंड सर्जनशीलता नष्ट होईल अशी भाकिते केली आहेत आणि खरोखरच ही विचार करायला लावणारे आहेत. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपण एवढा संकल्प करूया मी परकीय भाषांचे ज्ञान घेईन परंतु त्याच्या जोडीला माझी मातृभाषा मराठी हिचा देखील गौरव करेन.
मराठी आमची आन-बान नि शान आहे
आमची मातृभाषा मराठी
याचा आम्हाला अभिमान आहे
आमचा अभिमान स्वाभिमान
सर्वकाही मराठी आहे.
का ज्यावेळी आपण घेऊ त्यावेळेस आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा केला असा त्याचा अर्थ होईल. बोलून मी माझे लांबलेले मराठी भाषा गौरव दिनाचे भाषण थांबवतो जय हिंद! जय महाराष्ट्र!
मराठी भाषा गौरव दिन निबंध | marathi bhasha gaurav din nibandh | marathi bhasha gaurav din essay in marathi
मराठी भाषा गौरव दिनाचा निबंध लिहीत असताना आपल्याला कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी जे कार्य केलेले आहे या कार्यावर प्रकाश टाकावा लागेल. बरोबर आजच्या काळात परकीय भाषा प्रादेशिक भाषांवर कशा पद्धतीने आक्रमण करत आहेत याविषयी देखील मांडणी करावी लागेल. मराठी भाषा गौरव दिन भाषणामध्ये जे मुद्दे घेतलेले आहेत तेच मुद्दे आपण या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिनाचा निबंध लिहीत असताना नोंदवू शकता. तिला भाषणाची सुरुवात करत असताना ही सुरुवात आहे ती सुरुवात निबंध लेखनामध्ये या पद्धतीने करण्याची आवश्यकता नाही. त्यात भाषणात दिलेली माहिती हेच माहिती जरा वेगळ्या पद्धतीने मांडणे म्हणजे मराठी भाषा गौरव दिनाचा निबंध लिहिणे हे आपल्या ध्यानात आले असेल.